|| श्री स्वामी समर्थ ||
आषाढी एकादशी या वर्षी कालेंडर मध्ये दोन तारखा दर्शिवित आहे एक ८ जुलै आणि ९ जुलै, यात ८ तारखेस ही स्मार्त एकादशी आहे तर ९ तारखेस ही भागवत एकादशी आहे जो की प्रत्येक माळकरी हीच एकादशी गृहीत धरतात. याच दिवशी पंढरपूर यात्रा असते आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ लागलेली असते. या दोन एकाशितीला फरक हा पंचांगाच्या आधारे आपल्या समोर मांडत आहे.
वर्षातून २४ एकादशींचा उपवास असतो. त्यामध्ये ४ ते ६ वेळा स्मार्त व भागवत एकादशी येत असतात. सूर्योदयानंतर १ मिनीटसुध्दा एकादशी नसताना महाजे संपूर्ण दिवशी व्दादशी तिथी असताना व्दादशीच्या दिवशी एकाशीच उपवास कसा दिला जातो अशी शंका येते.
सध्याच्या काळात स्मार्त / भागवत (वैष्णव ) असे दोन संप्रदाय आहेत. एकादशीव्रत स्मार्तासाठी परानाप्रधान आहे आणि भागवंताना उपोषप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी करावे. भागवंताना उपोषणाच्या दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमीवेध होत असेल म्हणजे एकाशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदयवेळी ( १ ता. ३६ मी.) असेल तेंव्हा दशमीविध्द एकाशीचा दिवस सोडून द्वादशीच्या दिवशी भागावत संप्रदायांनी एकादशीव्रत करावे असे आहे. हा मुख्य नियम आहे.
हा सर्व विचार धर्मसिंधु, निर्णयसिंधू ई. ग्रंथामध्ये दिलेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा