शुक्रवार, १ फेब्रुवारी, २०१३

ग्रहांनी उत्तर दिले ...!

||श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

मागील दोन आठवड्यापासून फार व्यस्त होतो. थोडा देखिल वेळ मिळाला नाही व त्यातच कालचा दिवस तर फारच बिझी गेला.  रोज दुपारी २:०० वाजेपर्यंतचा वेळ कसा निघून जातो हे कळत देखिल नाही मग त्यानंतर ज्योतिषाच्या व जातकाचा कुंडलीच्या दुनियेत आमचे प्राचारन असते.

आमच्या नित्य व्यवहाराचे चालणारे मेडीकल ट्रान्सक्रिपशनचे काम आज आले नाही त्यामुळे थोडे आश्चर्यचकित झालो. आमचे कामचे स्वरूप अमेरिकेशी संभधित असल्याने, तेथे सुटी असलीकी आमच्या कामारवर फरक पडतो परंतू काल तेथे सुटीपण नव्हती मग आज काम का आले नाही म्हणून आम्ही आमचा काम्पुटर मधील ज्योतिष पसारा (सोफ्टवेर) उघडला व आमच्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला व ग्रहांनी उत्तर  दिले ...!

दि. ०१/०२/२०१३   वेळ: ९:१३:२९   स्थळ : औरंगाबाद




येथे आम्हाला चंद्राने बरीच उत्तर दिली व आज चंद्र स्वत:च्याच (हस्त) नक्षत्रात आहे. त्यामुळे तो बलवान झाला.

चंद्र अष्टम स्थानी (चिंता), भावचालीत मध्ये सप्तमात (स्वत: व्यवसायिक स्वरूपातच काम) असून तो षष्टेश आहे. त्यामुळे प्रश्नची ओढ दिसून येते.

चंद्राची महादशा व बुधाची अंतर-विदशा-शुक्ष्मदशा ही ०४/०२/२०१३ पर्यंत आहे म्हणजे बुध हा देखिल एक महत्त्वाचा घटक आहे  व बुधाच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नाही त्यामुळे तो बलवान ग्रह असून तो मंगळाच्या नक्षत्रात आहे. व बुध हा १-५-८-१२ चा बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे आता आपली सोमवार पर्यंत कामाचा ओघ कमीच राहील हे लक्षात आले व ते साहजिकच आहे उद्या शनीवार - व नंतर रविवार - या दिवशीतर सुट्टीच असते व त्यानंतर सोमवारी आमच्या क्षेत्रात मुळातच या दिवशी काम कमी असते कारण अधल्या दिवशी अमेरिकेत हा रविवार असतो.

असे ग्रह उत्तर देत असतात. त्यानुसार आंम्ही प्लानिंग करणार..हा लेख लिखाणकरे पर्यंत काम आले नाही म्हणजेच ग्रहांनी शिक्का मोहर्तब केला.

आपला,
Preview


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा