शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४
सोमवार, ८ डिसेंबर, २०१४
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार
नक्षत्राच देणं’ अंक हा माझ्यासाठी केवळ दिवाळी अंक नसून हा संधर्भ
आणि अभ्यास ग्रंथच झाला आहे. यावार्षी हा शेवटचा अंक आहे, मनाला थोडी हुरहुर ही
निश्चीत लागली आहे. मला या ग्रंथात मागील तीन ते चार वर्षापासून राशी भविष्य तसेच
लेख लिखाणाची संधी मिळाली त्यामुळे प्रथमतः श्री गोंधळेकर गुरुजींचा आभारी आहे. हा
अंक माझ्या मनात स्मरणीय राहणार आहे.
डॉक्टरी व्यवसायिक शिक्षण ग्रह आणि नियम कसे कार्यान्वित होत असतात आणि एकाच क्षेत्रात असून विविध विषयात मास्टरकी मिळविणाऱ्या तीन डॉक्टरांच्या कुंडल्याचे विवेचन लेख मी नक्षत्राचं देणं या दिवाळी अंकात मांडल्या आहे., गायनेकॊलोजिस्ट, भूलतज्ञ (अनेस्थेटीस्ट), आणि डॉक्टर होऊन कलेक्टरच्या दिशेने वाटचाल हे सर्व काही या डॉक्टर जातकाच्या कुंडलीत आहे तर निश्चीत वाचा पान क्र. ९५ ते १०२.
आपला,

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४
एक महान ज्योतिषाचार्य श्री चंद्रकांत भट्ट
!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,मागील एका लेखात डॉ. गोंधळेकर सरांची कुंडली विवेचन केले होते. गुरुवर्य श्री. कृष्णमूर्ती यासारखेच व्यक्तिमत्त्व असणारे आणि नक्षत्र अभ्यासक असणारे ज्योतिषाचार्य श्री चंद्रकांत भट्ट एक महान ज्योतिष होते. त्यांचे "नक्षत्र चिंतामणी" हे पुस्तक आज ही माझ्या टेबलावर नेहमी असते. या ग्रंथाचा मला नेहमी उपयोग होतो. ०७/०७/२०१२ म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी रोजी त्यांच्या कुंडली विवेचनाचा योग आला आणि तो मी माझ्या "नक्षत्र अलंकार" या लाब्रररी कॉपी असणाऱ्या ग्रंथात केला, तो आपल्या समोर ४-स्टेप थेरी प्रमाणे लेखाच्या उजव्या बाजूला मांडला आहे आणि डाव्या बाजूस स्वतः श्री. भट्ट यांनी लिखित "नक्षत्र चिंतामणी" या पुस्तकातील घटना लिखित केल्या आहे.
आपला

शुक्रवार, २५ जुलै, २०१४
प्रारब्धाचे झटके
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
आज जो तो येतो आणि ज्योतिषशास्त्र
थोतांड आहे, भोळ्या भाबड्याना फसवून पैसे मिळविण्याची सोपे साधन आहे असे म्हाणून ह्या
शास्त्राची हेटाळणी करणारे महाभाग पुष्कळ आहे. येथे मला आमच्या हसबे गुरुजीच्या लेखाची
आठवण झाली. ते म्हणतात..
अधिष्टनं, तथा कर्ता,
करणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पथगचेष्ठा,
दैवं चैवात्र पंचामम् ||
ज्योतिषशास्त्राचा मूळ
गाभा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या पांचव्या करणात आहे ज्योतीषशास्त्रानुकार
जन्मणाऱ्या प्राण्याने पूर्वजन्मामध्ये ज्या प्रकारची कर्मे केलेली असतील त्यानुसार
ह्या जन्मात सुखदु:ख मिळतात. भाग्य, दुर्भाग्य
ह्यांच्या लीला अगाध आहेत. ह्याची कल्पना रोजच्या जीवनात अनेकता येते. जन्मणाऱ्या मनुष्याने
कोणत्या प्रकारच्या प्रराब्द कर्माचे गाठोडे बरोबर आणले आहे, आणि त्या कर्माचा फलपाक
होत असताना कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन त्याला कशी व कोणत्या प्रकारची
सुखदु:खे भोगावी लागतील ह्याचा बोध जन्मकालचे ग्रह करतात. पुत्रशोक, स्त्रीवियोग, वैधव्य, अपघात,
आणि इतर अनेक गोष्ठी ह्या पूर्वकर्मावर आधरित आहे. जीवनातील यशापयश यांची संगती
इतर काराणांप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही मिळते. दैवलीलेत फार मोठे सामर्थ्य आहे. ज्यांनी
या शास्त्राचा एक मिनिटभर सुध्दा विचार केलेला नाही, त्यांनी या आकाशस्थ ग्रहांचा आणि
आमचा काय संबंध आहे हे खुशाल ओरडत बसावे. मानवी जीवनावरचे अचूक मार्गदर्शन करू शकणारे
फलज्योतिषाशास्त्र खरे व उपयुक्त आहे ह्यावर विश्वास ठेवणारे लोक जगात भरपूर आहे. असो..
!! शुभम् भवतु..!!

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)






