रविवार, २७ जानेवारी, २०१३

प्रश्नकुंडलीस जन्मकुंडली एवढेच महत्त्व (ठाणे ज्योतिष संमेलन)

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

ठाणे ज्योतिष संमेलनातील सादर केलेले नोकरी विषयक दुसऱ्या कुंडलीचे विवरण करीत आहोत. जातक ज्यावेळी प्रश्न विचारतो त्या वेळेला  फार महत्त्व असते. जन्मकुंडलीमध्ये उत्तर देण्याच्या काही मर्यादा असतात कारण तो पूर्ण आयुष्याचा आराखडा आहे व त्यातच जन्मवेळ निश्चित माहित असणे आवश्यक असते तसेच नोकरी व विवाह यासारख्या प्रश्नांचा ज्यावेळी कालनिर्णय चुकतो त्यावेळी प्रश्न कुंडली हीच फार महत्त्वाची व मार्गदर्शक ठरते.

सदर कुंडली विवेचण हे जातकाने ज्यावेळी आम्हाला प्रश्न विचारला त्यावेळीची कुंडली व जन्मकुंडली यावरून जाताकास नोकरी केंव्हा मिळेल हे सांगितले होते व तो कालनिर्णय अगदी अचूक ठरला.  म्हणूनच प्रश्नकुंडली ही जन्मकुंडली एवढेच महत्त्वाची असते हे जातकाने लक्षात घेतले पाहिजे. आम्ही जातकास नंबर विचारतो त्याचे महत्त्व काय आहे हे जानून घेतले पाहिजे. असो..!

हा प्रश्न आम्ही जन्म व प्रश्नकुंडली वरून कसा सोडविला आहे व जातकास सांगितलेल्या कालावधीतीलच नोकरी मिळाली याचे उत्तर आम्ही पुढीलप्रमाणे काढले होते.

जातक हे आमच्या परिचयाचे असून एक महिन्यापासून नोकरीच्या शोधात होते कारण पहिली नोकरी काही कारणास्तव सुटली होती. हे जातक नाशिक येथे असून जन्मकुंडली वरून प्रश्न पहावा अशी विनंती केली कारण जन्मकुंडलीचे सर्व डीटेलस योग्य आहे असे त्यांचे म्हणने होते व जातकाने आम्हास सर्व डीटेलस कळविल्यावर लागलेच आम्ही कुंडली मांडली.  जातकाचे दिलेली जन्मवेळ बरोबर आहे की नाही हे पहाणे जन्मकुंडलीत आवश्यक असते यासाठी  आम्ही रुलिंग प्लानेटची नोंद घेतली व त्या प्रश्नवेळेची कुंडली देखिल खाली मांडली आहे. त्या दिवसाचा आमचा पहिलाच प्रश्न असल्याने या प्रश्नकुंडलीस आम्ही महत्त्व दिले व हा प्रश्न पुढील प्रमाणे सोडविला.

सदर जन्मकुंडलीची जन्मवेळ योग्य आहे की नाही बघण्यासाठी रुलिंग प्लानेटची नोंद केली ती अशी.
दि. २३/५/२०१२ वेळ १७:१५ स्थळ: औरंगाबाद  (यावेळेची कुंडली ही खालील भागात दिलेली आहे).
L: शुक्र (केतू)
S: मंगळ (राहू)
R: बुध
D: बुध

जन्मकुंडलीतील लग्न भाव:
मिथून-०६'००'०२'': बुध-मंगळ-चंद्र-गुरु
व दशम भावाचा सब:  बुध

गुरु हा रुलीग मध्ये आहे कारण त्याची दृष्टी  ही लग्न भावावर आहे.  येथे केवळ चंद्र हा रुलीग मधील ग्रह नाही त्यामुळे वेळत कदाचित १-२ मिनिटांचा फरक आढळतो परंतु दशम भावाचा सब बुध हा रुलिंग मध्ये आहे व तो दोन वेळेस आला आहे. त्यामुळे जातकाने दिलेली वेळ योग्य आहे असे आम्ही ग्रहीत धरले.
नियम: १० भावाचा सब हा २, ६, १० किंवा ११ भावापैकीचा कार्येश असेल तर  नोकरी ही २-६-१०-११ या भावाच्या कार्येशाच्या एकत्रित दशकालात मिळण्याची हमी असते.

१० भावाचा सब हा बुध २, ६, १०, ११, पैकी १० चा बलवान कार्येश त्यामुळे नोकरी मिळेल असे सब दर्शवितो.

कालनिर्णयसाठी दशास्वामीकडे वळूया.
जातकास प्रश्नवेळी पुढीलप्रमाणे दशा सुरु होत्या.

येथे २-६-१०-११ अशी दशास्वामीची साखळी जोडायची आहे.
महा. स्वामी गुरु-७-९-१० पैकी १० चा कार्येश

अंतर. स्वा. १-३-४-११-१२ पैकी ११ चा कार्येश

आता साखळी जुळण्यासाठी २ व  ६ ची आवश्यकता आहे.
प्रश्नवेळी चंद्राची विदशा सुरु होती व चंद्र हा २ व ६ चा बलवान कार्येश ग्रह आहे त्यामुळे जातकास या विदशेत
नोकरी मिळाली पाहिजे. ही विदशा २/४/२०१२ ते २२/६/२०१२ पर्यंत होती. प्रश्न हा  २३/५/२०१२ रोजी विचारला आहे त्यामुळे २२/६/२०१२ पर्यंत नोकरी मिळेल असे सांगितले.
आता हाच प्रश्न जातकाने विचारलेल्या प्रश्नवेळी म्हणजेच प्रश्न कुंडलीवरुन सोडविला व नंतर एक शेवटचा निर्णय घेतला .





















प्रश्नवेळी ही बुधाच्या विदाशेत ही २-६-१०-११ ची साखळी जुळून येते. हा कालावधी २८/०५/२०१२ ते २७/६/२०१२
आता प्रश्न कुंडली व जन्म कुंडली वरून येणारा कालावधी हा एकच आहे हे दिसून येते. त्यामुळे प्रश्न कुंडलीलाही फार महत्त्व असते. ठिक आहे, आता पुढे वळू या..

आता आपणास एक ठरविक कालावधीची कल्पना आली आहे व तो साधारण प्रश्न वेळपासून साधारण एक महिन्या नंतर होता त्यामुळे मी रुलिंगच्या ग्रहामधून रविचे भ्रमण बघितले. ज्यावेळी रवि हा राहूच्या नक्षत्रात व बुधाच्या राशीत प्रवेश करेल त्यावेळी घटना घडेल व तो दिवस म्हणजे २३/०६/२०१२  या दिवशी मुद्दाम चंद्राची भ्रमण देखिल बघितले या विदशी चंद्र कर्क राशीत बुधाच्या नक्षत्रात होता व हे सर्व ग्रह रुलिंग मध्ये आहे त्यामुळे याच दिवशी आपणस नोकरी मिळेल असे जातकास कळविले.

एका विशिष्ट दिवशीच आपणास नोकरी मिळेल हे त्यांच्या पचनी पडत नव्हते आणि जातकाने आम्हास २५/०६/२०१२ रोजी फोन केला त्यावेळी आम्ही आई जगदंबेच्या दरबारी म्हजेच माहूरला होतो आणि कळविले की २३/६/२०१२ रोजी त्यांचा इंटरव्यू झाला आहे व त्यांना नोकरी मिळाली असून ते ट्रेनिंगसाठी दिल्लीला निघाले आहे.

अशी ही शास्त्राची प्रचीती येते. ही केस माझ्यासाठी काधीही न विसरणारी अशी आहे. लेख बराच लांबला आहे.  पण काय करणार आपणस समजावे यासाठीची ही आमची धडपड.

!!   जय जगदंब .. जय जगदंब...!! 
आपला,
Preview

1 टिप्पणी: