श्री स्वामी समर्थ
आज दि. ७ मे २०१९ रोजी मंगळाचे राशी परिवर्तन सकाळी मिथुन
राशीत झाले आणि मंगळ आणि राहू हा अंगारक योग असून शनी-केतू ची देखील दृष्टी आहे.
या योगाचा १२ राशीवर निश्चितच परिणाम होणार आहे. २२ जून पर्यंत आहे मंगळ हा मिथून
राशीत आहे. याचा परिमाण भौतिक दृष्ट्या देखील होणार आहे. गर्मी वाढेल कारण मंगळ
उष्णतेचा कारक, पाण्याचे संकट निर्माण होतील तर शनी दृष्टी युक्त असल्याने
राजनैतिक उलथा-पालथ देखील होणार आहे आणि याचा परिणाम आपण २३ मे रोजी पाहणारच आहोत.
मंगळ हा शत्रू राशीत आहे आणि शत्रू ग्रहा बरोबर म्हणजेच राहू बरोबर अंगारक योग
करीत आहे. त्यामुळे १२ राशीला तो वेग वेगळा परिणाम देणार ठरेल.
मंगळाचे गोचर राशी फळ
मेष:- मेष राशीतील तिसरा मंगळ हा भावंडात वाद निर्माण करणारा
ठरेल तर वाहन सावकाश चालवणे योग्य ठरेल. संपत्ती बाबत सावधान राहा, फसवणूक होऊ नये.
वृषभ : या राशीला दुसरा मंगळ हा, कोर्ट आणि कचेरीत आपण
विनाकारण ओढले जाऊ शकता. पैसे उधार देऊ नका. धर्याने काम करा.
मिथून : याच राशीत मंगळ-राहू हा अंगारक योग आहे, कर्ज वाढेल,
संध्याकाळी प्रवास टाळावा. मानसिक तणाव देखील वाढेल, वडिलांशी वाद होतील. त्यामुळे
आपण शांत राहणे योग्य राहील.
कर्क : मंगळ या राशीला १२ राहणार आहे. वाहनासाठी आणि घर
कामासाठी पैसा खर्च होईल. नियमाचे पालन करा नाही तर कानुनी पेचात अडकाल.
सिंह: ११ वा मंगळ
आपणास अचानक धन लाभ करून देऊ शकतो मग शेअर असो अथवा लॉटरी मार्फत असो ते धन
प्राप्त होईल. मित्रांनावर विश्वास ठेवू नका.
कन्या: १० वा मंगळ कामाची दग-दग वाढेल आणि पैसे हि कमी मिळतील
केवळ ढोर महिनत होणार आहे.
तुला: ९ वा मंगळ भाग्याला साथ मिळेल. यात्रेचा योग येईल. मोठी कामे मार्गी लागणार आहेत. लांबचे प्रवास देखील होतील. परदेश जाण्याचे योग
आहेत.
वृश्चिक: ८ वा मंगळ या राशीला अशुभ फळे देणारा ठरेल. सावधान
राह, आर्थिक आणि मानसिक हानी होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा.
धनु: ७ वा मंगळ पती-पत्नी मध्ये वाद निर्माण होऊ शकता. संशयाचे
वातावरण तयार होऊन गैरसमज वाढणार आहे. प्रेमात वाद निर्माण होतील, वेळ सावधान
राहण्याची आहे.
मकर: ६ वा मंगळ रोग
वाढवू शकतो. शत्रू हे हवी होणार आहेत. सत्याने वागा पुढे परिणाम चांगले मिळतील.
रोगाचे निदान लावर होणार नाही. काळजी घ्या.
कुंभ: ५ वा मंगळ हा
नौकरीत समस्या निर्माण करू शकतो, उत्त्पन्न कमी होईल, मुलांच्या स्वथाकडे लक्ष्य द्यावे
लागेल.
मीन : ४ था मंगळ आईची काळजी घावी. सुखात कमतरता येईल. घरात वाद
टाळा. चिंता वाढणार आहे. विवाद होणार नाही
याची देखील काळजी घ्या.
ज्योतिषकार: श्री दिपक चंद्रकांत पिंपळे / ९८२३४४८४४९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा