रविवार, २५ ऑक्टोबर, २०१५

रुद्राक्ष (मंगळ दोष निवारण)

|| श्री स्वामी समर्थ  ||
नमस्कार,

मागील एका लेखात मंगळ दोष हा कशा पद्धतीने नाहीसा होता किंवा सौम्य होतो हे आपण गुणमिलन करताना पहिले. तरी देखील बरेच जातक उपाय विचारतात, उपासना, किंवा रत्न अशी विचारणा सारखी करत असतात. माझ्या या ज्योतिष शास्त्राच्या अनुभव मला हेच दर्शवितो कि, कुठलाही उपाय हा समोरील जातक किती श्रद्धापूर्वक करतो त्यानुसार त्यास अनुभव हा निश्चितच येत असतो. शास्त्रात उपाय/उपासना भरपूर आहे पण आपला विश्वास या सांगितलेल्या उपायांवार असला पाहिजे. असो.. !!!

रुद्राक्ष हे उपायाच्या बाबतीतील एक उत्तम असे माध्यम आहे. वेगवेळ्या मुखी रुद्राक्षाचा उपयोग हा आरोग्य, व्यवसाय वृद्धी, विवाह सौख्य तसेच प्रेम यासाठी कशा पद्धतीने होते ते आपण पाहू या...आणि याचा अनुभव देखील उत्तम प्रकारे जाताकास येत असतो, मग कालसर्प, मंगळ दोष यासारख्या कुढल्या कॉम्बिनेशनचा रुद्राक्ष धारण केले पाहिजे हे देखील पाहूया..!!

मंगळ दोष निवारणासाठी २ मुखी, ३ मुखी, आणि ११ मुखी मंगळदोष कमी होत नाही तर ११ मुखी मुळे रागावर देखील नियंत्रण निर्माण होते. हा दोष असणाऱ्या जातकांनी हे करून पहा आणि आपला अनुभव कळवा.

(रुद्राक्ष धारण करण्याचेही काही नियम आहे त्याचे पालन मात्र कटाक्षाने केले पाहिजे)

आपला,
Preview
  

सोमवार, १२ ऑक्टोबर, २०१५

"नवरात्र" शंका समाधान - १


नवरात्र म्हणजे काय ? त्याला शारदिय नवरात्र का म्हणतात ?
अश्विन शुध्द प्रतिपदेपासून शरद हृतुचे आगमन होते. प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवीच्या या उत्सवास शारदीय नवरात्र म्हणतात. ९ दिवस उत्सव चालतो म्हणून नवरात्र. १०व्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते.
नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे. आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, तिचे आपल्या घरावर व कुटुंबियांवर कृपाछत्र असावे आणि अदृष्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावे या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितलेले आहे. नवरात्र व्रत जितके आवडीने, भक्तीने, हौसेने व मनःपूर्वक केले जाते, तितक्या अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा, शांती, सुख व समाधान नांदते.
 नवरात्र हा कुळधर्म कोणी सांभाळावा ? त्यासाठी काय काय करावे ?
नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्तीउपासनेचा असल्याने अत्यंत महत्त्वाचा कुळधर्म आहे. तो सगळ्यांकडे पाळला जाणे गरजेचे आहे. आपण कुटूंबातून विभक्त झालोत, आपले देव वेगळे केलेत, आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवितो अशा सर्वांनी हा कुळधर्म पाळावा. आमच्या मोठ्या भावाकडे कुळधर्म आहे असे सोपवून रिकामे राहू नये. स्वयंपाक, मिळकत सगळे वेगळे असताना कुळधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ? ज्या घरात स्वयंपाक व उपजिविकेचे साधन स्वतंत्र, त्या घरात कुळधर्म ही स्वतंत्र असायला हवेत. आपली आपली कुलदेवते आपण सांभाळली पाहिजेत. शिवाय कुळधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते. हा संस्कार सांभाळलाच पाहिजे.
कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते. ती पुढे दर बारा वर्षांनी करावी. म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते. तिच्यातील चैतन्य कायम टिकविण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराचे मार्ग सांगितलेले आहेत. नवरात्रात देवीचे घट, चंपाषष्ठीचे नवरात्र यामार्गे सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदैवतेपर्यंत पोहोचते. कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडीत झाल्यास संरक्षण कवच लगेचच संपत नाही. पण क्षीण होत जाते. त्यामुळे शक्यतो खंड करूच नये. चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटत असेल तर परंपरेने चालत आलेले उत्सव साजरे करणे गरजेचे आहे

