शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

अचूकता ४-स्टेप थेरीची, कालनिर्णय शुभमंगलचा...!

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

सध्या विवाहाचा सिझन सुरु आहे, त्यामुळे जातकाच्या गुणमिलनाच्या पत्रिकेची रेलचेल आमच्याकडे वाढली आहे. पालक पत्रिका घेउन येतात गुणमिलन योग्य होत नसल्यास  विनाकारण आमचे डोके खाजावितात, काही मार्ग किंवा पर्याय शोधण्यास सांगतात,  स्थळ उत्तम आहे असे सांगतात.  मग अशास आम्ही सांगतो आपण जर सर्व ठरविलेच आहे तर हे गुणामिलन तरी कशासाठी, करून टाका लग्न...! नंतर आम्ही आहोतच पुनर्मिलनचा प्रश्न सोडवायला.

असेच एक जातक काल आपल्या मुलीच्या पत्रिका गुणमिलनासाठी आले.  या जातकाकडून आम्हास आमच्या ज्योतिषमित्राच्या बहिणीचे लग्न जानेवारी महिन्यात होणार आहे अशी वार्ता कळाली आम्ही लागलेच त्यास फोन केला  कारण त्याच्या बहिणीचा विवाहाचा प्रश्न आम्ही मे-२०१२ रोजी बघितला होतो व त्यास आम्ही डिसेंबर-जानेवारीमध्ये विवाह होईल असा कालनिर्णय केला होता व तसे घडत देखिल आहे. फोन केल्यावर लग्नपत्रिका घेउन आम्हास आश्चर्यचकित करणार होता, असे तो म्हणाला.

आम्ही  आश्चर्यचकित मुळीच झालो नसतो कारण आमचा शास्त्रावर पूर्णपणे विश्वास आहे. परतवे आम्ही थोडे दुखी मात्र झोलो कारण ज्योतिषमित्र हा देखिल एका सामान्य जातकासारखा वागला. असो..!

त्याचे झाले असे की आम्ही नक्षत्राच देण वासंतिक अंकाच्या निमित्ताने त्याच्या घरी दि १३/०५/२०१२ रविवारी गेलो, आमच्या ज्योतिष गप्पा सुरु होत्या त्या अंकात आमचा लेख होता त्याचे उत्तर कसे काढले ते सांगत होतो व आमचा विषय त्याच्या बहिणीच्या विवाहसाठी स्थळ शोधण्याकडे वळला. मनात वाटले की आता हा आपणास के.पी. ने कालनिर्णय बघण्यास सांगेल तोच त्याने हे सांगण्यास तिळमात्र विलंब केला नाही व त्याने लागलेच कागदावर बहिणेचे सर्व डीटेल्स लिहून दिले व आम्ही बघून कळवितो असे त्यास सांगितले व पुन्हा नेहमी प्रमाणे खिशात तो कागद टाकला.  अशा चिठ्या आप्त-मित्र मंडळीच्या घरातून बाहेर पडताना आम्हास मिळतात त्यातच आमच्या या ज्योतिष मित्राची भर पडली.

कामाच्या व्यापामध्ये प्रश्न राहून गेला परंतु आमचा ज्योतिषमित्र यावेळी मात्र फोन करण्यास विसरला नाही त्याने दि. १६/०५/२०१२ बुधवार दुपारी १२:१५ मी. फोन करून प्रश्न बघितला का विचारले व मी त्यास अर्ध्या तासात कळवितो.  असे सांगितले व तो मी पुढीलप्रमाणे ४-स्टेप पद्धतीने सोडविला.

नाव:  स्त्री जातक                      प्रश्न दि. १६/०५/२०१२  वेळ :१२:१५            
ज. दि.: ०२/१०/१९८८                 L:  चंद्र      LS:  बुध 
ज. वे.  १८:१५ मी.                     S:  शनी    D:  बुध
ज. स्थळ: औरंगाबाद                R:  गुरु 
लग्नभाव: मीन: १६'४५''४१' - गुरु-बुध-बुध-बुध  हे तीन ही ग्रह रुलींगमध्ये आहे त्यमुळे जातकाची जन्मवेळ बरोबर आहे. 
सप्तम भाव: या भावाचा सब शनी हा देखिल रुलींगमध्ये आहे.
नियम: ७ भावाचा सब जर २-७-११ पैकीचा चा कार्येश असेल तर २-७-११ दशा-अन्तर दशेत विवाहयोग येईल.
०  शनी :                             शनी हा रुलीग मध्ये आहे व तो ७ चा बलवान कार्येश ग्रह आहे.
    केतू: ६ रा स्व. रवि ६        त्यामुळे सब चा होकार विवाह होणार पुढे कालनिर्णयासाठी
०० रवि: ६ भा. ७                  दशास्वामीकडे वळूया.
    चंद्र :४                           (याच पद्धतीचे वरील तक्त्यामध्ये सर्वे ग्रहांचे ४-स्टेप दिले आहे.) 
प्रश्नवेळी  :                                     दिनांक                                                   साखळी (२-७-११)
महादशा  - गुरु -                   २१/०२/१९९९ ते ५/१/ २०१३                                २-११
अंतरदशा - राहू                     १०/०८/२०१० ते ५/१/२०१३                                  ११
साखळी जुळण्यासाठी ७ ची आवश्यकता आहे विदशास्वामी असा निवडावा लागेल जोकी ७ बलवान कार्येश आहे. येथे प्रश्न वेळी शुक्र अंतर दशा सुरु होती जो की ७ चा कार्येश नाही.  उर्वरित ग्रह पैकी रवि, चंद्र, व मंगळ हे ७ चे बलवान कार्येश ग्रह आहेते.  लग्नाच्या तारखा व पितृपक्ष याचा विचार केल्यास मंगळाची अंतरदशा निवडली ती सुरु होते १२/११/२०१२ ते ५/१२/२०१२ पर्यंत त्यामुळे या काळात विवाह होणार परंतु डिसेंबर व जानेवारी पहिल्या हप्त्यापर्यंत रवि व चंद्राची सूक्ष्मदशा सुरु होते व दोन्ही ग्रह वरीलप्रमाणे ७-११ चे बलवान कार्येश ग्रह आहेत त्यमुळे मी हा कलावधी सांगितला व तो खरा ठरला. लेख बराच लांबत आहे.  येथेच लेखास पूर्णविराम देतो......!
|| शुभं भवतु ||
आपला, 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा