शनिवार, १९ जानेवारी, २०१३

कुंडली विवेचण (ठाणे ज्योतिष संमेलन)

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

सदर कुंडली ही आम्ही २८ ऑक्टोबर २०१२ रोजी ठाणे ज्योतिष संमेलनात मांडली होती. आम्हाला नौकरी हा विषय देण्यात आला होता.  या ठिकाणी प्रचीती आलेल्या दोन कुंडलीचे विवेचन केले होते, त्यातील ही एक कुंडली आहे व दुसऱ्या कुंडलीचे विवेचन पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करू.

सदर जातक हे मॅक्स न्यूयोर्क लाईफ इंशुरन्स या कंपनीत उच्चपदावर अरेया मॅनेजर या पदावर कार्यरत होते, परंतु मागील एक दिढ वर्षात या क्षेत्रात प्रचंड बदल झाला आहे. हे क्षेत्र टारगेटीव् स्वरूपाचे होते व जातक हे उच्चपदावर असल्याने कामाचा बोझा हा वाढतच होता त्यामुळे नौकरीमध्ये बदलीचे योग बघण्यासाठी आमच्याकडे प्रश्न घेऊन आले. मोठे सॅलरी पॅकेज असल्याने याच पद्धतीच्या स्वरूपामध्ये त्याना नौकरी हवी होती. त्यांचे सर्वे सांगणे झाल्यावर आम्ही त्यांच्या कडून २२१ होरा नंबर घेऊन ०२/०७/२०११ रोजी २०:५२ मी. प्रश्न कुंडली मांडली व आम्ही तो पुढील प्रमाणे सोडविला आहे आणि संगीतलेल्या कालवधीतच जातकच्या नौकरीमध्ये बदल झाला आहे.

फोर-स्टेप थेरी बलवान कार्येश ग्रह कसे कार्य करतात याचा अनुभव नेहमी येतो त्यातीलच ही एक कुंडली आहे.
   

नियम : दशम भावाचा सब २-६-१०-११ पैकीचा कार्येश होत असेल तर प्रश्न वेळी त्याच्या दशा-अंतर-विदशा या  देखिल साखळी पद्धतीने २-६-१०-११ ह्या भावाच्या कार्येश असव्या लागतात व दशमचा सब  हा जर ३, ९, १०, १२ पैकीचा कार्येश असेल तर नौकरीत बदल हा याच भावाची साखळी पद्धतीने प्रश्नवेळेच्या दशास्वामीत घडतो तसेच ५ भाव देखिल पूरक भाव नौकरीतील बदलीचा विचार करतात.

प्रथम प्रश्नाचे स्वरूप दर्शविणाऱ्या चंद्राची स्थिती पाहू:
चंद्र:  हा षष्टेश (नौकरीचे स्थान) असून तो ५ (बदल) मध्ये आहे तो गुरुच्या नक्षत्रात  आहे गुरु २ व ११ चा कार्येश असून राहू च्या सब मध्ये आहे व राहू हा १० स्थानी आहे. त्यामुळे जाताकच्या प्रश्नांची ओढ दिसून येते असे चंद्र दर्शवितो.

आता दशम भावाचा सब विचार करू व तो आहे मंगळ व त्याचे ४ स्टेप पुढील प्रमाणे
   मंगळ:                                                                 सबचा निर्णय: 
नक्षत्र स्वा:  चंद्र:  ५ -६                               २-६-१०-११ भावापैकी - १० व ६ बलवान कार्येश
० सब  गुरु:                                          ३-५-९ -१० (नौकारीतील बदल) चा बलवान
सब न स्वा.: केतू :  ४ शु-४-९                     ०० जातकाच्या दोन्ही प्रश्नांचा सबचा होकार
                 न. स्वा: मं.-३-१०                  ०० आता कालनिर्णयासाठी दशास्वामीकडे वळूया.
महादशा स्वामी                                  
०  गुरु:                                                                
न स्वा.: केतू : ४ शु-४-९/मं.-३-१०
० सब:  शनी
 सब न स्वा:  चंद्र: ५-६                              एकूण:  ३-४-५-६-९-१०

अंतरदशा स्वामी
० राहू :                                                    
न स्वा.: बुध ५-८
० सब:
सब न स्वा: ५-६                                      एकूण:   ५-६-८                                    
 
  प्रश्नवेळी दशा                              एकूण:                         साखळी 
गुरु  : १२/०७/२०१२ पर्यत                         ३-४-५-६-९-१०                    ६-१० /३-९
राहू:   २६/२/२०१० ते  २१ ७/२०१२ पर्यत     ५-६-८                                ६ /  ५
येथ साखळी जुळण्यासाठी अशा विदशा स्वामीची निवड करावी लागेल की जो २-११ चा कार्येश असेल.
सर्व ग्रहांचे ४-स्टेप पुढील प्रमाणे:
प्रश्नवेळी विदशा स्वामी :
बुध: २२ /०७/ २०११ पर्यंत
कतू: ११/० ९/२०११   पर्यंत
शुक्र: ०४/०२/२०१२  पर्यंत
रवि:  १९/०३/२०१२  पर्यंत
चंद्र:   ३१/०५/२०१२ पर्यंत  

येथे केवळ चंद्र हा २-११ चा बलवान कार्येश आहे आणि येथे २-६-१०-११ व ३-५-९ -१० ही साखळी जुळून येते.


त्यामुळे जातकाला आम्ही आपली नौकरीतील बदल हा १९ /०३/२०१२  ते ३१/५/२०१२ मध्ये होईल असे सांगितले.  हे ऐकल्यावर ते म्हणाले "हा तर बराच उशीराचा कालावधी आहे व मी तर आताच प्रयत्न करीत आहे. "  कारण प्रश्न हा २/७/२०११ बघितला होता, परंतु आम्ही आमच्या उत्तरावर ठाम होतो. मधल्या काळात त्यांनी नौकरीचे बरेच प्रयत्न केले परंतु नौकारचा योग काही आला नाही आणि जातकास साधारण १५ /०४/२०१२ ICICI Health Sector पनवेल येथून नौकारची ऑफर आली व जातकाची या ठिकाणी उच्चपदावर निवड झाली व ते १/५/२०१२ रोजी औरंगाबाद सोडून पनवेल येथे नौकारीस रुजू झाले. यावेळी ते स्वतः आमच्या ऑफिस पेढे घेउन आले व आमच्या या ज्योतिषशास्त्रास वंदन केले. आजही ते पनवेल येथे नौकरीला आहेत. शास्त्राची प्रचीती ही येतेच यात शंकाच नाही...!

आमचा हा लेख ४-स्टेपचे जनक डॉ. सुनील गों धळेकर सर व कृष्मूर्ती गुरुजींना अर्पण करतो व लेखास पूर्णविराम देतो.
|| शुभम्  भवतु ||

आपला,
Preview




   

1 टिप्पणी: