|| श्री स्वामी समर्थ ||
मित्रांनो कुलधर्म-कुलाचार म्हणजे काय ? कुलधर्म केला नाही तर काय घडते ?
कुळधर्म ज्ञान कुळधर्म सधन । कुळधर्म निधान हाती चढे ।।१।।
कुळधर्म भक्ती कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ।।२।।
कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनांचे ।।३।।
कुळधर्म महत्व कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकीचे ।।४।।
तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव । यथाविध भाव जरी होय ।।५।।
--तुकाराम महाराज.
आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.
कुळधर्म म्हणजे समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व समाज व्यवस्था टिकण्यासाठी केलेले अलिखित नियम होय. धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य करणे ते पार पाडणे असाही आहे म्हणून आपआपल्या घराण्यातील परंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजेच कुलधार्माचे पालन करणे.
हिंदू धर्मियांमध्ये प्रत्येक कुळाची म्हणजेच घरण्याची काही वैशिष्ठे असतात काही वेगळेपण तर काही साम्य असतात.प्रत्येक घराण्याला स्वतःचे दैवत,स्वतःचे आचार विचार असतात.यामध्ये भौगोलिक रचनेपरत्वे,आर्थिक कुवतीनुसार आदी गोष्टीमुळे बदल घडू शकतात.
कुलधर्म केला नाही तर काय घडते ?
याविषयी श्रीमत्भगवत्गीतेतील पहिल्या अध्यायात अर्जुनाने सविस्तर वर्णन केलेले आहे.
अधर्म माजतो. वर्णसंकर होतो. (भिन्न व्यवसायामध्ये लग्न होतात.), श्राध्दपक्ष होत नाहीत. त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही. परिणामी ते प्रेतयोनीमध्ये जातात. तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो. त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यामुळे मोक्षाची संधी प्राप्त होत नाही. त्यांचे शाप त्यांच्या वंशजांना लागतात. त्यामुळे अजून अधर्म घडत जातो.
आईवडिल, घरातील वृध्द यांचा अपमान होतो, त्यांची अवहेलना, कुचंबणा होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्यांचे शाप लागतात. कुलदेवतांची, नवग्रहांची, अष्टदिक्पालांची, क्षेत्रदेवतांची, ब्रह्मादीमंडलाची पूजा होणे, त्यांना तूपाची आहूति मिळणे त्यातून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्य जन्माचे कर्तव्य आहे. ते कुळाचाराद्वारा घडत असते. जरकुलाचार केले नाहीत तर देवतांना त्यांचा हविर्भाग मिळत नाही. या अपदेवता असल्याने त्या नाराज होतात व त्यांचे शाप घराण्याला लागतात.
दीनदुःखी, असहाय्य, पीडीत, वारकरी, साधू-संन्यासी-अतिथी, तडी-तापसी, वैदिक पाठशाळेत शिकणारे बटू, पशुपक्षी विशेषतः गाई यांची सेवा गृहस्थधर्मात करावी असा दंडक आहे. हा धर्म कुलाचार करताना आपोआप होतो. अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान, आसरा इ. कर्म घडतात. जर कुलाचार केले नाहीत तर समाजातील या घटकांना आसराच राहणार नाही. परिणामी गोहत्या, अतिथीचा अपमान, अवहेलना होते. कर्तव्य न केल्याचे व अधर्म केल्याचे पाप लागते ज्याला कठोर प्रायश्चित्त आहे.
अशा शापित घराण्यामध्ये कोणते अनाचार घडतात ?
भ्रूणहत्या.
अपमृत्यू (अकाली मृत्यू)
दुर्मरण (भाजून, अपघाताने, आत्महत्येने, बुडून, खितपत पडून, खून झाल्याने)
घरात भांडणे होणे,
सुवासिनीला पीडा होणे (डोळ्यात पाणी येणे, अन्न गोड न लागणे, खिन्नता येणे, भीती वाटणे, स्वप्नात साप दिसणे, स्वप्नात अघटित घडताना दिसणे, सतत अस्वस्थता असणे), सवतीचा त्रास होणे (यजमानाचे संसारातले लक्ष उडणे)
घरातून व्यक्ती पळून जाणे (तरणीताठी मुलगी/मुलगा, म्हातारी व्यक्ती, प्रमुख व्यक्ती)
धंद्यात नुकसान होणे. कर्ज होणे, वसुलीसाठी माणसे घरी येणे. कोर्ट कचेर्या मागे लागणे
नोकरी जाणे, प्रमोशन न मिळणे, कामात लक्ष न लागणे, कामाच्या ठिकाणी त्रास होणे.
सततची आजारपणे घरात असणे,
लहान मुलांना त्रास होणे (झोपेत ओरडत उठणे, अभ्यासात लक्ष न लागणे)
वाममार्गाला लागणे (परदारा-परधन-परनिंदा)
घरात सतत अशांति असणे.
लग्ने मोडणे, घटस्फोट होणे.
म्हणूनच या बाबत संत ज्ञानेश्वर माउलीनी सर्व जनतेस स्पष्ट संदेश दिला आहे,
कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा सर्वथा न करावा अनाचार --ज्ञानेश्वरी
कुळाचा कुळधर्म आवश्य पाळावा कुठेही अनाचार करू नये, कुळाचे नाव सर्वतोपरी उंचावण्याचे कार्य करावे कुलाच्या नावलौकिकाला कोणताही डाग डाग लागणर नाही याची काळजी घ्यावी समाज विघातक कृत्य करू नये.
कुळधर्माचे उपयुक्तता सांगताना संत ज्ञानेश्वर माउली म्हणतात
कुळधर्मु चाळी | विधिनिषेध पाळी | मग सुखे तुज सरळी | दिधली आहे || --ज्ञानेश्वरी
आपला कुलधर्म पाळावा, कुलाचारांचे आचरण करावे तसेच शास्त्रांनी सांगितलेली सत्कर्मे जरूर करावीत व ज्या कर्मांचा निषेध केला आहे ती कर्मे टाळावीत इतके केले म्हणजे सुखाने वागावयास मोकळीक आहे.
वंश परंपरेने आलेले रूढी रिती रिवाज तसेच दैवते यांना कुळधर्मामध्ये अनन्य साधारण महत्व असते.या संदर्भात समर्थ रामदास स्वामीनी ग्रंथराज दासबोध मध्ये सांगितले आहे.
याही वेगळे |कुळधर्म सोडू नये| अनुक्रम उत्तम अथवा मध्यम| करीत जावे || --दासबोध
आपले कुळधर्म आणि कुलाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे सुरु ठेवावेत याशिवाय आपल्या घरी जे कुळधर्म असतील ते जसे चालत आले असतील ते उत्तम किंवा मध्यम असोत आपण ते करीत राहावे.
संधर्भ: •|| वास्तु सुख ||•
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा