|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
निश्चितच मी “डॉक्टर होण्याचा योग” यावर कुंडली विवेचन करणार आहे तत्पुर्वी आपणास काही सांगू ईच्छितो. लाकांना हे त्यांचा आप्त संबधित नातलग
यांचे भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि त्यांचा या शास्त्रावर विश्वास
देखिल आहे. परंतू
आपण जन्मवेळेस महत्व देतो का आणि मनात
प्रश्न निर्माण झाल्यावर ज्योतिषकडे जाण्याची पूर्ण तयारी दर्शिवितो का हे देखिल
तितकेच महत्त्वाचे आहे कारण wahatups आणि mobile या काळात जातक/पृच्छक आपल्या
सोयीनुसारच त्याचा उपयोग करून घेत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीस ताप आला की
डॉक्टरकडे जसे जावे लागते त्याच प्रमाणात ज्योतिषाला महत्त्व हे दिलच पाहिजे तरच
उत्तर बरोबर येतील. हे जातकाने लक्षात घेतले पाहिजे.
ज्योतिष
नेत्रदृष्टी पर्यंत मायार्तीद आहे. डोळ्यासमोरील मर्यादेपर्यंत जे दिसते ते
ज्योतिष आहे. मग ते स्पष्ट दिसण्यासाठी शास्त्रातील वेगवेगळ्या पद्धतीचा मग
पारंपारिक, अष्टकवर्ग, नवमांश, नाडी शास्त्र, हस्त शास्त्र, के. पी. यांचा आपण
चस्मा लागलेला असतो. चष्मावरील कापळावरील कर्मचा वेध घेणे मात्र कुठल्याही
ज्योतिषास हे अवघडच जाते त्यामुळे एखादा जातक कुठल्या कुळात/परिवारात जन्म घेतो हे
ज्याच्या त्याच्या संचितावर अवलंबून आहे आणि आपल्या कर्मांनी तो आपले प्रारब्ध
घडवीत असतो. या सर्व बाबींचा विचार केला
तर एखाद्या लहान मुलांचे भविष्य सांगताना तू डॉक्टरच होशील हे दिखील थोड अवघड
होते. यांचे मुख्यत्व कारण म्हणजे व्यासायिक व्यापता आणि ग्रहांची विभागनी आणि
वर्गीकरण याच्या मार्यादित असते, हे सर्वे आपण २७ नक्षत्र, १२ राशी आणि ९ ग्रह याच
वर्गीकरणात रेखाटावी लागते. त्यामुळे
विशिष्ट वयात मुलांचे शिक्षण सुरु असताना, मुलांचा मुख्य विषय शिक्षण क्षेत्रातील
कल आणि पुढील येणाऱ्या दशा पुन्हा याचा
विचार करूनच पुढे हा मुलगा काय होईल किंवा कुठले विषय घेतले पाहिजे ते ठरविले
पाहिजे. कर्माची परिपक्वता आहेच.
एखाद्या
डॉक्टरच्या कुंडलीत रवी-गुरु हे ग्रह मुख्यत्वाने कार्यन्वित होत असतात तर तेच
ग्रह एकदा मेडिकल स्टोर चालविणाऱ्याच्या कुंडलीत होत असतो. षष्ठस्थान हे अतिशय
महत्त्वच स्थान कारण ते पेशंटचे १२ वे स्थान दवाखाना/हॉस्पिटल चे स्थान आहे तर ५
स्थान रोग्यास बारा होण्याचे स्थान ठरेल तर डॉक्टरचे हे स्थान देखिल कार्यान्वित
होत असते आणि हे स्थान कला क्षेत्रातील आहे. मग डॉक्टरची प्रीस्करीपशण पाहून वाटत
नाही के तो एखादा चित्रकार आहे. असो.
या
गुरु पंचम स्थान नवम स्थान यामुळे डॉक्टर ज्योतिष, आधात्मिक क्षेत्रात देखिल
प्रगती करतात, याचे उदा. डॉ. परोपकारी (पुढील भागात विवेचन केले) आहेतच तर मंगळ-गुरु-रवि या ग्रहामुळे
एकदा डॉक्टर सर्जन असून देखिल सोफ्टवर
बनवू शकतो याचे उत्तम उदा. डॉ. कारेकर
आहे.
आता
आपण कृष्ण पद्धतीनुसार तसेच ४ स्टेप पद्धतीने डॉक्टरचा कुंडलीत कुठले योग
कार्यान्वित होतात आणि एखादे स्पेशलायझेशन करताना ग्रह-भाव पुढील दोन-तीन डॉक्टरांच्या
कुंडलीचे विश्लेषण करणार आहोत.
व्यवसाय
शिक्षण:
नियम:
(कुंडली रहस्य – भाग १- लेखक – श्री चंद्रकांत भट्ट)
व्यवसाय
निश्चितीसाठी दहाव्या भावाचा भावारंभ बिंदूचे संयुक्त अधिपती म्हणजे त्याच्या राशी
स्वामी, नक्षत्र स्वामी व सब याचा विचार करावा. हे संयुक्त स्वामी कोणत्या
नक्षत्रात व सब मध्ये आहेत, ते कोणत्या राशीत आहे त्याची नोंद करावी. हे ग्रह
कुणाशी युती कींवा दृष्टी सम्भध करतात याची नोंद करावी. त्याबरोबर कुठल्या ग्रहाची
दशा-अंतरदशा चालू आहे याचा पण विचार करावा. अर्थात तारतम्य, बुधीयुक्त विवेक हवाच.
अनुभवाने अनुमापन करणे सुलभ होते.
डॉक्टर
रवि
वैद्यक डॉक्टरी विद्येचा कारक ग्रह आहे. गुरुसुध्दा वैद्यकीय ज्ञानाचा निर्देशक
आहे. मंगळ औषधपाणी आणि रसायने दर्शवितो.
नैसर्गिक कुंडलीत कन्या रास षष्ठात असते म्हणून रोगोपाचारांशी संबंधित आहे.
वृश्चिक रास, औषधपाणी, रसायने व शवगृहांशी संबधित आहे. सिंहरास औषधी योजना
सुचविते. मीनरास इस्पितळे सुचविते. धनुरास औषधांच्या गुणदोषांचे विशिष्ट ज्ञान
दर्शविते, सूर्य-गुरु वैद्यकीय ज्ञान; रवी-बुध कन्सल्टींग वैद्य, फिजिशियन;
रवि-मंगळ (कापाकापी) सर्जन, शस्त्र वैद्य ; रवी-शुक्र (प्रजनन) व गुरु (संतती
जन्म) प्रसूती संबंधी ज्ञान; रवि, शुक्र, मंगळ जातीय, अनुवांशिक तर शनी विजातीय
रोगांचे ज्ञान; रवि-शनी (अस्थी) हाडांच्या रोगांचे ज्ञान, रवि-शनी (त्वच्या) व
शुक्र (त्वाचा सौंदर्य) चर्मरोगांचे ज्ञान; रवी-शुक्र (तेज) नेत्र विकारांचे
ज्ञान; रवि-शनी दंत रोगाचे ज्ञान; रवी-शुक्र (गळा) व बुध (कान), कान, नाक, घास (गळा)
या विकारांचे ज्ञान दर्शवितो.
डॉक्टरांच्या
कुंडलीत दशा विचार: (संधर्भ
ग्रंथ – पान क्र. २९४ )
महादास्वामी
स्वामी षष्ठस्थानाचा बलवान कार्येश असावा. कारण षष्ठस्थान हे सप्तम स्थानाचे
व्ययस्थान आहे. डॉक्टरांच्या कुंडलीत साप्तमावरून रुग्णांचा बोध होतो त्यामुळे
षष्ठस्थानाची कार्येश दशा चालू असताना रुग्णांचे आजार डॉक्टरांना फायदेशीर ठरतात.
दशास्वामी
(२, ६, १०, ११ ) चा कार्येश असेल तर आर्थिक भरभराट होते.
दशास्वामी
(४, ११, १२, २) चा कार्येश असेल तेंव्हा स्वतःचे हॉस्पिटल होते.
आपला,
* लेखाचे सर्व हक्क लेखक - दिपक पिंपळे यांचे
(पुढील भागात हे सर्वे नियम डॉक्टरांच्या कुंडलीत असे चपखल बसतात ते पाहू)
धन्यवाद
उत्तर द्याहटवा