शुक्रवार, २९ मार्च, २०१९
शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९
......माझी counseling (समालोचन) देखील असफल ठरले... !!!
!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली एका स्त्री जातकाची आहे. विवाहास
साधारण तीन वर्षे झाली आहेत. मी ज्योतिष जरी असलो तरी देखील counseling चे कार्य देखील
मला करावे लागते कारण त्या जातकाची दशा पुढील काही काळापुर्तीच नकारात्मक सुरु
असते त्यासाठी हा समजविण्याचा आमचा हट्टहास असतो, परंतू कुंडलीतील ग्रह आपले
परिणाम देण्यास सज्ज झालेले असतात अशीच हि कुंडली आहे. विवाह मोडण्याची आणि
घटस्पोट घेण्याचा निर्णय या मुलीने घेतला
आहे. परंतू या मुलीच्या कुंडलीत गुरु ३ स्थानी (सुप्तमन) आणि तो ७ भावाला
(पती/life partner स्थान) बघत आहे आणि गुरु ९ भावाला देखील बघत आहे (३-९ स्थाने
म्हणजे करार-समजाविणे यामध्ये यश येते) त्यामुळे counseling आणि समजविण्याचा प्रयत्न
निश्चितच करणे आवश्यक असते. गुरु जर बलवान अथवा सप्तमावर दृष्टीयुक्त असेल कुंडलीत
तर सहसा विवाह मोडत नाही, शेवटी शनी महाराज (न्याय/कर्माची फळे देणारा ग्रह) जो
परिणाम द्यायचा आहे तो देणारच कारण ते कार्यच त्यांचाकडे आहे आणि शेवटी माझी counseling मात्र फेल झाली आणि
या मुलीने आणि मुलाने देखील divorce घेण्याचे अखेर ठरविले आहे. हे couple
माझ्याकडे जानेवारीत आले होते. पाहूया कुंडलीत ग्रह आणि शनी महाराज कसे परिणाम देत
आहे.
नियम: जर ७ भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी)
जर २ (सुख/पैसा), ७ (life partner/पती/पत्नी) आणि ११ (लाभ/पक्की मैत्री) या
भावांचा कार्येश असून दशास्वामी देखील या भावांचे कार्येश असेल तर विवाह आणि
वैवाहिक सुख मिळते.
सदर स्त्री जातकाच्या कुंडलीत ७ भाव
(वैवाहिक सुख) सब हा शनी आहे. शनी ४ स्टेप बलवान कार्येश पद्धतीनुसार २-७-११ या
भावाचा कार्येश नाही तो केवळ ५ स्थानचा कार्येश आहे. तर शनी हा शुक्राच्या
नक्षत्रात आणि शुक्राच्या सब मध्ये आहे आणि शुक्र ६ स्थान (वैवाहिक सुखाचे विरोधी
स्थान) मध्ये आहे आणि त्यातच आगीत तेल ओतण्याचे काम प्लुटोने केले केवळ ३ डिग्रीच्या
७ भावारंभावार आहे. त्यामुळे वैवाहिक सुखास कमतरता निर्माण झाली.
आता पाहूया दशास्वामी या मुलीला केतूची
दशा १५/९/२०१८ समाप्त झाली आणि शुक्राची महादशेला सुरुवात झाली याच महिन्यापासून
दोघांचे भांडणे वाढली आहे आणि हि दशा पुढील २० वर्षे आहे आणि शुक्र-शुक्र-शुक्र
१५/९/२०१८ ते ६/०४/२०१९ पर्यंत आहे. शुक्र हा ६ स्थानी (७ स्थानाचे व्यय) आहे तो
मंगळच्या नक्षत्रात आहे मंगळ हा लग्नेश १ (२-सुख स्थानचा व्यय) असून तो ५ स्थानी
आहे आणि शुक्र हा बुधाच्या सब मध्ये आणि बुध देखील ६ स्थानी आहे त्यावर शनी दृष्टी
आहे त्यामुळे तो ८ (अडचणी) देखील कार्येश झाला. ४ स्टेप पद्धतीने तो ७-११ चा
कार्येश आहे परंतू येथे शनी गोचर पहा कसा परिणाम करत आहे. अष्टक वर्गानुसार शनीचे
भ्रमण भाग्य स्थानातून (सासू-सासरे) होत आहे आणि या भावाला केवळ १ बिंदू (कमित कमी
२ च्या वर गुण असावे) आहे आणि ७ भावाला २० बिंदू (२४ च्या वर बिंदू असावे) आहे.
