गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

शासक ग्रहांची किमया (रुलीग प्लानेट)

!! श्री स्वामी समर्थ !!

कृष्णमूर्ती पद्धतीत शासक ग्रहांना (रुलीग प्लानेट) यक्षनीची कांडी (मँजिक) म्हटले आहे.  तत्कालीन प्रश्न देखिल सहजपणे सोडवता येतात. माझ्या घरात चुलत भावाची पत्नी गरोधर आणि साधारण ९ महिने पूर्ण झाले त्यामुळे बाळाचे आगमन कधी होणार हा कुतूहलाचा विषय तर होताच परंतू आम्ही दत्त-स्वामी भक्त या वर्षी माझे दत्त गुरुचरित्र पारायण दत्तजयंती मध्ये होणार की नाही कारण पुढील १० दिवस वृद्धी पडेल आणि १३ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दर वर्षीचा आपला हा नियम या वर्षी खंडीत होतो की काय असे वाटत होते. त्यामुळे २९/११/२०१६ मंगळवारी सहज दुपारी माझ्या सौभाग्यवतीने कुंडली मांडण्याचा आग्रह धरला आणि ठोकळा कुंडली मांडत दु. २:४८ रुलिंग प्लानेटची नोंद घेतली.

२९/११/२०१६ दु. २:४८
L:  (मीन) गुरु
LS:   बुध
S:  (अनुराधा) शनी (केतू)
R:  (वृश्चिक) मंगळ
D:  (मंगळवार) मंगळ

डॉक्टरने पुढील ६ ते ७ दिवस वाट पाहण्यास सांगितले त्यामळे एक आठवडा असल्याने उत्तर लगेच मिळाले होते की प्रसृती ही गुरुवारी होणार परंतु रुलिंग मध्ये बुध आहे आणि शनी देखिल आहे त्यामुळे शनिवार हे देखिल उत्तर असू शकते. पुन्हा चंद्राचे गोचर पाहिले तर गुरुवारी (गुरु) मुळ नक्षत्र (केतू) असून सकाळी साधारण १० ते १२ पर्यंत मकर (शनी) लग्न सुरु होते (हे सर्व ग्रह रुलींगमध्ये आहे) त्यामुळे या दरम्यानच घरी मुलगी येईल असे भविष्य केले. डॉक्टरकडे रुटीन चेक-अप करण्यास बुधवारी गेले असता त्यांनी शनिवार पर्यन्त थांबण्यास सांगितले. परंतू प्रसृती वेदना ह्या गुरुवारीच सकाळी सुरु झाल्या आणि ठीक ११:३० मी. नॉर्मल प्रसृती होऊन मुलगी झाली आणि माझी भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी आता ७ दिवसाचे नाही परंतू ३ दिवसचे गुरु चरित्राचे पारायण करू शकेल. माझा हा वार्षिक नित्यनियम जणू काही दत्त महाराजांनी सांभाळला हे मात्र नक्की.. !!! ज्योतिष शास्त्राचे अनुभव हे नित्य येतात त्यातच स्वामी महाराजाची साथही मिळत असते. वेळे अभावी मात्र त्याचे कुंडली विवेचन किंवा लेख हा ब्लोग वर मांडणे अवघड होते. असो..!!


!! शुभम् भवतु !!

Preview

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

-:: सस्नेह निमंत्रण ::-

!! श्री स्वामी समर्थ !!
विराह ज्योतिष मुक्त विद्यापीठ आयोजित व्याखानमाला : माझा व्याख्यान विषय : (४-स्टेप थेरी के. पी. ) अध्यात्मिक ग्रहयोग - दिपक पिंपळे, दि. १८ सेप्टेम्बर २०१६ रविवार - साय. ४ वा.
स्थळ: व्हिट्स हॉटेल - स्टेशन रोड - औ. बाद.


रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

!! कुंडलीतील ज्योतिष योग (के. पी. पद्धती) !!

!! श्री स्वामी समर्थ !!
एकंदरीत विचार केला तर ज्योतिष शास्त्राचे बरेच संशोधन अगदी अलीकडील काळात के पी. पद्धतीने झाले आहे आणि त्यास नियमाच्या आधार आहे. लोकांना फार प्रश्न पडतात, ज्योतीषांस आपली कुंडली चांगली माहिती असते हो..!!. एखादे जाताकास रत्न सुचविले कि लागलेच आमच्या बोटाकडे लक्ष ठेवतात कि आम्ही रत्न घातले आहे कि नाही.. अशा “जातक कथा” खूप आहे, नित्य अनुभव येतो. असो..
‘जोतिष योग’ कुंडलीत पालक लहानपणी कोणीच विचारीत नाही, फक्त doctor, engineer, software हे योग पाहतात. परंतू ज्योतिष योग हा वारसाने परंपराने कधी कधी default येतो. असेच एक प्रभावी व्यक्तिमत्व असणारे आमच्या क्षेत्रातील श्री पुरोशात्तम कोराणे यांची कुंडलीत “ज्योतिष योग” पाहू, ८ ऑगस्टचा श्रावणी सोमवार १९७७ दिवशीचा यांचा जन्म आणि तोच योग या ८ ऑगस्टला श्रावणी सोमवारी निमीत्ताने आला आहे. सर्वाना कळवा या दृष्टीकोनातून याच्या कुंडलीत ज्योतिष योग पाहूया.
नियम: जर प्रथम भावाचा(व्यक्तिमत्व) उप स्वामी (सब) गुरु, चंद्र, शनी अथवा केतू असून जर तो १, ५, ९, अथवा १२ भावाशी संबधित असेल तर जातक हा ज्योतिष शास्त्राकडे वळतो.
या कुंडलीत प्रथम भावाचा सब हा गुरु (विद्या) असून तो ५ पंचमेश (धर्म त्रिकोण) असून पंचमात (कतू – मंत्र विद्या) आहे गुरु हा अष्टम स्थानी (परंपराने वारसेने) असून गुरुची १२ स्थानावर दृष्टी आहे. प्रथम स्थानी वृश्चिक रास (संशोधक रास/प्रक्टिकल) असून यामध्ये नेपच्यून (गूढ शास्त्राचा द्योतक असून वाचासिद्धी देणारा ग्रह असून) केतू हा मीन रास (अध्यात्मिक अनुभव) त्यामुळे हे ज्योतिष आहेत.
यात तृतीय भावाचा (लिखान) सब हा बुध (लिखाण कारक प्रभावी/बुद्धीला पटणारे) असे असून बुध हा लाभेश (परिपूर्णता) आहे. शनी नवमं स्थान हे भाव सदर जाताकास प्रभावी ठरतात. याच प्रकारे माझ्या कुंडलीत देखील वृश्चिक लग्न असून मिथून रास आहे तर कर्क राशीचा गुरु नवम भावी आहे. या निमित्ताने पुरोशात्तमजीना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!!
!! शुभम भवतु !! गुरुदेव दत्त..!!


गुरु पालट (गुरूचा कन्या राशीत प्रवेश)

!! श्री स्वामी समर्थ !!
गुरु महाराज ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. “गुरु मला कितवा आहे, कसा आहे” अशी सध्या रोजी विचारनी सुरु असते. ज्योतिष शास्त्रातील काही माहित असो अथवा नसो परंतू पूर्वी पासून कोणाकुडून ऐकत असलेला हा ज्योतिषास चीमटभर भाग सर्वांना माहित असतो अथवा जाणून घेण्याची उत्सुकता हि असते. त्यात मग ४, ८, आणि १२ हे खडतळ, त्रासदायी, कष्टप्रद असा असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १२ वा गुरु मुलीच्या विवाहास अडचणी देणारा, ‘गुरुबळ’ नाही, अशी माहीती लोकांमध्ये प्रचलित आहे कि ते समजाविणे आता कठीण आहे. माझ्या ब्लोगवर माझ्या एका ज्योतीष मित्राच्या बहिणीस १२वा गुरु सुरु असताना विवाह झाला आहे व त्या पत्रिकेचे विश्लेषण देखील मी केले आहे. असो.. अहो..!! कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीत दशास्वामी काय परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८ गुरु सुरु असेल तर कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, १२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो. गुरु भक्तीची वाढ निर्माण करतो. गुरूचा कन्या राशीतल प्रवेशा समयीच “ श्री नृसिंह स्वामी महाराजांनी” आपले अवतार कार्य संपून श्री शैल्यास निघून गेले. कन्यागत गुरु म्हणजे “गंगा-कृष्णा” भेटपर्व असा उत्सव श्री क्षेत्र वाडीस सुरु होणार आहे असा योग १२ वर्षांनी येतो. मग या ४ ८ आणि १२ गुरूचा आपण कसा परिणाम भोग्याचा याची तयारी तुमची तुम्ही थोड्याफार प्रमाणात करू शकता...!!! बाकी शेष स्वामी महाराजावर सोपवावे... गुरुविण मज कोण दाखवील वाट ...!!!


बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

ज्योतिषशास्त्र

!! श्री स्वामी समर्थ !!
पाच वेदांगापैकी ज्योतिष एक वेदांग आहे. ज्योतिषाचा अनुभव हा येतो. यासाठी हवी असते आपली श्रद्धा व अध्यात्मिकता. आयुष्यातील घटना या लिखित आहे त्यात तुमच्या कर्माचा आधार असतो आणि त्याप्रमाणे फळ मिळते. सध्या प. प. टेंबे स्वामीनि रचित मंत्र साधना पोस्ट करत आहे. शंकाखोराना त्याचा लाभ मुळीच होणार नाही. मंत्रात प्रचंड ताकद असते हे माझ्या अनुभवांनी सांगत आहे. कुठलाही मंत्र हा तुमच्या प्रयत्न कर्माला साथ देणारा असतो. आजारी व्यक्तीने डॉक्टरचा सल्ला औषधी घेणेच भाग पडते मग मंत्र आत्मबल वाढेल. श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक वाक्य सर्वांना माहित आहे. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे." तर मग कुणाच्या पाठीशी आहे स्वामी...!! जो कि सातत्याने प्रयत्न करतो. त्याच प्रमाणे रत्न व यंत्र यांचा देखील उपयोग होतो. रत्न हे तुमच्या प्रयत्नाला संधी निर्माण करतात. तुमचे भाग्य बदलत नाही. शास्त्राची किती आहारी जायचे ते आपणच ठरवावे. नाही तर रात्री न्यूज च्यानलवर "Yes I can change" म्हणारे भरपूर ज्योतिष झाले आहे. प्रथम साधक व्हावे लागेल. मन-बुद्धी-अंतकरण शुद्ध होईल तरच उपाय हे उपयोगी पडतील. खोटे, फसवणूक करणारे, ब्ल्याक मार्केटिंग करणाऱ्याच्या हातात केवळ रत्न दिसतील पण अशा लोकांना मंत्राचा उपयोग होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
गुरुदेव दत्त..!!

बुधवार, १३ जुलै, २०१६

"जन्म कुंडली आणि प्रश्न कुंडली"


!! श्री स्वामी समर्थ !!

जन्म कुंडली आणि प्रश्न कुंडलीतील फरक हा प्रश्नकर्त्याने (जातकाने) समजला पाहिजे. जन्म कुंडली हि आपल्या जीवनाचा आराखडा असून जीवनातील चढउतार किंवा घटना यांचा तपशील ओळखता येतो. उदा. विवाह योग, नौकरी ईत्यादी.. यासाठी जन्मवेळ ही अचूक असावी लागते. परंतू प्रश्न कुंडली हि जातक ज्यावेळी प्रश्न घेऊन येतो त्यावेळी हि मांडली जाते आणि याची उत्तरे देखील अगदी समीप व अचूक असतात. मग एक कुठलाही साधा प्रश्न असेल जसे कि, नौकरीच्या मुलाखतीत यश मिळेल का किंवा जमीन/घर मिळेल का?, हरवलेल्या व्यक्ती, वस्तू, कागदपत्र, निवडणूकत यश ई. प्रश्न हे प्रश्न कुंडलीद्वारे सोडविण्यास यश मिळते हा माझा नित्याचा अनुभव..!!

मंगळवार, ५ जुलै, २०१६

कुंडली गुण मिलन

!! श्री स्वामी समर्थ !!

