गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

शासक ग्रहांची किमया (रुलीग प्लानेट)

!! श्री स्वामी समर्थ !!

कृष्णमूर्ती पद्धतीत शासक ग्रहांना (रुलीग प्लानेट) यक्षनीची कांडी (मँजिक) म्हटले आहे.  तत्कालीन प्रश्न देखिल सहजपणे सोडवता येतात. माझ्या घरात चुलत भावाची पत्नी गरोधर आणि साधारण ९ महिने पूर्ण झाले त्यामुळे बाळाचे आगमन कधी होणार हा कुतूहलाचा विषय तर होताच परंतू आम्ही दत्त-स्वामी भक्त या वर्षी माझे दत्त गुरुचरित्र पारायण दत्तजयंती मध्ये होणार की नाही कारण पुढील १० दिवस वृद्धी पडेल आणि १३ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दर वर्षीचा आपला हा नियम या वर्षी खंडीत होतो की काय असे वाटत होते. त्यामुळे २९/११/२०१६ मंगळवारी सहज दुपारी माझ्या सौभाग्यवतीने कुंडली मांडण्याचा आग्रह धरला आणि ठोकळा कुंडली मांडत दु. २:४८ रुलिंग प्लानेटची नोंद घेतली.

२९/११/२०१६ दु. २:४८
L:  (मीन) गुरु
LS:   बुध
S:  (अनुराधा) शनी (केतू)
R:  (वृश्चिक) मंगळ
D:  (मंगळवार) मंगळ

डॉक्टरने पुढील ६ ते ७ दिवस वाट पाहण्यास सांगितले त्यामळे एक आठवडा असल्याने उत्तर लगेच मिळाले होते की प्रसृती ही गुरुवारी होणार परंतु रुलिंग मध्ये बुध आहे आणि शनी देखिल आहे त्यामुळे शनिवार हे देखिल उत्तर असू शकते. पुन्हा चंद्राचे गोचर पाहिले तर गुरुवारी (गुरु) मुळ नक्षत्र (केतू) असून सकाळी साधारण १० ते १२ पर्यंत मकर (शनी) लग्न सुरु होते (हे सर्व ग्रह रुलींगमध्ये आहे) त्यामुळे या दरम्यानच घरी मुलगी येईल असे भविष्य केले. डॉक्टरकडे रुटीन चेक-अप करण्यास बुधवारी गेले असता त्यांनी शनिवार पर्यन्त थांबण्यास सांगितले. परंतू प्रसृती वेदना ह्या गुरुवारीच सकाळी सुरु झाल्या आणि ठीक ११:३० मी. नॉर्मल प्रसृती होऊन मुलगी झाली आणि माझी भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी आता ७ दिवसाचे नाही परंतू ३ दिवसचे गुरु चरित्राचे पारायण करू शकेल. माझा हा वार्षिक नित्यनियम जणू काही दत्त महाराजांनी सांभाळला हे मात्र नक्की.. !!! ज्योतिष शास्त्राचे अनुभव हे नित्य येतात त्यातच स्वामी महाराजाची साथही मिळत असते. वेळे अभावी मात्र त्याचे कुंडली विवेचन किंवा लेख हा ब्लोग वर मांडणे अवघड होते. असो..!!


!! शुभम् भवतु !!

Preview