|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
सध्या New Year मुळे आमच्या कामाचा ओघ थोडा कमी आहे त्यामुळे सकाळच्या वेळी आह्मी थोडे निवांत असतो . या ब्लॉगच्या निमित्याने आम्ही फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क संभध आला त्यातील एक ग्रुप या आमच्या शास्त्राला नावे ठेवण्यात फुढे आहे. अशांना आम्ही काय सांगावे.... असो..!
काल एक जातक आपली जन्मपत्रिक घेउन आले. समस्या व अडचणींची लिस्ट तपशीलवारपणे आमच्या समोर मांडली. जन्मपत्रिका ही हाताने बनविलेले जीर्ण झालेली होती, ग्रह हे पुसट व ग्रहांचे मागील व पुढील अक्षरे दिसत नव्हती ते पाहून पुन्हा मनात म्हटले की कधी जातक आपल्या १२ चौकटीच्या या कुंडलीला महत्व देतील. आम्ही या जीर्ण झालेल्या या पत्रिकेचा उद्धार तर केला, परंतु त्याच्या दैवाचा उद्धार मात्र स्वामी महाराजवर सोडविला.
पत्रिका बनवून झाल्यावर व निरीक्षण केल्यावर आम्ही त्यास काही प्रश्न विचारले ते असे की आपल्या घरात वडील, भावंड, किवा काका यापैकी कोणी अग्नी तत्वाचे निधन झाले आहे असे दिसून येते यावर ते जातक दोन मिनिटे स्तब्ध झाले व एकसारखे माझ्याकडे पाहत होते व त्यांनी हळुवारपणे सांगितले की वडील व बहिण दोघेही आगीत जळून मृत पावले आहेत. आम्ही हे कसे ओळखले म्हणजेच diagnosis कसे केले असे ते विचारणी करू लागले. त्याचे विवरण आम्ही खाली दिलेच आहे व शास्त्राची प्रचीती कशी येती हे पुन्हा सिद्ध होते.
जातक: पुरुष जन्म दि. १०/०४/१९७७
जन्म वेळ: स. ५:३० जन्म स्थळ : औरंगाबाद
राहू व मंगळ दोन्ही ग्रह निरीक्षण केल्यास लक्षात येते की राहू हा अष्टमस्थानी (मृत्यू स्थान) आहे व तो मंगळच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा १२ व्या स्थानी (मोक्ष स्थान) आहे. हा मंगळ नवमेश (पित्याचे स्थान) आहे व तो शनी (मृत्यू कारक) च्या राशीस असून हा शनी लाभेश (काका, मित्र, मोठा भाऊ) आहे. मंगळ (अग्नी तत्त्व) हा गुरुच्या नक्षत्रात आहे व गुरु हा वृषभेला (शुक्र - त्रीतेयेश - लहान बाहीण) आहे. रवि (वडिल कारक) व शुक्र युती प्रथम स्थानी मीन या मोक्षम् राशीत आहे व राहू व मंगळाचा भावाचलित कुंडलीत मध्ये षडाष्टक योग आहे.
वरील सर्व तत्त्वाचा विचार केल्यावर आह्मी जातकाचे वडील किंवा भावंडे अग्नी तत्त्वाने मृत्यू झाला असेल असा निष्कर्ष काढाला व तो खरा ठरला. ही केवळ एक कुंडली नसून आशा कुंडल्याचा संकीर्ण आमच्याजवळ आहे त्यामुळे शास्त्र आहे त्याचा आभ्यास निट पाहिजे काही मुठभर लोकांमुळे शास्त्राला नाव ठेवणे कितपत योग्य आहे ते आपणच ठरविले पाहिजे. दोन भिन्न चित्र एकत्रित करून काही वेगळे भासवीणाऱ्याना स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे.
आपला,
नमस्कार दीपक,
उत्तर द्याहटवाह्या विषयावर म्हणजे घराण्यातील दोष किंवा पितृदोष ह्यावरील अजून काही कुंडली जर सोडवून दाखवलीत तर नवीन अभ्यासकांना त्याचा फायदा होईल आणि नियम पण कळतील.
ता. क. बरेच दिवस ब्लॉग वर काही नवीन लेख नाही कृपया नवीन कुंडली पोस्ट टाकावी.
आपला नियमित वाचक,
संतोष सुसवीरकर
संतोषजी,
उत्तर द्याहटवानिश्चीत प्रयत्न करेल, परतू मागील काही दिवसापासून कामात व्यस्त आहे त्यामुळे लिखानास हल्ली वेळ मिळत नाही..