मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

रवीचे राशी आणि नक्षत्र भ्रमण

||श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

रुलिंग प्लानेटचा वापर करून कालनिर्णय करण्यासाठी महिन्याभरात घडणाऱ्या घटनेसाठी चंद्राचे भ्रमण पहावे लागते तर वर्षभरात घडणाऱ्या घटनेसाठी रविचे भ्रमण विचारात घावे लागते. साधारण रविचे वर्षभराचे  राशी व नक्षत्रस्वामीचे भ्रमण पुढील प्रमाणे देत आहोत.

दिनांक                   राशी प्रवेश               नक्षत्र स्वामी                 

१६/१२/१३                     धनु           शनी                        ३०/१२/१३ ते २/१२/१३
                                  बुध                         ३/१२/१३ ते १५/१२/१३
                                  केतू                         १६/१२/१३ ते २८/१२/१३
                                  शुक्र                         २९/१२/१३ ते ३१/१२/१३
१४/१/१४                       मकर          शुक्र                         ०१/१/१४ ते १०/१/१४
                                  रवि                         ११/१/१४ ते २४/१/१४
                                  केतू                         २५/१/१४ ते ३१/१/१४
१२/२/१४                      कुंभ           चंद्र                         ०१/२/१४ ते ६/२/१४
                                  मंगळ                       ७/२/१४ ते १९/२/१४
                                  राहू                         २०/२/१४ ते २८/२/१४
१४/३/१४                      मीन          राहू                         १/३/१४ ते ४/३/१४
                                  गुरु                         ५/३/१४ ते १७/३/१४
                                  शनी                        १८/३/१४ ते ३१/३/१४
१४/४/१४                      मेष           बुध                         १/४/१४ ते १३/४/१४
                                  केतू                         १४/४/१४ ते २७/४/१४
                                  शुक्र                         २८/४/१४ ते ३०/४/१४
१५/५/१४                     वृषभ          शुक्र                         १/५/१४ ते ११/५/१४
                                  रवी                         १२/५/१४ ते २५/५/१४
                                  चंद्र                         २६/५/१४ ते ३१/५/१४
१५/६/१४                      मिथुन        चंद्र                         १/६/१४ ते ८/६/१४
                                  मंगळ                       ९/६/१४ ते २२/६/१४
                                  राहू                         २३/६/१४ ते ३०/६/१४
१६/७/१४                      कर्क          राहू                         १/७/१४ ते ६/७/१४
                                  गुरु                         ७/७/१४ ते २०/७/१४
                                  शनी                        २१/७/१४ ते ३१/७/१४
१७/८/१४                      सिंह         शनी                        १/८/१४ ते ३/८/१४
                                  बुध                         ४/८/१४ ते १६/८/१४
                                  केतू                         १७/८/१४ ते ३०/८/१४
१७/९/१४                      कन्या        शुक्र                         १/९/१४ ते १३/९/१४
                                  रवि                         १३/९/१४ ते २७/९/१४
                                  चंद्र                         २८/९/१४ ते ३०/९/१४
१७/१०/१४                    तुळ             चंद्र                         १/१०/१४ ते १०/१०/१४
                                  मंगळ                       ११/१०/१४ ते २४/१०/१४
                                  राहू                         २५/१०/१४ ते ३१/१०/१४

Preview

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१३

"गुरूचरित्र"


|| गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ||

 

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे.

