सोमवार, १६ जुलै, २०१८

चार मुखी रुद्राक्ष


!! श्री स्वामी समर्थ !!
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.

।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८

चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे.

ब्रेन समन्धित आजारावर उपयुक्त असून शोर्ट-मेमरी किंवा नूरोलोजी समन्धित आजार दूर होतात. फोकस आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहता शारारतील ७ चक्र जागृत होतात. ३२ रुद्राक्ष माळ ४ मुखी घातल्यास एक चक्र पूर्णत्व पावते आणि त्याचे स्पंधणे कंट्रोल होतात.

सरस्वती बंध:  ४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार.
!! शुभम भवतु !!


गुरुवार, ५ जुलै, २०१८

दोन मुखी रुद्राक्ष

श्री स्वामी समर्थ
मागील लेखात आपण एक मुखी रुद्राक्षाची माहिती पाहिली आज दोन मुखी रुद्राक्षाच महत्त्व पाहूया. दोन मुखी रुद्राक्षामध्ये साक्षात शिव आणि पार्वतीचा निवास असतो. हे धारण केल्यानंतर तुम्ही आपल्या सगळ्या अडचणी, समस्या देवावर सोडा देवच तुमची बिगडलेली काम सावरतील. दोन मुखी रुद्राक्ष यासाठी देखील खास आहे कारण हे धारण करणाऱ्या व्यक्तीला शिव आणि शक्‍तिचा एकत्र आशीर्वाद मिळतो.

|| द्विवक्त्रस्तु मुनिश्रेष्ठ अर्धनारीश्वरो भवेत ||
श्रीमद् देवीभागवत अ. ७, श्लो. २४

2 मुखी रुद्राक्ष पेंडेंटचे लाभ: वैवाहिक जीवनाला सुखी बनवण्या साठी दोन मुखी रुद्राक्ष अत्‍यंत लाभकारी आहे. घर-परिवारात शांती राहते आणि कर्जापासून मुक्‍ति मिळते तसेच मान-सन्मानात वाढ होते. कर्क रास असणाऱ्या व्यक्तीसाठी दोन मुखी रुद्राक्ष अत्‍यंत उत्‍तम असते.
शारीरिक लाभ: डिप्रेशन, नरर्वौसनेस, चेस्टपेन, खोकला यापासून मुक्तता प्राप्त करून देते तर मनाची एकग्रता वाढविते. पुरुषांना प्रोस्टेट तर स्त्रियांना गायनिक (OB-GYN) अशा आजारापासून लवकर बर होण्यास मदत करते. याचा बीज हे ‘ॐ नम:’ आपणस कुणास पाहिजे असल्यास संपर्क करू शकता. माझ्याकडे केवळ एकच उपलब्ध आहे ते देखील
certification सहित

सोमवार, २ जुलै, २०१८

एक मुखी रुद्राक्ष


श्री स्वामी समर्थ 
मागील पोस्ट मध्ये जोतिष हा कुठल्या आधारे रत्न, रुद्राक्ष, उपासना सांगतात असे मी सांगितले तर आज आपण एक मुखी रुद्राक्षाचा पुराणातील संधर्भ आणि त्याची उपयुक्तता पाहूया. एक मुखी रुद्राक्षास शास्त्रात प्रत्यक्ष शिव स्वरूप मानले आहे. एक मुखी धारण केल्यास सर्व पापांपासून मुक्तता होऊन जन्म-मारण्याच्या फेर्यातून मुक्त करणारा आहे. 
।। एकवक्त्र: शिव: साक्षाद्भुक्ति मुक्ति फल प्रद: ||
शिवपुराण अ. २५, श्लो. ६४
या रुद्राक्षाला सर्वात अधिक कल्‍याणकारी आणि महत्‍वपूर्ण मानल गेल आहे. पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्‍याणकारी वस्तूं मध्ये एकमुखी रुद्राक्ष नाव सर्वप्रथम घेतलं जात. याची देवता मुळातच शिव आहे आणि शिव हे प्रथम आदियोगी असल्याने योगसाधनेला उपयोगी ठरणारा आहे. रुद्राक्षचे असे फारसे नियम नाही परंतू एक मुखी धारण करण्यासाठी कसोटीला उतरणे फार गरजचे असते त्यामुळे या रुद्राक्षाचे देवघरात पूजन जास्त योग्य आहे. रोज रुद्राभिषेक किंवा ‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राचा अभिषेक करावा. नेपाळमध्ये जो एक मुखी रुद्राक्ष पाहण्यात येतो तो फारच दुर्मिळ असून १२ वर्षानंतर एकदाच तयार होतो आणि आपण जे मार्केट मध्ये पाहतो ते ‘अर्धचंद्राकार’ किंवा काजूच्या आकाराचा हा रुद्राक्ष पाहतो त्याची प्राप्ती दक्षिण भारत किंवा इंडोनेशिया मध्ये जास्त प्रमाणात होते.
कसा वापर करावा:
एक एकमुखी रुद्राक्ष धारण करण्याचा मंत्र आहे “ॐ ह्रीं नमः” आणि शिवचा पंचाक्षर बीज मंत्र आहे “ॐ नमः शिवाय” दोनीही मंत्रा पैकी एक मंत्राच उच्‍चारण करून एकमुखी रुद्राक्ष धारण केल जावू शकत. हे लक्षात ठेवा की नियमित पंच माळेचा “ॐ नमः शिवाय” मंत्राचा जप केल्यानी याचा प्रभाव किती तरी पटीने वाढतो.
एकमुखी रुद्राक्ष लाभ : तणाव (स्ट्रेस) कमी होणे, डोळ्यांचे, रक्तदाब, आणि हृदय विकार सारख्या आजारावर उपयुक्त असा आहे. - आपणस एक मुखी प्राप्त करायचे असल्यास संपर्क करू शकता.



Preview