शनिवार, १८ मे, २०१३

अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी


!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,

आज मिती वैशाख शु. ८ (दुर्गाष्टमी )
शंकर महाराजांचा समाधी दिन !
समाधीस्थानाचा तो अनोखा स्पर्श 
पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जानार्या रस्त्यावर , स्वारगेट पासून दोन अडीच किलो मैलावर डाव्या हाताला एक मठ लागतो . हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ ! 




शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा. महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. ( वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे. )
समाधीत ठेवल्यावर बाबुराव रुद्र त्या समाधीच्या रात्रो त्या घनदाट अंधारात भयाण जंगलात न घाबरता समाधी सोबत राहिले. सारी भक्त मंडळी घरी निघून गेली. महाराजांच्या तीन पादुकांपैकी एक समाधी मंदिरात एक सोलापूरच्या जक्कलांच्या मळ्यातील दत्त मंदिरात व एक सोलापूरच्या शुभराय मठात ठेवली. प्रथम समाधी बांधली गेली नंतर एक पत्र्याची शेड असे करता करता असे आजचे भव्य दिव्य समाधी मंदिर उभे राहिले.
आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.


शंकर महाराजांचे समाधी नंतरचे अस्तित्व -

शंकर महाराज समाधी घेतल्या नंतर सुद्धा भक्तांना भेटू लागले. स्वप्नात जाऊन मार्गदर्शन करू लागले. एका भक्ताला कुंपणाजवळ दर्शन दिले. व एका भक्ताला समाधी मठात विराट रुपात दर्शन दिले. १९४५ साली दिगंबर सरस्वती राजयोगी अन्ना महाराजांच्या दर्शनास गेले असता मी २१ वर्षांनी तुझ्याकडे दर्शनास येईन असे सांगितले होते. १ ९ ६ ६ साली वाघोड ला उत्सवात शंकर महाराज भेटले त्यांना घेवून रावेर येथे आले. तेथे सर्वांनी पाद्यपूजा केली. नैवेद्य दिला. वाजंत्री आणली. अन्ना महाराज व वाघोडकरांचा अष्टभाव जागा झाला. नंतर त्याच्या घरी मुंबईला महाराजांना आणले. त्याच्या उपस्थितीत श्री अनंत काळकर व जयश्री इखे यांचा साखरपुडा झाला त्यावेळी शंकर महाराजांनी त्याच्या सासर्याला टोपी व रुमाल भेट दिला आणि ते निघून गेले. त्या दिवसापासून घरची परिस्थिती चांगली झाली. आज मुलुंड येथे टोपी व रुमाल श्री रमेश इखे यांच्या घरी जपून ठेवला आहे. सौ. उमाताई व श्री शंकरराव नेरुरकर (आयडियल बुक डेपो कंपनी चे मालक ) हे दोघे १ ९ ८ ९ साली श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी रात्रो २ वाजता बोरीवली येथे L. I .C. कॉलोनी येथून घरी येत असता दाट अंधारात गर्द झाडीतून अचानक श्री शंकर महाराज बाहेर आले. सिगारेट व माचीस घेवून झाडीत अदृश्य झाले. असा हा अनपेक्षित प्रसंग पाहून दोघे स्तब्ध होवून पहात राहिले. धनकवडीच्या समाधीचा परिसर पूर्वी जंगलाचा होता. वाघ नेहमी येत. पण कोणाला कसलीही इजा झाली नाही. एका भक्ताला रात्रो समाधीतून बाहेर येउन दर्शन दिले. महाराज समाधीतून बाहेर आले व आपला पाय हंडीपर्यंत नेउन हंडी हलवली. हे अभ्यंकरानी समाधी नंतर ३ वर्षाने अष्टमीच्या रात्री पहिले. अभ्यंकरांची मुलगी आजारी असताना महाराज घरी आले व अभ्यंकराना भेटले. टोपी चपला सोडून संडासात गेले. लगेच त्यांनी चप्पल टोपी पेटीत लपवून ठेवल्या बराच वेळाने संडासात पहिले तर महाराज तिथे नव्हते. व पेटीतील लपवून ठेवलेली चप्पल टोपी नाहीशी झाली. पुण्याच्या लाकडी पुलावर एका माणसाला शंकर महाराज नावाने एक माणूस भेटत असे. गप्प चालत असे. मी धनकवडी ला राहतो म्हणून सांगत असे दोन दिवस शंकर महाराज आले नाहीत म्हणून तो शोधत धनकवडीला मठ्ठात आला. बाबुराव रुद्रानी महाराजांची समाधी दाखवली. तो गृहस्थ समाधी समोर पाया पडून निघून गेला. सोलापूर दक्षिण कसबा पेठेत राहणारे श्री दादा फुलारी सौर्गावकर यांना महाराजांनी समाधी नंतर त्याच्या घरी जावून चहा व सिगारेट अंगावरचा सदरा व पायजमा मागितला तो दिल्यावर चल माझ्या बरोबर असे सांगितले. सौर्गावकर गेले नाहीत. पण त्या नंतर ८ दिवसांनी सौर्गावकरांनी देह ठेवला. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महाराज म्हणत माझ्या गुरूचा जप आहे. माझा गुरु व मी वेगळा नाही. जो माझ्या गुरुचा जप करेल त्याचे सर्वच मनोरथ पूर्णच करावयाची जबाबदारी माझी राहील. माझे स्मरण करा. व माझा अनुभव घ्या. महाराजांची वक्तव्ये आजही खरी ठरतात.


!!श्री स्वामी समर्थ !!
!! जय शंकर !!


सौजन्य गुरुबंधू - श्री प्रशांतजी कुडाळकर 

२५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद माहिती बद्दल, आज सांगलीला जाताना पुण्यात थोडा वेळ थांबून जाणार आहे, शक्य झाल्यास तिथे जाईन

    अमोल

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. माऊली शंकर महाराजांनी मला गुरूचरित्राची ५ पारायणे करावयास सांगीतली आहेत त्यापैकी ४ मी पुर्ण केलीत व पाचवे पुढील आठवडयात पुर्ण करणार आहे . ते पुर्ण झाल्यावर धनकवडीला महाराजांना भेटायला नक्की येईन.

      हटवा
  3. MI NIKITA SHANKAR MAHARAJ MAZYA 5-6 VERSHAPURVI SWAPNAT AALE HOTE PAN THEWA HI TYANA OLKHAL NAVHAT. GELYA KAHI DIVASATACH TYANCH PHOTO MI SWAMINCHYA PHOTOSOBAT PAHILA TIVHA LAKSHAT AAL ARE APALYALA DARSHAN YANI DIL HOT.AAJ TYANCHI MAHITI VACHUN ANGAVAR SHAHARE ALE. === SHRI SWAMI SAMARTH ===

    उत्तर द्याहटवा
  4. Shankar Maharaj 28/2/2014 la mazya swapanat ale va mala mhanale ,Tu bollywood sathi ek kathanak lihayala ghe,mi tula kay lihayache te punha tujha swapanat yehun sangen.........tya kathanaka sathi tula OSCAR puraskar milel..............Mi Maharajanchi swapanat yenyachi vat baghit ahe. MAHARAJ LAVKARAT LAVKAR MALA DARSHAN DYA.

    उत्तर द्याहटवा
  5. खूप मन भरून आले वाचून , साक्षात महाराज भेटल्याचा अनुभव आला . शंकर महाराजा बद्दल जास्त काय लिहू ? साक्षात परमात्मा आहेत ते .
    जय शंकर

    उत्तर द्याहटवा
  6. माहिती बद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा

    उत्तर द्याहटवा
  7. Tumarrow on date with wish of Shankar Maharaj I will be in Temple .
    His blessings always with me. When ever I am having problems withwith Mah blessings they are solved.
    There are many experience with me.
    Jai Shankar Maharaj.
    Sri swami samarth
    Sri swami samarth.

    उत्तर द्याहटवा
  8. Mala pan anubhava ala ahe maharajanche dhanya zale me ya janmat swami Samarth ani Shankar maharaj Maza sobat ahet

    उत्तर द्याहटवा
  9. कृपा झाली आणि शंकर बाबाही माझ्या आयुष्यात आले, त्यांनी एकदा मध्यरात्री मला उठवून माझ्याकडून ७ गाणी लिहून घेतली आहेत. १२ करण्याचा विचार आहे, बाबा कधी सांगता कुणास ठाऊक. श्री स्वामी समर्थ
    ९५०३६७७७४०

    उत्तर द्याहटवा
  10. महाराजांच्या मठात घरी आल्यासारखं वाटतं... गुरुमाऊलींची कृपा !

    उत्तर द्याहटवा
  11. मला एका क्ष व्यक्ती बद्दल माहिती नव्हती परंतु वाटायचे की ती अध्यात्म वा तांत्रिक मार्गातील आहे आणि तिच्याकडून माझ्या कुटुंबाला नकळत धोका होण्याचा संभव आहे.
    सद्गुरू शंकर महाराजांना मी एकदा याबद्दल मनात सांगितलं आणि त्यांनी त्या व्यक्तीला जाऊन सांगितलं की ते माझ्या कुटुंबाचे पालक आहेत. ती व्यक्ती अंतराज्ञानी असल्याकारणाने महाराजांची प्रचंड शक्ती जाणवल्याने संभाव्य धोका टळला. श्री स्वामी समर्थ. श्री शंकर| जय शंकर||

    उत्तर द्याहटवा
  12. 🚩🚩🚩🚩अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय 🚩🚩🚩🚩

    उत्तर द्याहटवा
  13. कालनिर्णय मध्ये आजची 1 मे ची पुण्यतिथी दाखवलेली आहे त्याच्या दुरुस्ती करावी ही विनंती
    जय जनार्दन कोपरगांव.
    वाल्मिक
    लक्ष्मणगिर गोसावी

    उत्तर द्याहटवा
  14. श्री सद्गुरू शंकर महाराजांची समाधी कथा वाचली. वाचून अंगावर काटा येत होता अंगावर शहारे येत होते हीच शंकर लीला आहे.
    जय शंकर जय जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर शंभो

    उत्तर द्याहटवा
  15. वाचून छान वटले. शंकर महाराज समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा आहे.

    उत्तर द्याहटवा
  16. सेवा करा सेवेकरी व्हा माणूस जपा माणूस शिका श्री स्वामी समर्थ

    उत्तर द्याहटवा
  17. मी मे महिन्यात२०२२ला धनकवडीला जाऊन दर्शन घेऊन आलो।त्यांची काही पुस्तके वाचली आहेत।सद्या कलर्सवर त्यांची मालिकाही चालू आहे।पण त्यांचे भक्त पुष्कळ आहेत।दर १३तारखेला त्यांच्या कार्यक्रमाचा उपक्रम दादरला असतो।।।।रवीबाग।।।

    उत्तर द्याहटवा
  18. हार हार शंकर, नमा मी शंकर, शिव शंकर शंबो

    उत्तर द्याहटवा