सोमवार, २ जुलै, २०१८

एक मुखी रुद्राक्ष


श्री स्वामी समर्थ 
मागील पोस्ट मध्ये जोतिष हा कुठल्या आधारे रत्न, रुद्राक्ष, उपासना सांगतात असे मी सांगितले तर आज आपण एक मुखी रुद्राक्षाचा पुराणातील संधर्भ आणि त्याची उपयुक्तता पाहूया. एक मुखी रुद्राक्षास शास्त्रात प्रत्यक्ष शिव स्वरूप मानले आहे. एक मुखी धारण केल्यास सर्व पापांपासून मुक्तता होऊन जन्म-मारण्याच्या फेर्यातून मुक्त करणारा आहे. 
।। एकवक्त्र: शिव: साक्षाद्भुक्ति मुक्ति फल प्रद: ||
शिवपुराण अ. २५, श्लो. ६४
या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्‍याणकारी आणि महत्‍वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्‍याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष नाव सर्वप्रथम घेतलं जात. याची देवता मुळातच शिव आहे आणि शिव हे प्रथम आदियोगी असल्याने योगसाधनेला उपयोगी ठरणारा आहे. रुद्राक्षचे असे फारसे नियम नाही परंतू एक मुखी धारण करण्यासाठी कसोटीला उतरणे फार गरजचे असते त्यामुळे या रुद्राक्षाचे देवघरात पूजन जास्त योग्य आहे. रोज रुद्राभिषेक किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा अभिषेक करावा. नेपाळमध्ये जो एक मुखी रुद्राक्ष पाहण्यात येतो तो फारच दुर्मिळ असून १२ वर्षानंतर एकदाच तयार होतो आणि आपण जे मार्केट मध्ये पाहतो ते ‘अर्धचंद्राकार’ किंवा काजूच्या आकाराचा हा रुद्राक्ष पाहतो त्याची प्राप्ती दक्षिण भारत किंवा इंडोनेशिया मध्ये जास्त प्रमाणात होते.
कसा वापर करावा:
एक एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ ह्रीं नमः” आणि शिवचा पंचाक्षर बीज मंत्र आहे “ॐ नमः शिवाय” दोनीही मंत्रा पैकी एक मंत्राच उच्‍चारण करून एकमुखी रुद्राक्ष धारण केल जावू शकत. हे लक्षात ठेवा की नियमित पंच माळेचा “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्यानी याचा प्रभाव किती तरी पटीने वाढतो.
एकमुखी रुद्राक्ष लाभ : तणाव (स्ट्रेस) कमी होणे, डोळ्यांचे, रक्तदाब, आणि हृदय विकार सारख्या आजारावर उपयुक्त असा आहे. - आपणस एक मुखी प्राप्त करायचे असल्यास संपर्क करू शकता.



Preview

शनिवार, ३० जून, २०१८

जोतिषशास्त्र


!! श्री स्वामी समर्थ !!

अनुभवाची शिजोरी घेऊन एक ज्योतिष तयार होत असतो. त्याचा अभ्यास, साधना, ग्रहांची साथ आणि गुरुंचा आशीर्वाद मग एखाद्या जातकाचा चांगला भलं कस होईल हाच उद्द्शे घेऊन तो पत्रिका पहात असतो. अनुभव भरपूर आहे, त्यावर एक कथा संग्रह निघू शकेल, असे लोक भेटतात आमचीही परीक्षा बघतात. अहो.. उपाय आणि पूजा आशाच लोकांना कार्य सिद्धीला पावते, जे लोक ते श्रद्धेने आणि विश्वासाने करतात. काल एक जातक आला. रत्न, रुद्राक्ष यंत्र आणि पूजा यावर माझा विश्वास नाही असे तो म्हणाला, मग माझ्या कडे का आलात विचारल्यावर आपण के.पी जोतिष पाहतात त्यात घटना कधी घेडेल हे अगदी निश्चित सांगता येते. त्यांचा थोडा अभ्यास होता. त्यांना एकच विचारले कि के. पी. पद्धतीचा मूळ आधार काय आहे तर ग्रह तारे पारंपारिक जोतिष मग शास्त्रात वरील सर्व उपाय देखील सांगितले आहेत. मग त्यांनी मोठे ज्योतिष यांचा तो शिष्य आहे जे कि टीवी वर राशीचक्र करून लोकांना हसवितात त्यांची करमणूक करतात. आता काय बोलाव ते दत्त उपासक आहे. मी काहीहि बोललो नाही. त्याला एकच सांगितले अरे बाबा ..मी ग्रह नक्षत्र तारकाच आणि गुरु उपासक आहे, माझा उपजीविका जरी यावर असली तरी प्रथम जातकाचा चांगल कस होईल हाच माझा उद्देश. असो..!!




Preview

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

गुरु पालट २०१७ तूळ रास

!! श्री गणेशाय नम: श्री स्वामी समर्थ !!
आज गुरु महाराजाचा प्रवेश तुळ राशीत झाला, लगेच सर्वांच्या विचारण्या सुरु झाल्या .. कितवा गुरु आहे.. ? कसा आहे..? विवाहास अडचण असे, बरेच प्रश्न सुरु होतात..मला येथे एवढेच सांगायचे आहे की दर वर्षी हा गुरु बदलणार आता पुढील महिन्यात शनी देखिल बदलणार, जर गुरु सध्या लाभात असेत, तर मग शनीचा धनुचा प्रवेश हानिकारक नुकसान तर करणार नाही..? ग्रहांचे भ्रमण हे चालतच राहणार आहे. आपण नित्य कर्म करत राहावे. गोचर भ्रमण हे एक ज्योतिष शास्त्रातील एक भाग आहे बाकीच्या दुसऱ्या बाबी देखिल कुंडलीत पाहाव्या लागतात, दशास्वामी, नक्षत्र भ्रमण, ग्रहांच बळ, असे बरेच काही..त्यामुळे आता १२ वा गुरु सुरु झाला विवाह होईल की नाही .. हे डोक्यातून काढा. माझ्याकडे असे भरपूर कुंडल्या आहेत की ज्यांचे विवाह १२ वा गुरु असताना झाले आहे.

Preview

मंगळवार, २५ जुलै, २०१७

‘नक्षत्र अलंकार’- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे

श्री स्वामी समर्थ

ज्योतिष शास्त्रात वेळवेगळ्या विषयावर भरपूर पुस्तक प्रकाशित झाली आहे मग ती पारंपारिक असोत अथवा कृष्णमूर्ती पद्धतील असो. त्यातच एक माझा मानस असा होता की ४-स्टेप थेरी के पी. पद्धतीमधील माझे पुस्तक नक्षत्र अलंकार हे कर्मस्थान तसेच नौकरी/व्यवसाय या विषयावर आहे आणि ते प्रकाशित व्हावे अशी खूप ईच्छा २०१२ पासून होती परंतू प्रकाशक मिळाले नाही. असो..!!

परंतू आज या facebook च्या माध्यमातून हा माझा ग्रंथ प्रकशित करीत आहे. या ग्रंथात कार्येश ग्रह हे माणसाच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात. त्यामुळे केपी ४-स्टेप थेरीचा उपयोग हा केवळ घटना कधी घडेल एवढेच सांगणे मर्यादित नसून जन्म कुंडलीचे विवेचन उत्तम होऊ शकते यासाठीच या माझ्या संधर्भ ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ एकून चार भागात असून प्रथम भागामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या कुंडल्या विवेचन करून ते साखळी पद्धतीने सिद्ध करून दाखविले आहे उदा. सचिन तेडुलकर (क्रिकेट), लता मंगेशकर (कला), बाबा रामदेव (योग/आध्यात्म), विलासराव देशमुख (राजकारण), श्री चंद्रकांत भट्ट तसेच माझे गुरु श्री सुनीलजी गोंधळेकर (ज्योतिषशास्त्र), सलमान खान (फिल्म) ई. तसेच मला अनुभव आलेल्या कुंडल्यांचे शास्त्र शुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. अशा साधारण २६ कुंडल्या या ग्रंथात आहे.  ४-स्टेपचे नियम आणि नौकरी व व्यवसायाची नियामली देखिल आहे. जन्मवेळ लंग्नशुद्धी तेसेच हर्शल-नेप्चून, प्लूटो यांचा प्रभाव, गोचर भ्रमण आणि रुलीग प्लानेट या सर्व बाबीचा या ग्रंथात समावेश आहे आणि कशा पद्धतीने उत्तराच्या समीप पोहचता येत हे दर्शविले.

स्वामीनी जे भविष्य कथनाच्या वेळी सुविले तेच मी लिहिले आहे. या नियमाच्या चैकाटीला गुरु महराजांची साथ हवी असते असे मला वाटते.

आपणास हा ग्रंथ e-book माध्यमातून हवा आल्यास कळवावा.
नक्षत्र अलंकार- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे /किमंत १५० रु.
संपर्क : ९८२३४४८४४९

Preview

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

शासक ग्रहांची किमया (रुलीग प्लानेट)

!! श्री स्वामी समर्थ !!

कृष्णमूर्ती पद्धतीत शासक ग्रहांना (रुलीग प्लानेट) यक्षनीची कांडी (मँजिक) म्हटले आहे.  तत्कालीन प्रश्न देखिल सहजपणे सोडवता येतात. माझ्या घरात चुलत भावाची पत्नी गरोधर आणि साधारण ९ महिने पूर्ण झाले त्यामुळे बाळाचे आगमन कधी होणार हा कुतूहलाचा विषय तर होताच परंतू आम्ही दत्त-स्वामी भक्त या वर्षी माझे दत्त गुरुचरित्र पारायण दत्तजयंती मध्ये होणार की नाही कारण पुढील १० दिवस वृद्धी पडेल आणि १३ डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे आणि दर वर्षीचा आपला हा नियम या वर्षी खंडीत होतो की काय असे वाटत होते. त्यामुळे २९/११/२०१६ मंगळवारी सहज दुपारी माझ्या सौभाग्यवतीने कुंडली मांडण्याचा आग्रह धरला आणि ठोकळा कुंडली मांडत दु. २:४८ रुलिंग प्लानेटची नोंद घेतली.

२९/११/२०१६ दु. २:४८
L:  (मीन) गुरु
LS:   बुध
S:  (अनुराधा) शनी (केतू)
R:  (वृश्चिक) मंगळ
D:  (मंगळवार) मंगळ

डॉक्टरने पुढील ६ ते ७ दिवस वाट पाहण्यास सांगितले त्यामळे एक आठवडा असल्याने उत्तर लगेच मिळाले होते की प्रसृती ही गुरुवारी होणार परंतु रुलिंग मध्ये बुध आहे आणि शनी देखिल आहे त्यामुळे शनिवार हे देखिल उत्तर असू शकते. पुन्हा चंद्राचे गोचर पाहिले तर गुरुवारी (गुरु) मुळ नक्षत्र (केतू) असून सकाळी साधारण १० ते १२ पर्यंत मकर (शनी) लग्न सुरु होते (हे सर्व ग्रह रुलींगमध्ये आहे) त्यामुळे या दरम्यानच घरी मुलगी येईल असे भविष्य केले. डॉक्टरकडे रुटीन चेक-अप करण्यास बुधवारी गेले असता त्यांनी शनिवार पर्यन्त थांबण्यास सांगितले. परंतू प्रसृती वेदना ह्या गुरुवारीच सकाळी सुरु झाल्या आणि ठीक ११:३० मी. नॉर्मल प्रसृती होऊन मुलगी झाली आणि माझी भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी आता ७ दिवसाचे नाही परंतू ३ दिवसचे गुरु चरित्राचे पारायण करू शकेल. माझा हा वार्षिक नित्यनियम जणू काही दत्त महाराजांनी सांभाळला हे मात्र नक्की.. !!! ज्योतिष शास्त्राचे अनुभव हे नित्य येतात त्यातच स्वामी महाराजाची साथही मिळत असते. वेळे अभावी मात्र त्याचे कुंडली विवेचन किंवा लेख हा ब्लोग वर मांडणे अवघड होते. असो..!!


!! शुभम् भवतु !!

Preview