रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

!! कुंडलीतील ज्योतिष योग (के. पी. पद्धती) !!

!! श्री स्वामी समर्थ !!
एकंदरीत विचार केला तर ज्योतिष शास्त्राचे बरेच संशोधन अगदी अलीकडील काळात के पी. पद्धतीने झाले आहे आणि त्यास नियमाच्या आधार आहे. लोकांना फार प्रश्न पडतात, ज्योतीषांस आपली कुंडली चांगली माहिती असते हो..!!. एखादे जाताकास रत्न सुचविले कि लागलेच आमच्या बोटाकडे लक्ष ठेवतात कि आम्ही रत्न घातले आहे कि नाही.. अशा “जातक कथा” खूप आहे, नित्य अनुभव येतो. असो..
‘जोतिष योग’ कुंडलीत पालक लहानपणी कोणीच विचारीत नाही, फक्त doctor, engineer, software हे योग पाहतात. परंतू ज्योतिष योग हा वारसाने परंपराने कधी कधी default येतो. असेच एक प्रभावी व्यक्तिमत्व असणारे आमच्या क्षेत्रातील श्री पुरोशात्तम कोराणे यांची कुंडलीत “ज्योतिष योग” पाहू, ८ ऑगस्टचा श्रावणी सोमवार १९७७ दिवशीचा यांचा जन्म आणि तोच योग या ८ ऑगस्टला श्रावणी सोमवारी निमीत्ताने आला आहे. सर्वाना कळवा या दृष्टीकोनातून याच्या कुंडलीत ज्योतिष योग पाहूया.
नियम: जर प्रथम भावाचा(व्यक्तिमत्व) उप स्वामी (सब) गुरु, चंद्र, शनी अथवा केतू असून जर तो १, ५, ९, अथवा १२ भावाशी संबधित असेल तर जातक हा ज्योतिष शास्त्राकडे वळतो.
या कुंडलीत प्रथम भावाचा सब हा गुरु (विद्या) असून तो ५ पंचमेश (धर्म त्रिकोण) असून पंचमात (कतू – मंत्र विद्या) आहे गुरु हा अष्टम स्थानी (परंपराने वारसेने) असून गुरुची १२ स्थानावर दृष्टी आहे. प्रथम स्थानी वृश्चिक रास (संशोधक रास/प्रक्टिकल) असून यामध्ये नेपच्यून (गूढ शास्त्राचा द्योतक असून वाचासिद्धी देणारा ग्रह असून) केतू हा मीन रास (अध्यात्मिक अनुभव) त्यामुळे हे ज्योतिष आहेत.
यात तृतीय भावाचा (लिखान) सब हा बुध (लिखाण कारक प्रभावी/बुद्धीला पटणारे) असे असून बुध हा लाभेश (परिपूर्णता) आहे. शनी नवमं स्थान हे भाव सदर जाताकास प्रभावी ठरतात. याच प्रकारे माझ्या कुंडलीत देखील वृश्चिक लग्न असून मिथून रास आहे तर कर्क राशीचा गुरु नवम भावी आहे. या निमित्ताने पुरोशात्तमजीना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!!
!! शुभम भवतु !! गुरुदेव दत्त..!!


गुरु पालट (गुरूचा कन्या राशीत प्रवेश)

!! श्री स्वामी समर्थ !!
गुरु महाराज ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. “गुरु मला कितवा आहे, कसा आहे” अशी सध्या रोजी विचारनी सुरु असते. ज्योतिष शास्त्रातील काही माहित असो अथवा नसो परंतू पूर्वी पासून कोणाकुडून ऐकत असलेला हा ज्योतिषास चीमटभर भाग सर्वांना माहित असतो अथवा जाणून घेण्याची उत्सुकता हि असते. त्यात मग ४, ८, आणि १२ हे खडतळ, त्रासदायी, कष्टप्रद असा असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १२ वा गुरु मुलीच्या विवाहास अडचणी देणारा, ‘गुरुबळ’ नाही, अशी माहीती लोकांमध्ये प्रचलित आहे कि ते समजाविणे आता कठीण आहे. माझ्या ब्लोगवर माझ्या एका ज्योतीष मित्राच्या बहिणीस १२वा गुरु सुरु असताना विवाह झाला आहे व त्या पत्रिकेचे विश्लेषण देखील मी केले आहे. असो.. अहो..!! कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीत दशास्वामी काय परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८ गुरु सुरु असेल तर कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, १२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो. गुरु भक्तीची वाढ निर्माण करतो. गुरूचा कन्या राशीतल प्रवेशा समयीच “ श्री नृसिंह स्वामी महाराजांनी” आपले अवतार कार्य संपून श्री शैल्यास निघून गेले. कन्यागत गुरु म्हणजे “गंगा-कृष्णा” भेटपर्व असा उत्सव श्री क्षेत्र वाडीस सुरु होणार आहे असा योग १२ वर्षांनी येतो. मग या ४ ८ आणि १२ गुरूचा आपण कसा परिणाम भोग्याचा याची तयारी तुमची तुम्ही थोड्याफार प्रमाणात करू शकता...!!! बाकी शेष स्वामी महाराजावर सोपवावे... गुरुविण मज कोण दाखवील वाट ...!!!


बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

ज्योतिषशास्त्र

!! श्री स्वामी समर्थ !!
पाच वेदांगापैकी ज्योतिष एक वेदांग आहे. ज्योतिषाचा अनुभव हा येतो. यासाठी हवी असते आपली श्रद्धा व अध्यात्मिकता. आयुष्यातील घटना या लिखित आहे त्यात तुमच्या कर्माचा आधार असतो आणि त्याप्रमाणे फळ मिळते. सध्या प. प. टेंबे स्वामीनि रचित मंत्र साधना पोस्ट करत आहे. शंकाखोराना त्याचा लाभ मुळीच होणार नाही. मंत्रात प्रचंड ताकद असते हे माझ्या अनुभवांनी सांगत आहे. कुठलाही मंत्र हा तुमच्या प्रयत्न कर्माला साथ देणारा असतो. आजारी व्यक्तीने डॉक्टरचा सल्ला औषधी घेणेच भाग पडते मग मंत्र आत्मबल वाढेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक वाक्य सर्वांना माहित आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." तर मग कुणाच्या पाठीशी आहे स्वामी...!! जो कि सातत्याने प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे रत्न व यंत्र यांचा देखील उपयोग होतो. रत्न हे तुमच्या प्रयत्नाला संधी निर्माण करतात. तुमचे भाग्य बदलत नाही. शास्त्राची किती आहारी जायचे ते आपणच ठरवावे. नाही तर रात्री न्यूज च्यानलवर "Yes I can change" म्हणारे भरपूर ज्योतिष झाले आहे. प्रथम साधक व्हावे लागेल. मन-बुद्धी-अंतकरण शुद्ध होईल तरच उपाय हे उपयोगी पडतील. खोटे, फसवणूक करणारे, ब्ल्याक मार्केटिंग करणाऱ्याच्या हातात केवळ रत्न दिसतील पण अशा लोकांना मंत्राचा उपयोग होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
गुरुदेव दत्त..!!