गुरुवार, १ ऑक्टोबर, २०१५

वास्तू दिशा विचार आणि समृद्धी

श्री स्वामी समर्थ 
नमस्कार,

एक दोन खोलीत संसार करणारी सामान्य व्यक्ती वस्तूशास्त्राचे नियम पाळून घर वस्तू सजवू शकत नाही. अशावेळी  दिशांचा विचार करून घरात वस्तूची योग्य प्रकारे मांडणी करता येते. त्यामुळे वस्तू दोष कमी होतो. मनास शांति समाधान लाभते. वास्तूत संपन्नता प्राप्त होते तसेच सुबत्ता नांदते.  घरात मंगल कार्य होतात. घरात आजारपण नष्ठ होते. याच प्रमाणे नवीन घरात प्रवेश करण्या अगोदर देखिल मुहर्त पाहून वस्तू शांतिलाही तेवढेच महत्त्व आहे. हे देखिल आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. नुसता कलश ठेवून प्रवेश करणे योग्य नाही.  

घरात दिशा प्रथम निश्चीत करून घ्याव्यात. घरातील मांडणी शक्यतो याप्रामाणे असावी.


१.  ईशान्य देशेला देवघर 
२.  पूर्वेला स्नानगृह
३.  अग्नेय दिशेला स्वयंपाक घर
४.  दक्षिण दिशेला झोपण्याची खोली
५.  नैॠत्य दिशेला विळी, सुरु, भांडे ठेवण्याची जागा
६. पश्चिम दिशेला अभ्यासाची खोली, भोजनाची जागा 
७. वायव्य दिशेला भांडार घर धान्य साठवणुकीची जागा  
८.  उत्तर दिशेला तिजोरी कपाट पैशाची जागा 

साधारणत: बैठक ही घराच्या मध्यावर असावी. घरातील झोपण्याच्या पलंगावर बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस बसवू नये.  घरातील औषधी नेहमी ईशान्य भागात ठेवावी. तशीच ती उंच जागेवर ठेवावी. लहान मुलांच्या हातात पोहचणार नाहीत अशा प्रकारे ठेवावी. 

मुलांच्या अभ्यासाची जागा पूर्वे - ईशान्य, उत्तर दिशेला तोंड करून बसण्याची असावी. विद्या ग्रहण आणि आकलन हे चांगल्या प्रकारे होते. 

घराचे किंवा वस्तूचे प्रमुख प्रवेशद्वार हे मोठे असावे साधारण ४ फूट रुंदीस असावा.  प्रवेशद्वारावर उंबरठा असलाच पाहिजे. प्रवेशद्वारावर श्री गणेश, कलश, स्वस्तिक वगैरे शुभ चिन्हे रेखावीत अथवा चित्र स्वरुपात लावावीत. वाईट प्रवाह, स्पंदने, किंवा लहरी घरात प्रवेश करीत नाही. 

भारतीय संस्कृतीनुसार दारासमोर रांगोळी रेखावी. रांगोळीला हळद कुंक लावावे. शुभ परिणाम होतो. 

एक विशेष सूचना म्हणजे मांगल्याचे प्रतिक घरातील प्रवेशद्वारासमोर तुळशी वृंदावन असावे. वातावरणात प्राणवायूंचे प्रमाण वाढते. 'तुळशीचे महात्म्य' मी पामराने काय सांगावे. 

"तुलसी महात्म्य हे स्त्रियांना सौभाग्यदायक  संतती, संपती देते आणि मानवास भरपूर प्राणवायू देते. वास्तूतील तथा घरातील वातावरण प्रसन्न राहते."
"ॐ नमो भगवते वास्तू देवतायै नम:"

|| शुभमं भवतु ||

आपला 
Preview

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा