!! श्री स्वामी समर्थ !!
!! जय
गुरुदेव !!
अध्यात्मिक
योग गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!! श्री
श्री यांचा व्यक्तिमत्व म्हणजेच अध्यात्मिक आणि योग सूत्रातील योग परिपक्वता अशी
आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य असे
सीमित नसून सामाजिक क्षेत्रात देखील परिपूर्ण कार्य करीत आहे अशी त्यांची ख्याती
जगभरात पसरली आहे. यांच्या कुंडलीत ग्रह कसे बलवान आहेत त वाखाणण्याजोगीच
आहे.
सूत्र:
साधू/संत/योगी:
लग्न
बिंदूचा उपनक्षत्र स्वामी जर ३ (मानस), १० (ध्येय) आणि १२ (त्याग) स्थानानाशी तसेच
शनीशी संबधित असेल तर जातक सर्वसंघ परित्यागी वैरागी वृतीचा साधुसंत बनतो. ११ (लाभ) स्थानांचा उपनक्षत्रस्वामी जर १
(जातक) ५ (साधना) १० (ध्येय) भावांशी निर्देशित असेल तर जातकाची साधना सफल होते.
रवी आत्मा
व चंद्र मन निर्देशित मानले गेले आहेत. गुरु नीती, धर्म, तत्त्वज्ञान तर शनी मनन,
त्याग, साधना, व उच्च विचारशक्ती यांचे निर्देशन करतात व केतू आधात्मकता तसेच
संतात्वाचे प्रतिक आहे.
४, ८, आणि
१२ स्थानी कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या राशी अधात्मावादि कांगोरेच दर्शवित नसून, शेवटचा पुरुषार्थ जो
मोक्ष याचे प्रतिक आहे, नवम स्थान व धनु राशी नीती, भक्ती, दूरदर्शित्व,
तत्त्वज्ञान, अंतरदृष्टीचे द्योतक आहे. (५)
पंचम स्थान हे तंत्र, मंत्र, उपसाना, आणि साधना दर्शविते. (१२) व्ययस्थान हे
त्यागवृत्ती, एकांतवास, आत्मसंयमन व मोक्ष सूचित करते.
अग्नी
राशीत ग्रह उत्तंग मनोबल व त्यायोगे राजयोग दर्शविते. पृथ्वीराशीत ग्रह नि:स्वार्थ
भावनेने मानवसेवा म्हणजे प्रेमयोग कर्मयोग सुचवितात. वायुराशित ग्रह तर्क, बुद्धी, व समजयुक्त
ज्ञानयोग निर्देशित करतात. तर जलराशीत ग्रह भावना, ममत्व, प्रेमरसपूर्ण भक्तियोग
दाखवितात.
कुंडलीतील
योगाचा विचार जर केला तर हि कुंडली किती राजयोगकारक आहे, गुरु उच्च राशीत कर्क (जलतत्त्व
– हंस योग) केंद्रात, रवी आपल्या उच्च मेष राशीत (अग्नी तत्व) , मंगळ देखील स्थिर
पृथ्वी तत्त्वाच्या मकर या उच्च राशीत (रूचक योग), बुध-शुक्राच्या अनन्ययोग पंचम (ध्यान-योग
) स्थानी आहे. गुरूचा नवपंचम योग शनी-राहू बरोबर येथेच सर्व कुंडली संपते अशी हि
कुंडली आहे जणू काही अध्यात्मिक/योग/सामाजिक क्षेत्रातील मानवसेवा म्हणजे प्रेमयोग
कर्मयोग सुचवितात. आता आपण के.पी. पद्धतीने कुंडली विवेचन पाहूया...! वरील सर्व
नियम तत्वराशी आणि ग्रह योग श्रीं च्या कुंडलीत चपखळ बसतात.
वरील
नियमानुसार कुंडलीत प्रथम भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी) हा शनी (त्याग, चिकाटी, मनन, साधना) शनीच आहे. शनी
हा लाभ स्थानी वृश्चिक राशीत आहे तर शनी आणि राहू युक्त
असून
भावचलित कुंडलीत दशमस्थानी (कर्म-ध्येय) आहे, शनी हा बुधाच्या उपनक्षत्रात (सब)
मध्ये असून लग्न कुंडलीत हा बुध पंचम स्थानी (योग-आध्यात्म) दर्शत असून तो भावचलीतात
४ स्थानी आहे तर चंद्र केतू बुध युती हि अध्यात्म आणि प्राचीन परंपरा यांचे जतन
करणारे गुरु दर्शविते. हा चंद्र लाभाचा सब आहे आणि चंद्राच्या राशीत गुरु आणि गुरु
व्ययेश (त्यागवृत्ती, एकांतवास, आत्मसंयमन व मोक्ष) तृतीयेश (सुप्तमन-प्रचार पसार) या ठिकाणी मीन
रास आहे.
या
कुंडलीत ४-८-१२ या राशी आणि भावातील ग्रहांचा संबध उत्तुंग अध्यात्मिक पातळी
दर्शवित आहे. सध्या बुधाची महादशा सुरु आहे, केवळ बुधाचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल कि बुध दशमाचा सब
आहे तो गुरूच्या सब मध्ये आहे तर चंद्राच्या नक्षत्रात आहे हे सर्व मी वरील भागात
स्पष्ट केले आहे कि गुरुचे कार्य या कुंडलीत वाख्याण्यासारखे आहे.
लक्षात
घेण्यासारखे एकच असते, याच वेळेला कुणी त्याच ठिकाणी एखादे दुसरे बालक देखील जन्म
घेतला असेल तेच योग ग्रह नक्षत्र दशा परंतु ते का नाही श्री श्री होऊ शकले तर हाच
भाग ज्योतिष वाचू शकत नाही त्यामुळेच भविष्य चुकतात ... अशावेळी मला तुकाराम महाराजाच्या
अभंगातील एक ओळ आठवते...
“जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य
केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ।।“
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ।।“
येथे
महाराजांनी केवळ एक जन्म नाही तर “जन्मो जन्मी” असा उल्लेख केला आहे.
!! शुभम
भवतु !!