मंगळवार, २४ जून, २०१४

स्मार्त व भागवत एकादशी संबंधी ..!!

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

आषाढी एकादशी या वर्षी कालेंडर मध्ये दोन तारखा दर्शिवित आहे एक ८ जुलै आणि ९ जुलै, यात ८ तारखेस ही स्मार्त एकादशी आहे तर ९ तारखेस ही भागवत एकादशी आहे जो की प्रत्येक माळकरी हीच एकादशी गृहीत धरतात. याच दिवशी पंढरपूर यात्रा असते आणि त्या पांडुरंगाला भेटण्याची ओढ लागलेली असते. या दोन एकाशितीला फरक हा पंचांगाच्या आधारे आपल्या समोर मांडत आहे.

वर्षातून २४ एकादशींचा उपवास असतो. त्यामध्ये ४ ते ६ वेळा स्मार्त व भागवत एकादशी येत असतात. सूर्योदयानंतर १ मिनीटसुध्दा एकादशी नसताना महाजे संपूर्ण दिवशी व्दादशी तिथी असताना व्दादशीच्या दिवशी एकाशीच उपवास कसा दिला जातो अशी शंका येते.

सध्याच्या काळात स्मार्त / भागवत (वैष्णव ) असे दोन संप्रदाय आहेत. एकादशीव्रत स्मार्तासाठी परानाप्रधान आहे आणि भागवंताना उपोषप्रधान आहे. पारण्यास द्वादशी सुर्योदयास असलेल्या दिवसाचे आधीचे दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी स्मार्तांनी करावे. भागवंताना उपोषणाच्या दिवशी दशमी वेध होता कामा नये. दशमीवेध होत असेल म्हणजे एकाशीच्या सूर्योदयापूर्वी अरुणोदयवेळी ( १ ता. ३६ मी.) असेल तेंव्हा दशमीविध्द  एकाशीचा दिवस सोडून द्वादशीच्या दिवशी भागावत संप्रदायांनी एकादशीव्रत करावे असे आहे. हा मुख्य नियम आहे.

हा सर्व विचार धर्मसिंधु, निर्णयसिंधू ई. ग्रंथामध्ये दिलेला आहे.


Preview

मंगळवार, १७ जून, २०१४

गुरूपालट

!! श्री स्वामी समर्थ !!
जेष्ठ कृ ७, गुरुवार १९/६/२०१४ रोजी ८ वाजून ४७ मि. गुरु कर्क राशीत प्रवेश करतो. त्याचा पुण्यकाल गुरुवार सकाळी ६/५६ ते १०/३८ मि. पर्यंत आहे.  मेष,  धनु, व सिंह या राशींना ४-८-१२ वा गुरु येत असल्याने व लावहापादाने ज्या राशीत येत आहे. त्यांनी पिडापारिहारार्थ गुरूच्या उद्धेशाने जप, दान पूजा अवश्य करावी.

कर्क राशीत गुरु असता ज्यांची जन्म राशी मेष आहे अशा व्यक्तींना तो ४ था येईल. याच प्रमाणे वृषभ राशीला - ३ रा, मिथुनेला -२ रा, कर्केला - १ ला, सिहेला - १२ वा, कन्येला - ११ वा, तुळेला- १० वा, वृश्चिकला - ९ वा, धनुला ८ वा, मकरेला - ७  वा, कुंभेला - ६ वा, मिनेला - ५ वा येईल. 

आपल्या जन्म राशीपासून गुरु २, ५, ७, ९, ११ वा शुभफल देणारा आहे तर १, ३, ६, १० वा मध्यम आणि ४, ८, १२ वा हा अनिष्ठ असतो. गुरु हा अनिष्ठ असता गुरूचा जप, होम, शांति करावी. त्यायोगे संकटाचे निवारण होते.

दरवर्षी दिवाळी अंकात ग्रहांच्या नक्षत्र गोचर भ्रमनांचा विचार करून राशी भविष्य लिहीत असताना  ज्या राशीना ४,८,१२ वा गुरु सुरु असतो त्यावेळे अशा राशींना निश्चीत अडचणी किंवा संकाटाना सामोरी जावे लागते मग मुळ कुंडलीत दशाजरी शुभ कारक असल्या तरी गोचर भ्रमणाची  अशा  जातकांना साथ मिळत नाही आणि येणाऱ्या शुभ कार्यास व्यत्यय निर्माण होतो त्यामुळे कृष्णमूर्ती पद्धतीत गुरु पालटास जरी महत्त नसले तरी देखिल गोचर भ्रमणाचा अनुभव हा येतो. 

कर्क राशीत गुरु असता जन्म राशीफले - (दि. १९/६/२०१४ ते १४/७/२०१५)
१) मेष - धननाश 
२) वृषभ - क्लेश दायक
३) मिथून - धनप्राप्ती 
४) कर्क - भयपरद 
५) सिंह - पीडाकारक
६) कन्या - धनलाभ 
७) तुळ - विपत्तीदायक
८) वृश्चिक - रोगोपद्र्व 
९) धनु - रोग भय 
१०) मकर - सन्मान प्राप्ती 
११) कुंभ - शोकप्रद 
१२) मीन - सोख्य दायक 

आपला, 
Preview