सध्या जानेवारी २०१९ रोजी शनी १९ अंशावर आहे तर नेपचून हा फसवा ग्रह देखील याच
भावात १६ अंशावर आणि हर्षल शनी १३ अंशावर आहे येथेच शनीचे भ्रमण नकारात्मक ठरले
सासू-सासरे पासून विभक्त राहणे हि या मुलीची पहिली अट आहे आणि मुलगी हि डिसेंबर
२०१८ पासून माहेरी आहे आणि त्यांनी मला आजच कळवल त्यांचा निर्णय, मुलाच एकत्र
कुंटुंब आहे आणि वैभाशाली आहे. पण शेवटी ग्रहांनी परिणाम केला हे मात्र
निश्चित...!! हे जोडप एकत्र येईल असे मला वाटते कारण २३ जाने २०२० ला शनी जेव्हा
मकर राशीत प्रवेश करेल.आणि मुलीची साडेसाती देखील संपते....यांनी एकत्र यावा हीच
स्वामी चरणी प्रार्थना ..!! शुभम भवतु !!
मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९
कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple
तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते.
▪ मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात.
▪ मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते.
▪ मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते.
▪ वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.
▪ वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात.
▪ मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. तसेच मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात त्यामुळे हास्य आणि नेतृत्व असे उत्तम मिश्रण दिसून येते.
▪ कर्क आणि मीन - या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात. समोरच्याला सांभाळून घेणे हीच मोठी गोष्ट जमत असल्याने यांचे चांगले जमू शकते.
▪ सिंह आणि धनू - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. धनु राशीच्या लोकांना मस्ती, मजाक करणे आवडते.
▪ कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. त्यामुळे मकर राशीचे लोक यांच्याकडे फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात.
▪ सिंह आणि मिथुन - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्तीसोबत हे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.
▪ वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.
▪ वृश्चिक आणि कर्क - या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
▪ वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
▪ कुंभ आणि मिथुन - या दोन्ही राशींचे विशेष म्हणजे या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.
▪ मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर प्रेमळरित्या अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते. त्यामुळे यांचे चांगले जमू शकते.
(संग्रहित - दिपक पिंपळे -९८२३४४८४४९ )
(संग्रहित - दिपक पिंपळे -९८२३४४८४४९ )

बुधवार, १६ जानेवारी, २०१९
जे घडायचे होते तेच शेवटी घडले.....!!!!
!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली ही पुरुष जातकाची आहे. या मुलाचे पालक माझ्याकडे
पूर्वी पासून जन्मपत्रिका दाखवाण्यासाठी येतात आणि एक ज्योतिष म्हणून कुंडलीत जे
आहे ते मला सांगणे हेच माझे कर्तव्य आहे. या जातकाचा डिसेंबर २०१८ रोजी विवाह
मोडला आणि विवाह हा डिसेंबर २०१७ रोजी झाला होता. याची चाहूल एक ज्योतिष म्हणून
आम्हाला होती याची ताकीद मी त्यांना दिली देखील मी कुंडली मिलन करता बऱ्याचवेळी
मुलीच्या कुंडली गुणमिलन चांगले अगदी गुण २७, २१ आणि ३६ गुणाच्या कुंडल्या बाजूला
काढून ठेवतो आणि दुसरे गुरुजी हो पुढे जाण्यासा हरकत नाही असे हे पालक सांगतात. या
मुलाचे लग्न अजून एक ते दोन वर्ष करू नका असे मी सांगत होतो. परंतू मुलगा चांगला इंजिनिअर
आहे नौकरी आहे, वय देखील वाढत आहे, मुली देखील येत आहे या कारणामुळे पालकांनी
निर्णय घेतला आणि घडायचे तेच घडले. काही गोष्टी ह्या विधीलिखितच असतात हेच खर...!!
एक ज्योतिष काही नकारात्मक बाबी कुंडलीत दिसत आहे हे ओरडून सांगत असतो, परंतू
त्याचा दैव योगच तसा असतो आणि ती घटना घडते.
आता कुंडलीचा विचार करूया, या कुंडलीत ७ भावाचा सब हा शनी आहे.
आणि शनी बुधाच्या नक्षत्रात आहे आणि बुध (नपुसक ग्रह) शुक्र (विवाह कारक) आणि
प्लुटो (स्पोटक) पूर्ण युती योगात आहे. शनी आणि हर्शल युती युक्त आहे आणि हे
दोन्ही ग्रह सप्तम (पती/पत्नी) स्थानला बघत (दृष्टी) आहे आणि सर्वात विध्वंसक योग
म्हणजे शनी आणि प्लुटो ३७ डिग्री असे अंतर, अशा बर्याच कुंडल्यात विवाह मोडतात आणि
या योगाच्या कुंडल्यांचा संग्रह माझ्याकडे आहे.
बुध अष्टमेश व्ययात (बेडरूम) शक्र-प्लुटो युक्त आहे त्यामुळे यांचे शयनकश
स्थान बिघडले. शुक्राची महादशा नोव्हेंबर २०१५ सुरु झाली आणि शुक्र २-७-११ या
भावांचा बलवान कार्यश झाला त्यामुळे विवाह होणार हे लिखित होते. शुक्र किती खराब
झाला आहे हे मी वर सांगितले तसेच ७ भावाचा सब देखील कसा व्ययात बुधाच्या नक्षत्रात
स्पोटक झाला हे देखील पाहिले. डिसेंबर २०१७ रोजी विवाह झाला त्यावेळी
शुक्र-शुक्र-शनी ची दशा सुरु होती आणि अंतरदशास्वामी शनीचा प्रवेश नुकताच ऑक्टोबर
२०१७ रोजी धनु राशीत झाला होता. आणि या मुलाच्या सुखस्थानी (द्वितीय स्थान) ११
अंशावर नेपचून हा फसवा ग्रह आहे. विवाह हा डिसेंबर २०१८ रोजी मोडला मुलगी एक महिन्याअगोदरच
माहेरी निघून गेली. यावेळी शनी हा १५ अंशावर कुंडलीतील नेपचून वरून गोचर करीत होता
केवळ ४ degree (फसवणूक) दर्शवितो, शुक्र-शुक्र-बुध हि दशा २३ डिसेंबर २०१८ पर्यंत होती
आणि बुध कसा बिघडला हे वर सांगितलेच आहे तर दशास्वामी शुक्र यावेळी तुळ राशीत होता
जो कि मुळ कुंडलीत देखील तूळ रास व्ययस्थानी आहे. असे ग्रह आणि असे परिणाम करतात. स्वामी
महाराजांचे नाव घेऊन ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि त्यांचे साथही मिळते हे देखील त्रिवार
सत्य. त्यामुळे आपणस एकच सांगणे आहे गुण मिलानापेक्षा कुंडलीस महत्त्व द्यावे हे मी
नेहमी सांगतो.

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८
गुरु प्रवेश - २०१८
!! श्री स्वामी समर्थ !!
अश्विन शु. ३ गुरुवार ११-१०-२०१८ रोजी सायंकाळी ७:२० वाजता गुरु वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे त्याचा पुण्यकाल गुरुवारी साय. ५:२९ ते ९:११ पर्यंत आहे. सध्या या social media मुळे नको ती भ्रांती लोकांमध्ये तयार झाली आहे, ठीक आहे ४, ८, १२ गोचारेने थोड्याफार प्रमाणत फळे देतो याचा अर्थ असा नाही कि सर्व काही नकारात्मक आहे. १२ वा गुरु असेल तर लग्न होत नाही, अडचणी येतात, वगेरे, हे अतिशय चुकीचे आहे. अशा भरपूर कुंडल्या आहेत ज्या लोकांना १२ गुरु असताना विवाह संपन्न झाला. त्यामुळे वर्तमान पेपर, न्यज चानेलच्या या कथाकाथीत ज्योतिषाच्या आहारी जाऊ नका. गुरूची सेवा करा, नामस्मरण करा, उपासना करा .. गुरु आपणस सशक्त बनवेल. कृपया ज्यांना आज पर्यत ११ वा गुरु सुरु आहे त्यांना तुम्ही विचारा... असा कुठला मोठा फायदा त्यांना गुरु ११ असताना करून देला..उत्तर समाधान कारक मिळणार नाही. मूळ कुंडलीत दशा महत्त्वाची असते ती चांगली असेत मग आपण ४-८-१२ असणारा गुरु देखील फायदा करून देणार यात शंका नाही.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



