शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

* कुलदेवता *

!! श्री स्वामी समर्थ !! 
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. तिलाच कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
कुलदेवतेचा नामजप करणे

कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

'
कुलदेवता' हा शब्द कुल' आणि देवता' या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला कुलदेवआणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला कुलदेवीम्हणून संबोधले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवता ठाऊक नसेल, तर श्री कुलदेवतायै नमः ।' असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी ही अनुभूती घेतली आहे. श्री कुलदेवतायै नमः ।' हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता' या शब्दातील दे' हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा