सोमवार, १६ जुलै, २०१८

चार मुखी रुद्राक्ष


!! श्री स्वामी समर्थ !!
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.

।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८

चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे.

ब्रेन समन्धित आजारावर उपयुक्त असून शोर्ट-मेमरी किंवा नूरोलोजी समन्धित आजार दूर होतात. फोकस आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. अध्यात्मिक दृष्टीकोनातून पाहता शारारतील ७ चक्र जागृत होतात. ३२ रुद्राक्ष माळ ४ मुखी घातल्यास एक चक्र पूर्णत्व पावते आणि त्याचे स्पंधणे कंट्रोल होतात.

सरस्वती बंध:  ४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार.
!! शुभम भवतु !!


1 टिप्पणी:

  1. रुद्राक्ष धारण केले की मांसाहार केला तर चालते का कारण हर एक नियम अलग अलग सांगत आहेत नक्की कोनाचे एकावे समजत नाही पन तुम्हीं मार्गदर्शन कराल तर बारे होईल

    उत्तर द्याहटवा