बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

निवेदन आणि आभार

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आज गणेश जयंती, अशा शुभ दिवसापर्यंत आमच्या ब्लॉगची फॉलोवरची संख्या ही बरोबर २१ या शुभ आकड्यावर पोहचली आहे. नोव्हेंबर २०१२ ला सुरु केलेल्या या ब्लोगला केवळ तीन महिने झाले व सुरुवातीच्या एक महिन्यात तर केवळ आम्हीच या ब्लॉगचे सदस्य होतो.  या तीन महिन्यात एक शुभ आकड्याची सदस्य संख्या एका शुभ दिवसापर्यंत झाली यासाठी आम्ही सर्वांचे आभारी आहोत. आमच्या या ब्लोगला भेट देणारा प्रत्येक सदस्य आमच्यासाठी लाखासमान आहे त्यामुळे ब्लॉगला भेट देणारे पृष्ठसंखेचे चिन्ह काढून टाकत आहोत.

हा ब्लोग केवळ आमचा नसून आपल्या सर्वांचा आहे व आम्ही नक्षत्र अभ्यासक जरी असलो तरीदेखील दैववादी आहोत त्यामुळे ज्योतिष माहिती, दैविक उपासना व आपण अनुभवलेली दैविक अनुभूती आम्हास मेलद्वारे कळवू शकता व ती आम्ही निश्चित या ब्लोगवर आपल्या नावासमवेत प्रकाशित करू.

या ब्लोगच्या निमित्ताने आमची खूप चांगल्या ज्योतिष अभ्यासकांची मैत्री झाली यापैकी श्री अमोल केळकर यांचा उल्लख येथे आवरुजून करावा वाटतो व त्यांनी या ब्लोगचे स्वागत व कौतुक केले, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

फेसबुकवर त्यांनी आमच्या ब्लोगबद्दल लिहिलेला अभिप्राय आपल्यासमोर ठेवत आहे.



अमोल केळकर shared a link.


  • केवळ जोतिष या विषयाला वाहिलेली मराठी संकेतस्थळे ( ब्लॉग ) तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. ( यासंबंधीचा लेख काही दिवसांपुर्वीच माझ्या ब्लॉगवर लिहिलेला आहे. इच्छुकांनी पहावा ) यामधे औरंगाबाद मधे रहाणारे स्वामी भक्त ' श्री दिपक पिंपळे ' यांनी तयार केलेला
    ' नक्षत्र ' हा ब्लॉग आपले लक्ष वेधून घेतल्याशिवाय रहात नाही.
    ह्या ब्लॉगला के. पी अभ्यासकांनी जरुर भेट द्यावी. सरळ सोपी भाषा, सुंदर सजावट आणि मुख्य म्हणजे सोप्या पध्दतीने सोडवलेल्या कुंडल्या हे याही ब्लॉगचे वैशीष्ठ म्हणावे लागेल.

    श्री दिपक पिंपळे साहेब यांचे यासाठी अभिनंदन. श्री स्वामींची कृपा आपणावर अखंडीत राहो या शुभेच्छा

    http://deepakpimple.blogspot.in/2013/02/blog-post_11.html
    Like ·  ·  10 minutes ago  near Mumbai, Maharashtra · 



आपल्या सर्वांचे पुन:च एकदा आभार.

आपला,
Preview


1 टिप्पणी:

  1. अभिनंदन आणि आपणास पुढील कार्यासाठी लाखो शुभेच्छा . योगायोगाने केल्या काही दिवसात लाखांची संख्या पार केलेल्या संकेतस्थळांच्या पोस्टवर अभिनंदनाचा मजकूर लिहिण्याचा योग आला होता ( मुख्य म्हणजे लाखाची संख्या पार केलेला माझा स्वतःची ब्लॉग होता )
    अर्थात . ससा आणि कासवाची लाख मोलाची कथा आपणा सर्वांस माहितच आहे

    जोतिष अभ्यासकांसाठी अशी लाख मोलाची संकेतस्थळे उपलब्ध होऊन हे शास्त्र जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहचावे ही' श्री गजानना ' चरणी प्रार्थना

    आपला
    अमोल केळकर

    उत्तर द्याहटवा