पारायण-पद्धती
श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"
अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.
१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.
२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.
३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.
४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.
५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)
६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.
७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.
८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.
९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

डिसेंबर २०१३, ग्रहांचे नक्षत्र भ्रमण

ग्रह          ग्रह-राशी प्रवेश       नक्षत्र स्वामी               दिनांक
रवि           १६/१२/१३-धनु          शनी                        ३०/१२/१३ ते २/१२/१३
                                  बुध                         ३/१२/१३ ते १५/१२/१३
                                  केतू                         १६/१२/१३ ते २८/१२/१३
                                  शुक्र                         २९/१२/१३ ते ३१/१२/१३

मंगळ          कन्या                रवि                         १/१२/१३ ते १५/१२/१३
                                  चंद्र                         १६/१२/१३ ते ३१/१२/१३

बुध           १/१२/१३-वृश्चिक        गुरु                         १/१२/१३ ते १२/१२/१३
              २०/१२/१३ धनु        बुध                         १३/१२/१३ ते २०/१२/१३
                                  केतू                         २१/१२/१३ ते २९/१२/१३
                                  शुक्र                         ३०-३१/१२/१३

शुक्र           ०५/१२/१३-मकर        रवि                         १/१२/१३ ते ३१/१२/१३
                                  

ग्रह          ग्रह-राशी प्रवेश      नक्षत्रस्वामी-सब                   दिनांक
     
गुरु           मिथून                गुरु-बुध                      १/१२/१३ ते १८/१२/१३
                                  गुरु-शनी                     १९/१२/१३ ते ३१/१२/१३

शनी           तुळ                  गुरु-शनी                     १/१२/१३ ते ७/१२/१३
                                  गुरु-बुध                      ८/१२/१३ ते २५/१२/१३
                                  गुरु-केतू                      २६/१२/१३ ते ३१/१२/१३

राहू           तुळ                  राहू-शनी                     १/१२/१३ ते ३०/१२/१३
                                        

केतू           मेष                  केतू-बुध                      १/१२/१३ ते १०/१२/१३

                                  केतू-शनी                     ११/१२/१३ ते ३१/१२/१३

Preview

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

* कुलदेवता *

!! श्री स्वामी समर्थ !! 
आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. तिलाच कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास जलद पद्धतीने प्रगती होते.
कुलदेवतेचा नामजप करणे

कुलदेवता या शब्दाचा अर्थ !

'
कुलदेवता' हा शब्द कुल' आणि देवता' या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला कुलदेवआणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला कुलदेवीम्हणून संबोधले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली उपासना !
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता
शिवाजी माहाराजांना आशीर्वाद देतांना त्यांची कुलदेवता

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

कुलदेवता ठाऊक नसेल, तर श्री कुलदेवतायै नमः ।' असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटते. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी ही अनुभूती घेतली आहे. श्री कुलदेवतायै नमः ।' हा जप देवतेच्या तारक तत्त्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता' या शब्दातील दे' हे अक्षर उच्चारतांना थोडेसे लांबवावे. यामुळे देवतेचे तारक तत्त्व जागृत होऊन त्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

नोव्हेंबर २०१३, ग्रहांचे नक्षत्र भ्रमण

 !! श्री स्वामी समर्थ !!
  
नोव्हेंबर २०१३
  
ग्रह          ग्रह-राशी प्रवेश      नक्षत्र स्वामी               दिनांक
रवि           १६/११/१-वृश्चिक         राहू                         १/११/१३ ते ६/११/१३
                                  गुरु                         ७/११/१३ ते १९/११/१३
                                  शनी                        २०/११/१३ ते ३०/११/१३

मंगळ          २६/११/१३-कन्या        शुक्र                         १/११/१३ ते २०/११/१३
                                  रवि                         २०/११/१३ ते ३०/११/१३

बुध           तुळ                  राहू                         १/११/१३ ते २४/११/१३
                                  गुरु                         २५/११/१३ ते ३०/११/१३

शुक्र           धनु                  केतू                         १/११/१३ ते १३/११/१३
                                  शुक्र                         १४/११/१३ ते २९/११/१३

 ग्रह         ग्रह-राशी प्रवेश      नक्षत्रस्वामी-सब             दिनांक

गुरु           मिथून                गुरु-केतू                      १/११/१३ ते २८/११/१३
                                  गुरु-बुध                      २९/११/१३ ते ३०/११/१३

