|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
आम्ही के. पी. अभ्यासक, प्रत्यक ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देणार त्याला साथ हवी असते दशास्वामीची, सब (उप न.स्वामी.) च्या होकार अथवा नाकारची, हे सर्व ठरते ज्यावेळी बालक जन्मास येते म्हणजेच जातकाच्या जन्मपत्रिकेवरून त्याच्या आयुष्याचा भविष्यवेध घेता येतो. मग येथे दैव आले कुठे ?
के.पी. व ४-स्टेपच्या बलवान कार्येशत्वाचा वापर करुन कालनिर्णय अथवा भविष्य हे अचूक येते, परंतु अशा काही कुंडल्या आहेत की त्यामध्ये घरातील दोष, वास्तू दोष, शापित कुंडल्या यांचादेखील विचार करणे आवश्य असते, म्हणजे आमच्या मेडिकलच्या भाषेत diagnosis (निदान) होणे आवश्य असते. पुन्हा निदान झाल्यावर त्यावर उपचार हा ओघाने आलाच. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण रत्न उपचार, दैव व नक्षत्र हा लेख आवश्य वाचा. मग या जातकाच्या दैवाला आमच्या सारखा एखादा ज्योतिष हा केवळ माध्यम ठरत असेल असे वाटते जो की आपणस जन्मपत्रिका बघून उपाय सूचीवतो व तो जातक हा तेवढ्याच श्रद्धेने, भावनेने व प्रयत्नाने संगीलेला उपाय करतो व त्यास त्याचे फलश्रुती मिळतेच यात शंका नाही. निश्चित अशा कुंडल्या मी आपणास लेखाद्वारे कळवेल. हा आपचा लिखाणाचा प्रपंच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच आहे व तो नेहमी वेळोवेळी मांडेल.
काल सकाळी वी. श्री. देशिंगीकर यांचे पुस्तक वाचत होतो त्यांनी एक जातक जोडप्याला पुत्र प्राप्तीसाठी संगीलेल्या उपचार व प्रचीतीबद्दल होता. तो आपल्या समोर मांडावा असे वाटते. ते या दैवाबाद्दल लिहितात ते असे....
बलिष्ठ प्रयत्नाने दैवास देखील मागे हटविता येते, असे वचन प्रसिद्ध वैद्यशास्त्रकार पंडीत वाग्भाटकर यांनी आपल्या गंथात लिहिले. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, हे रामायणातून व विटाळ गेलेल्या स्त्रीस श्रीनरसिंहसरस्वती स्वामीनी आशीर्वाद देता पुत्रप्राप्ती झाली, हे आपण गुरुचरित्रात वाचतो पुत्रप्राप्तीसाठी जप करणे, नवस करणे, पूजा विधी, नारायण नागबळी, औषधी देणे हे सर्व प्रयत्नाचेच भाग आहेत. असे काही दैवी प्रयत्न केले असता संतती होते, अशा कुंडल्या आहेत. अशा कुंडल्यात योग देखील तसेच असतात.
यावरून आम्हास वाटते की पंडीत वाग्भाटकर सांगीलेले वाक्य हे त्रिवार सत्य आहे. दैव हे बदलते त्यास उपचार व प्रयत्नाची सांगड घालणे आवश्यक असते त्यामुळेच आमच्या के.पी. होरा प्रश्नकुंडलीत जातक हा जर प्रश्नसंभाधित विषयाबद्दल प्रयत्न करीत असेल तरच उत्तर बरोबर येते व प्रचीतिचा अनुभव येतो. नाहीतर उगीचच आमची परीक्षा घेणारे महाभाग देखील आम्हास भेटतात. असो.....!
आपला,

"बली पुरुषकारी हि दैवमप्य तिवर्तते !"

correct sundar
उत्तर द्याहटवा