अतृप्त पूर्वजांचा त्रास होण्याचे कारण
आणि त्रासाचे स्वरूप
दत्ताच्या नामजपाने पूर्वजांचे त्रास
दूर होणे
हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्ध-पक्ष वगैरे, तसेच साधनाही करीत नसल्याने बहुतेक सर्वांनाच पूर्वजांच्या
लिंगदेहांमुळे त्रास होतो. पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे किंवा त्रास
होत आहे, हे उन्नतच सांगू शकतात. तसे
सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढे दिल्याप्रमाणे काही तर्हेचे त्रास पूर्वजांमुळे
होतात असे समजावे - विवाह न होणे, विवाह झाल्यास पतीपत्नीचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, गर्भपात न झाल्यास मूल वेळेआधी जन्मणे, मतीमंद किंवा विकलांग अपत्य होणे किंवा सर्व मुली होणे, अपत्ये बालपणातच मृत्युमुखी पडणे वगैरे. दारिद्र्य, शारीरिक आजार अशीही लक्षणे असू शकतात.
दत्ताच्या नामजपाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
अ. संरक्षक-कवच
निर्माण होणे
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या
भोवती संरक्षक-कवच निर्माण होते.
आ. अतृप्त
पूर्वजांना गती मिळणे
बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत खूप गुरफटलेले असतात. मायेत
खूप गुरफटलेले असल्यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त
लिंगदेह मर्त्यलोकात (मृत्युलोकात) अडकतात. दत्ताच्या नामजपामुळे मृत्युलोकात
अडकलेल्या पूर्वजांना गती मिळते. ( भूलोक आणि भूवर्लोक यांच्या मध्ये मृत्युलोक आहे.) त्यामुळे पुढे ते त्यांच्या
कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला
होणार्या त्रासाचे प्रमाण कमी होते.
अतृप्त पूर्वजांच्या त्रासावर उपाययोजना
१. कोणत्याही तर्हेचा त्रास होत नसल्यास
पुढे त्रास होऊ नये म्हणून, तसेच जरासा
त्रास असल्यास कमीतकमी १ ते २ घंटे (तास) किंवा तीन तास `श्री गुरुदेव दत्त ।' हा जप नेहमीच करावा. एरव्ही प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून सर्वसामान्य मनुष्याने
किंवा
प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.
२. मध्यम तर्हेचा त्रास असल्यास
कुलदेवतेच्या जपाबरोबरच `श्री
गुरुदेव दत्त ।' हा जप कमीतकमी २ ते ४ घंटे तरी
करावा. तसेच गुरुवारी दत्ताच्या देवळात जाऊन सात प्रदक्षिणा घालाव्यात आणि बसून एक-दोन
माळा जप वर्षभर तरी करावा. त्यानंतर तीन माळा जप चालू ठेवावा.
३. तीव्र त्रास असल्यास कमीतकमी ४ ते ६ घंटे
जप करावा. एखाद्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन नारायणबली, नागबली, त्रिपिंडी
श्राद्ध, कालसर्पशांती अशासारखे विधी करावे.
त्याच्याच जोडीला एखाद्या दत्तक्षेत्री राहून साधना करावी किंवा संतसेवा करून
त्यांचा आशीर्वाद मिळवावा.
एखादी व्यक्ती जेव्हा `श्री गुरुदेव दत्त ।' हा
नामजप करते,
तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक लाभदायक ठरतो ?
तेव्हा तो तिच्या पूर्वजांपैकी कोणाला सर्वाधिक लाभदायक ठरतो ?
एखादी व्यक्ती `श्री गुरुदेव दत्त ।' हा नामजप करते, तेव्हा `आपल्याला
पुढील गती मिळावी', अशी तीव्र
तळमळ असलेल्या तिच्या पूर्वजाला या नामजपाचा सर्वाधिक लाभ होतो.
`असे जर आहे, तर बहुतांश
पूर्वज नामजप करणार्या वारसदारालाच लक्ष्य का करतील', असा प्रश्न कुणालाही पडू शकेल. याचे उत्तर असे आहे - `स्वत:ची आध्यात्मिक प्रगती व्हावी', अशी इच्छा असणारे पूर्वज साधना करणार्या वारसदारांकडून साहाय्य
घेतात आणि ज्या पूर्वजांच्या अतृप्त इच्छा भौतिक विषयांशी निगडित असतात (खाणे-पिणे
आदी), ते पूर्वज त्याच प्रकारच्या वासना
असणार्या वारसदारांकडून साहाय्य घेतात.
घोर कष्टोद्धरण स्तोत्राचा रोज सकाळी/संध्याकाळी बारा वेळा जप करणे फारच फलदायी आहे, कारण ३/४ तास जप करणे सामान्य संसारी नोकरदार माणसाला अवघड आहे म्हणून …।
उत्तर द्याहटवाश्री विश्वनाथजी आपण म्हणता ते योग्य आहे. हा संदर्भ ग्रंथातील केलाला उल्लेख आहे. तो येथे तसाच मांडला आहे. एवढे शक्य नसले तरी कमीत कमी १०८ "श्री स्वामी समर्थ" एवढा जप तर निश्चित करू शकतो. हे जरी नित्य केले तरी आनुभूती येणार .. केवळ हे करण्यची आपली तयारी हवी असते.
उत्तर द्याहटवाशुंभ भवतु
श्री स्वामी समर्थ
खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवाखुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवाखुप उपयुक्त माहिती. धन्यवाद
उत्तर द्याहटवा