मंगळवार, २६ मार्च, २०१३
गुरुवार, २१ मार्च, २०१३
जातक हो...! प्रश्नकुंडलीस महत्त्व द्या..!
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
जातकास आम्ही ज्यावेळी १ ते २४९ मधील के.पी. नंबर विचारतो तेंव्हा त्याचे महत्त्व काय आहे हे ओळखले पहिजे. प्रश्नकुंडलीस देखिल जन्मकुंडली एवढेच महत्त असते हे जाणले पाहिजे, ना की आम्ही एखादा नंबर विचारतो व जातक हे आपला लक्की नंबर किंवा फेवरेट नंबर सांगतात हे आमच्या लक्षात येते ज्यावेळी चंद्र हा निगडीत प्रश्नांचे स्वरूप दर्शवित नाही.
जन्मवेळेत थोड्याफार मिनिटाचा फरक आढळून येतो त्यामुळे सब हा बदलतो व विवाह, नोकरी, नोकरीतील बदल ह्या सारख्या प्रश्नांचा कालनिर्णय हा प्रश्नकुंडलीवरून अगदी अचूक येतो व त्याची प्रचीती नेहमी येते.
सदर जातक हे काल आमच्याकडे आले, रविवार पासून आम्हास भेट घेण्याचा प्रयत्न करीत होत परंतू आम्ही त्यास वेळ देऊ शकलो नाही. रविवारी सर्वे डिटेल्स व तसेच एका ज्योतिष अभ्यासकाचा रेफरन्स कागद ही ठेवला. त्या ज्योतिषाचा आम्हास फोन देखिल आला व जातक हे काल अर्ध्या दिवसाची सुटी घेउन धडपड करीत ४:३० नंतर फोचले अशी ही त्यांची प्रश्न बघण्याची तीव्र ओढ पाहून आम्ही त्यांचा प्रश्न हा प्रथम प्रश्नकुंडली वरून सोडवायचा ठरविला.
के.पी. नंबरचे महत्त्व काय हे त्यांना माहित होते. आम्ही त्यास नंबर विचारला त्यांनी चटकन ९६ सांगितला व कुंडली मांडली व कुंडलीवरून व्यवसायात पदार्पण व यश मिळेल का ? असा प्रश्न पहिला व नंतर आम्ही त्यांच्या जन्मकुंडलीवरून कालनिर्णय केला तो अगदी जुळत होता एवढेच नव्हे तर जन्म व प्रश्न कुंडलीत किती साम्य हे देखिल आभ्यासानिय आहे.
प्रश्न कुंडलीत चंद्र ११ स्थानी (ईच्छापुर्ती) तो चंद्र हा व्येयेश (व्यवसायात गुंतवूनक) दर्शवितो. आता पहा चंद्र हा जन्म व प्रश्न कुंडलीत मिथून राशीतच आहे. जाताकास जन्म राहूच्या महादशेत झाला असून जातकाने काल प्रश्न विचारला त्यावेळी राहूचे नक्षत्र सुरु होते, प्रश्न कुंडलीत व जन्म कुंडलीत बुध-नेपच्यून ७ स्थानी व शुक्र व मंगळ ८ स्थानी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कुंडलीतील केलाला कालनिर्णय हा सारखा येतो परतू १५ ते २० दिवसाचा फरक आढळतो अशावेळी प्रश्न कुंडलीस महत्त्व द्यावे लागेल. अशापद्धतीची कुंडली आम्ही ठाणे येथील ज्योतिष संमेलनामधे सादर व विवेचन केले होते व आमच्या या ब्लोगवर मागे मांडली होती. अभ्यासकांनी निश्चित वाचावी. (प्रश्नकुंडलीस जन्मकुंडली एवढेच महत्त्व (ठाणे ज्योतिष संमेलन)
लोकांना जेंव्हा जन्म वेळ-तारीख माहित नसते हीच प्रश्न कुंडली महत्त्वाची ठरते त्यामुळे जाताक हो..! प्रश्नकुंडलीस महत्त्व द्या..!
आपला,
रविवार, १० मार्च, २०१३
आयुष्याची डोर ही परमेश्वरच्या हाती..!
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
मागिल रविवारी एका जातकाचे नातलग आमच्याकडे हे जातक आजारी आहे व ते कधी बरे होईल असा प्रश्न घेउन आले. रविवार असल्याने आमच्या नित्याचा कमाला सुट्टीच होती. आमचे 'श्रीपाद चरित्राचे' पारायण आमच्या स्वामी मठात सुरु होते त्यामुळे हे जातकाचे नातलग ओफिसमध्ये आमच्या येण्याची वाट पाहत होते.
आम्ही नंतर काम्पुटर सुरु केले यादरम्यान जातकाला कुठला आजार झाला आहे, त्याचे स्वरूप काय आहे, ही माहिती घेणे आवश्यक होती. त्यांच्याकडून कळाले की जातकाचे किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे व ते मागील तीन-चार दिवसापासून त्यांचा विकनेस वाढला असून डॉक्टरचे मार्गदर्शन चालूच आहे परंतु यात ज्योतिष मार्गदर्शन मिळेल का ? यासाठी ते विचारनी करू लागले.
जातक: प्रवीण उमाटे जन्म दिनांक: ०९/०९/१९७४ जन्मवेळ: ६:१३ मीनटे जन्म स्थळ: नांदेड
आम्ही जातकाचे सर्वे डीटेल घेउन कुंडली मांडली. आजाराचे गांभीर्य व स्वरूप पाहता प्रथम के.पी च्या माध्यमातून जातकाचे आयुष्मान किती आहे हे पहावे लागते. यासाठी प्रथम लग्न भावाचा सबवरून आयुष्यमान बघितले. लग्न भावाचा सब हा शनी आहे व तो बलवान आहे कारण त्याच्या नक्षत्रात कुठलाच ग्रह नाही.
SATURN* : -10, 7, 11 दीर्घयुशी १-५-९-११ पैकी ५-११ बलवान कार्येश
2-Star-Lord is JUP: 6, 5, 8 आल्पआयु २-६-७-८-१२ पैकी ६-७-८-१२ बलवान कार्येश
3-Sub-Lord is SAT: 10, 7, 11 हे दोन्ही भाव असल्याने जातक हे माध्यमआयु असे सांगता येते.
4-Star-Lord of SubLord is JUP: 6, 5, 8 के. पी. मध्ये ३३ ते ६६ हे वय मध्यमआयुचे मानले आहे.
जातकास गंभीर स्वरूपाचा आजार असून प्रकृती खालवत चालली होती त्यामुळे येथे दशास्वामी हे फार महत्वाचे होते. जातकास प्रश्नवेळी गुरु-शुक्र-चंद्र ही दशा १५/५/२०१३ पर्यंत होती.
JUPITER : - महादशा स्वामी गुरु हा आयुष्यसाठी पूर्णत: विरोधी भावाचा बलवान कार्येश
2-Star-Lord is RAH: 3, 1 , 4, 4 ३ (८ भावाचे अष्टम स्थान) ४ (अंतिम चिरशांती)
3-Sub-Lord is MON: 9 ९ (सिंह हे स्थिर लग्न त्यामुळे हे स्थान बाधक ठरले)
4-Star-Lord of SubLord is MON: 9 (२ व ७ हे मारक भाव असतात.)
VENUS : - अंतरदशास्वामी शुक्र हा केवळ १ -११ या सकरात्मक भावाचा कार्येश
2-Star-Lord is KET: 9, 12, 10 ९ (बाधक) १२ (व्यय व हॉस्पिटलचे स्थान)
3-Sub-Lord is RAH: 4 ४ (अंतिम चिरशांती)
4-Star-Lord of SubLord is MER: 1 , 2, 11 २ (मारक)
याच प्रमाणे विदशास्वामी चंद्र व शुक्ष्मदशा स्वामी हा राहू (कुठल्याही प्रकारे डायगनोस होउ देत नाही) ची दशा ही १९/०३/२०१३ पर्यंत असून गोचर भ्रमण हे देखिल जातकाच्या आयुष्यास धोकादायक होते.
वरील सर्वेगोष्टी हे जातकाच्या नातलगास सांगितल्या व उपाय म्हणून आम्ही त्यास पुरोहीताकडून प्रथम "महामृत्यूंजयाचा जाप" करून घ्यावा व जातकाच्या पत्नीस शनीप्रदोषाचे व्रत कारन्यास सांगितले व त्यानुसार त्यांनी ६/३/२०१३ रोजी हा जाप करण्यासाठी पुरोहिताना घरी बोलाविले व जातकाकडून संकल्प देखिल केला व जपास प्रारंभ केला व कालच्या शनिवारी जातकाच्या पत्नी शनीप्रदोषाचे व्रत करणारच होती परंतू हे नियतीला मान्य नव्हते का कुणाच ठावूक, जातकाची गुरुवारी तब्यत बिघडली व हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. या भयंकर आजारातच त्यांना कावीळ झाला, व दुसरी किडनी फेल झाली व शुक्रवारी दुपारी ३:३० रोजी जातकाचे देहवसान झाले. असे हे ग्रह व दशास्वामी..!
आयुष्याची डोर ही त्या परमेश्वरचाच हातात असते हे त्रिवार सत्य..! काल शनीप्रदोषाच्या दिवशीच जातकाचा अंत्यविधी झाला. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही त्या शंभो महादेवाकडे प्रार्थना...!
!! ॐ नम: शिवाय !!
!! ॐ शांति: शांति: शांति: !!
आपला,
शुक्रवार, १ मार्च, २०१३
सबने उत्तर दिले आणि मुलगा ७ च्या नंतर घरात..!
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
नित्याप्रमाणे दुपारच्या दोन कन्सल्टिंग आटोपल्यावर चहा घेण्यासाठी ऑफिसच्या बाहेर पडणार तोच एक जातकाची आई आपल्या मुलाचा प्रश्न घेउन आमच्याकडे आली व त्यांचा मुलगा हा कालपासून घरातून निघून गेला होता. सर्वे सांगता सांगता मध्येच डोळ्यातून अश्रू सुरु झाले. 'आपला मुलगा येईल.. काळजी करू नका'.. असा धीर देतच सुरु असलेल्या कॉम्पुटर मधून ज्योतिषाचा पसारा उघडला व कुंडली मांडली.
दिनांक: २८/०२/२०१३
वेळ : १६:२५:४३
स्थळ: औरंगाबाद
त्या बाईकडून नंबर घेउन प्रश्न कुंडली मांडणार व पंचम स्थान लग्नी मांडावे असा विचार करीत होतो परंतु त्यांच्या मनाची स्थिती बघितली व क्षेत्र कुंडलीत चंद्र प्रश्नाचे स्वरूप दर्शवित असल्यास प्रश्न केवळ याच कुंडलीवरून सोडविण्याचे ठरविले.
३-९-१२ ही स्थाने प्रवासासाठी विचारात घेतात.
येथे चंद्र ३ स्थानी आहे, तो लग्नेश असून स्वनक्षत्री आहे व बुधाच्या सब मध्ये आहे. तर बुध हा ८ (चिंता व ९ स्थानाचे व्यय) स्थानी असून तो व्येयेश (१२) आहे. म्हणजेच चंद्र हा पूर्णत: प्रश्नांचे स्वरूप दर्शवित आहे.
घरात कलह व भांडण करून जातक निघुन गेला ४ स्थानी राहू व शनी ते दर्शर्वीत असून कारण हे बायकोशी संभधित चतुर्थ भावाचा (घर) सब हा शुक्र (बायोको) असून तो ८ स्थानी आहे.
नियम: ४ भावाचा सब हा २ (३ भावाचे व्यय) ४ (घर) ११ (ईच्छापूर्ती) या भावापैकीच्या दशांतरदशेत हरवलेली व्यक्ती परत येते.
आता पाहूया ४ भावाचा सब कुंडलीत काय दर्शवितो, तो शुक्र असून राहूच्या नक्षत्रात आहे व गुरुच्या सबमध्ये आहे. राहू हा शुक्राच्या राशीत आल्याने तो शुक्राचेच फळ देणार शुक्र ४ (घर) ७ (खंडीत प्रवास) व तो लाभेश-११ (ईच्छापूर्ती) कार्येश आहे. ४-स्टेप च्या चौथ्या पायरीवर चंद्रामुळे तो १ (स्वत: जातक) ३ (लहान प्रवास) कार्येश झाला आहे. त्यामुळे जातक हे निश्चित घरी परतण्यात आहे हे लक्षात येते. त्यामुळे सबचा पूर्णत: होकार होता व आम्ही त्यास आपला मुलगा निश्चित परत येईल हे सांगितले.
आता पुन्हा एकदा दशास्वामीकडे वळलो. प्रश्नवेळी चंद्र-बुध-रवि-रवि २७/०२/२०१३ ते १/०३/२०१३ पर्यंत त्यामुळे आता रविचे कार्येश ग्रह हे key factor आहेत त्यामुळे रवि काय दर्शवितो ते पाहू.
रवि नक्षत्रात कुठलही ग्रह नाही त्यामुळे तो बलवान आहे.
2-Star-Lord is RAH: 4, 7, 11
3-Sub-Lord is VEN:
4-Star-Lord of SubLord is RAH: 4, 7, 11
येथे रवि हा ८ (९ भावाचे व्यय) २ (३ भावाचे व्यय) ४ (घरी येणे) ११ (ईच्छापूर्ती) म्हणजेच जातक आज १ मार्च २०१३ पर्यंत येतील. हे उत्तर, त्यामुळे त्यांचा मुलगा घरी उद्या पर्यंत निश्चित येईल असे सांगीतले.
प्रश्नवेळेपासून साधारण पूर्ण दिवसाचा कालावधी त्यामुळे जातकाच्या आईची चिंता दूरव्हावी यासाठी रुलिंग प्लानेटकडे लक्ष दिले. L: चंद्र S: चंद्र R: बुध D: गुरु
प्रश्नवेळी कर्क हे चरलग्न १७'४३'' सुरु होते व गुरु हा ११ स्थानी आहे. वरील रुलींग ग्रहांची जोडी हि बुधाच्या कन्या लग्नात येते. येथे लागलेच कागद-पेन घेउन सेकंदापर्यंतचा हीशोब करण्याची गरज नसते. कुठलेही लग्न हे साधारणपणे २ तास पूर्व क्षितीजावर असते. कर्क प्रश्नवेळेपासून साधारण पाउन तास राहणार नंतर सिंह लग्न - २ तास व नंतर कन्या लग्न हे सुरु होउन चंद्राच्या नक्षत्रात जाईल तेंव्हा घटना घडेल व त्यास पुन्हा ४० मी. म्हणजेच जातक हे साधारण रात्री ८ ते ९ वाजेपर्यत घरी येतील हे उत्तर येते.
त्यामुळे त्या बाईस आपला मुलगा आला तर आज रात्रीच येईल असे सांगितले व उद्या चतुर्थी आहे, मुलगा घरी येईलच..! गणपतीस एक नारळ फोडा व चिंता करू नका असे सांगितले.
त्यांच्या डोळ्यातील आश्रू थांबतच नव्हते, परिस्थिती फारच बेताची होती, धुणे-भांडे करुन संसाराला हातभार लावत होत्या व त्याचाच मुलगा हा असा. त्या आम्हास प्रश्न विचारल्याचे मानधन किती झाले असे विचारले. आता आम्ही त्यांचाकडून काय मानधन घेणार. आम्ही त्यास म्हटले की त्या गजाननाकडे आमच्यासाठी देखिल प्रार्थाना करा हेच आमचे मानधन..!
बाई गेल्यावर चहा घेण्यास पुन्हा उठलो तर फोनची रिंग वाजली, डोकं आता काम करनारच नव्हत..! या आमच्या चहास कुणाचा नाट लागला.. कुणास ठाउक..!
आज सकाळी ऑफिसमध्ये त्याबाई आल्या, आनंदात होत्या, त्यांचा मुलगा हा रात्री ८:३० ला घरी आला असे कळविले. या बाईने मेलद्वारे अभिप्राय कळवावा, ते तर शक्य नाही. आज चतुर्थी आहे, तो गजाननच साक्षीदार...!
आपला,
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)