शास्त्रामध्ये संगीतल्याप्रमाणे षोडष संस्कारापैकी लग्न हा एक त्यातील भाग आहे. आजच्या आधुनिक जमान्यामध्ये केवळ गृह-गृहस्थी (संसार) चालविणे, कुटुंबाचा वंश वाढविणे एवढाच मर्यादित राहिला नसून कुणी पैशासाठी, आपले करियर बनविण्यासाठी, कोणी परदेशात स्थिर होण्यासाठी, तर कुणी निर्मल-निर्भेढ प्रेमात पडून लग्न करतो. असा उद्देश घेऊन जातक हे ज्योतिषकडे येतो हा माझा नित्य अनुभव आहे. याच प्रकारची वधू-वरांचे पालक देखील कुंडली मिलणासाठी येत असतात. ज्यांना ज्योतीष्याचे ज्ञान नाही ते “किती गुण जमतात?” असा प्रश्न करतात. खरे पाहता ३० च्यावर गुण पाहिल्यावर देखील “कुंडली जुळत” नसल्याने लग्न जीवनात अडथळे अथवा त्रास येऊ शकतो. त्यामुळे गुण १८ पेक्षा कमी गुण असल्यास देखील “कुंडली मिलन” केल्यास लग्नजीवनात, आनंद, सुख भरून राहून ते टिकते. त्यातच “मुलीला मंगळ” असे बौऊ करणारे देखील कमी नाहीत, पुढे हा विषय मांडू ....

शनिवार, २ जुलै, २०१६

शनी प्रदोष


!!श्री स्वामी समर्थ !!
दि. २ जुलै २०१६, शनिवार त्रयोदशी असून शनी प्रदोष आहे. प्रदोष पुजेस अनन्य साधारण महत्त्व आहे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे. शनीप्रदोष हे वर्षातून साधारण ३ किंवा ४ वेळेस असते. सर्व प्रदोष पूजनात शनीप्रदोष व्रत अतिशय फलदायी असून राहू दोष, शनीपिडा, तसेच संकटात मुक्ती देणारे हे व्रत आहे. श्रद्धेने हे पूजन केल्यास त्याची फलश्रुती ही निश्चितच मिळते. याचे महत्त्व 'गुरुचरित्र' तसेच 'श्रीपादचरित्रात' देखील असून पिठापुराम येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकावर रुद्र अभिषेक पूजन हे शनिप्रदोषच्या दिवशी होत असते.

बुधवार, १ जून, २०१६

निमंत्रण


!! श्री स्वामी समर्थ !!
रविवार दि. ५ जुन २०१६ बृहन महाराष्ट्र जोतिष मंडळ तर्फे ६ वे कृष्णमूर्ती जोतिष अधिवेशन - स्वाध्याय महाविद्यालय - लक्ष्मीरोड पुणे येथे होणार आहे. येथे माझे खेळाडूंचे कार्येश ग्रह .. या विषयावर दुपारी १२ ते २ या कालावधीत व्याख्यान/कुंडली विश्लेषण आहे तसेच ईतर ज्योतिषांचे व्याख्यान आणि सत्र आहेत. आपणस आग्रहाचे निमंत्रण .

सोमवार, ३० मे, २०१६

निमंत्रण

!! श्री स्वामी समर्थ !!
रविवार दि. ५ जुन २०१६ बृहन महाराष्ट्र जोतिष मंडळ तर्फे ६ वे कृष्णमूर्ती जोतिष अधिवेशन - स्वाध्याय महाविद्यालय - लक्ष्मीरोड पुणे येथे होणार आहे. येथे माझे खेळाडूंचे कार्येश ग्रह .. या विषयावर दुपारी १२ ते २ या कालावधीत व्याख्यान/कुंडली विश्लेषण आहे तसेच ईतर ज्योतिषांचे व्याख्यान आणि सत्र आहेत. आपण आग्रहाचे निमंत्रण


शनिवार, २ जानेवारी, २०१६

ज्योतिषशास्त्र - संचित आणि प्रारब्द

!! श्री स्वामी समर्थ !!
ज्योतिष विषयक मागे बरेच लेख लिहिले आहे परंतू कधी माझाच लेख whatsapp वर दुसऱ्याचे नावानिशी येतो मीच माझ्या लेखाचा धनी नसतो. असो ...

तरीदेखील नवीन वर्षाचा लेख लिहावा असा वाटत होते आणि थोडा वेळ देखिल मिळाला आहे...!! निश्चितच वेळ हा प्रत्यकाकडे असतो फक्त तो काढावा लागतो मग तो देवासाठी असो, चांगल्या कार्यासाठी असो अथवा कुटुंबासाठी असो. मी मित्रासाठी म्हणतच नाही कारण त्यांचासाठी आपल्याकडे द्यायला वेळच वेळ असतो आणि तो आपण देतो देखिल याचा अनुभव अगदी या ३१ डिसेंबरला बघितला देखिल आहे. त्यामुळे मी म्हणेल आपला अमूल्य वेळ थोडाफार का होईना त्या परमेश्वरसाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी द्यावा असे वाटते.

