!! श्री स्वामी समर्थ !!
जेष्ठ कृ ७, गुरुवार १९/६/२०१४ रोजी ८ वाजून ४७ मि. गुरु कर्क राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल गुरुवार सकाळी ६/५६ ते १०/३८ मि. पर्यंत आहे. मेष, धनु, व सिंह या राशींना ४-८-१२ वा गुरु येत असल्याने व लावहापादाने ज्या राशीत येत आहे. त्यांनी पिडापारिहारार्थ गुरूच्या उद्धेशाने जप, दान पूजा अवश्य करावी.
कर्क राशीत गुरु असता ज्यांची जन्म राशी मेष आहे अशा व्यक्तींना तो ४ था येईल. याच प्रमाणे वृषभ राशीला - ३ रा, मिथुनेला -२ रा, कर्केला - १ ला, सिहेला - १२ वा, कन्येला - ११ वा, तुळेला- १० वा, वृश्चिकला - ९ वा, धनुला ८ वा, मकरेला - ७ वा, कुंभेला - ६ वा, मिनेला - ५ वा येईल.
आपल्या जन्म राशीपासून गुरु २, ५, ७, ९, ११ वा शुभफल देणारा आहे तर १, ३, ६, १० वा मध्यम आणि ४, ८, १२ वा हा अनिष्ठ असतो. गुरु हा अनिष्ठ असता गुरूचा जप, होम, शांति करावी. त्यायोगे संकटाचे निवारण होते.
दरवर्षी दिवाळी अंकात ग्रहांच्या नक्षत्र गोचर भ्रमनांचा विचार करून राशी भविष्य लिहीत असताना ज्या राशीना ४,८,१२ वा गुरु सुरु असतो त्यावेळे अशा राशींना निश्चीत अडचणी किंवा संकाटाना सामोरी जावे लागते मग मुळ कुंडलीत दशाजरी शुभ कारक असल्या तरी गोचर भ्रमणाची अशा जातकांना साथ मिळत नाही आणि येणाऱ्या शुभ कार्यास व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीत गुरु पालटास जरी महत्त नसले तरी देखिल गोचर भ्रमणाचा अनुभव हा येतो.
कर्क राशीत गुरु असता जन्म राशीफले - (दि. १९/६/२०१४ ते १४/७/२०१५)
१) मेष - धननाश
२) वृषभ - क्लेश दायक
३) मिथून - धनप्राप्ती
४) कर्क - भयपरद
५) सिंह - पीडाकारक
६) कन्या - धनलाभ
७) तुळ - विपत्तीदायक
८) वृश्चिक - रोगोपद्र्व
९) धनु - रोग भय
१०) मकर - सन्मान प्राप्ती
११) कुंभ - शोकप्रद
१२) मीन - सोख्य दायक
आपला,
नमस्कार दीपक,
उत्तर द्याहटवाबर्याच दिवसांनी लेख पाहून बरे वाटले.
गोचर भ्रमणाचा अनुभव (चंद्र राशी) जन्मराशी प्रमाणे येतो कि लग्न राशी प्रमाणे येतो?
आपला,
संतोष सुसवीरकर
मी राशी भविष्य लिहित असतना लग्न राशी विचारात घेऊनच लिहितो, त्याचा अनुभव अधिक प्रमाणात येतो. हे सर्व मी जलद गतीचे ग्रह आणि मंद गतीचे ग्रह त्यांचे नक्षत्रातून होणारे भ्रमण असा एकत्र विचार करून लेहितो.. त्यामुळे चंद्रराशी वरून देखील विचार केला तरी हि अनुभय येतो..हे राशी भविष्य लिखाण करणा-यांवर देखील अवलंबून असते कि तो कुठले गोचर भ्रमण गृहीत धरत आहे.
उत्तर द्याहटवाश्री स्वामी समर्थ
dhanyavaad
उत्तर द्याहटवाAmol Kelkar
19/9/2014 aivaji 19/6/2014 ase pahije hote ka?
उत्तर द्याहटवाho agadi barobar.. typo error.. dhanyvad..!!
उत्तर द्याहटवा