|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
आज दुपारी एका जातकाचा फोन आला त्यांना कालच भेटण्यासाठी वेळ दिली होती प्रश्न हा जमीन विक्री संभधीत होता त्यामुळे रुलींग प्लानेटची नोंद घेण्यासाठी आमच्या काम्पुटर मधील ज्योतिष शास्त्राचा पसारा (सोफ्टवेअर) उघडल्यावर लक्षात आले की आज मृग नक्षत्र म्हणजे मंगळाचे नक्षत्र, प्रश्न जमिन विक्री बद्दल होता, दुपारी २:४० मीन लग्न सुरु होत चंद्र ४ स्थानी होता तर मंगळ हा १० स्थानी होता केवळ क्षेत्र कुंडली हे प्रश्न स्वरूप दर्शवितो. ४ स्थान जातकाची जमिन तर १० स्थान हे जमीन घेणाऱ्याचे दर्शविते व चंद्र हा पंचमेश आहे म्हणजे समोरील व्यक्तीचे लाभ स्थान आहे. माझे बरेच उत्तर हे जातक येण्याची पूर्वीच तयार होते, असो मी ते पुन्ह्या कधी तरी तपसीलवार सांगेल.
येथे विषय थोडा जिव्हाळ्याचा आहे, आज मंगळाचे नक्षत्र तर रविवारी हे पुनर्वसू नक्षत्र व या दिवशी आम्ही बुलढाणास जाणार आहोत, त्यामुळे आठविलेला प्रसंग कारण माझे जवळचे नातलग-जातकाच्या लग्नाची बोलणीसाठी माझ्या सारख्या पामरास देखील आमंत्रण आवर्जून येण्याचे आहे. हे जातक भोकर्दन या ठिकाणी बँकेत काम करतात. लग्नाचा योग असून देखील योग जुळून येतच नव्हता कारण जन्मकुंडलीत सप्तम स्थानाच्या भावारंभावर प्लुटो हा विध्वंसक ग्रह आहे, अविवाहीतांच्या बऱ्याच कुंडल्यामध्ये ते दिसून येते. तसेच के. पी. पद्धतीने देखील कालनिर्णय चूकलेला होता. त्यामुळे साहजिक त्याच्या आई-वडिलांची काळजी वाढतच होती, महिन्याचे रुपांतर आता वर्षात होत होते.
हे जातक माझ्या जवळचे व अगदी माझ्या नेहमी स्मरात असणारे असे याचे व्याक्तीमत्व आहे. आमच्या ठाण्याच्या ज्योतिष संमेलनात एका रत्न व्यापाराने मला एक गुलाबी मोती सप्रेम भेट दिआ व मला या जातकाचे त्याचवेळी स्मरण झाले कारण हे रत्न विवाहास ठरण्यासाठी किवां जुळवून येणाऱ्या जातकांसाठी उत्तम असा आहे. मी जातकास फोन करून बोलावून घेतले व जातक हे ३/११/२०१२ शनिवारी सुटी घेउन आमच्यकडे आले त्याच दिवशी दुपारी चांदीच्या अंगठीत ते रत्न तयार केले व त्यास मी हे रत्न दुसऱ्या दिवशी पुनर्वसू नक्षत्रात अभिषेक करून स्वामीच्या मठात धारण करावे असे सांगितले त्यानुसार वडिलांनी अभिषेक करून व त्याच्याच हस्ते जातकाने रत्न धारण केले.

योग सुंदरच होता, नक्षत्र पुनर्वसू जेकी पुनर्वसन करणारे आहे मग ते कुठल्याही बाबतीत असो असे हे गुरुचे नक्षत्र, वडील-गुरुच्या हस्ते, स्वामी महाराजांच्या मठात त्यामुळे जातकाचे निश्चित विवाह योग जुळून येणार यात शंका नव्हतीच.
परंतु आमच्यातील ज्योतिष आम्हाला स्वस्त बसू देत नाही. हे सर्व झाल्यावर मी जातकाकडून एक नंबर घेउन कुंडली मांडली, ती खाली दिली आहे. बघा ७ भावाच्या भावारंभावर पुन्हा प्लुटो आला जो की जन्मकुंडलीत देखील आहे. मनात शंकेचे वादळ सुरु झाले. ७ भावाचा सब मंगळ हा षष्टात होता तर गुरु व्ययस्थानी असून तो दशमेश आहे व गुरुचीच दशा व अंतर्दशा सुरु होती. मन थोडे नाराज झाले.
स्वामी महाराजांवर आमचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे शास्त्र हे सकारत्मक विचार करण्यास लावते. मंगळ हा षष्टात म्हणजे जातकाच्या नौकरीच्या स्थानी व तो लाभेश आहे त्यामुळे मी त्यास मुलगी हे भोकरदन मधील मिळेल असे संगीतले आणि जातकाला स्थळ हे याच भागातील मिळाले असून मुलगी बघण्याचा कार्यक्रम इथेच झाला, दोन्ही पक्षाकडून होकार देखील झाला आहे.
त्यामुळे पुढची बोलणीसाठी आम्ही जातकाच्या गावी बुलढाणा दि. २/१२/२०१२, वार पुन्हा राविवार (रवि) , पुन्हा पूनर्वसू नक्षत्र (गुरु) व चतुर्थी (म्हणजे मंगळ आलाच). रत्न, नक्षत्र, व दैवाची साथ निश्चित जातकास मिळाली आहे यात शंका नाही.
आपला,
दिपक पिंपळे