आज कुंडलीत थोडा वेगळ्या प्रकारे मंथन करणार आहे. दरोरोज कुंडल्यांचे विवेचन सुरु असते वेगवेगळा अनुभव हा येत असतो. संगीतलेल्या कालावधीत घटना देखिल घडतात, बाहेरगावी असलेल्या जातकांचे फोन अचानक येतात कारण मागे काही वर्षांनी मी काही संगीलेली घटना/अनुभव त्यांना येत असतात. यात माझा मी पणा मुळीच नाही कारण माझा शास्त्रावर आणि माझ्या स्वामीरायांवर प्रचंड विश्वास आहे आणि त्यांच्यामुळेच जो काही तो मी आहे.  मग यामध्ये असे जातक आहेतच की त्यांना संगीलेल्या कालावधीत होणाऱ्या घटनांचा अनुभव येत नाही मग सांगितलेल्या उपायात काही कमतरता राहिला का किंवा मग रत्न बदलून पाहू का अशा प्रश्नांची उत्तरे देत हा ज्योतिषशास्रचा प्रवास सुरूच आहे. हजारो कुंडल्या डोळ्यासमोर आतापर्यंत गेल्या त्यामुळे जातक कथेचे येथे विस्तारण नको.

सर्वानी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की या शास्त्राची देखिल काही मर्यादा आहेत त्याचे आकलन होणे गरजचे आहे. कुंडलीत मुखत्वे करून एकसारखे भाव, येणाऱ्या दशा, साधारण सारख्या जरी दिसत असल्या तरीदेखिल मात्र दोन जातकांच्या जीवन घटनेत प्रचंड तफावत फरक दिसून येतो मग तो दोन जुळ्या भावांचा असो अथवा इतर दोन समान जातकांच्या कुंडल्यात असो. येथे मुख्य मुद्दा असतो की असे का घडते याचा विचार कुंडलीत आभ्यासाचा असतो तो आपल्या ३ स्थान (सुप्तमन/क्रियमाण कर्म) ५ स्थान (संचित कर्म) आणि ९ स्थान (अव्यक्तमन/प्रारब्द) याच संधर्भाने आभ्यास करवा लागतो. याचा संबध परस्पराशी कसा आहे ते पाहू.

संचितकर्म म्हणजे जे आपण जन्मत: घेऊन आलो, प्रराब्द जे आपणस भोगायचे आहे तर हे भोगण्यासाठी आपणास क्रियमाण कर्म महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कुंडलीतील ३ स्थान फार महत्वाचे ठरते. आयुष्यात अचानक असे काहीच घडत नसते कारण संचीतातील जमा ठेवलेला ठेवा प्रारब्द स्वरुपात टप्याटप्याने आयुष्यात भोगावा लागतो. उदा. जशी की बँकेत ठेवलेली रक्कम आपण वेळोवेळी गरजेनुसार काढतो. परंतू या परमेश्वरच्या कर्माच्या बँकेत पापा पुण्याची वजाबाकी ही नाही केवळ बेरीज आहे मग आपण केलेले पाप असो अथवा पुण्य त्यानुसार ते भोगणे आहे. मग यात असा प्रश्न पडतो की जर सर्व काही लिखित आहे तर परमेश्वर आणि ज्योतिष शास्त्राचा काय रोल आहे तर येथे मी हेच सांगेण की यासाठी आपले तृतीयस्थान बळकट करावे लागेते जे की आपल्या हातात आहे म्हणजेच येथे प्रथम स्थान (स्वतः जातक/बुद्धी) देखिल कार्यान्वित होते. त्या परमेश्वरला असे मागावे की त्याचे चिंतन नेहमी असावे आणि केवळ आपल्या हातून चांगले कार्य घडावे, चांगली वागणूक व्यावी, अन्नदान, श्रमदान, रक्तदान हे घडावे. देवाच्या नामस्मरणमुळे पाप नाश होऊन सुप्तमन (३ रे स्थान) जागृत होते आणि दैविक अनुभव मिळण्यास सुरुवात होते. म्हणून मी आपणास सांगेन की आपण आपल्या कुंडलीतील तृतीय स्थान बळकट करा. लिखाणासाठी भरपूरकाही आहे परंतू येथेच लेखास विराम देतो.


!! शुभम् भवतु !!
Preview