!!
श्री स्वामी समर्थ !!
मागील
बऱ्याच लेखात मी प्रश्न कुंडलीचे महत्त्व सांगितले आहे आणि हरवलेल्या जातकाची केस देखील
प्रश्न आणि जन्म कुंडलीने आपण पाहिली आहे की उत्तरला किती समीपता येते. लक्षात घेतले
पाहिजे कि जन्मकुंडली हा जीवनाचा पूर्ण आराखडा आहे त्यात जन्मापासून ते मरणापर्यंत
जीवनाच्या घटना दर्शवित असेतच मग विवाह, नौकरी, आथवा संतती याचा देखील आढावा घेता
येतो. परंतु चालू जीवनात तत्कालीन प्रश्न उद्भवतात त्यावेळी केवळ प्रश्नकुंडलीच
फार समीप उत्तर देऊ शकते. २३ मे २०१९ रोजी
मला एका पुणेस्थित जातकाने प्रश्न केला आणि प्रश्न कुंडलीची माहिती त्यांना
असल्याने प्रश्नकुंडलीच मांडावी असे ते म्हणाले. हे ज्या क्षेत्रात काम करतात
त्यात पूर्णत: अगदी १००% हे लेबरवर (कामगारावर) अवलंबून आहे आणि त्यांचे सर्व
कामगार टीम साधारण दीड तो दोन महिन्यापासून सुटीवर होते, ती सर्व उत्तर भारतातील
होती त्यांचा फोन-मोबिईल कुठलाच संपर्क होत नव्हता, आणि जातकाचे शिक्रापूर येथील काम
हातातून जाईल अशी त्यांना भीती वाटू लागली, काम मोठ होत, १५ दिवस सुट्टी म्हणून गेलेले
कामगार दीड महिना झाला तरी संपर्कात नाही म्हणून काळजी वाटू लागली आणि त्यांनी मला
पुढील प्रश्न केला. (कुंडली आणि whatsapp
चा त्यांचा feedback
अभिप्राय देखील मी दिला आहे).
“मुले वेळेत येऊन शिक्रापूर चे काम
आपल्याला मिळेल ना ? मुले नाहीत म्हणून हातातून जाणार नाही
ना?”
प्रश्न
होरारी tossing पद्धतीने नंबर #१०३ घेऊन, दि. २४/०५/२०१९ वेळ ९:५८:५१ रोजी, स्थळ:
औरंगाबाद आणि प्रश्नकुंडली मांडली. कुंडलीत लेबर, नौकर, अथवा कामगार हे ६ व्या
स्थानावरून पाहतात.
नियम:
जर ६ भावाचा सब हा जर ६-१०-११ पैकीचा कार्येश असून याच भावाच्या दशा-अंतरदशेत हे
कामगार कामावर रुजू होतील.
६
व्या भावाचा सव हा शनी (सेवाधारी) असून त्यचे बलवान कार्येश पाहूया.
SATURN*
: -4 6
7 5(cuspal) (Conj-KET 4 (JUP 4
))(Asp-RAH 10 (MER 9 2 11 ))
2-Star-Lord
is VEN: 8 3
3-Sub-Lord
is KET: 4 (JUP 4 ) 5(cuspal) (Conj-SAT
4 6
7 )
4-Star-Lord of SubLord is VEN: 8 3
शनी
हा २-६-१०-११ या सर्व भावांचा कार्येश आहे यामुळे लेबर लोक कामावर परततील हे सिद्ध
झाले.
१०
भावाचा (कर्म स्थान) सब गुरु आहे
JUPITER
: - 4(cuspal)
2-Star-Lord
is MER: 9 2 11 (Conj-SUN 9 1)
3-Sub-Lord
is JUP: 4(cuspal)
4-Star-Lord of SubLord is MER: 9 2 11
(Conj-SUN 9 1)
गुरु
बुधाच्या नक्षत्रात २-११-१, २ (धन) १-११ (जातकाची ईछपुर्ति होणे) त्यामुळे जातकाचे
शिक्रपुरचे काम जाणार नाही..हे हि निश्चित झाले, तर मग हे लेबर कधी येतील त्यासाठी
दशा स्वामी पाहूया.
चंद्र-मंगळ-गुरु
हि दशा २३-०५-२०१९ पासून ते ६-०६-२०१९ पर्यंत आहे.
चंद्र
हा स्वतःच्या नक्षत्रात असून मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ -१० आहे आणि मंगळ आणि
गुरु हे दोन्ही ग्रह २-६-१०-११ चे बलवान कार्येश आहेत त्यामुळे वरील कालावधीत लेबर
येतील असे सांगितले आणि २८/०५/२०१९ रोजी ३ मुल आली आणि बाकीची सर्व मुले ४/६/२०१९
रोजी येणार आहेत असे त्यांनी कळविले. असे ग्रह-नक्षत्र एका ज्योतिषाला अडचणीत
असणाऱ्या जातकाचा प्रश्न सोडविण्यास मदत करतात त्यातच स्वामी महाराज वाचेला साथ
देतात हे हि त्रिवार सत्य...