(क्रमश: पुढील लेखात)

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

वास्तू दिशा विचार आणि समृद्धी

श्री स्वामी समर्थ 
नमस्कार,

एक दोन खोलीत संसार करणारी सामान्य व्यक्ती वस्तूशास्त्राचे नियम पाळून घर वस्तू सजवू शकत नाही. अशावेळी  दिशांचा विचार करून घरात वस्तूची योग्य प्रकारे मांडणी करता येते. त्यामुळे वस्तू दोष कमी होतो. मनास शांति समाधान लाभते. वास्तूत संपन्नता प्राप्त होते तसेच सुबत्ता नांदते.  घरात मंगल कार्य होतात. घरात आजारपण नष्ठ होते. याच प्रमाणे नवीन घरात प्रवेश करण्या अगोदर देखिल मुहर्त पाहून वस्तू शांतिलाही तेवढेच महत्त्व आहे. हे देखिल आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसता कलश ठेवून प्रवेश करणे योग्य नाही.  

घरात दिशा प्रथम निश्चीत करून घ्याव्यात. घरातील मांडणी शक्यतो याप्रामाणे असावी.


१.  ईशान्य देशेला देवघर 
२.  पूर्वेला स्नानगृह
३.  अग्नेय दिशेला स्वयंपाक घर
४.  दक्षिण दिशेला झोपण्याची खोली
५.  नैॠत्य दिशेला विळी, सुरु, भांडे ठेवण्याची जागा
६. पश्चिम दिशेला अभ्यासाची खोली, भोजनाची जागा 
७. वायव्य दिशेला भांडार घर धान्य साठवणुकीची जागा  
८.  उत्तर दिशेला तिजोरी कपाट पैशाची जागा 

साधारणत: बैठक ही घराच्या मध्यावर असावी. घरातील झोपण्याच्या पलंगावर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस बसवू नये.  घरातील औषधी नेहमी ईशान्य भागात ठेवावी. तशीच ती उंच जागेवर ठेवावी. लहान मुलांच्या हातात पोहचणार नाहीत अशा प्रकारे ठेवावी. 

मुलांच्या अभ्यासाची जागा पूर्वे - ईशान्य, उत्तर दिशेला तोंड करून बसण्याची असावी. विद्या ग्रहण आणि आकलन हे चांगल्या प्रकारे होते. 

घराचे किंवा वस्तूचे प्रमुख प्रवेशद्वार हे मोठे असावे साधारण ४ फूट रुंदीस असावा.  प्रवेशद्वारावर उंबरठा असलाच पाहिजे. प्रवेशद्वारावर श्री गणेश, कलश, स्वस्तिक वगैरे शुभ चिन्हे रेखावीत अथवा चित्र स्वरुपात लावावीत. वाईट प्रवाह, स्पंदने, किंवा लहरी घरात प्रवेश करीत नाही. 

भारतीय संस्कृतीनुसार दारासमोर रांगोळी रेखावी. रांगोळीला हळद कुंक लावावे. शुभ परिणाम होतो. 

एक विशेष सूचना म्हणजे मांगल्याचे प्रतिक घरातील प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन असावे. वातावरणात प्राणवायूंचे प्रमाण वाढते. 'तुळशीचे महात्म्य' मी पामराने काय सांगावे. 

"तुलसी महात्म्य हे स्त्रियांना सौभाग्यदायक  संतती, संपती देते आणि मानवास भरपूर प्राणवायू देते. वास्तूतील तथा घरातील वातावरण प्रसन्न राहते."
"ॐ नमो भगवते वास्तू देवतायै नम:"

|| शुभमं भवतु ||

आपला 
Preview