मंगळवार, १५ जानेवारी, २०१३

ओटी कशी भरावी ?


|| जय आई जगदंब जगदंब ||

सुती किंवा रेशमी वस्त्र असलेली ओटी भरा ! ताटातील साडीवर तांदुळ, खण, शेंडी देवाकडे करून नारळ ठेवा. ओटीचे साहित्य ओंजळीत घेऊन शरणागत भावाने देवीसमोर उभे रहा ! देवीला भावपूर्ण प्रार्थना करा – ‘हे देवी, तुझ्याकडून चैतन्य मिळूदे आणि माझी आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’ ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यावर त्यावर तांदुळ वहा.

देवीला अर्पण केलेली साडी प्रसाद म्हणून परिधान करा. खणा-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळचा उपचार अनेकांकडून कारणपरत्वे वर्षातून दोन-चारदा तरी केला जातो. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा अधिक लाभ भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी !

१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ? ‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.'

२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत
अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून    ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.
आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.
इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.
ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत. उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे.

३. ओटी भरतांना हातांची ओंजळ छातीसमोर ठेवून उभे राहिल्याने होणारे सूक्ष्मातील लाभ आपल्या मिळतात देवीची ओटी भरतांना देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य आहे.

* ताटात साडी ठेवून साडीवर थोडे तांदूळ, खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हे सर्व साहित्य हातांच्या ओंजळीत घ्यावे आणि ओंजळ छातीसमोर धरून शरणागतभावाने देवीसमोर उभे राहावे. 'देवीकडून चैतन्य मिळू दे, तसेच आपली आध्यात्मिक उन्नती होऊ दे', अशी भावपूर्ण प्रार्थना करून ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण करावे. नंतर या साहित्यावर थोडे तांदूळ वाहावेत. ओटीची साडी किंवा वस्त्र रंगीबेरंगी आणि कृत्रिम धाग्यांचे (उदा. नायलॉन) टाळा ! निकृष्ट साहित्य असलेली ओटी भरणे टाळा !

|| जय आई जगदंब जगदंब ||

२ टिप्पण्या: