शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२

अंतरंगातील बोल

|| श्री स्वामी समर्थ  ||

नमस्कार,

आज कार्तिकी एकादशी, त्या पांडुरंगाच्या भेटीला सर्वे वारकरी हे भेटण्यासाठी पंढरपूर नगरीत भक्तीभावाने एकत्रित येतात व दर्शन घेतात, माझे वडील देखिल त्यातीलच एक परंतु मागील आषाढी एकादशीस त्यांच्या तब्यतीमुळे ते शक्य झाले नाव्ह्ते, त्यामुळे ते थोडे दुःखी झाले होते त्यावेळी एक रचना सुचली. हे असे कस घडते हे मला माहित नाही कारण नंतर मला ते कधीच जमल नाही कदाचित स्वामीच मला सुचवीत होते ते असे :

मज पामराची नजर तुमच्या वरी
नाही अधिकार मी सांगणे तुमसी
चिंतीत असती पाखरे घरट्यातली 
का जाता तुम्ही पंढरपुरी ?

स्वामी अससी आपल्या अंतरी
तरीही मन का उडते भवरी 
का मिळतील स्वामी पंढरपुरी ?
का जाता तुम्ही पंढरपुरी? 

आम्हीच ठरलो आमच्यासारखे भाग्यवान 
अससी स्वामी आमुच्या दारी
म्हणोनी झालो स्वामींचा मी वारकरी
का जाता तुम्ही पंढरपुरी?

काशिनाथ (दिपक) म्हणे मायबाप, आता जाऊ तरी कुठवरी
नका धरू आग्रहे मजवरी
सेवा करितो हा वारकरी 
का जाता तुम्ही पंढरपुरी?

|| श्री स्वामीचरणार विन्दार नमस्तु ||

आपला,
Preview

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा