शुक्रवार, ६ मार्च, २०२०

शनी प्रदोष २०२०

!!श्री स्वामी समर्थ !!
शनी प्रदोषाच्या व्रताबद्दल नेहमी सांगतो आणि त्याचा अनुभव देखील लोकांना येतो..असे हे व्रत आहे...
दि. ७ मार्च २०२०, शनिवार त्रयोदशी असून शनी प्रदोष आहे. प्रदोष पुजेस अनन्य साधारण महत्त्व आहे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे. शनीप्रदोष हे वर्षातून साधारण ३ किंवा ४ वेळेस असते. सर्व प्रदोष पूजनात शनीप्रदोष व्रत अतिशय फलदायी असून राहू दोष, शनीपिडा, तसेच संकटात मुक्ती देणारे हे व्रत आहे. श्रद्धेने हे पूजन केल्यास त्याची फलश्रुती ही निश्चितच मिळते. याचे महत्त्व 'गुरुचरित्र' तसेच 'श्रीपादचरित्रात' देखील असून पिठापुराम येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकावर रुद्र अभिषेक पूजन हे शनिप्रदोषच्या दिवशी होत असते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा