!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,
आज डॉ रमेश परोपकारी – भूलतज्ञ (अनेस्थेटीस्ट) यांची कुंडली अभ्यासूया आणि मागिली लेखात सांगितलेले सर्व नियम कसे चपखल बसतात ते पाहूया.
राहू,
केतू व शनी बेशुदावस्था दर्शिवितात.
बुध सजगता, शुद्धी व
संपूर्ण भान सुचवितो. रवि प्राणनिर्देशक आहे. वृश्चिक आणि मीन राशी बेशुद्ध, बेहोष
परिस्थिती सुचवितात.
रोग्याला
यत्किंचितही जाणीव किंवा विविक्षित अवयव/मेंदू विवक्षित वेळेसाठी
ऑपरेशन/शल्यक्रियेसाठी बधीर करण्यासठी अनेस्थेटीस्ट डॉक्टरांना करायचे असते. म्हणून डॉक्टरांच्या कुंडलीमध्ये रवि किंवा बुध
जर राहू, केतू किंवा शनीशी संबंध करीत असेल तर असा व्यक्ती अनेस्थेटीस्ट असते असे
अनुमान निघू शकते.
दशम
स्थान :
०
राहू:
न.
स्वा : केतू
– १२ बुध- ८
केतू न.स्वा.- राहू-६ गुरु-१-५-९ [रवि-शनी दृष्टी आहे.] ३
०
सब: गुरु – १ भा.
स.
न.स्वा. गुरु – १ ५ ९ ३
भावारंभी
मीन रास (बेशुद्ध-बेहोष परिस्थिती) १३००४’ आहे. या भावाचा सब हा राहू (भूल-कारक) षष्ठ
स्थानी (रोग स्थान) वृश्चिक (औषधी/रसायने) या राशीत आहे. राहू ग्रहाचा राशी स्वामी
गुरु (रोग परीज्ञान कारक) आहे व याच गुरुची पूर्ण दृष्टी ही नवम भावातील (उच्च
शिक्षण) रवि (वैद्यक कारक) या ग्रहावर आहे. तसेच तृतीय स्थानी ही सिंह रास (औषध
योजना) आहे व हे स्थान स्वबल मेहनत-पराक्रमाचे स्थान आहे. राहूचा बुध-गुरु-रविशी
येणारा संबध कन्सल्टींग फिजिशियन दर्शिविते. तसेच सदर जन्मकुंडलीत डॉक्टर हे
भूलतज्ञ आहे याचा पडताळा होतो.
सदर
कुंडलीत चतुर्थ भावाचा सब हा राहू असून तो वरील प्रमाणे नवम भाव तसेच रवी गुरुशी
संबधित आहे तसेच नवम भावाचा सब शनी असून तो देखिल गुरूच्याच नक्षत्रात आहे
त्यामुळे जातक डॉक्टरांचे शिक्षण हे वैद्यकीय क्षेत्रात झाले आहे.
आता
दशास्वामीकडे वळूया
जातकाचे
प्राथमिक शिक्षण हे मंगळाच्या महादशेत सुरु होते.
तो
कालावधी ७/१२/१९६१ ते ८/१२/१९६७
मंगळ
काय दर्शवितो ते पाहूया.
०
मंगळ: ११ भावारंभी आहे.
नस्वा
शुक्र: ७-८
०
शुक्र:
शु.नस्वा
चंद्र: ४-२
मंगळ
शिक्षणसाठी आवश्यक असणाऱ्या ११ तसेच ४ चा बलवान कार्येश झाला आहे.
नंतर
राहूची महादशा ही ८/१२/१९६७ ते ७/१२/१९८५
राहू
वरील प्रमाणे प्रमाणे ९ भाव रवी गुरु आणि बुधाशी संभाधित आहे. त्यामुळे secondary
higher education हे जून १९७३ झाले ते उत्तीर्ण करून वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश मिळवला
त्यावेळी शनी विदशा सुरु होती.
०
शनी : ५ भा.
नस्वा
गुरु: १ ५ ९ ३
०
शुक्र: ८
भा.
शु.नस्वा
चंद्र: ४ २
जून-जुलाई
मध्ये जातकाला – बुधाची विदशा सुरु होती आणि बुध हा
मंगळच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा ११ भावात अशाप्रकारे ४-९-११ ची साखळी पूर्ण
होते. तसेच जातकाचे पुढील डॉक्टरी शिक्षण
हे राहू-केतू-बुध ३/५/१९७९ ते २६/६/१९७९ आणि याच महिन्यात जातकाला सरकारी नौकरी
लागली. येथे केतू दुसऱ्या पायरीवर राहू मुळे ६ चा कार्येश व चौथ्या पायरीवर १२ ८
बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे डॉक्टराना Master Degree चे पुढील शिकण घेता आले
नाही व घराच्या परिस्थिती व दबावामुळे नौकरी बुधाच्या विदाशेत्त नौकरी स्वीकारावी
लागली. कारण बुध हा मंगळाच्या नक्षत्रात आहे व मंगळ १०–११ चा बलवान कार्येश आहे तर बुध दृष्टी २
आहे येथे २-६-१०-११ चा बलवान कार्येश झाला आहे.
जातकाने
Master Degree ही १९८७ ते १९८९ रोजी प्राप्त केली व
अनेस्थेटीस्ट डॉक्टर झाले. यावेळी जाताकास गुरु-शनी-मंगळची महादशा सुरु होती जे की
गुरु हा ४-९ मंगळ ११ असा कार्यश झाले आणि जातकाने १९९० रोजी सरकारी नौकरी राजीनामा
दिला आणि स्वतःची प्राक्टीस सुरु केली आणि अजून देखिल सुरूच आहे.
* लेखाचे सर्व हक्क लेखक - दिपक पिंपळे यांचे
!! शुभम भवतु !!