सोमवार, १५ जून, २०२०

सुशांत सिंग राजपूत सिने अभिनेता (KP पद्धती आणि अष्टकवर्ग)


!! श्री स्वामी समर्थ !!
सुशांत सिंग राजपूत  सिने अभिनेता (KP पद्धती आणि अष्टकवर्ग)
लेखक: ज्योतिष दिपक चंद्रकांत पिंपळे – ९८२३४४८४४९
काल एक थक्क्दायक बतमी दुपारी २ वाजेच्या सुमारास न्यूस माध्यमद्वारे कळते कि एक उभारता कलाकाराने, सुंदर व्यक्तिमत्व, तरुण, यशाच्या पायरीवर असताना देखील गळफास लावून आत्महत्या केली. का केली असावी हा प्रश्न तर सर्वाना पडला आहे ? मागील सहा महिन्यापासून तो डिप्रेशनमध्ये होता, एकटा राहत होता, याच काळात त्याने घर देखील बदले होते. अस सर्व वृत वाहिन्यावर सुरु आहे. मग सहज वाटले कि काय असा योग झाले कि सुशांत सिंग याने हे पावूल उचले. कुंडली तर सर्व काही सांगत आहे. मागील साधारण ७ ते ८  महिन्यापासूनचा कालावधी पूर्ण नकारात्मक झाला आहे. अशावेळी या कलाकाराला counseling ची गरज होती. ज्या ग्रहाला शुभ मानतो तोच गुरु कुंडलीत नकरात्मक झाला त्यामुळे ग्रह कुणाच्या नक्षत्रात बसला आहे आणि नक्षत्रचा स्वामी फळ देतो हेच KP पद्धतीत मध्ये सांगितले आहे.  detail तपशील आपण पाहूया..

प्रथम आयुष्यामानाचे काही नियम पाहूया.
लग्न भावाचा (प्रथम भाव) सब हा १-५-९-११ या भावाचा कार्येश असेल तर जातक हा दिघार्युषी असतोजर हा सब २-६-७-८-१२ या भावाच्या कार्येश असून मारक आणि बाधक स्थानाचा (लग्नात चर राशी – ११ स्थान/स्थिर राशी – ९ स्थान/द्विस्वभावी – ७ स्थान बाधक स्थान असते) कार्येश असेल तर जातक हा अल्पायुषी असतो आणि मारक भाव हे २ आणि ७ आहेत. वरील सांगितलेल्या दोन्ही समान भाव दर्शवित असेल तर तो मध्यायु असतो. शास्रतात ३३ वर्षे अल्पायु आणि ६६ वर्षाच्या वर जगाला तर त्यास पूर्णआयु सांगितले आहे. असे काही नियम आहेत.
सुशांत सिंग च्या कुंडलीत प्रथम भावाचा सब (उपनक्षत्र स्वामी) हा राहू आहे त्याचे ४-स्टेप बलवान कार्येश ग्रह पाहूया.
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 12       Rashi-Swami Mars 7   1 8
It's N.Swami :-------- Ketu:- (6)      Rashi-Swami Venus (10)   (2) 7
It's Sub :------------ Saturn:- (7)   10 (11)     Moon-Drusht  (1)   (4)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   10 (11)     Moon-Drusht  (1)   (4)
Itself aspects :------ 7

वरील नियमानुसार राहू  हा २-७ या मारक भावाचा तर चर लग्न असल्याने ११ व्या या बाधक स्थानांचा बलवान कार्यश झाला आहे. तर  १-६-४-१० हे देखील बलवान भाव आयुष्यवर्धक नाही. तर दुय्यम पद्धतीने जरी पहिले तर राहू हाच एक महत्वाचा ठरला आहे आयुष्याला तो १-८-१२ भावाशी संबंधित आहे त्यामुळे राहू आयुष्यासाठी पूर्ण नकारात्मक झाला आहे जो कि अल्पाआयु दर्शवितो.

काल दि. १४/०६/२०१९ रोजी त्याने फाशी घेतली त्यावेळची दशा आणि गोचर भ्रमण पाहूया. ९/०६/२०१८ पासून गुरुची महादशा सुरु झाली होती. गुरु देखील राहू पेक्षाही अधिक नकारात्मक झाला आहे ते असे पाहूया.



PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 10   9 12     Mars-Drusht  7  1 8
It's N.Swami :-------- Mars:- (7)   1 (8)  
It's Sub :------------ Saturn:- (7)   10 (11)     Moon-Drusht  (1)   (4)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7)   10 (11)     Moon-Drusht  (1)   (4)
Itself aspects :------ 4 2 6

गुरु हा मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगळाची पूर्ण दृष्टी गुरुवर आहे त्यामुळे गुरु हा ७ (मारक स्थान)  १ (स्वतः) -८ (आयुष्याला धोका) या स्थानाचा बलवान कार्यश आहे. तर शनी हा ३ आणि ४ थ्या पायरीवर ११ (बाधक स्थानाचा) कार्यश झाला आहे. दि. ०९/०६/२०२० ते १६/०६/२०२० पर्यंत गुरु-गुरु-राहू यांचीच दशा सुरु होती आणि हे किती नकारात्मक झाले आहे हे तर मी वर सांगितले आहे.

अष्टकवर्गानुसार ग्रहांचे गोचर पाहूया.
महादशा स्वामी गुरुचे गोचरच नकारात्मक झाले आहे ते कसे पहा. गुरु हा धनुराशीत आहे. समुदय अष्टकवर्गात धनु राशीला केळव २० बिंदू आहे (कमीत कमी २५ अथवा त्यावर असावे) आणि गुरुने केवळ धनु राशीला १ बिंदू (कमीत कमी ४ बिदू असावे)  सर्वाष्टकाला दिला आहे याचा अर्थ ज्यावेळी गुरु ४ नोव्हेंबर २०१९ पासून धनु राशीत प्रवेश केला आहे याची मानसिक स्थिती भिघडत चालली होती आणि तो मागील सहा महिन्यापासून treatment च्या गोळ्या देखील घेत नव्हता असे सांगत आहे.
त्यातच मंगळ (कार्य करण्याची हिमंत देणारा ग्रह)  गोचारेने कुंभ (बाधक स्थानात)  बिंदू २ कुंभ राशीला समुदय अष्टकवर्गात २५ बिंदू आहेत. तर मंगळ हा लग्नेश आणि अष्टमेश असून त्याची पूर्ण दृष्टी गुरु वर आहे.  गुरु च्या धनु राशीत नेपचून (मानसीक संतुलन बिघडले) असून अष्टमात शनी-हर्शल आहे.

गोचारेचा विचार केला तर चंद्र कुंभेत असून कुंभ राशीतच मंगळ (बळ)  आणि नेपचून (मानसिकता) पूर्ण युती योगात होता. असे ग्रह फलीभूत होत असतात याची प्रचीती नेहमी येते. कर्म स्थानातील गुरूला ७ बिंदू होते त्यामुळे पुढील वर्षे या हिरोला ७ व्या असमानावर पोहचवली असते, परंतु ते नियतीला मान्य नव्हते हेच म्हणावे लागेल अजून काय... यशासाठी ज्योतिष देखील एक counselor म्हणून उपयोगी झाला असता असो.. जे घडायचे ते घडतेच...!! बाकी सर्व निमित्तमात्र ..!!
शुशांत सिंग याचा परमेश्वर शांती द्योवोत ..!!
ॐ शांती शांती शांती ...!!


शुक्रवार, १२ जून, २०२०

व्याख्यान कृष्णमूर्ती पद्धती आणि कुंडलीतील प्रारब्ध स्थाने

[8:39 PM, 6/12/2020] Pawale: .    .😌.    .
      🙏
॥ नमस्कार ॥

मी उज्ज्वल पावले औरंगाबाद.
९५४५१४७९०७
९४२१३०१२३६
एम्. ए. वेदांग ज्योतिष
ज्योतिष शास्त्री, वास्तु विशारद
(ज्योतिष, वास्तु विषयक सॉफ्टवेअर्सचे एकमेव वितरक आणि विक्रेते)

वेदचक्षु आणि मराठी ज्योतिषी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

वेदचक्षु व्याख्यानमाला

या झूम व्याख्यान सोहळ्यात समस्त ज्योतिष अभ्यासकांना सादर आमंत्रित करीत आहे.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
शनिवार, दि. १३ जून, २०२०
वेळ: दुपारी २ वाजता
वक्ते: श्री. दीपक पिंपळे
"मोबाईल:" 9823448449
(नक्षत्र शिरोमणी, नक्षत्र अलंकार, वास्तु विशारद)
विषय: कृष्णमूर्ती पद्धती आणि कुंडलीतील प्रारब्ध स्थाने.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
सकाळी: ११:३० वाजता
"अॅस्ट्रो कुंडली"
प्रोफेशनल
या सॉफ्टवेअरचा झूम डेमो दाखविला जाईल.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
लिंकवर स्पर्श करून बैठकीत सामील व्हा 👇

https://us02web.zoom.us/j/89738750126?pwd=dWd0M1dTMmxxVjcvSWFRK0w5cXlMUT09

किंवा 👇

मिटिंग आय डी:
897 3875 0126

पासवर्ड:
123456
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
🙏कृपया ही पोस्ट अधिकाधिक ज्योतिष्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता सहकार्य करा!
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