श्री स्वामी समर्थ
मागील पोस्ट मध्ये जोतिष हा कुठल्या आधारे रत्न, रुद्राक्ष, उपासना सांगतात असे मी सांगितले तर आज आपण एक मुखी रुद्राक्षाचा पुराणातील संधर्भ आणि त्याची उपयुक्तता पाहूया. एक मुखी रुद्राक्षास शास्त्रात प्रत्यक्ष शिव स्वरूप मानले आहे. एक मुखी धारण केल्यास सर्व पापांपासून मुक्तता होऊन जन्म-मारण्याच्या फेर्यातून मुक्त करणारा आहे. ।। एकवक्त्र: शिव: साक्षाद्भुक्ति मुक्ति फल प्रद: ||
शिवपुराण अ. २५, श्लो. ६४
या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्याणकारी आणि महत्वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष नाव सर्वप्रथम घेतलं जात. याची देवता मुळातच शिव आहे आणि शिव हे प्रथम आदियोगी असल्याने योगसाधनेला उपयोगी ठरणारा आहे. रुद्राक्षचे असे फारसे नियम नाही परंतू एक मुखी धारण करण्यासाठी कसोटीला उतरणे फार गरजचे असते त्यामुळे या रुद्राक्षाचे देवघरात पूजन जास्त योग्य आहे. रोज रुद्राभिषेक किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा अभिषेक करावा. नेपाळमध्ये जो एक मुखी रुद्राक्ष पाहण्यात येतो तो फारच दुर्मिळ असून १२ वर्षानंतर एकदाच तयार होतो आणि आपण जे मार्केट मध्ये पाहतो ते ‘अर्धचंद्राकार’ किंवा काजूच्या आकाराचा हा रुद्राक्ष पाहतो त्याची प्राप्ती दक्षिण भारत किंवा इंडोनेशिया मध्ये जास्त प्रमाणात होते.
कसा वापर करावा:
एक एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ ह्रीं नमः” आणि शिवचा पंचाक्षर बीज मंत्र आहे “ॐ नमः शिवाय” दोनीही मंत्रा पैकी एक मंत्राच उच्चारण करून एकमुखी रुद्राक्ष धारण केल जावू शकत. हे लक्षात ठेवा की नियमित पंच माळेचा “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्यानी याचा प्रभाव किती तरी पटीने वाढतो.
एकमुखी रुद्राक्ष लाभ : तणाव (स्ट्रेस) कमी होणे, डोळ्यांचे, रक्तदाब, आणि हृदय विकार सारख्या आजारावर उपयुक्त असा आहे. - आपणस एक मुखी प्राप्त करायचे असल्यास संपर्क करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा