मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गुरु पालट २०१९



!! श्री स्वामी समर्थ !!
दि.4-11-2019 रोजी सोमवारी उत्तर रात्री म्हणजे उजाडत्या मंगळवारी पहाटे ५ वाजून १८ मिनीटांनी गुरू धनू राशीत प्रवेश करतो आहे. याचा पुण्यकाल सोमवारी मध्यरात्री नंतर ३-२७ ते मंगळवारी सकाळी ७-०९ पर्यंत आहे. या कालावधीत गुरूचा जप केला तर खूप लाभदायक असेल.
याचे सर्वसामान्य फल पहाता.
सिंह-मकर-मीन--: या राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने येत असूनही "चिंता" असेल.पुण्य काळात जप दान पूजा केली असता शुभता प्राप्त होईल.सुवर्ण पादाने येणारा हा गुरू शुभ असतो.
वृषभ-कन्या-धनु---:
या राशींना रोप्य पादाने येत असून याचे फल शुभकारक असेल.
मेष-कर्क-वृश्चिक---:
या राशींना ताम्र पादाने येत असून याचे फल श्रीप्राप्ती आहे.
मिथुन-तुला-कुंभ -----:
या राशींना लोह पादाने येत असून याचे फल "कष्ट" असे आहे.
या गुरूपालटाची राशीगत फलादेश आपण थोडक्यात पाहू!
मेष:--शुभदायक असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.नोकरी, प्रमोशन, बदली,विवाह तसेच, व्यवसायात येणारे आडथळे दूर होतील. धार्मिक कार्य संपन्न होतील.सामाजिक कार्यात यश प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून आनंद प्राप्त होईल.
वृषभ:--हा गुरूपालट वृषभ राशीच्या लोकांना ही लाभदायक असेल.
तरुणांना मनोवांछित यश मिळेल.शिक्षण नोकरीत प्रगती होईल.
मात्र प्रवासात दगदग होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. क्वचित प्रसंगी एखाद्या घटनेमुळे मानसिक संताप , अकस्मात खर्च व व्यापारात नुकसान होण्याची शक्यता असते.
मिथुन:--येणाऱ्या काळात या गुरूपालटा मुळे दगदग व कष्ट जास्त करावे लागतील. परंतु अथक परिश्रम केल्याचे फल निश्चितच मिळेल.व्यापार व्यवसायात भरभराट होईल.आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा होईल. वैवाहिक सौख्य व कौटुंबिक आनंद प्राप्त होईल. संततीसौख्य मिळेल.
कर्क:--हा गुरूपालट या राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्ती करून देईल.कर्ज परतफेड होईल.नोकरी व व्यवसाय यातून धनलाभ होईल.मात्र याचबरोबरीने आपली उन्नती न पहावल्याने आपणास त्रास देणारी मंडळी आसपास असतील.कधीकधी एखाद्या घटनेमुळे मन अशांत होईल.येत्या वर्षभरात आपणास आरोग्यासाठी खास लक्ष द्यावे लागेल. शरीरातील जाडेपणा वाढेल.पोटाचे विकार संभवतील.
सिंह:--या राशीच्या लोकांना सर्व काही उत्तम असूनही मनाला कसली तरी चिंता लागून राहिलेली असेल. सहसा या राशीपासून समाधान लांबच असते.मात्र आगामी वर्षात या जातकांना कौटुंबीक, वैवाहिक तसेच कार्यक्षेत्रातील सुख आनंद मिळणार आहे फक्त त्याला जवळ करणे न करणे हे यांचे मनावर अवलंबून आहे.
सकारात्मक दृष्टीने पाहिले तर नोकरी, व्यवसाय, संतती आर्थिक स्थैर्य आदी सर्वांगाने हे वर्ष लाभदायक असणार आहे.
कन्या:--या राशीच्या लोकांना हा गुरूपालट उत्तम आहे. परदेशगमन स्वतःचे नवीन घर तयार होणे,नवीन नोकरी लागणे.लग्न जमणे वगैरे गोष्टी घडू शकतात. मात्र या लोकांनी नेहमी आर्थिक बाबतीत आगामी काळात सतर्क राहावे.फसवणूक व नुकसानीची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. घरातील इतर लोकांच्या समस्या मुळे मनःशांती भंगण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आजच्या भागात आपण #मेष ते #कन्या राशींना या गुरूपालटामुळे काय अनुभव येऊ शकतात हे थोडक्यात व ढोबळ मानाने पाहिले. उद्याच्या भागात #तूळ ते #मीन राशीबाबत पहाणार आहोत शिवाय गुरूचा जप दान पूजा याविषयीही मार्गदर्शन देण्यात येईल.
मित्रांनो ! मागच्या भागात आपण मेष ते कन्या राशींच्या जातकाला हा गुरूपालट काय फले देऊ शकेल याचे अंदाजे विश्लेषण पाहिले. मित्रांनो खरे पाहिले असता #गुरू हा सर्वात शुभ ग्रह आहे. याचे #बल मिळते म्हणूनच प्रत्येक जातकाचे भाग्य उजळत असते. शत्रूच्या राशीत गुरू भ्रमण करत असेल किंवा गुरूचा शत्रू ग्रह हा गुरूच्या राशीत भ्रमण करत असेल तेंव्हाही गुरूची फले तितकी त्रासदायक मिळत नाहीत. दोन वाईट माणसे एकत्र असतील तेंव्हा एखाद्याला ते खूप त्रास देतील.पण एक सज्जन व एक वाईट माणूस एकत्र असतील तर सहसा तेवढा त्रास देऊ शकत नाहीत.सज्जन माणूस दुसऱ्याला एकतर विरोध करेल अथवा त्याला त्या कर्मात कुठलीही साथ देणार नाही. गुरू कोणत्याही राशीत घरात कोणत्याही क्रूर ग्रहाबरोबर जरी असेल तेंव्हा तो तुम्हाला निश्चितच सांभाळून घेईल याची खात्री बाळगा ! फक्त एक गोष्ट मात्र कधीच विसरू नका की गुरूला अध्यात्मिक व धार्मिक माणूस फार प्रिय आहे.
आता आपण बाकीच्या राशीबाबत पाहू या !
(७):-तूळ :--लोहपादाने या राशीला गुरू येत असल्याने या जातकांना हा काळ खूप कष्टाचा जाईल.एखाद्या स्थानी ठरवलेले एखादे काम लवकर होणार नाही. तिथेच आडकले जाऊ शकते. नोकरीत समस्या निर्माण होऊन पदावनती किंवा जाँब जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय धंद्यात आडचणी निर्माण होऊन कर्जबाजारी होण्याचीही वेळही एखाद्या जातकावर येऊ शकते. उत्पन्न कमी खर्च जास्त तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील.आतापर्यंत हा गुरू आपणास बरेच शुभ फले देऊन गेलेला असून इथून पुढे जरा सतर्क राहाण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.
(८):-वृश्चिक---हा गुरूपालट कठीण प्रसंगातून जाणाऱ्या वृश्चिक जातकांना जरा दिलासा देणारा असेल.
ताम्र पादाने पैसा घेऊन आपल्याकडे हा गुरू येत आहे. पैसा कसा प्राप्त करायचा हे आता आपल्या कर्मावर अवलंबून असेल. नोकरीत बढती,अपेक्षित ठिकाणी बदली ,नवीन जाँब,व्यवसायात प्रगती,
वैवाहिक सौख्य, उत्तम भोग व सुखप्राप्ती हे अनुभव येणार आहेत.
आळस झटकून टाका ! निराशा सोडून सकारात्मक व्हा! जोमाने व आत्मविश्वासाने कामाला लागा! गुरूला अपेक्षित वागणूक आचरणात ठेवा!
(९):-धनु:---हे गुरूचे भ्रमण आपल्या धनू राशीत होत असल्याने.हळूहळू स्थीरता मिळण्यास सुरूवात होईल.हा गुरू रौप्य पादाने आपणाकडे काही चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. आतापर्यंत झालले नुकसान पुढील काही दिवसात भरून निघण्याची शक्यता आहे.
नवीन जाँब,विवाह,याचे योग येतील.आर्थिक स्थैर्य लाभेल. मनाची उद्विग्नता कमी होऊन जोडीदाराशी संबंध सुधारतील.प्रेमविवाह सफल होतील.तरुणांना स्फूर्तिदायक स्थिती अनुभवायला मिळेल. मात्र याचबरोबर निरर्थक भीती वाटेल व्यवसायात धास्ती वाटेल.वादविवादाचे प्रसंग येतील.कधीकधी आर्थिक आवक घटल्यामुळे बुद्धी व विवेक यावर नियंत्रण राहाणार नाही. यासाठी रागावर नियंत्रण व काटकसर याचा अवलंब करावा.मूळ नक्षत्रातील जातकांचा त्रास हा काही काळानंतर कमी होईल.मूळ नक्षत्रातील जातकांनी खूपच संयमाने व शांततेने वागण्याची गरज आहे. विशेष करून वैवाहिक व आर्थिक बाबी हाताळताना सतर्क राहिले पाहिजे! राशीस्वामी #गुरूचा जप करावा.काही इतर साधना कुलधर्म कुलाचार नियमितपणे करावे.
सर्वकाही ठीक होईल.!!
(१०):-मकर:--या राशीच्या लोकांना हा गुरू सुवर्ण पादाने येत आहे. बाराव्या स्थानी येत आहे. याचे फल चिंता असे जरी असले तरी.व्यय स्थानी स्वराशीचा असल्याने आपणास आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. गुंतवणूक सांभाळून करणे अन्यथा फसवणूक संभवते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे
मन चिंतेत राहील. एखाद्या घटनेमुळे अचानक खर्च उद्भवेल. त्याचा त्रास सर्व कुटुंबातील व्यक्तींना जाणवेल.पण मित्रांनो हा सुवर्ण पादाने येणारा गुरू परोपकारी असल्याने स्वराशीतील लोकांना थोडा त्रासदायक वाटला तरी शुभ असेल.श्रद्धेने जप, दान पूजा केली की हा गुरू आपणावर नक्कीच प्रसन्न होईल व रक्षण करेल.!शिवाय मकर राशीला साडेसाती चा प्रभाव वाढता असेल.सांभाळून राहावे.
(११):-कुंभ:-हा गुरू कुंभ राशीला लोह पादाने येत आहे त्यामुळे या जातकांना भाग्योदयासाठी अथक परिश्रम करावे लागतील. नोकरी तसेच व्यवसायात खूप कष्ट सोसावे लागतील.
जाँब मिळतांना,विवाह जमवताना विलंब व आडचणीचा सामना करावा लागू शकतो. तथापि गोचरीचे हा गुरू लाभ स्थानी येत असल्याने नवीन काम मिळेल.स्थान बदलले की फायदा होईल. आडकलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.
नोकरी व्यवसाय शेती धंदा यात लाभ होईल. खास करून बिल्डर लोकांना उत्तम दिवस येतील.गुरू व शन
(१२):-मीन:--गुरूचे हे भ्रमण मीन राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने होत आहे. त्यामुळे याचे फल चिंता आहे. व जवळपास तशीच परिस्थिती या लोकांना अनुभवास येईल.मात्र परिवार व नातेवाईक यांच्याशी एखाद्या कारणामुळे वितुष्ट येऊ शकेल.नोकरीत व्यवसायात संबंधित लोकांशी विनाकारण मतभेद होतील.खर्चात वाढ,आर्थिक नुकसान व कामात अपयश येण्याची शक्यता असेल.क्वचित प्रसंगी एखाद्या जातकाच्या बाबतीत नोकरीत मनाविरुद्ध बदली तसेच नोकरी जाणे इत्यादी घटना घडू शकतात. आर्थिक फटके बसू शकतात.परंतु सुवर्ण पादाने येणारा स्वतःच्या धनु राशीत येणारा हा गुरू त्याच्याच मीन राशीसाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तितके अनिष्ट फळ देणार नाही.मात्र जातक धार्मिक ,शांत व सहनशील असला पाहिजे.
निराशा झटकून प्राणायाम ध्यानधारणा सुरू करा. भयमुक्त राहून श्रद्धेने गुरुचे पूजन करा! काळजी नको!