शुक्रवार, २ मे, २०१४

श्राद्ध आणि विज्ञान


आपण श्राद्ध विधी करतो पण ते का करावे ? ते खरोखर पितरांपर्यंत पर्यंत पोहोचते का? श्राद्धाचे खरे महत्व काय?

प्रश्न: पिंडाला कावळा शिवला नाही तर तोः वासनाग्रस्त जीवात्मा अडून बसतो त्याला कसा कळत कि हा प्रेतात्माला आहे?
radio active धातू असतात . त्यातून तेज विकिरण होते लोहचुंबक लोखंडाचे आकर्षण करते वायू स्वभावताच संचार करतो diffusion काजव्यात,काही जन्तुत, काही माश्यात तेज विकीरणाची शक्ती असते  दाटअंधारात माणसाला दिसणार नाहीत अश्या वस्तू मांजरीला घुबदना दिसतात कावळ्याच्या दृष्टीला त्या सुष्मतम दृष्टीने तोः प्रेअत्जीव पाहू शकतो हा प्रेअत्जीव पिंडाभवतीअसतो तर तोः कावळ्याला पिंडस्पर्श करू देत नाही पिंडा जवळ कावळा येतो पण परंतु स्पर्श न करताच परत जातो.

विज्ञानम्हणजे काय ? काय श्राद्ध हे science आहे का ?
विज्ञान हे बदलणारे असते त्यांचे निष्कर्ष शाश्वत आहेत एकाची हजामत दुसरा करतो आणि दुसर्याची तिसरा......अनुच विभाजन करताना इलेक्ट्रोन , प्रोटोन , आणि nutron असे तीनच कण सुरुवातीला सापडले पुढे १०७ च्या जवळपास कण सापडलेत म्हणजे ते प्रयोग करतात प्रयोगाची प्रक्रिया अशीच अखंड सुरु आहे त्यामुळे निष्कर्ष बदलतात पण श्राद्ध हे chemistry aani physics सारखे बदलणारे विज्ञान नाही त्याचे विशेष सिद्धांत शाश्वत आहेतश्राद्ध हे न बदलणारे आहे श्रद्धाचा सबंधविश्व देवाशी असतो वासू , रुद्र, आदित्ये देव्ताशी आहे पिता प्रपिता व प्रपितामः हे वासू, रुद्र, व आदित्ये रूप आहे श्राद्ध मंत्र व विधी हे देवतांशी संपर्क साधून देतात ब्रह्मा देवाने आधी ऋषी निर्माण केलेत नंतर पितान ,नंतर देव, नंतर मानव. पण हे आधुनिकांना पटत नाही कारण विश्वाच्या मुलाशी चैत्रान्ये शक्ती आहे जे सर्व विश्वाचा पसारा त्यातून निर्माण झाला व त्याचे नियमन ,नियंत्रण,करण्याकरताच तर शास्त्रे निर्माण झालीत.

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४

महाशिवरात्र

|| श्री स्वामी समर्थ ||
|| ॐ नमः शिवाय ||

-: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा :-
महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्‍ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. 'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबो‍धले जाते. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्‍याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या द‍िनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्‍या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.





रविवार, २ फेब्रुवारी, २०१४

गुरु आणि शनी - २०१४

|| श्री स्वामी समर्थ || 

गुरुपुष्यामृतयोग :  १३ फेब्रुवारी सूर्योदयापासून २२:२२ पर्यंत 
                             १८ सेप्टेम्बर उ. रात्री ०३:२५ सूर्योदयापर्यंत
                १६ ऑक्टोबर १० ४६ ते  सूर्योदयापर्यंत
                १३ नोव्हेंबर सूर्योदयापासून २१:४१ पर्यंत

शनीची साडेसाती:  २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या-तुला-वृश्चिक या राशींना साडेसाती
                २ नोव्हेंबर २०१४ पासून तुला-वृश्चिक-धनु या राशींना साडेसाती आहे. (कन्या राशीला साडेसती संपते).

गुरु अस्त :       ११/०७/२०१४ ते ६/८/२०१४
शुक्र अस्त:       ०८/०१/२०१४ ते १४/०१/२०१४, ०२/१०/२०१४ ते २२/११/२०१४

गुरु कर्क राशीत १९ जुन २०१४ रोजी प्रवेश करणार आहे.


फेब्रुवारी २०१४ ग्रहांचे नक्षत्र भ्रमण

|| श्री स्वामी समर्थ ||
ग्रह          ग्रह-राशी प्रवेश             नक्षत्र स्वामी               दिनांक
रवि           १२/२/१४-कुंभ          चंद्र                         ०१/२/१४ ते ६/२/१४
                                  मंगळ                       ७/२/१४ ते १९/२/१४
                                  राहू                         २०/२/१४ ते २८/२/१४

मंगळ          ४/२/१४-तुळ           मंगळ                       १/२/१४ ते २८/२/१४

बुध           १८/२/१४-मकर(वक्री)     राहू                         २/२/१४ ते १२/२/१४
                                   मंगळ                       १३/२/१४ ते २८/२/१४

शुक्र           २६/२/१४-मकर        शुक्र                         १/२/१४ ते २१/२/१४
                                  रवि                         २२/२/१४ ते २८/२/१४
                                 

ग्रह          ग्रह-राशी प्रवेश       नक्षत्रस्वामी-सब            दिनांक
     
गुरु           मिथून                राहू-चंद्र                       १-२/२/१४
                                  राहू-रवी                      ३/२/१४ ते १०/२/१४
                                  राहू- शुक्र                     ११/२/१४ ते २८/२/१४

शनी           तुळ                  गुरु-शुक्र                      १/२/१४ ते ५/२/१४
                                  गुरु-रवि                       ६/२/१४ ते २८/२/१४

राहू           तुळ                  राहू-राहू                      १/२/१४ ते २८/२/१४
                                        

केतू           मेष                  केतू-गुरु                      १/२/१४ ते २०/२/१४

                                  केतू-राहू                      २१/२/१४ ते २८/२/१४

Preview