रविवार, २८ एप्रिल, २०१३

सर्वांना जाहीर आमंत्रण


!!श्री स्वामी समर्थ !!


नमस्कार,



सर्वांना जाहीर आमंत्रण :

मागील २० वर्षापासून अखंडीत सुरु असणारे व ज्योतिष विषयाला वाहिलेल के. पी. पद्धतीतील केवळ एकमेव अर्धवार्षिक अंक दिनांक १ मे २०१३, बुधवार रोजी मा. श्री संजय केळकर (बी.जे.पी. प्रमुख नेते) याच्या हस्ते साय. ४:०० वाजता न्यू इंग्लिश हायस्कूल ठाणे या ठिकाणी प्रकाशित होणार आहे.
आमंत्रक: संपादक - डॉ सुनील गोंधळेकर, सहाय्यक संपादक - श्री एदलाबादकर, श्री. दिपक पिंपळे जाहिरात प्रमुख - श्री सुहास सावरगावकर
(टीप - १९९३ ते २०१० पर्यतचे सर्वे अंक DVD स्वरुपात उपलब्ध)



नक्षत्राचं देणं दिवाळी २०१२ या अंकाच आम्ही पूर्ण वर्षाचे राशीभविष्य लिहिले आहे. त्यामुळे या अंकात राशीभविष्य दिले नसून जास्तीत जास्त लेखांचा समावेश केला आहे. अभ्यासकांनी जरुरू हा अंक वाचवा तसेच या अंकात आमचा देखील एक लेख आहे.



सहाय्यक संपादक नक्षत्राचं देणं 


Preview






बुधवार, १७ एप्रिल, २०१३

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !


अतृप्त पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण आणि त्रासाचे स्वरूप
 दत्ताच्या नामजपाने पूर्वजांचे त्रास दूर होणे
         हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्ध-पक्ष वगैरे, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात असे समजावे - विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे किंवा सर्व मुली होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.
 दत्ताच्या नामजपाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
अ. संरक्षक-कवच निर्माण होणे
         दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्‍या शक्‍तीने नामजप करणार्‍याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.
आ. अतृप्त पूर्वजांना गती मिळणे
         बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत खूप गुरफटलेले असतात. मायेत खूप गुरफटलेले असल्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भूवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्‍तीला होणार्‍या त्रासाचे प्रमाण कमी होते. 
अतृप्त पूर्वजांच्या त्रासावर उपाययोजना
१. कोणत्याही तर्‍हेचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ घंटे (तास) किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।' हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा
 प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.
 २. मध्यम तर्‍हेचा त्रास असल्यास कुलदेवतेच्या जपाबरोबरच `श्री गुरुदेव दत्त ।' हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.

३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे. त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून त्यांचा आशीर्वाद मिळवावा.

एखादी व्यक्‍ती जेव्हा `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते,
तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक लाभदायक ठरतो
?
         एखादी व्यक्‍ती `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला पुढील गती मिळावी', अशी तीव्र तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.
         `असे जर आहे, तर बहुतांश पूर्वज नामजप करणार्‍या वारसदारालाच लक्ष्य का करतील', असा प्रश्‍न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे - `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी', अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना असणार्‍या वारसदारांकडून साहाय्य घेतात.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ 'दत्त'

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

के. पी. पद्धतीस नविन दिशा देणारे ४-स्टेपचे जनक डॉ. सुनील गोंधळेकर

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आज आमच्या गुरुवर्य डॉ. सुनीलजी गोंधळेकर सरांचा वाढदिवस आहे त्या निमिताने आज त्यांच्या कुंडलीचे विविचन करीत आहोत व सरांची कुंडली ही के. पी. अभ्यासकांसाठी एक अभ्यासच आहे. के.पी. मध्ये बलवान कार्येशत्व म्हणजे ४ स्टेप थेरी संशोधन करून त्याचे जनक म्हणूनच ओळखले जातात. या ब्लोगच्या माध्यमातून आज आम्ही गुरुजींना वाढदिवसच्या हार्दिक शुभेच्छा देउन वंदन करतो.


  
 







Preview



मंगळवार, २ एप्रिल, २०१३

सांगलीकरांचे आभार..!

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

कृष्णमूर्ती संशोधन संस्था सांगली यांच्यातर्फे ३१ मार्च २०१३ रोजी ४-स्टेप थेरी व के पी पद्धतीची एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या संमेलनात प्रथम प्रमुख पाहुणे व उद्घाटक डॉ. सुनीलजी गोंधळेकर, डॉ. प्रा. विजय कुमार (दादा) वाणी, ज्योतिष संधर्भ ग्रंथकार श्री नेमिचंद सोनार, श्री मुनोद, श्री. महारुद्र हिरेमठ, सौ सुमती सामंत, सौ आरती शिवरकर याची उपस्थिती होती.

या संमेलनात कोल्हापूर, सातारा व सांगली मधील के.पी. अभ्यासकांची उपस्थिती होती. प्रथम डॉ. सुनील गोंधळेकर सरांच्या हस्ते उद्घाटन झाले व उपस्थित आमंत्रकांनी के पी विषयवार मार्गदर्शन केले.
आम्हाला कुठलाही असा विषय दिलेला नव्हता, परंतु आयोजकांच्या निवेदनामुळे नवीन अभ्यासाकांनी के पी व ४ स्टेप थेरी कशी आत्मसात करायची व आम्ही या शास्त्राचा कसा अनुभव घेत आहोत याचे मार्दर्शन 
केले.

याच संमेलनात आखिल भारतीय अध्यात्म पुणे संस्थेतर्फे आम्हास "जोतिष प्राज्ञ" ही पदवी व सुवर्ण पदक हे डॉ दादा वाणी व श्री मुनोद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले व डॉ गोंधळेकर सरांना "कृष्णमूर्ती महर्षी" ही पदवी, सुवर्ण पदक व मानचिन्ह देण्यात आले.

या कार्यक्रम यशस्वी बनविण्यासाठी कृष्णमूर्ती संशोधन संस्था सांगलीचे संस्थापक श्री महारुद्र हिरेमठ, कार्याध्यक्ष चेतन कुलकर्णी व सचिव शरद चौगुले यांनी प्रचंड परिश्रम घेतली व सांगली-कोल्हापूर भागात के.पी. चा पाया रुजविला व त्याची सुरुवात ही उत्तम झाली हे या संमेलानावरून व के.पी. अभ्यासाकच्या उपस्थितीवरून निश्चितच दिसून येते.

त्यांच्या उपक्रमास आमच्या शुभेच्छा व आभार..!




आपला,
Preview