शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४
सोमवार, ८ डिसेंबर, २०१४
शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार
नक्षत्राच देणं’ अंक हा माझ्यासाठी केवळ दिवाळी अंक नसून हा संधर्भ
आणि अभ्यास ग्रंथच झाला आहे. यावार्षी हा शेवटचा अंक आहे, मनाला थोडी हुरहुर ही
निश्चीत लागली आहे. मला या ग्रंथात मागील तीन ते चार वर्षापासून राशी भविष्य तसेच
लेख लिखाणाची संधी मिळाली त्यामुळे प्रथमतः श्री गोंधळेकर गुरुजींचा आभारी आहे. हा
अंक माझ्या मनात स्मरणीय राहणार आहे.
डॉक्टरी व्यवसायिक शिक्षण ग्रह आणि नियम कसे कार्यान्वित होत असतात आणि एकाच क्षेत्रात असून विविध विषयात मास्टरकी मिळविणाऱ्या तीन डॉक्टरांच्या कुंडल्याचे विवेचन लेख मी नक्षत्राचं देणं या दिवाळी अंकात मांडल्या आहे., गायनेकॊलोजिस्ट, भूलतज्ञ (अनेस्थेटीस्ट), आणि डॉक्टर होऊन कलेक्टरच्या दिशेने वाटचाल हे सर्व काही या डॉक्टर जातकाच्या कुंडलीत आहे तर निश्चीत वाचा पान क्र. ९५ ते १०२.
आपला,
बुधवार, २० ऑगस्ट, २०१४
एक महान ज्योतिषाचार्य श्री चंद्रकांत भट्ट
!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,मागील एका लेखात डॉ. गोंधळेकर सरांची कुंडली विवेचन केले होते. गुरुवर्य श्री. कृष्णमूर्ती यासारखेच व्यक्तिमत्त्व असणारे आणि नक्षत्र अभ्यासक असणारे ज्योतिषाचार्य श्री चंद्रकांत भट्ट एक महान ज्योतिष होते. त्यांचे "नक्षत्र चिंतामणी" हे पुस्तक आज ही माझ्या टेबलावर नेहमी असते. या ग्रंथाचा मला नेहमी उपयोग होतो. ०७/०७/२०१२ म्हणजे त्यांच्या जन्मशताब्दी रोजी त्यांच्या कुंडली विवेचनाचा योग आला आणि तो मी माझ्या "नक्षत्र अलंकार" या लाब्रररी कॉपी असणाऱ्या ग्रंथात केला, तो आपल्या समोर ४-स्टेप थेरी प्रमाणे लेखाच्या उजव्या बाजूला मांडला आहे आणि डाव्या बाजूस स्वतः श्री. भट्ट यांनी लिखित "नक्षत्र चिंतामणी" या पुस्तकातील घटना लिखित केल्या आहे.
आपला
शुक्रवार, २५ जुलै, २०१४
प्रारब्धाचे झटके
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
आज जो तो येतो आणि ज्योतिषशास्त्र
थोतांड आहे, भोळ्या भाबड्याना फसवून पैसे मिळविण्याची सोपे साधन आहे असे म्हाणून ह्या
शास्त्राची हेटाळणी करणारे महाभाग पुष्कळ आहे. येथे मला आमच्या हसबे गुरुजीच्या लेखाची
आठवण झाली. ते म्हणतात..
अधिष्टनं, तथा कर्ता,
करणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पथगचेष्ठा,
दैवं चैवात्र पंचामम् ||
ज्योतिषशास्त्राचा मूळ
गाभा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या पांचव्या करणात आहे ज्योतीषशास्त्रानुकार
जन्मणाऱ्या प्राण्याने पूर्वजन्मामध्ये ज्या प्रकारची कर्मे केलेली असतील त्यानुसार
ह्या जन्मात सुखदु:ख मिळतात. भाग्य, दुर्भाग्य
ह्यांच्या लीला अगाध आहेत. ह्याची कल्पना रोजच्या जीवनात अनेकता येते. जन्मणाऱ्या मनुष्याने
कोणत्या प्रकारच्या प्रराब्द कर्माचे गाठोडे बरोबर आणले आहे, आणि त्या कर्माचा फलपाक
होत असताना कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन त्याला कशी व कोणत्या प्रकारची
सुखदु:खे भोगावी लागतील ह्याचा बोध जन्मकालचे ग्रह करतात. पुत्रशोक, स्त्रीवियोग, वैधव्य, अपघात,
आणि इतर अनेक गोष्ठी ह्या पूर्वकर्मावर आधरित आहे. जीवनातील यशापयश यांची संगती
इतर काराणांप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही मिळते. दैवलीलेत फार मोठे सामर्थ्य आहे. ज्यांनी
या शास्त्राचा एक मिनिटभर सुध्दा विचार केलेला नाही, त्यांनी या आकाशस्थ ग्रहांचा आणि
आमचा काय संबंध आहे हे खुशाल ओरडत बसावे. मानवी जीवनावरचे अचूक मार्गदर्शन करू शकणारे
फलज्योतिषाशास्त्र खरे व उपयुक्त आहे ह्यावर विश्वास ठेवणारे लोक जगात भरपूर आहे. असो..
!! शुभम् भवतु..!!
मंगळवार, १ जुलै, २०१४
suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का ?
!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,माझ्या एका जोतिष मित्रास एका जातकाने suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का असा प्रश्न विचारला त्यामुळे अशा प्रश्नांना के. पी. मध्ये कुठले नियम वापरतात आणि मि अशा पद्धतीचा एक प्रश्न २०११ रोजी प्रश्न कुंडली मांडून यशस्वी सोडविला होता. त्याचा तपशील माझ्याकडे असल्याने सदर कुंडलीसह येथे मांडत आहे.
आपला
मंगळवार, २४ जून, २०१४
स्मार्त व भागवत एकादशी संबंधी ..!!
|| श्री स्वामी समर्थ ||
आषाढी एकादशी या वर्षी कालेंडर मध्ये दोन तारखा दर्शिवित आहे एक ८ जुलै आणि ९ जुलै, यात ८ तारखेस ही स्मार्त एकादशी आहे तर ९ तारखेस ही भागवत एकादशी आहे जो की प्रत्येक माळकरी हीच एकादशी गृहीत धरतात. याच दिवशी पंढरपूर यात्रा असते आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ लागलेली असते. या दोन एकाशितीला फरक हा पंचांगाच्या आधारे आपल्या समोर मांडत आहे.
वर्षातून २४ एकादशींचा उपवास असतो. त्यामध्ये ४ ते ६ वेळा स्मार्त व भागवत एकादशी येत असतात. सूर्योदयानंतर १ मिनीटसुध्दा एकादशी नसताना महाजे संपूर्ण दिवशी व्दादशी तिथी असताना व्दादशीच्या दिवशी एकाशीच उपवास कसा दिला जातो अशी शंका येते.
सध्याच्या काळात स्मार्त / भागवत (वैष्णव ) असे दोन संप्रदाय आहेत. एकादशीव्रत स्मार्तासाठी परानाप्रधान आहे आणि भागवंताना उपोषप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी करावे. भागवंताना उपोषणाच्या दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमीवेध होत असेल म्हणजे एकाशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदयवेळी ( १ ता. ३६ मी.) असेल तेंव्हा दशमीविध्द एकाशीचा दिवस सोडून द्वादशीच्या दिवशी भागावत संप्रदायांनी एकादशीव्रत करावे असे आहे. हा मुख्य नियम आहे.
हा सर्व विचार धर्मसिंधु, निर्णयसिंधू ई. ग्रंथामध्ये दिलेला आहे.
मंगळवार, १७ जून, २०१४
गुरूपालट
!! श्री स्वामी समर्थ !!
जेष्ठ कृ ७, गुरुवार १९/६/२०१४ रोजी ८ वाजून ४७ मि. गुरु कर्क राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल गुरुवार सकाळी ६/५६ ते १०/३८ मि. पर्यंत आहे. मेष, धनु, व सिंह या राशींना ४-८-१२ वा गुरु येत असल्याने व लावहापादाने ज्या राशीत येत आहे. त्यांनी पिडापारिहारार्थ गुरूच्या उद्धेशाने जप, दान पूजा अवश्य करावी.
कर्क राशीत गुरु असता ज्यांची जन्म राशी मेष आहे अशा व्यक्तींना तो ४ था येईल. याच प्रमाणे वृषभ राशीला - ३ रा, मिथुनेला -२ रा, कर्केला - १ ला, सिहेला - १२ वा, कन्येला - ११ वा, तुळेला- १० वा, वृश्चिकला - ९ वा, धनुला ८ वा, मकरेला - ७ वा, कुंभेला - ६ वा, मिनेला - ५ वा येईल.
आपल्या जन्म राशीपासून गुरु २, ५, ७, ९, ११ वा शुभफल देणारा आहे तर १, ३, ६, १० वा मध्यम आणि ४, ८, १२ वा हा अनिष्ठ असतो. गुरु हा अनिष्ठ असता गुरूचा जप, होम, शांति करावी. त्यायोगे संकटाचे निवारण होते.
दरवर्षी दिवाळी अंकात ग्रहांच्या नक्षत्र गोचर भ्रमनांचा विचार करून राशी भविष्य लिहीत असताना ज्या राशीना ४,८,१२ वा गुरु सुरु असतो त्यावेळे अशा राशींना निश्चीत अडचणी किंवा संकाटाना सामोरी जावे लागते मग मुळ कुंडलीत दशाजरी शुभ कारक असल्या तरी गोचर भ्रमणाची अशा जातकांना साथ मिळत नाही आणि येणाऱ्या शुभ कार्यास व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीत गुरु पालटास जरी महत्त नसले तरी देखिल गोचर भ्रमणाचा अनुभव हा येतो.
कर्क राशीत गुरु असता जन्म राशीफले - (दि. १९/६/२०१४ ते १४/७/२०१५)
१) मेष - धननाश
२) वृषभ - क्लेश दायक
३) मिथून - धनप्राप्ती
४) कर्क - भयपरद
५) सिंह - पीडाकारक
६) कन्या - धनलाभ
७) तुळ - विपत्तीदायक
८) वृश्चिक - रोगोपद्र्व
९) धनु - रोग भय
१०) मकर - सन्मान प्राप्ती
११) कुंभ - शोकप्रद
१२) मीन - सोख्य दायक
आपला,
शुक्रवार, २ मे, २०१४
श्राद्ध आणि विज्ञान
आपण श्राद्ध विधी करतो पण ते का करावे ? ते खरोखर
पितरांपर्यंत पर्यंत पोहोचते का? श्राद्धाचे खरे महत्व काय?
प्रश्न: पिंडाला कावळा शिवला नाही तर तोः वासनाग्रस्त जीवात्मा
अडून बसतो त्याला कसा कळत कि हा प्रेतात्माला आहे?
radio active धातू असतात . त्यातून तेज विकिरण होते लोहचुंबक
लोखंडाचे आकर्षण करते वायू स्वभावताच
संचार करतो diffusion काजव्यात,काही जन्तुत, काही माश्यात तेज विकीरणाची शक्ती असते दाटअंधारात माणसाला दिसणार नाहीत अश्या वस्तू
मांजरीला घुबदना दिसतात कावळ्याच्या दृष्टीला त्या सुष्मतम दृष्टीने तोः प्रेअत्जीव
पाहू शकतो हा प्रेअत्जीव पिंडाभवतीअसतो तर तोः कावळ्याला
पिंडस्पर्श करू देत नाही पिंडा जवळ कावळा येतो पण परंतु स्पर्श न करताच परत जातो.
विज्ञानम्हणजे काय ? काय श्राद्ध हे science आहे का ?
विज्ञान हे बदलणारे असते
त्यांचे निष्कर्ष शाश्वत आहेत एकाची हजामत दुसरा करतो आणि दुसर्याची तिसरा......अनुच
विभाजन करताना इलेक्ट्रोन , प्रोटोन , आणि nutron असे तीनच कण सुरुवातीला
सापडले पुढे १०७ च्या जवळपास कण सापडलेत म्हणजे ते प्रयोग करतात प्रयोगाची
प्रक्रिया अशीच अखंड सुरु आहे त्यामुळे निष्कर्ष बदलतात पण श्राद्ध हे chemistry aani physics सारखे बदलणारे विज्ञान नाही त्याचे विशेष सिद्धांत
शाश्वत आहेत. श्राद्ध हे न बदलणारे आहे
श्रद्धाचा सबंधविश्व देवाशी असतो वासू , रुद्र, आदित्ये देव्ताशी आहे पिता प्रपिता व प्रपितामः हे
वासू, रुद्र, व आदित्ये रूप आहे
श्राद्ध मंत्र व विधी हे देवतांशी संपर्क साधून देतात ब्रह्मा देवाने आधी ऋषी
निर्माण केलेत नंतर पितान ,नंतर देव, नंतर मानव. पण हे आधुनिकांना पटत
नाही कारण विश्वाच्या मुलाशी चैत्रान्ये शक्ती आहे जे सर्व विश्वाचा पसारा त्यातून
निर्माण झाला व त्याचे नियमन ,नियंत्रण,करण्याकरताच तर शास्त्रे निर्माण झालीत.शनिवार, १९ एप्रिल, २०१४
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०१४
महाशिवरात्र
|| श्री स्वामी समर्थ ||
|| ॐ नमः शिवाय ||
-: महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा :-
महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. 'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबोधले जाते. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.
महाशिवरात्र' हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असून हिंदू संस्कृतीत फाल्गून महिन्याच्या कृष्ण त्रयोदशीला हे पर्व असते. महाशिवरात्रीला मोठे महत्त्व आहे. पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकराने रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा कालरात्री असेही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो. या महिन्यात होणारे ऋतुचे परिवर्तनही शुभ मानले जाते. म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथाची आवडती तिथी आहे. 'शिव' म्हणजे कल्याण. म्हणून भेदभाव न करता शिवशंकर भाविकांवर चटकन प्रसन्न होतो. त्यांच्या जीवनातील दु:ख दूर करतो. गौरी अर्थात पार्वतीच्या या पतीचे वास्तव्य नेहमी स्मशानात असते. स्मशानातील प्रेताची राख ते सर्वांगाला भस्म म्हणून लावतात. गळ्यामध्ये सर्पहार असतो. विष पिऊन कंठ निळा झाल्याने त्याला 'नीलकंठ' म्हणूनही संबोधले जाते. महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो. या दिवशी सुवासिनी शिव मंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी, दूध भरून त्यावर बेल, धोतर्याचे पुष्प व भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात. काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात. महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करतात. महाशिवरात्रीचे व्रत कुमारीका देखील करतात. शिवरात्रीचे व्रत केल्याने कुमारीकांच्या विवाहातील अडचणी दूर होतात. त्यांना शिवशंकराच्या कृपेने मनाप्रमाणे वर प्राप्त होतो. शिवरात्री वर्षभरात प्रत्येक महिन्यात येत असते. मास महिन्यातील महाशिवरात्री ही महत्त्वाची मानली जाते.
रविवार, २ फेब्रुवारी, २०१४
गुरु आणि शनी - २०१४
|| श्री स्वामी समर्थ ||
गुरुपुष्यामृतयोग : १३ फेब्रुवारी सूर्योदयापासून २२:२२
पर्यंत
१८ सेप्टेम्बर उ.
रात्री ०३:२५ सूर्योदयापर्यंत
१६ ऑक्टोबर १०
४६ ते सूर्योदयापर्यंत
१३ नोव्हेंबर सूर्योदयापासून
२१:४१ पर्यंतशनीची साडेसाती: २ नोव्हेंबर २०१४ पर्यंत कन्या-तुला-वृश्चिक या राशींना साडेसाती
२ नोव्हेंबर २०१४ पासून तुला-वृश्चिक-धनु या राशींना साडेसाती
आहे. (कन्या राशीला साडेसती संपते).
गुरु अस्त : ११/०७/२०१४ ते ६/८/२०१४
शुक्र अस्त: ०८/०१/२०१४ ते १४/०१/२०१४, ०२/१०/२०१४ ते २२/११/२०१४
फेब्रुवारी २०१४ ग्रहांचे नक्षत्र भ्रमण
|| श्री स्वामी समर्थ ||
ग्रह ग्रह-राशी
प्रवेश नक्षत्र स्वामी दिनांक
रवि १२/२/१४-कुंभ चंद्र ०१/२/१४ ते ६/२/१४
मंगळ ७/२/१४ ते १९/२/१४
राहू २०/२/१४ ते २८/२/१४
मंगळ ४/२/१४-तुळ मंगळ १/२/१४ ते २८/२/१४
बुध १८/२/१४-मकर(वक्री)
राहू २/२/१४ ते १२/२/१४
मंगळ १३/२/१४
ते २८/२/१४
शुक्र २६/२/१४-मकर
शुक्र
१/२/१४
ते २१/२/१४
रवि
२२/२/१४
ते २८/२/१४
ग्रह ग्रह-राशी
प्रवेश नक्षत्रस्वामी-सब दिनांक
गुरु मिथून
राहू-चंद्र १-२/२/१४
राहू-रवी
३/२/१४
ते १०/२/१४
राहू-
शुक्र ११/२/१४ ते २८/२/१४
शनी तुळ
गुरु-शुक्र १/२/१४
ते ५/२/१४
गुरु-रवि
६/२/१४
ते २८/२/१४
राहू तुळ
राहू-राहू १/२/१४
ते २८/२/१४
केतू मेष
केतू-गुरु १/२/१४ ते २०/२/१४
केतू-राहू
२१/२/१४ ते २८/२/१४
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)