शनिवार, २ जानेवारी, २०१६

ज्योतिषशास्त्र - संचित आणि प्रारब्द

!! श्री स्वामी समर्थ !!
ज्योतिष विषयक मागे बरेच लेख लिहिले आहे परंतू कधी माझाच लेख whatsapp वर दुसऱ्याचे नावानिशी येतो मीच माझ्या लेखाचा धनी नसतो. असो ...

तरीदेखील नवीन वर्षाचा लेख लिहावा असा वाटत होते आणि थोडा वेळ देखिल मिळाला आहे...!! निश्चितच वेळ हा प्रत्यकाकडे असतो फक्त तो काढावा लागतो मग तो देवासाठी असो, चांगल्या कार्यासाठी असो अथवा कुटुंबासाठी असो. मी मित्रासाठी म्हणतच नाही कारण त्यांचासाठी आपल्याकडे द्यायला वेळच वेळ असतो आणि तो आपण देतो देखिल याचा अनुभव अगदी या ३१ डिसेंबरला बघितला देखिल आहे. त्यामुळे मी म्हणेल आपला अमूल्य वेळ थोडाफार का होईना त्या परमेश्वरसाठी आणि आपल्या कुटुंबियासाठी द्यावा असे वाटते.

आज कुंडलीत थोडा वेगळ्या प्रकारे मंथन करणार आहे. दरोरोज कुंडल्यांचे विवेचन सुरु असते वेगवेगळा अनुभव हा येत असतो. संगीतलेल्या कालावधीत घटना देखिल घडतात, बाहेरगावी असलेल्या जातकांचे फोन अचानक येतात कारण मागे काही वर्षांनी मी काही संगीलेली घटना/अनुभव त्यांना येत असतात. यात माझा मी पणा मुळीच नाही कारण माझा शास्त्रावर आणि माझ्या स्वामीरायांवर प्रचंड विश्वास आहे आणि त्यांच्यामुळेच जो काही तो मी आहे.  मग यामध्ये असे जातक आहेतच की त्यांना संगीलेल्या कालावधीत होणाऱ्या घटनांचा अनुभव येत नाही मग सांगितलेल्या उपायात काही कमतरता राहिला का किंवा मग रत्न बदलून पाहू का अशा प्रश्नांची उत्तरे देत हा ज्योतिषशास्रचा प्रवास सुरूच आहे. हजारो कुंडल्या डोळ्यासमोर आतापर्यंत गेल्या त्यामुळे जातक कथेचे येथे विस्तारण नको.

सर्वानी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की या शास्त्राची देखिल काही मर्यादा आहेत त्याचे आकलन होणे गरजचे आहे. कुंडलीत मुखत्वे करून एकसारखे भाव, येणाऱ्या दशा, साधारण सारख्या जरी दिसत असल्या तरीदेखिल मात्र दोन जातकांच्या जीवन घटनेत प्रचंड तफावत फरक दिसून येतो मग तो दोन जुळ्या भावांचा असो अथवा इतर दोन समान जातकांच्या कुंडल्यात असो. येथे मुख्य मुद्दा असतो की असे का घडते याचा विचार कुंडलीत आभ्यासाचा असतो तो आपल्या ३ स्थान (सुप्तमन/क्रियमाण कर्म) ५ स्थान (संचित कर्म) आणि ९ स्थान (अव्यक्तमन/प्रारब्द) याच संधर्भाने आभ्यास करवा लागतो. याचा संबध परस्पराशी कसा आहे ते पाहू.

संचितकर्म म्हणजे जे आपण जन्मत: घेऊन आलो, प्रराब्द जे आपणस भोगायचे आहे तर हे भोगण्यासाठी आपणास क्रियमाण कर्म महत्त्वाचे ठरते. त्यामुळे कुंडलीतील ३ स्थान फार महत्वाचे ठरते. आयुष्यात अचानक असे काहीच घडत नसते कारण संचीतातील जमा ठेवलेला ठेवा प्रारब्द स्वरुपात टप्याटप्याने आयुष्यात भोगावा लागतो. उदा. जशी की बँकेत ठेवलेली रक्कम आपण वेळोवेळी गरजेनुसार काढतो. परंतू या परमेश्वरच्या कर्माच्या बँकेत पापा पुण्याची वजाबाकी ही नाही केवळ बेरीज आहे मग आपण केलेले पाप असो अथवा पुण्य त्यानुसार ते भोगणे आहे. मग यात असा प्रश्न पडतो की जर सर्व काही लिखित आहे तर परमेश्वर आणि ज्योतिष शास्त्राचा काय रोल आहे तर येथे मी हेच सांगेण की यासाठी आपले तृतीयस्थान बळकट करावे लागेते जे की आपल्या हातात आहे म्हणजेच येथे प्रथम स्थान (स्वतः जातक/बुद्धी) देखिल कार्यान्वित होते. त्या परमेश्वरला असे मागावे की त्याचे चिंतन नेहमी असावे आणि केवळ आपल्या हातून चांगले कार्य घडावे, चांगली वागणूक व्यावी, अन्नदान, श्रमदान, रक्तदान हे घडावे. देवाच्या नामस्मरणमुळे पाप नाश होऊन सुप्तमन (३ रे स्थान) जागृत होते आणि दैविक अनुभव मिळण्यास सुरुवात होते. म्हणून मी आपणास सांगेन की आपण आपल्या कुंडलीतील तृतीय स्थान बळकट करा. लिखाणासाठी भरपूरकाही आहे परंतू येथेच लेखास विराम देतो.


!! शुभम् भवतु !!
Preview

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा