सोमवार, १३ मे, २०१९

“हरवलेली व्यक्ती परत घेईल का (सापडेल का)?....!!!”


श्री स्वामी समर्थ

मागील रविवारी दि. ०५ मे रोजी सकाळी ७ वाजता फोनची रिंग वाजली, माझी स्वामी मठात पूजेची तयारी सुरु होती, खूप अर्जंट आहे व्यक्ती घरातून ३ मे पासून घरातून निघून गेली आहे आणि आपण प्रश्न कुंडली मांडावी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने एक होरारी नंबर पाठविला आहे तो देखील मी पाठविला आहे असे तो म्हणाला त्यास मी पूजा आरती झाल्यावर ऑफस मध्ये गेलो कि प्रथम आपली कुंडली मांडून कळवतो असे सांगितले. हा फोन मुंबई येथून होता.

ऑफिस मध्ये आल्यावर कॉम्पुटर सुरु केले आणि प्रथम कुंडली मांडली, हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीने ५० हा नंबर दिला, त्यानुसार कुंडली मांडली आणि ७ स्थान (पतीचे स्थान) फिरवून कुंडली (लग्न भाव) तयार केली आणि तीच कुंडली पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न कुंडली: ५ मे २०१९, रविवार, वेळ: १०:४२:१३, स्थळ: औरंगाबाद, होरारी न. ५०
रूलीग प्लानेट: रवी, मंगळ शुक्र, गुरु, राहू, केतू

नियम:  हरवलेल्या व्यक्तीच्या लग्न भावापासून २-४-११ या भावापैकीचा कार्येश ग्रहाच्या दशा-अंतरदशेत व्यक्ती परत येते.

वरील नियमा व्यतिरिक्त जातकाच्या आयुष्याला काही धोका आहे का, तर अशावेळी लग्न भावाचा सब मारक/बाधक भावाचा कार्येश आहे किंवा नाही हे पाहून तो व्यक्ती जीवित अथवा मृत आहे आहे याचा देखील आढावा घ्यावा लागतो, मंगळ संबध असेल तर पोलिसांची मदत घ्यावी लागते हे सर्व काही पाहावे लागते आणि कुंडलीचा आधार घेऊन अंतिम निष्कर्श येवून उत्तर सोमोरील व्यक्तीस सांगावे लागते. हे नियम पाहूया या कुंडलीत.



कुंडलीत ७ भाव लग्नी मांडला आहे कारण पत्नीने प्रश्न विचारला आहे. या कुंडलीत १ भाव (जातक) आणि ८ भावाचा (धोका, संकट) सब (उपनक्षत्र स्वामी) हा बुध आहे आणि आत बुधाचे बलवान कार्येश ग्रह पाहूया.

० बुध:
केतू: १ (गुरु १२) (यु.शनी १, २, ३) (मंगळ दृ ६)
० रवी:
शुक्र:  ४ ११

एकूण: १-२-३-६-१२ आणि ४-११

बुध हा १ (हरवलेला जातक), १२ (लांब दूर, इस्पितळात, मंदिर), २ (मारक स्थान) ३ (८ चे ८ स्थान) मंगल ६ (पोलिसांचा आधार घेणे) आणि शुक्र मुळे ४ आणि ११ भावाचा कार्येश झाला त्यामुळे जातक हे सापडेल हे निश्चित झाले.

तसेच बुध हा सप्तमेश (बाधक) असून त्यात राहू देखील आहे याचाच अर्थ बुध हा १-२-७-६-१२ या भावाचा कार्येश असल्यामुळे जातकाच्या जीवाला धोका आहे आणि मंगळाचा संबध असल्याने पोलिसाचा आधार घ्यावा लागतो, दुय्यम कार्येश सब रवी हा ९-५ चा कार्येश असल्याने एक आशेचा किरण म्हणजे जातक जीवत आहे असे दर्शविते, आम्हाला अशा महत्वाच्या गोष्टीत एकदम अंतिम निर्णय घेता येत आणि जरी कुंडली पूर्णत: जीवाला धोका दर्शवित असली तरी ५-९ मुळे जातक कदाचित सुरक्षित आहे असे मी समोरील प्रश्न विचारलेल्या व्यक्तीस कळविले आणि दशा स्वामी काय सांगतो याचा विचार केला, तर प्रश्न हा भरणी नक्षत्रात विचारला, त्याचा स्वामी शुक्र आणि शुक्र चतुर्थी स्थानी (घरी घेईल/सापडेल), मीन रास या ठिकाणी (जल तत्वाची रास), शुक्र बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध चतुर्थात, सप्तमेश (बाधक स्थान), दशमेश (११ चे व्यय) आणि हा शुक्र मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ ६ (पोलीस आधार), १२ व्या स्थानाचा अधिपती (हॉस्पिटल, धोका) आणि वृश्चिक रास (साचलेला डबके अथवा गटार) असे दर्शवितो कि दशा देखील पूर्णत: नकारात्मक झाली आहे जातकाच्या जीवाला धोका आहे हे मात्र आता निश्चीत वाटत होते. तरी देखील रुलिंग प्लानेटचा आधार घेऊन समोरील व्यक्तीस आपण पोलिसांची मदत घ्यावी आणि जातक हे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सापडतील असे संगीतले, ५-९ भावामुळे ते कदाचित जीवित असतील असे हि सांगितले. परंतू प्रश्न कुंडली अगदी बरोबर सांगत होती, जातकचा मृतदेह मंगळवारी सूर्यास्तापूर्वी त्यांच्याच घरातील मागच्या बाजूच्या डबक्यात तरंगत होता आणि पुढील तपास हे पोलीस करती आहेत.
याच कुंडलीत अजून खूप बारकावे आहेत विचार केला तर प्रत्यक घटनेचे उत्तर मिळते असो कधी कधी कुंडलीत नकारात्मक गोष्टी दिसत असल्यातरी समोरील व्यक्तीस सांगण्याचे धाडस होत नाही, खूप विचार करून समर्पक उत्तर द्यावे लागते. हरवलेल्या व्यक्तीची जन्म कुंडली तपशील प्राप्त झाला आहे, पुढील भागात जन्म कुंडलीचे विवेचण पाहूया...!!! ॐ शांती !!!






मंगळवार, ७ मे, २०१९

मंगळाचा मिथून राशीत प्रवेश


श्री स्वामी समर्थ 
आज दि. ७ मे २०१९ रोजी मंगळाचे राशी परिवर्तन सकाळी मिथुन राशीत झाले आणि मंगळ आणि राहू हा अंगारक योग असून शनी-केतू ची देखील दृष्टी आहे. या योगाचा १२ राशीवर निश्चितच परिणाम होणार आहे. २२ जून पर्यंत आहे मंगळ हा मिथून राशीत आहे. याचा परिमाण भौतिक दृष्ट्या देखील होणार आहे. गर्मी वाढेल कारण मंगळ उष्णतेचा कारक, पाण्याचे संकट निर्माण होतील तर शनी दृष्टी युक्त असल्याने राजनैतिक उलथा-पालथ देखील होणार आहे आणि याचा परिणाम आपण २३ मे रोजी पाहणारच आहोत. मंगळ हा शत्रू राशीत आहे आणि शत्रू ग्रहा बरोबर म्हणजेच राहू बरोबर अंगारक योग करीत आहे. त्यामुळे १२ राशीला तो वेग वेगळा परिणाम देणार ठरेल.

मंगळाचे गोचर राशी फळ
मेष:- मेष राशीतील तिसरा मंगळ हा भावंडात वाद निर्माण करणारा ठरेल तर वाहन सावकाश चालवणे योग्य ठरेल. संपत्ती बाबत सावधान राहा, फसवणूक होऊ नये.

वृषभ : या राशीला दुसरा मंगळ हा, कोर्ट आणि कचेरीत आपण विनाकारण ओढले जाऊ शकता. पैसे उधार देऊ नका. धर्याने काम करा.

मिथून : याच राशीत मंगळ-राहू हा अंगारक योग आहे, कर्ज वाढेल, संध्याकाळी प्रवास टाळावा. मानसिक तणाव देखील वाढेल, वडिलांशी वाद होतील. त्यामुळे आपण शांत राहणे योग्य राहील.

कर्क : मंगळ या राशीला १२ राहणार आहे. वाहनासाठी आणि घर कामासाठी पैसा खर्च होईल. नियमाचे पालन करा नाही तर कानुनी पेचात अडकाल.

सिंह:  ११ वा मंगळ आपणास अचानक धन लाभ करून देऊ शकतो मग शेअर असो अथवा लॉटरी मार्फत असो ते धन प्राप्त होईल. मित्रांनावर विश्वास ठेवू नका.

कन्या: १० वा मंगळ कामाची दग-दग वाढेल आणि पैसे हि कमी मिळतील केवळ ढोर महिनत होणार आहे.

तुला: ९ वा मंगळ भाग्याला साथ मिळेल. यात्रेचा योग येईल.  मोठी कामे मार्गी लागणार आहेत.  लांबचे प्रवास देखील होतील. परदेश जाण्याचे योग आहेत.

वृश्चिक: ८ वा मंगळ या राशीला अशुभ फळे देणारा ठरेल. सावधान राह, आर्थिक आणि मानसिक हानी होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा.

धनु: ७ वा मंगळ पती-पत्नी मध्ये वाद निर्माण होऊ शकता. संशयाचे वातावरण तयार होऊन गैरसमज वाढणार आहे. प्रेमात वाद निर्माण होतील, वेळ सावधान राहण्याची आहे.


मकर:  ६ वा मंगळ रोग वाढवू शकतो. शत्रू हे हवी होणार आहेत. सत्याने वागा पुढे परिणाम चांगले मिळतील. रोगाचे निदान लावर होणार नाही. काळजी घ्या.

कुंभ:  ५ वा मंगळ हा नौकरीत समस्या निर्माण करू शकतो, उत्त्पन्न कमी होईल, मुलांच्या स्वथाकडे लक्ष्य द्यावे लागेल.

मीन : ४ था मंगळ आईची काळजी घावी. सुखात कमतरता येईल. घरात वाद टाळा.  चिंता वाढणार आहे. विवाद होणार नाही याची देखील काळजी घ्या.

ज्योतिषकार: श्री दिपक चंद्रकांत पिंपळे / ९८२३४४८४४९



शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

......माझी counseling (समालोचन) देखील असफल ठरले... !!!


!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली एका स्त्री जातकाची आहे. विवाहास साधारण तीन वर्षे झाली आहेत. मी ज्योतिष जरी असलो तरी देखील counseling चे कार्य देखील मला करावे लागते कारण त्या जातकाची दशा पुढील काही काळापुर्तीच नकारात्मक सुरु असते त्यासाठी हा समजविण्याचा आमचा हट्टहास असतो, परंतू कुंडलीतील ग्रह आपले परिणाम देण्यास सज्ज झालेले असतात अशीच हि कुंडली आहे. विवाह मोडण्याची आणि घटस्पोट घेण्याचा  निर्णय या मुलीने घेतला आहे. परंतू या मुलीच्या कुंडलीत गुरु ३ स्थानी (सुप्तमन) आणि तो ७ भावाला (पती/life partner स्थान) बघत आहे आणि गुरु ९ भावाला देखील बघत आहे (३-९ स्थाने म्हणजे करार-समजाविणे यामध्ये यश येते) त्यामुळे counseling आणि समजविण्याचा प्रयत्न निश्चितच करणे आवश्यक असते. गुरु जर बलवान अथवा सप्तमावर दृष्टीयुक्त असेल कुंडलीत तर सहसा विवाह मोडत नाही, शेवटी शनी महाराज (न्याय/कर्माची फळे देणारा ग्रह) जो परिणाम द्यायचा आहे तो देणारच कारण ते कार्यच त्यांचाकडे आहे आणि शेवटी माझी counseling मात्र फेल झाली आणि या मुलीने आणि मुलाने देखील divorce घेण्याचे अखेर ठरविले आहे. हे couple माझ्याकडे जानेवारीत आले होते. पाहूया कुंडलीत ग्रह आणि शनी महाराज कसे परिणाम देत आहे.


नियम: जर ७ भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी) जर २ (सुख/पैसा), ७ (life partner/पती/पत्नी) आणि ११ (लाभ/पक्की मैत्री) या भावांचा कार्येश असून दशास्वामी देखील या भावांचे कार्येश असेल तर विवाह आणि वैवाहिक सुख मिळते.


सदर स्त्री जातकाच्या कुंडलीत ७ भाव (वैवाहिक सुख) सब हा शनी आहे. शनी ४ स्टेप बलवान कार्येश पद्धतीनुसार २-७-११ या भावाचा कार्येश नाही तो केवळ ५ स्थानचा कार्येश आहे. तर शनी हा शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या सब मध्ये आहे आणि शुक्र ६ स्थान (वैवाहिक सुखाचे विरोधी स्थान) मध्ये आहे आणि त्यातच आगीत तेल ओतण्याचे काम प्लुटोने केले केवळ ३ डिग्रीच्या ७ भावारंभावार आहे. त्यामुळे वैवाहिक सुखास कमतरता निर्माण झाली.

आता पाहूया दशास्वामी या मुलीला केतूची दशा १५/९/२०१८ समाप्त झाली आणि शुक्राची महादशेला सुरुवात झाली याच महिन्यापासून दोघांचे भांडणे वाढली आहे आणि हि दशा पुढील २० वर्षे आहे आणि शुक्र-शुक्र-शुक्र १५/९/२०१८ ते ६/०४/२०१९ पर्यंत आहे. शुक्र हा ६ स्थानी (७ स्थानाचे व्यय) आहे तो मंगळच्या नक्षत्रात आहे मंगळ हा लग्नेश १ (२-सुख स्थानचा व्यय) असून तो ५ स्थानी आहे आणि शुक्र हा बुधाच्या सब मध्ये आणि बुध देखील ६ स्थानी आहे त्यावर शनी दृष्टी आहे त्यामुळे तो ८ (अडचणी) देखील कार्येश झाला. ४ स्टेप पद्धतीने तो ७-११ चा कार्येश आहे परंतू येथे शनी गोचर पहा कसा परिणाम करत आहे. अष्टक वर्गानुसार शनीचे भ्रमण भाग्य स्थानातून (सासू-सासरे) होत आहे आणि या भावाला केवळ १ बिंदू (कमित कमी २ च्या वर गुण असावे) आहे आणि ७ भावाला २० बिंदू (२४ च्या वर बिंदू असावे) आहे. सध्या जानेवारी २०१९ रोजी शनी १९ अंशावर आहे तर नेपचून हा फसवा ग्रह देखील याच भावात १६ अंशावर आणि हर्षल शनी १३ अंशावर आहे येथेच शनीचे भ्रमण नकारात्मक ठरले सासू-सासरे पासून विभक्त राहणे हि या मुलीची पहिली अट आहे आणि मुलगी हि डिसेंबर २०१८ पासून माहेरी आहे आणि त्यांनी मला आजच कळवल त्यांचा निर्णय, मुलाच एकत्र कुंटुंब आहे आणि वैभाशाली आहे. पण शेवटी ग्रहांनी परिणाम केला हे मात्र निश्चित...!! हे जोडप एकत्र येईल असे मला वाटते कारण २३ जाने २०२० ला शनी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल.आणि मुलीची साडेसाती देखील संपते....यांनी एकत्र यावा हीच स्वामी चरणी प्रार्थना ..!! शुभम भवतु !!

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple



 तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते.
 मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात.
 मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते.
 मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते.
 वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.
 वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात.
 मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. तसेच मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात त्यामुळे हास्य आणि नेतृत्व असे उत्तम मिश्रण दिसून येते.
 कर्क आणि मीन - या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात. समोरच्याला सांभाळून घेणे हीच मोठी गोष्ट जमत असल्याने यांचे चांगले जमू शकते.
 सिंह आणि धनू - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. धनु राशीच्या लोकांना मस्ती, मजाक करणे आवडते.
 कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. त्यामुळे मकर राशीचे लोक यांच्याकडे फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात.
 सिंह आणि मिथुन - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्तीसोबत हे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.
 वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.
 वृश्चिक आणि कर्क - या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
 वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
 कुंभ आणि मिथुन - या दोन्ही राशींचे विशेष म्हणजे या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.
 मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर प्रेमळरित्या अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते. त्यामुळे यांचे चांगले जमू शकते.
(संग्रहित - दिपक पिंपळे -९८२३४४८४४९ )
No photo description available.