शनी           तुळ                  राहू-मंगळ                    १/११/१३ ते ४/११/१३
                                  गुरु-गुरु                      ५/११/१३ ते १८/११/१३
                                  गुरु-शनी                     १९/११/१३ ते ३०/११/१३

राहू           तुळ                  राहू-बुध                      १/११/१३ ते १८/११/१३
                                   राहू-शनी                     १९/११/१३ ते २९/११/१३ 

केतू           मेष                  शुक्र-शुक्र                     १/११/१३ ते ४/११/१३

                                  केतू-बुध                      ५/११/१३ ते ३०/११/१३
Preview

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

!! श्री स्वामी समर्थ !!
!! श्री लक्ष्मीमाता  प्रसन्न !!

नरक चतुदर्शी हा दिवस नरकासुराच्या वधाचा आनंदोत्सव म्हणून साजरा होतो. या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामेने स्त्रियांना पिडा देणार्याा नरकासुराचा वध केला. पण मरताना नरकासुराने वर मागितला की, या दिवशी अभ्यंगस्नान करणार्याास नरकाची पिडा देऊ नये. श्रीकृष्णाने उदारमनाने त्याला हा वर देऊ केला. म्हणूनच या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व आहे. या दिवशी सुर्योदयापूर्वी स्नान केल्यास अपमृत्यू आणि दुर्दैवापासून सुटका होते असा समज असल्याने या दिवसापासून अभ्यंगस्नानाला सुरूवात केली जाते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण केले जाते. हा संपूर्ण विधी पंचागात दिलेला असतो. या दिवशी आई मुलांना औक्षण करते. काही ठिकाणी नरकासूर वधाचे प्रतिक म्हणून कारीट पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात. अभ्यंग स्नानानंतर कपाळाला टिळा लावून देवदर्शनास जाण्याचा प्रघात आहे. या दिवशी सायंकाळी घर, दुकान कार्यालय आदी ठिकाणी दिवे प्रज्वलित केले जातात. घराचे अंगण रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजवले जाते. केवळ लहान मुलेच नव्हे तर तरुण, प्रौढ असे सारेजण ङ्गटाके वाजवून येणार्याे नवीन पर्वाचा आनंदाने स्विकार करतात. या दिवशी नवीन वस्त्र परिधान करून येणार्याव लक्ष्मीचे स्वागत केले जाते. 

थोडक्यात नरक चतुदर्शीच्या दिवशी अलक्ष्मीचे मर्दन करून, आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट करून, अहंकाराचे उच्चाटन करून शुचिर्भूत व्हायचे असते. आजच्याच दिवशी लक्ष्मीपूजनाचाही योग आला आहे. सामान्यत: अमावस्या हा दिवस अशुभ मानला जातो. पण याला आश्वििन अमावस्येचा अपवादर आहे. कारण ही अमावस्या शुभ ङ्गलदायी आहे. शिवाय ती चंचल असणार्याव लक्ष्मीला स्थिर करणारी आहे. म्हणूनच स्थिर लग्नावर लक्ष्मीचे पूजन केले जाते. आपल्याकडे लक्ष्मी कायम रहावी, तिची चंचलता संपुष्टात यावी हा यामागचा हेतू आहे. या दिवशी अनेक घरात श्रीसुक्ताचे पठण केले जाते. या दिवसाची आख्यायिका मोठी रंजक आहे. या दिवशी बळीराजा पाताळात गाडला गेला आणि त्याच्या तावडीतून सर्व देवतांची सुटका झाली. शिवाय लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित राहिले. याची आठवण म्हणून लक्ष्मीपूजन केले जाते. 

हा दिवस व्यापारी लोक विशेष उत्साहाने साजरा करतात. त्यांच्या पूजेचा दिमाख पाहण्याजोगा असतो. सायंकाळी नवीन वस्त्रावर रांगोळी रेखून तबक ठेवले जाते. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, आपल्याकडील मिळकतीची कागदपत्रे, खतावण्या, वह्या आदी ठेवले जाते. या सर्वांची ङ्गुले, ङ्गळे, हळद-कुंकू, नैवेद्य, अक्षता आदींद्वारे विधीवत पूजा केली जाते. देवीला प्रसन्न करण्यासाठी पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. साळीच्या लाह्या, बत्तासे, अनारसे, डाळींबाचे दाणे, पंचामृत अशा पारंपरिक पदार्थांनी देवीला तुष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. या दिवशी लक्ष्मीबरोबरच घरातील केरसुणीलाही पूजेचा मान असतो. घर स्वच्छ करणारी केरसुणी उत्सवमूर्ती असते. तिची देखील पाणी, हळदकु ंकु, ङ्गुले, हार आदींनी पूजा केली जाते आणि नंतरच तिचा वापर करणे सुरू होते. लक्ष्मीबरोबरच कुबेराचेही पूजन केले जाते. संध्याकाळी ङ्गटाक्यांच्या दणदणाटात लक्ष्मीचे स्वागत होते. शेजार्या्-पाजार्यांेना बोलावून, त्यांना ङ्गराळाचे पदार्थ देऊन हा दिवस थाटामाटात साजरा केला जातो. याच दिवशी संध्याकाळी आणखी एक पूजाविधी संपन्न होते तो म्हणजे यमराज पूजन आणि यमदीपदान. यासाठी घररातील स्त्री एका पात्रामध्ये तिळाच्या तेलाचे दिवे लावते. या दिव्यांची गंध, पुष्प, अक्षता यांनी पूजा केली जाते. दक्षिणेकडे तोंड करून यमाची प्रार्थना केली जाते. त्यानंतर हे सर्व दिवे सार्वजनिक ठिकाणी ठेवले जातात. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावरती अखंड तेवत ठेवला जातो. अशा प्रकारे विधी केल्यास यमाच्या पाशातून आणि नरकातून मुक्ती मिळते असा समज आहे. याखेरीज यमासाठी पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही लावला जातो. या दिव्याची देखील तांदूळ, गूळ, पाणी, ङ्गुले, नैवेद्यासह पूजा केली जाते. अशा प्रकारे यमराज पूजन संपन्न होते. अकाली मृत्यूदोष आणि पिडा टाळणे हा या विधीच्या आयोजनामागचा उद्देश आहे. या दिवशीचा मुख्य नैवेद्य धने आणि गुळाचा असतो. काही ठिकाणी कडूलिंबाची पाने आणि गूळ देखील नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवतात. कडूलिंबाचे आयुर्वेदातील महत्त्व सर्वांना ठाऊकच आहे. रक्तशुद्धी करण्याबरोबरच एकूण प्रकृती स्वाथ्यासाठी कडू

लेख सौजन्य :  श्री प्रशांतजी कुडाळकर 

शनिवार, २६ ऑक्टोबर, २०१३

नक्षत्राचं देणं दिवाळी अंक – २०१३

!! श्री स्वामी समर्थ !!
नक्षत्राचं देणं दिवाळी अंक २०१३, उद्या दिनांक २७/१०/२०१३ रोजी नाशिक येथे प्रकाशित होणार आहे. या अंकांत पान क्र. २९ वर माझा लेख केदानाथातील त्रासदा आणि वाट पाहणारे ओलेचिंब डोळे हा लेख कुंडली विवेचन सहित असून दरवर्षी प्रमाणे राशी भविष्य-२०१३-१४ (वेध नक्षत्रातील ग्रहांचा) देखिल या अंकांत आहे तर आपण निश्चीत वाचा  हा अंक उद्यापासून बाजारात उपलब्ध होईल.
संपर्क: 
संपादक डॉ. सुनीलजी गोंधळेकर (ठाणे)
०९८१९२४८१७९
जाहिरात व प्रसिद्धी प्रमुख:  श्री सुहास सावरगावंकर (ठाणे)
क्षेत्रीय सहसंपादक
श्री श्याम एदलाबादकर (यवतमाळ) ९८२२७२५५५९
श्री दिपक पिंपळे (औरंगाबाद) ९८२३४४८४४९ 
श्री वि जी. प्रभू (डोंबिवली) ९९६९०८२६२६ 



आपला 
दिपक पिंपळे 
Preview

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

पितृपक्ष (महालय पक्ष)

|| श्री स्वामी समर्थ ||
ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तसेच पुराणातील ग्रंथांमध्ये देखिल पितृपक्षाला फार महत्त आहे. अगदी श्रीपाद चरित्रात देखिल याचा उल्लेख आहे व ते योग्य शास्त्रोक्त पद्धतीने केले नसता त्याच्या दोष पुढील तीन पिढ्यांना लागतो हे लक्षात घेतले पाहिजे.   जोतिषशास्त्र केवळ १२ राशी २७ नक्षत्रात अभ्यास नाही तर त्यामध्ये अनुभव आणि प्रचीती याची देखिल सांगड असते. कृष्णामूर्ती पद्धतीत ज्यावेळी उत्तर अथवा कालनिर्णय चुकतात त्यावेळी अशाकाही कुंडल्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की यामध्ये पितृदोष आहे.  त्याचे परिणाम म्हणजे विवाहात अडचणी, संतती सुख, व्यापारातील नुकसान इत्यादी अनेक असू शकतात. मागील  "मोक्षम् देही राहू" या लेखात आम्ही हा दोष पत्रिकेत कसा शोधातात हे दर्शविले होते. ती केवळ एक कुंडली नसून अशा कुंडल्यांचा संच आम्हा जवळ आहे.  याचे महत्त्व आपण जाणावे यासाठी लेखनाचा आमचा हा प्रयत्न.  त्यामुळे येणाऱ्या पितृपक्षात आपण ही विधी निश्चीतपणे विधीपूर्वक करावी आणि आपल्या पितरांना सदगती मिळवून द्यावी. याची सखोल माहित व विधी पद्धती ही सनातन ग्रंथातून पुढील प्रमाणे मांडली आहे. 
(टीप:- दिवाळी अंकासाठी राशी भविष्य लिखाणाचे कार्य सुरु असल्याने कुंडली विवेचने लेख आम्ही नोव्हेंबर पासून वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करणार आहोत).
आपला, 
दिपक पिंपळे

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.
  १. पक्ष
         भाद्रपद मासातील कृष्णपक्ष
 २. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व
       पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईट शक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात.
 ३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?
अ. `पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्‍या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.
आ. पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.
इ. पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.
ई. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते. 
 ४. श्राद्ध करण्याची पद्धत
अ. भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रयी - पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा); मातृत्रयी - माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.
इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.
ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे यावद्वृश्चिकदर्शनम्म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.
उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.

तिथी
श्राद्धाचे नाव
कोणासाठी ?
विधीविशेष
१. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्र असतांना)
भरणी
मृत झालेली -
व्यक्ती

२. नवमी
अविधवा नवमी
अहेवपणी मृत झालेली स्त्री
श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनही लतात
३. त्रयोदशी
बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव)
लहान मुले
काकबळी
४. चतुर्दशी
घातचतुर्दशी
अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेले


टीप १ - पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्‍या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते. (मूळस्थानी)
 ५. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व
         दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.
६. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?
अ. पक्षपंधरवडा कालावधी
         भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या) महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.
 आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे
         पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात विवाहहा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर राहातात. प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही. पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्‍या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.
७. भरणी श्राद्ध
अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे
         पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.
 आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल
         पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्‍यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये.
 ८. इतरही मघादी श्राद्ध
भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्‍या वर्षापासून करावीत.
 ९. नित्य तर्पण
         नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.
 संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ सण, धार्मिक उत्सव आणि व्रते