शुक्रवार, १२ जून, २०२०

व्याख्यान कृष्णमूर्ती पद्धती आणि कुंडलीतील प्रारब्ध स्थाने

[8:39 PM, 6/12/2020] Pawale: .    .😌.    .
      🙏
॥ नमस्कार ॥

मी उज्ज्वल पावले औरंगाबाद.
९५४५१४७९०७
९४२१३०१२३६
एम्. ए. वेदांग ज्योतिष
ज्योतिष शास्त्री, वास्तु विशारद
(ज्योतिष, वास्तु विषयक सॉफ्टवेअर्सचे एकमेव वितरक आणि विक्रेते)

वेदचक्षु आणि मराठी ज्योतिषी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

वेदचक्षु व्याख्यानमाला

या झूम व्याख्यान सोहळ्यात समस्त ज्योतिष अभ्यासकांना सादर आमंत्रित करीत आहे.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
शनिवार, दि. १३ जून, २०२०
वेळ: दुपारी २ वाजता
वक्ते: श्री. दीपक पिंपळे
"मोबाईल:" 9823448449
(नक्षत्र शिरोमणी, नक्षत्र अलंकार, वास्तु विशारद)
विषय: कृष्णमूर्ती पद्धती आणि कुंडलीतील प्रारब्ध स्थाने.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
सकाळी: ११:३० वाजता
"अॅस्ट्रो कुंडली"
प्रोफेशनल
या सॉफ्टवेअरचा झूम डेमो दाखविला जाईल.
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
लिंकवर स्पर्श करून बैठकीत सामील व्हा 👇

https://us02web.zoom.us/j/89738750126?pwd=dWd0M1dTMmxxVjcvSWFRK0w5cXlMUT09

किंवा 👇

मिटिंग आय डी:
897 3875 0126

पासवर्ड:
123456
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯
🙏कृपया ही पोस्ट अधिकाधिक ज्योतिष्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता सहकार्य करा!
¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯¯

बुधवार, १३ मे, २०२०

अध्यात्मिक योग गुरु श्री श्री रविशंकर


!! श्री स्वामी समर्थ !!
!! जय गुरुदेव !!


अध्यात्मिक योग गुरुवर्य श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!! श्री श्री यांचा व्यक्तिमत्व म्हणजेच अध्यात्मिक आणि योग सूत्रातील योग परिपक्वता अशी आहे.  अध्यात्मिक क्षेत्रातील कार्य असे सीमित नसून सामाजिक क्षेत्रात देखील परिपूर्ण कार्य करीत आहे अशी त्यांची ख्याती जगभरात पसरली आहे. यांच्या कुंडलीत ग्रह कसे बलवान आहेत त वाखाणण्याजोगीच आहे. 

सूत्र:
साधू/संत/योगी:
लग्न बिंदूचा उपनक्षत्र स्वामी जर ३ (मानस), १० (ध्येय) आणि १२ (त्याग) स्थानानाशी तसेच शनीशी संबधित असेल तर जातक सर्वसंघ परित्यागी वैरागी वृतीचा साधुसंत बनतो.  ११ (लाभ) स्थानांचा उपनक्षत्रस्वामी जर १ (जातक) ५ (साधना) १० (ध्येय) भावांशी निर्देशित असेल तर जातकाची साधना सफल होते.



रवी आत्मा व चंद्र मन निर्देशित मानले गेले आहेत. गुरु नीती, धर्म, तत्त्वज्ञान तर शनी मनन, त्याग, साधना, व उच्च विचारशक्ती यांचे निर्देशन करतात व केतू आधात्मकता तसेच संतात्वाचे प्रतिक आहे.

४, ८, आणि १२ स्थानी कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या राशी अधात्मावादि  कांगोरेच दर्शवित नसून, शेवटचा पुरुषार्थ जो मोक्ष याचे प्रतिक आहे, नवम स्थान व धनु राशी नीती, भक्ती, दूरदर्शित्व, तत्त्वज्ञान, अंतरदृष्टीचे द्योतक आहे.  (५) पंचम स्थान हे तंत्र, मंत्र, उपसाना, आणि साधना दर्शविते. (१२) व्ययस्थान हे त्यागवृत्ती, एकांतवास, आत्मसंयमन व मोक्ष सूचित करते.

अग्नी राशीत ग्रह उत्तंग मनोबल व त्यायोगे राजयोग दर्शविते. पृथ्वीराशीत ग्रह नि:स्वार्थ भावनेने मानवसेवा म्हणजे प्रेमयोग कर्मयोग सुचवितात.  वायुराशित ग्रह तर्क, बुद्धी, व समजयुक्त ज्ञानयोग निर्देशित करतात. तर जलराशीत ग्रह भावना, ममत्व, प्रेमरसपूर्ण भक्तियोग दाखवितात.

कुंडलीतील योगाचा विचार जर केला तर हि कुंडली किती राजयोगकारक आहे, गुरु उच्च राशीत कर्क (जलतत्त्व – हंस योग) केंद्रात, रवी आपल्या उच्च मेष राशीत (अग्नी तत्व) , मंगळ देखील स्थिर पृथ्वी तत्त्वाच्या मकर या उच्च राशीत (रूचक योग), बुध-शुक्राच्या अनन्ययोग पंचम (ध्यान-योग ) स्थानी आहे. गुरूचा नवपंचम योग शनी-राहू बरोबर येथेच सर्व कुंडली संपते अशी हि कुंडली आहे जणू काही अध्यात्मिक/योग/सामाजिक क्षेत्रातील मानवसेवा म्हणजे प्रेमयोग कर्मयोग सुचवितात. आता आपण के.पी. पद्धतीने कुंडली विवेचन पाहूया...! वरील सर्व नियम तत्वराशी आणि ग्रह योग श्रीं च्या कुंडलीत चपखळ बसतात.

वरील नियमानुसार कुंडलीत प्रथम भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी)  हा शनी (त्याग, चिकाटी, मनन, साधना) शनीच आहे. शनी हा लाभ स्थानी वृश्चिक राशीत आहे तर शनी आणि राहू युक्त
असून भावचलित कुंडलीत दशमस्थानी (कर्म-ध्येय) आहे, शनी हा बुधाच्या उपनक्षत्रात (सब) मध्ये असून लग्न कुंडलीत हा बुध पंचम स्थानी (योग-आध्यात्म) दर्शत असून तो भावचलीतात ४ स्थानी आहे तर चंद्र केतू बुध युती हि अध्यात्म आणि प्राचीन परंपरा यांचे जतन करणारे गुरु दर्शविते. हा चंद्र लाभाचा सब आहे आणि चंद्राच्या राशीत गुरु आणि गुरु व्ययेश (त्यागवृत्ती, एकांतवास, आत्मसंयमन व मोक्ष)  तृतीयेश (सुप्तमन-प्रचार पसार) या ठिकाणी मीन रास आहे.
या कुंडलीत ४-८-१२ या राशी आणि भावातील ग्रहांचा संबध उत्तुंग अध्यात्मिक पातळी दर्शवित आहे. सध्या बुधाची महादशा सुरु आहे, केवळ बुधाचा आपण  अभ्यास केला तर लक्षात येईल कि बुध दशमाचा सब आहे तो गुरूच्या सब मध्ये आहे तर चंद्राच्या नक्षत्रात आहे हे सर्व मी वरील भागात स्पष्ट केले आहे कि गुरुचे कार्य या कुंडलीत वाख्याण्यासारखे आहे.

लक्षात घेण्यासारखे एकच असते, याच वेळेला कुणी त्याच ठिकाणी एखादे दुसरे बालक देखील जन्म घेतला असेल तेच योग ग्रह नक्षत्र दशा परंतु ते का नाही श्री श्री होऊ शकले तर हाच भाग ज्योतिष वाचू शकत नाही त्यामुळेच भविष्य चुकतात ... अशावेळी मला तुकाराम महाराजाच्या अभंगातील एक ओळ आठवते...

जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले
तेव्हा या विठ्ठले कृपा केली ।।

येथे महाराजांनी केवळ एक जन्म नाही तर “जन्मो जन्मी” असा उल्लेख केला आहे.

!! शुभम भवतु !!
 



शुक्रवार, ६ मार्च, २०२०

शनी प्रदोष २०२०

!!श्री स्वामी समर्थ !!
शनी प्रदोषाच्या व्रताबद्दल नेहमी सांगतो आणि त्याचा अनुभव देखील लोकांना येतो..असे हे व्रत आहे...
दि. ७ मार्च २०२०, शनिवार त्रयोदशी असून शनी प्रदोष आहे. प्रदोष पुजेस अनन्य साधारण महत्त्व आहे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आहे. शनीप्रदोष हे वर्षातून साधारण ३ किंवा ४ वेळेस असते. सर्व प्रदोष पूजनात शनीप्रदोष व्रत अतिशय फलदायी असून राहू दोष, शनीपिडा, तसेच संकटात मुक्ती देणारे हे व्रत आहे. श्रद्धेने हे पूजन केल्यास त्याची फलश्रुती ही निश्चितच मिळते. याचे महत्त्व 'गुरुचरित्र' तसेच 'श्रीपादचरित्रात' देखील असून पिठापुराम येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुकावर रुद्र अभिषेक पूजन हे शनिप्रदोषच्या दिवशी होत असते.


मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गुरु पालट २०१९



!! श्री स्वामी समर्थ !!
दि.4-11-2019 रोजी सोमवारी उत्तर रात्री म्हणजे उजाडत्या मंगळवारी पहाटे ५ वाजून १८ मिनीटांनी गुरू धनू राशीत प्रवेश करतो आहे. याचा पुण्यकाल सोमवारी मध्यरात्री नंतर ३-२७ ते मंगळवारी सकाळी ७-०९ पर्यंत आहे. या कालावधीत गुरूचा जप केला तर खूप लाभदायक असेल.
याचे सर्वसामान्य फल पहाता.
सिंह-मकर-मीन--: या राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने येत असूनही "चिंता" असेल.पुण्य काळात जप दान पूजा केली असता शुभता प्राप्त होईल.सुवर्ण पादाने येणारा हा गुरू शुभ असतो.
वृषभ-कन्या-धनु---:
या राशींना रोप्य पादाने येत असून याचे फल शुभकारक असेल.
मेष-कर्क-वृश्चिक---:
या राशींना ताम्र पादाने येत असून याचे फल श्रीप्राप्ती आहे.
मिथुन-तुला-कुंभ -----:
या राशींना लोह पादाने येत असून याचे फल "कष्ट" असे आहे.
या गुरूपालटाची राशीगत फलादेश आपण थोडक्यात पाहू!
मेष:--शुभदायक असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.नोकरी, प्रमोशन, बदली,विवाह तसेच, व्यवसायात येणारे आडथळे दूर होतील. धार्मिक कार्य संपन्न होतील.सामाजिक कार्यात यश प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून आनंद प्राप्त होईल.
वृषभ:--हा गुरूपालट वृषभ राशीच्या लोकांना ही लाभदायक असेल.
तरुणांना मनोवांछित यश मिळेल.शिक्षण नोकरीत प्रगती होईल.
मात्र प्रवासात दगदग होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. क्वचित प्रसंगी एखाद्या घटनेमुळे मानसिक संताप , अकस्मात खर्च व व्यापारात नुकसान होण्याची शक्यता असते.
मिथुन:--येणाऱ्या काळात या गुरूपालटा मुळे दगदग व कष्ट जास्त करावे लागतील. परंतु अथक परिश्रम केल्याचे फल निश्चितच मिळेल.व्यापार व्यवसायात भरभराट होईल.आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा होईल. वैवाहिक सौख्य व कौटुंबिक आनंद प्राप्त होईल. संततीसौख्य मिळेल.
कर्क:--हा गुरूपालट या राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्ती करून देईल.कर्ज परतफेड होईल.नोकरी व व्यवसाय यातून धनलाभ होईल.मात्र याचबरोबरीने आपली उन्नती न पहावल्याने आपणास त्रास देणारी मंडळी आसपास असतील.कधीकधी एखाद्या घटनेमुळे मन अशांत होईल.येत्या वर्षभरात आपणास आरोग्यासाठी खास लक्ष द्यावे लागेल. शरीरातील जाडेपणा वाढेल.पोटाचे विकार संभवतील.
सिंह:--या राशीच्या लोकांना सर्व काही उत्तम असूनही मनाला कसली तरी चिंता लागून राहिलेली असेल. सहसा या राशीपासून समाधान लांबच असते.मात्र आगामी वर्षात या जातकांना कौटुंबीक, वैवाहिक तसेच कार्यक्षेत्रातील सुख आनंद मिळणार आहे फक्त त्याला जवळ करणे न करणे हे यांचे मनावर अवलंबून आहे.
सकारात्मक दृष्टीने पाहिले तर नोकरी, व्यवसाय, संतती आर्थिक स्थैर्य आदी सर्वांगाने हे वर्ष लाभदायक असणार आहे.
कन्या:--या राशीच्या लोकांना हा गुरूपालट उत्तम आहे. परदेशगमन स्वतःचे नवीन घर तयार होणे,नवीन नोकरी लागणे.लग्न जमणे वगैरे गोष्टी घडू शकतात. मात्र या लोकांनी नेहमी आर्थिक बाबतीत आगामी काळात सतर्क राहावे.फसवणूक व नुकसानीची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. घरातील इतर लोकांच्या समस्या मुळे मनःशांती भंगण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आजच्या भागात आपण #मेष ते #कन्या राशींना या गुरूपालटामुळे काय अनुभव येऊ शकतात हे थोडक्यात व ढोबळ मानाने पाहिले. उद्याच्या भागात #तूळ ते #मीन राशीबाबत पहाणार आहोत शिवाय गुरूचा जप दान पूजा याविषयीही मार्गदर्शन देण्यात येईल.
मित्रांनो ! मागच्या भागात आपण मेष ते कन्या राशींच्या जातकाला हा गुरूपालट काय फले देऊ शकेल याचे अंदाजे विश्लेषण पाहिले. मित्रांनो खरे पाहिले असता #गुरू हा सर्वात शुभ ग्रह आहे. याचे #बल मिळते म्हणूनच प्रत्येक जातकाचे भाग्य उजळत असते. शत्रूच्या राशीत गुरू भ्रमण करत असेल किंवा गुरूचा शत्रू ग्रह हा गुरूच्या राशीत भ्रमण करत असेल तेंव्हाही गुरूची फले तितकी त्रासदायक मिळत नाहीत. दोन वाईट माणसे एकत्र असतील तेंव्हा एखाद्याला ते खूप त्रास देतील.पण एक सज्जन व एक वाईट माणूस एकत्र असतील तर सहसा तेवढा त्रास देऊ शकत नाहीत.सज्जन माणूस दुसऱ्याला एकतर विरोध करेल अथवा त्याला त्या कर्मात कुठलीही साथ देणार नाही. गुरू कोणत्याही राशीत घरात कोणत्याही क्रूर ग्रहाबरोबर जरी असेल तेंव्हा तो तुम्हाला निश्चितच सांभाळून घेईल याची खात्री बाळगा ! फक्त एक गोष्ट मात्र कधीच विसरू नका की गुरूला अध्यात्मिक व धार्मिक माणूस फार प्रिय आहे.
आता आपण बाकीच्या राशीबाबत पाहू या !
(७):-तूळ :--लोहपादाने या राशीला गुरू येत असल्याने या जातकांना हा काळ खूप कष्टाचा जाईल.एखाद्या स्थानी ठरवलेले एखादे काम लवकर होणार नाही. तिथेच आडकले जाऊ शकते. नोकरीत समस्या निर्माण होऊन पदावनती किंवा जाँब जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय धंद्यात आडचणी निर्माण होऊन कर्जबाजारी होण्याचीही वेळही एखाद्या जातकावर येऊ शकते. उत्पन्न कमी खर्च जास्त तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील.आतापर्यंत हा गुरू आपणास बरेच शुभ फले देऊन गेलेला असून इथून पुढे जरा सतर्क राहाण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.
(८):-वृश्चिक---हा गुरूपालट कठीण प्रसंगातून जाणाऱ्या वृश्चिक जातकांना जरा दिलासा देणारा असेल.
ताम्र पादाने पैसा घेऊन आपल्याकडे हा गुरू येत आहे. पैसा कसा प्राप्त करायचा हे आता आपल्या कर्मावर अवलंबून असेल. नोकरीत बढती,अपेक्षित ठिकाणी बदली ,नवीन जाँब,व्यवसायात प्रगती,
वैवाहिक सौख्य, उत्तम भोग व सुखप्राप्ती हे अनुभव येणार आहेत.
आळस झटकून टाका ! निराशा सोडून सकारात्मक व्हा! जोमाने व आत्मविश्वासाने कामाला लागा! गुरूला अपेक्षित वागणूक आचरणात ठेवा!
(९):-धनु:---हे गुरूचे भ्रमण आपल्या धनू राशीत होत असल्याने.हळूहळू स्थीरता मिळण्यास सुरूवात होईल.हा गुरू रौप्य पादाने आपणाकडे काही चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. आतापर्यंत झालले नुकसान पुढील काही दिवसात भरून निघण्याची शक्यता आहे.
नवीन जाँब,विवाह,याचे योग येतील.आर्थिक स्थैर्य लाभेल. मनाची उद्विग्नता कमी होऊन जोडीदाराशी संबंध सुधारतील.प्रेमविवाह सफल होतील.तरुणांना स्फूर्तिदायक स्थिती अनुभवायला मिळेल. मात्र याचबरोबर निरर्थक भीती वाटेल व्यवसायात धास्ती वाटेल.वादविवादाचे प्रसंग येतील.कधीकधी आर्थिक आवक घटल्यामुळे बुद्धी व विवेक यावर नियंत्रण राहाणार नाही. यासाठी रागावर नियंत्रण व काटकसर याचा अवलंब करावा.मूळ नक्षत्रातील जातकांचा त्रास हा काही काळानंतर कमी होईल.मूळ नक्षत्रातील जातकांनी खूपच संयमाने व शांततेने वागण्याची गरज आहे. विशेष करून वैवाहिक व आर्थिक बाबी हाताळताना सतर्क राहिले पाहिजे! राशीस्वामी #गुरूचा जप करावा.काही इतर साधना कुलधर्म कुलाचार नियमितपणे करावे.
सर्वकाही ठीक होईल.!!
(१०):-मकर:--या राशीच्या लोकांना हा गुरू सुवर्ण पादाने येत आहे. बाराव्या स्थानी येत आहे. याचे फल चिंता असे जरी असले तरी.व्यय स्थानी स्वराशीचा असल्याने आपणास आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. गुंतवणूक सांभाळून करणे अन्यथा फसवणूक संभवते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे
मन चिंतेत राहील. एखाद्या घटनेमुळे अचानक खर्च उद्भवेल. त्याचा त्रास सर्व कुटुंबातील व्यक्तींना जाणवेल.पण मित्रांनो हा सुवर्ण पादाने येणारा गुरू परोपकारी असल्याने स्वराशीतील लोकांना थोडा त्रासदायक वाटला तरी शुभ असेल.श्रद्धेने जप, दान पूजा केली की हा गुरू आपणावर नक्कीच प्रसन्न होईल व रक्षण करेल.!शिवाय मकर राशीला साडेसाती चा प्रभाव वाढता असेल.सांभाळून राहावे.
(११):-कुंभ:-हा गुरू कुंभ राशीला लोह पादाने येत आहे त्यामुळे या जातकांना भाग्योदयासाठी अथक परिश्रम करावे लागतील. नोकरी तसेच व्यवसायात खूप कष्ट सोसावे लागतील.
जाँब मिळतांना,विवाह जमवताना विलंब व आडचणीचा सामना करावा लागू शकतो. तथापि गोचरीचे हा गुरू लाभ स्थानी येत असल्याने नवीन काम मिळेल.स्थान बदलले की फायदा होईल. आडकलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.
नोकरी व्यवसाय शेती धंदा यात लाभ होईल. खास करून बिल्डर लोकांना उत्तम दिवस येतील.गुरू व शन
(१२):-मीन:--गुरूचे हे भ्रमण मीन राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने होत आहे. त्यामुळे याचे फल चिंता आहे. व जवळपास तशीच परिस्थिती या लोकांना अनुभवास येईल.मात्र परिवार व नातेवाईक यांच्याशी एखाद्या कारणामुळे वितुष्ट येऊ शकेल.नोकरीत व्यवसायात संबंधित लोकांशी विनाकारण मतभेद होतील.खर्चात वाढ,आर्थिक नुकसान व कामात अपयश येण्याची शक्यता असेल.क्वचित प्रसंगी एखाद्या जातकाच्या बाबतीत नोकरीत मनाविरुद्ध बदली तसेच नोकरी जाणे इत्यादी घटना घडू शकतात. आर्थिक फटके बसू शकतात.परंतु सुवर्ण पादाने येणारा स्वतःच्या धनु राशीत येणारा हा गुरू त्याच्याच मीन राशीसाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तितके अनिष्ट फळ देणार नाही.मात्र जातक धार्मिक ,शांत व सहनशील असला पाहिजे.
निराशा झटकून प्राणायाम ध्यानधारणा सुरू करा. भयमुक्त राहून श्रद्धेने गुरुचे पूजन करा! काळजी नको!