|| श्री स्वामी समर्थ ||
|| ॐ नमः शिवाय ||
-: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा :-
महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. 'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबोधले जाते. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा