शनिवार, १६ फेब्रुवारी, २०१३

पुन्हा एकदा आभार

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

सोमवार पासून शुभेच्छा व अभिनंदाचे मेल, फोन व फेसबुक आपल्या प्रतिक्रिया कळविल्याबद्दल आपल्या सर्वांचे आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो.  जर आपल्याकडे या ब्लोगसाठी ज्योतिष विषयक काही नवीन कल्पना सुचावायची असल्यास आपण कळवू शकता. काही जोतिष मित्रांनी सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणाऱ्या लोकांच्या कुंडलीचे विवरण ४ स्टेप थेरी व नक्षत्र ज्योतिष पद्धतीतीने विश्लेषण करण्याची विनंती केली आहे व ती निश्चितच पुढील लेखात देण्याचा प्रयत्न करेल.

आमचे ज्योतिष शुभेच्छूक विवेक पाध्ये व त्यांच्या ग्रुपने कळविलेल्या फेसबुकर प्रतीक्रिया आपल्या समोर ठेवत आहे.

 आपला,
Preview

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

निवेदन आणि आभार

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आज गणेश जयंती, अशा शुभ दिवसापर्यंत आमच्या ब्लॉगची फॉलोवरची संख्या ही बरोबर २१ या शुभ आकड्यावर पोहचली आहे. नोव्हेंबर २०१२ ला सुरु केलेल्या या ब्लोगला केवळ तीन महिने झाले व सुरुवातीच्या एक महिन्यात तर केवळ आम्हीच या ब्लॉगचे सदस्य होतो.  या तीन महिन्यात एक शुभ आकड्याची सदस्य संख्या एका शुभ दिवसापर्यंत झाली यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आमच्या या ब्लोगला भेट देणारा प्रत्येक सदस्य आमच्यासाठी लाखासमान आहे त्यामुळे ब्लॉगला भेट देणारे पृष्ठसंखेचे चिन्ह काढून टाकत आहोत.

हा ब्लोग केवळ आमचा नसून आपल्या सर्वांचा आहे व आम्ही नक्षत्र अभ्यासक जरी असलो तरीदेखील दैववादी आहोत त्यामुळे ज्योतिष माहिती, दैविक उपासना व आपण अनुभवलेली दैविक अनुभूती आम्हास मेलद्वारे कळवू शकता व ती आम्ही निश्चित या ब्लोगवर आपल्या नावासमवेत प्रकाशित करू.

या ब्लोगच्या निमित्ताने आमची खूप चांगल्या ज्योतिष अभ्यासकांची मैत्री झाली यापैकी श्री अमोल केळकर यांचा उल्लख येथे आवरुजून करावा वाटतो व त्यांनी या ब्लोगचे स्वागत व कौतुक केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

फेसबुकवर त्यांनी आमच्या ब्लोगबद्दल लिहिलेला अभिप्राय आपल्यासमोर ठेवत आहे.



अमोल केळकर shared a link.


  • केवळ जोतिष या विषयाला वाहिलेली मराठी संकेतस्थळे ( ब्लॉग ) तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. ( यासंबंधीचा लेख काही दिवसांपुर्वीच माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे. इच्छुकांनी पहावा ) यामधे औरंगाबाद मधे रहाणारे स्वामी भक्त ' श्री दिपक पिंपळे ' यांनी तयार केलेला
    ' नक्षत्र ' हा ब्लॉग आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही.
    ह्या ब्लॉगला के. पी अभ्यासकांनी जरुर भेट द्यावी. सरळ सोपी भाषा, सुंदर सजावट आणि मुख्य म्हणजे सोप्या पध्दतीने सोडवलेल्या कुंडल्या हे याही ब्लॉगचे वैशीष्ठ म्हणावे लागेल.

    श्री दिपक पिंपळे साहेब यांचे यासाठी अभिनंदन. श्री स्वामींची कृपा आपणावर अखंडीत राहो या शुभेच्छा

    http://deepakpimple.blogspot.in/2013/02/blog-post_11.html
    Like ·  ·  10 minutes ago  near Mumbai, Maharashtra · 



आपल्या सर्वांचे पुन:च एकदा आभार.

आपला,
Preview


सोमवार, ११ फेब्रुवारी, २०१३

पंतांचा ब्लोग केंव्हा सुरु होईल ?

|| श्री स्वामी समर्थ || 

नमस्कार,

नित्याचे काम सुरु असताना मध्येच पंतानी काही नवीन अपडेट केला आहे हे बघण्यासाठी आम्ही त्यांचा ब्लोग उघडला परंतू तो ओपन होत नसल्याने आमच्या ब्लॉगच्या रेडिंग लिस्ट मध्ये त्याचे कारण कळाले. पुन्ह्ना त्यांनी केवळ आप्तमित्रांना ब्लोग वाचण्याची मुभा देणार होते.  मग आमचा तर प्रश्न संपला होता कारण मागील आठवड्यात फेसबुकवर स्वामीचे छायाचित्र रंग भरून स्वमीसेवाकापर्यंत पोहोचविण्यात आनंदात होतो कारण हे माध्यम देखिल प्रचार व प्रसारचे आहे त्यातच ही स्वामी सेवा घडते असे आम्ही समजतो.

त्याचे झाले असे की पंताना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली व त्यानी ती स्वीकारली  देखिल परंतू दोन-तीन दिवसानंतर आमचा फ्रेंडच्या लिस्ट मधून पत्ता साफ केला.  असो...!  ही त्यांची मर्जी परंतू ब्लोग वाचकांच्या लिस्टमध्ये आमचे नाव  निश्चितच नसणार होते त्यामुळे पंत ब्लोग केंव्हा सुरु करतील यासाठी प्रश्न बघितला व आमच्या नित्य चालणाऱ्या कामामध्येच कॉम्पुटर मधून ज्योतीषाचा पसारा उघडला व कुंडली मांडली आणि रुलिंग प्लानेटची नोंद घेतली 

दिनांक ११/०२/२०१३ वेळ: ९:१३:५६ स्थळ:  औरंगाबाद
रुलीग प्लानेट:
L: गुरु 
S: राहू 
R: शनी
D: चंद्र   
लग्न भाव: ९ ३१'४९''

१-७ भावाचा सब शुक्र -
शुक्राच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो बलवान आहे.
सब - शुक्र (स्वत: ची इच्छा ) ११ (इच्छापूर्ती) ३ (लिखान, प्रकाशन) दर्शवितो त्यामुळे पंत ब्लोग सुरु करतील.

आता ३ भावाचा सब काय दर्शवितो ते पाहूया तो आहे राहू (नेहमी संभ्रमात असणे किंवा गैरसमज निर्माण करणे).  राहू हा गुरूच्या नक्षत्रात व गुरु (ज्योतिष लिखाण) ३ स्थानी आहे व तो लग्नेश असून शुक्राच्या सब मध्ये व शुक्र वरील प्रमाणे ११ -३ चा बलवान कार्येश तसेच ११ स्थानी चरराशी मग आता निश्चित आजच ब्लोग सुरु करतील हे उत्तर मिळाले.

आमची नजर पुन्हा रुलींग ग्रहाकडे गेली व प्रश्नांचे पूर्ण उत्तर शोधण्यासाठी आमच्यातील ज्योतिष डोके खाजवू लागला. जर दिवसभरात ब्लोग सुरु होईल तर केंव्हा यासाठी लग्नभ्रमण बघावे लागेल येथे आम्ही दोन पर्याय निवडले कारण लग्न हे द्विस्वभावी असून ११ भावाचा सब शनी आहे.

रुलींगमध्ये राहू व गुरु हे बलवान ग्रह आहे व येथे आम्ही राहूला महत्त्व  दिले. ज्यावेळी लग्न हे राहूच्या नक्षत्रात जाईल त्यावेळी घटना घडेल.  प्रश्नवेळी मीन लग्न सुरु होते व राहूचे नक्षत्र मिथून लग्नामध्ये येते व ही रास नैसर्गिक कुंडलीत त्रितीय स्थानी (लिखाण व प्रकाशन) असते त्यामुळे हा एक पर्याय निवडला व साधारण २:०० वाजता मिथून लग्न सुरु होते व लग्न हे राहूच्या नक्षत्रात साधारणपणे दुपारी २:२५  ते ३:३० पर्यंत होते त्यामुळे पंत यावेळेच्या दरम्यान ब्लोग सुरु करतील व तो त्यांनी सुरु केला. ही बातमी आम्हास प्रथम फेसबुकद्वारे  सुमेध तांबे यांनी ही पंतानी पोस्ट केलेली लिंक शेअर केली व आम्ही ती आमच्या नित्याचे काम झाल्यावर ती लिंक  पाहिली.


 ही शेअर केलीली लिंक आम्ही ४:३० वाजता पाहिली तिला पोस्ट करून साधारण एक तास झाला होता.

येथे लग्न भाव हा द्विस्वभावी व शनी ने आपले कार्ये केले असे दिसते व आम्ही पंताचा ब्लोग यावेळी उघडला व तो सुरु झाला होता. हे कळण्यास थोडा उशीर मात्र झाला.


आमच्या ब्लोगचे मुठभर वाचक प्रेमी:
येथे आम्ही एक गोष्ट नमूद करू इच्छितो आम्ही कोणाच्या ही ब्लॉगच्या लेखाचे कोपी पेस्टचे काम करीत नाही व ते करण्याचा आमच्याकडे वेळ ही नाही व आम्हास प्रसिद्धीची ही गरज नाही. गुरु कडून मिळालेले ज्ञान व स्वामीचा अशीर्वादाने आम्हाला भरपूर काही मिळाले आहे व त्यात आम्ही खूप समाधानी आहोत. ज्योतिषशास्त्र व दैविक उपासना आपना पर्यंत पोहचावी हाच आमचा मुख्य उद्देश असून स्वामी सेवा घडावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना....!

आपला,
Preview




शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

आशिर्वाद आणि श्राप नक्की आहे तरी काय ??

सुख आणि दुख ????

एखाद्या मंदिरामध्ये जाणे ... देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होवून जाणे, त्याला खाद्यपदार्थांचे चढावे देणे आणि इच्छा मागणे आणि इच्छा पुरती झाली तर त्याला देवाचा प्रसाद मानणे म्हणजे देवाची भक्ती नाही .

प्रसाद या शब्दाचा अर्थ .....''प्रत्यक्ष साक्षात दर्शन '' असा आहे.

हे तेच दर्शन आहे जे स्वामी विवेकानंद यांना झाले होते , हे तेच दर्शन आहे जे भक्त अर्जुनाला झाले होते , हे तेच दर्शन आहे जे संत तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माउली,नामदेव महाराज, मीराबाई ,जनाबाई ,मुक्ताबाई आणि देखील अशा भरपूर संताना झाले होते 

आशीर्वाद हा आपल्याला मागून भेटत नाही तर तो स्वताच्या कर्मावर अवलंबून असतो .

भगवान कृष्ण भगवतगीता या मध्ये सहजपणे बोलले आहेत कि ...''आजची हीच माणसे एका बाजूने बोलून दाखवितात कि त्यांना सर्व देणारा मीच आहे म्हणजे परमात्मा आहे ,पण काही कालांतरानंतर ,हीच माणसे मीच यांना दिलेले मलाच परत का देतात ''??
माझे मलाच परत देतात . असे का ???
म्हणून देवाकडे काही मागयचेच असेल तर 'जीवन जगण्याची कला मागितली पाहिजे'

जीवन किती जगलो हे महत्वाचे नाही तर जीवन आपण कसे जगलो आणि आता कसे जगत आहे हे महत्वपूर्ण आहे. 
आजचा माणूस हा practical जीवन जगत आहे .तो निर्णय सहजच घेत नाही .सर्व गोष्टी तपासून मगच अंतिम निर्णय घेतो . मग हा देवाच्या भक्तीमध्ये असा घाईगडबडी मध्ये निर्णय का घेतो. देवाने आपले शब्द ,वचन ,नियम हे प्रत्येक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले असतानादेखील आजचा माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे.

काही व्यक्तींना सांगितले जाते कि देवाने भगवतगीता लिहिली आहे ,ज्ञानेश्वरी आहे 
मग समोरून लगेच उत्तर येते कि ,'' अरे वेळ कोणाला आहे हे वाचायला''
सुखी माणूस या गोष्टीचा कधीच विचार करू शकत नाही , म्हणून स्वताच्या मुळापासून भटकल्यामुळे या देवाला त्याच्या जीवनात काही दुख द्यावे लागते ..
पण जसे बोलतात कि 

''आजच्या माणसाच्या तोंडात सुख आले कि तो लगेच गिळून टाकतो ,पण जर दुख आले तर मात्र तो चघळत बसतो ,कारण त्याला दुख पचवण्याची कला हि माहितच नसते ''

मग त्याला शेवटी देवाचे द्वार दिसते ,आणि ज्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो,मात्र दुख जाण्यासाठी त्याला देवाकडेच शरण जावे लागते 

जसे बोलतात कि 'तलवारीपेक्षा धार हि शब्दांना असते ' म्हणून शब्द बोलताना सांभाळून बोलावेत .
कारण तुमच्या तोंडातून निघणारा एक चांगला शब्द समोरच्या माणसाचे पूर्ण जीवन सुधारू शकतो . त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जो जीव वास करत असतो ,तो फक्त तुमच्यामुळे आनंदित होतो .
आणि जर त्या जीवाला आनंद भेटला तर तोच जीव आपल्याला भरपूर असे आशीर्वाद देत असतो . तुम्ही समोर असू द्या किवा नको ,पण जर तुमच्या चांगल्या कोणत्याही कर्माची आठवण हि समोरच्या माणसाला झाली असेल तर तुम्हाला आशीर्वाद हा अनंत प्रमाणात भेटत असतो.

साई बाबा यांचे वचन आहे कि ,'' अगर मुझसे प्यार करना चाहते हो ,तो मेरे हर एक बंदे से प्यार करो''
''अगर मुझे मानते हो ,तो मेरे हर एक बंदे को भी मानो''
''अगर मेरी सेवा करना चाहते हो,तो मेरे हर एक बंदे कि सेवा करो ''

या जगातले सर्वात मोठे पुण्य म्हणजे दुसर्याला मदतीचा हात देणे ...ज्याला स्वताच्या बाहेर पडता आले ,तोच मदतीचा हात देउ शकतो .
समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य येणे हे एकत्वाचे लक्षण आहे.
मदत हि कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकते , एका हाताने केलेली मदत हि दुसर्या हाताला समजली नाही पाहिजे .

संतानी सांगितले आहे कि ,''माणसाचे हात हे दुसर्यावर उगारण्यासाठी नसतात तर स्वताचे आणि दुसर्यांचे जीवन उभारण्यासाठी असतात ''

दुख हे याच्या उलट असते.
''दुख जीवन कि झोली में अपने आप गिरता हे ,लेकिन सुख अर्जित करना पडता हे ,वो कमाना पडता हे ''
तुमच्या कोणत्याही शब्दाने किवा वागणुकीमुळे समोरच्या माणसाचे मन हे दुखावले गेले ,किवा जीव हा दुखावला गेला तर दुख येणे हे स्वाभाविकच आहे .

म्हणूनच संत नेहमीच सांगतात कि ,''कर्मावर जोर दे मानवा ,कर्म आहे थोर ''

काळाप्रमाणे माणसाचे विचार देखील बदलत आहेत, त्याचा स्वभाव ,समाजाप्रती त्याची वागणूक सर्व काही बदलत आहे. आपल्या स्वताच्या मुळापासून भटकत आहे . विसरला आहे कि आपण जीवन का जगत आहे . जरुरी आहे विज्ञान बरोबर आध्यात्मिक संस्कृती पुढे आणण्याची :)

रावण आणि राम हे आणि कुठे राहत नाही . ते आपल्यातच असतात . आपल्या मनाला चांगली दिशा भेटली तर ती अवस्था रामाची आहे , नाही तर रावणाची आहे . 
देवाने या युगाला कलयुग हे नाव बरोबर दिले आहे , पण नाव ठेवल्याने युग खराब होत नाही . या युगाला दिशा दिली आहे आजच्या समाजाने आणि त्यात वावरणाऱ्या माणसाने . जर माणूस चांगला वागला , तर हे कलयुगच सतयुग आहे नाही तर उलटे आहे .. म्हणून आपले मन हेच राम आणि कधी कधी रावणाचे अनुकरण करत असते .

शेवटी संत कबीरजी बोलतात कि ,

''जीवनात जेव्हा तुम्ही आला होतात तेव्हा तुम्ही रडत होतात, आणि बाकी सर्व मंडळी हसत होते , कारण तो तुमचा जन्माचा क्षण होता ,
पण मरताना असे काही तरी करा , कि या जगातून निघताना तुम्ही हसणार आणि हे सर्व जग तुमच्यासाठी रडणार '' 

(सौजन्य:  भरत तळाशिलकर) 

शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

ग्रहांनी उत्तर दिले ...!

||श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

मागील दोन आठवड्यापासून फार व्यस्त होतो. थोडा देखिल वेळ मिळाला नाही व त्यातच कालचा दिवस तर फारच बिझी गेला.  रोज दुपारी २:०० वाजेपर्यंतचा वेळ कसा निघून जातो हे कळत देखिल नाही मग त्यानंतर ज्योतिषाच्या व जातकाचा कुंडलीच्या दुनियेत आमचे प्राचारन असते.

आमच्या नित्य व्यवहाराचे चालणारे मेडीकल ट्रान्सक्रिपशनचे काम आज आले नाही त्यामुळे थोडे आश्चर्यचकित झालो. आमचे कामचे स्वरूप अमेरिकेशी संभधित असल्याने, तेथे सुटी असलीकी आमच्या कामारवर फरक पडतो परंतू काल तेथे सुटीपण नव्हती मग आज काम का आले नाही म्हणून आम्ही आमचा काम्पुटर मधील ज्योतिष पसारा (सोफ्टवेर) उघडला व आमच्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला व ग्रहांनी उत्तर  दिले ...!

दि. ०१/०२/२०१३   वेळ: ९:१३:२९   स्थळ : औरंगाबाद




येथे आम्हाला चंद्राने बरीच उत्तर दिली व आज चंद्र स्वत:च्याच (हस्त) नक्षत्रात आहे. त्यामुळे तो बलवान झाला.

चंद्र अष्टम स्थानी (चिंता), भावचालीत मध्ये सप्तमात (स्वत: व्यवसायिक स्वरूपातच काम) असून तो षष्टेश आहे. त्यामुळे प्रश्नची ओढ दिसून येते.

चंद्राची महादशा व बुधाची अंतर-विदशा-शुक्ष्मदशा ही ०४/०२/२०१३ पर्यंत आहे म्हणजे बुध हा देखिल एक महत्त्वाचा घटक आहे  व बुधाच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो बलवान ग्रह असून तो मंगळाच्या नक्षत्रात आहे. व बुध हा १-५-८-१२ चा बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे आता आपली सोमवार पर्यंत कामाचा ओघ कमीच राहील हे लक्षात आले व ते साहजिकच आहे उद्या शनीवार - व नंतर रविवार - या दिवशीतर सुट्टीच असते व त्यानंतर सोमवारी आमच्या क्षेत्रात मुळातच या दिवशी काम कमी असते कारण अधल्या दिवशी अमेरिकेत हा रविवार असतो.

असे ग्रह उत्तर देत असतात. त्यानुसार आंम्ही प्लानिंग करणार..हा लेख लिखाणकरे पर्यंत काम आले नाही म्हणजेच ग्रहांनी शिक्का मोहर्तब केला.

आपला,
Preview