बुधवार, २६ डिसेंबर, २०१२

नव ग्रह रत्न धारण विधी

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

जातक हे रत्न धारण विधी बद्दल विचाराणी करीत असतात. त्यामुळे या विधीचा सर्व तपशील खालील प्रमाणे देत आहे. तसेच पुढील लेखात रत्नांची तपशीलवार माहिती देणार आहोत.


आपला
Preview



बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

यश मिळाले.. यशाच्याच पायरीने...!

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
नक्षत्राचे देणं दिवाळी अंक २०१२ मध्ये प्रकाशित झालेला आमचा लेख 
यश मिळाले.. याशाच्याच पायरीने...!


आपला,
Preview

शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१२

अचूकता ४-स्टेप थेरीची, कालनिर्णय शुभमंगलचा...!

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

सध्या विवाहाचा सिझन सुरु आहे, त्यामुळे जातकाच्या गुणमिलनाच्या पत्रिकेची रेलचेल आमच्याकडे वाढली आहे. पालक पत्रिका घेउन येतात गुणमिलन योग्य होत नसल्यास  विनाकारण आमचे डोके खाजावितात, काही मार्ग किंवा पर्याय शोधण्यास सांगतात,  स्थळ उत्तम आहे असे सांगतात.  मग अशास आम्ही सांगतो आपण जर सर्व ठरविलेच आहे तर हे गुणामिलन तरी कशासाठी, करून टाका लग्न...! नंतर आम्ही आहोतच पुनर्मिलनचा प्रश्न सोडवायला.

असेच एक जातक काल आपल्या मुलीच्या पत्रिका गुणमिलनासाठी आले.  या जातकाकडून आम्हास आमच्या ज्योतिषमित्राच्या बहिणीचे लग्न जानेवारी महिन्यात होणार आहे अशी वार्ता कळाली आम्ही लागलेच त्यास फोन केला  कारण त्याच्या बहिणीचा विवाहाचा प्रश्न आम्ही मे-२०१२ रोजी बघितला होतो व त्यास आम्ही डिसेंबर-जानेवारीमध्ये विवाह होईल असा कालनिर्णय केला होता व तसे घडत देखिल आहे. फोन केल्यावर लग्नपत्रिका घेउन आम्हास आश्चर्यचकित करणार होता, असे तो म्हणाला.

आम्ही  आश्चर्यचकित मुळीच झालो नसतो कारण आमचा शास्त्रावर पूर्णपणे विश्वास आहे. परतवे आम्ही थोडे दुखी मात्र झोलो कारण ज्योतिषमित्र हा देखिल एका सामान्य जातकासारखा वागला. असो..!

त्याचे झाले असे की आम्ही नक्षत्राच देण वासंतिक अंकाच्या निमित्ताने त्याच्या घरी दि १३/०५/२०१२ रविवारी गेलो, आमच्या ज्योतिष गप्पा सुरु होत्या त्या अंकात आमचा लेख होता त्याचे उत्तर कसे काढले ते सांगत होतो व आमचा विषय त्याच्या बहिणीच्या विवाहसाठी स्थळ शोधण्याकडे वळला. मनात वाटले की आता हा आपणास के.पी. ने कालनिर्णय बघण्यास सांगेल तोच त्याने हे सांगण्यास तिळमात्र विलंब केला नाही व त्याने लागलेच कागदावर बहिणेचे सर्व डीटेल्स लिहून दिले व आम्ही बघून कळवितो असे त्यास सांगितले व पुन्हा नेहमी प्रमाणे खिशात तो कागद टाकला.  अशा चिठ्या आप्त-मित्र मंडळीच्या घरातून बाहेर पडताना आम्हास मिळतात त्यातच आमच्या या ज्योतिष मित्राची भर पडली.

कामाच्या व्यापामध्ये प्रश्न राहून गेला परंतु आमचा ज्योतिषमित्र यावेळी मात्र फोन करण्यास विसरला नाही त्याने दि. १६/०५/२०१२ बुधवार दुपारी १२:१५ मी. फोन करून प्रश्न बघितला का विचारले व मी त्यास अर्ध्या तासात कळवितो.  असे सांगितले व तो मी पुढीलप्रमाणे ४-स्टेप पद्धतीने सोडविला.

नाव:  स्त्री जातक                      प्रश्न दि. १६/०५/२०१२  वेळ :१२:१५            
ज. दि.: ०२/१०/१९८८                 L:  चंद्र      LS:  बुध 
ज. वे.  १८:१५ मी.                     S:  शनी    D:  बुध
ज. स्थळ: औरंगाबाद                R:  गुरु 
लग्नभाव: मीन: १६'४५''४१' - गुरु-बुध-बुध-बुध  हे तीन ही ग्रह रुलींगमध्ये आहे त्यमुळे जातकाची जन्मवेळ बरोबर आहे. 
सप्तम भाव: या भावाचा सब शनी हा देखिल रुलींगमध्ये आहे.
नियम: ७ भावाचा सब जर २-७-११ पैकीचा चा कार्येश असेल तर २-७-११ दशा-अन्तर दशेत विवाहयोग येईल.
०  शनी :                             शनी हा रुलीग मध्ये आहे व तो ७ चा बलवान कार्येश ग्रह आहे.
    केतू: ६ रा स्व. रवि ६        त्यामुळे सब चा होकार विवाह होणार पुढे कालनिर्णयासाठी
०० रवि: ६ भा. ७                  दशास्वामीकडे वळूया.
    चंद्र :४                           (याच पद्धतीचे वरील तक्त्यामध्ये सर्वे ग्रहांचे ४-स्टेप दिले आहे.) 
प्रश्नवेळी  :                                     दिनांक                                                   साखळी (२-७-११)
महादशा  - गुरु -                   २१/०२/१९९९ ते ५/१/ २०१३                                २-११
अंतरदशा - राहू                     १०/०८/२०१० ते ५/१/२०१३                                  ११
साखळी जुळण्यासाठी ७ ची आवश्यकता आहे विदशास्वामी असा निवडावा लागेल जोकी ७ बलवान कार्येश आहे. येथे प्रश्न वेळी शुक्र अंतर दशा सुरु होती जो की ७ चा कार्येश नाही.  उर्वरित ग्रह पैकी रवि, चंद्र, व मंगळ हे ७ चे बलवान कार्येश ग्रह आहेते.  लग्नाच्या तारखा व पितृपक्ष याचा विचार केल्यास मंगळाची अंतरदशा निवडली ती सुरु होते १२/११/२०१२ ते ५/१२/२०१२ पर्यंत त्यामुळे या काळात विवाह होणार परंतु डिसेंबर व जानेवारी पहिल्या हप्त्यापर्यंत रवि व चंद्राची सूक्ष्मदशा सुरु होते व दोन्ही ग्रह वरीलप्रमाणे ७-११ चे बलवान कार्येश ग्रह आहेत त्यमुळे मी हा कलावधी सांगितला व तो खरा ठरला. लेख बराच लांबत आहे.  येथेच लेखास पूर्णविराम देतो......!
|| शुभं भवतु ||
आपला, 




सोमवार, १० डिसेंबर, २०१२

दैव बदलते काय ?

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

आम्ही के. पी. अभ्यासक, प्रत्यक ग्रह हा त्याच्या नक्षत्रस्वामी प्रमाणे फळ देणार त्याला साथ हवी असते दशास्वामीची, सब (उप न.स्वामी.) च्या होकार अथवा नाकारची, हे सर्व ठरते ज्यावेळी बालक जन्मास येते म्हणजेच जातकाच्या जन्मपत्रिकेवरून त्याच्या आयुष्याचा भविष्यवेध घेता येतो. मग येथे दैव आले कुठे ?

के.पी. व ४-स्टेपच्या बलवान कार्येशत्वाचा वापर करुन कालनिर्णय अथवा भविष्य हे अचूक येते, परंतु अशा काही कुंडल्या आहेत की त्यामध्ये घरातील दोष, वास्तू दोष, शापित कुंडल्या यांचादेखील विचार करणे आवश्य असते, म्हणजे आमच्या मेडिकलच्या भाषेत diagnosis (निदान) होणे आवश्य असते. पुन्हा निदान झाल्यावर त्यावर उपचार हा ओघाने आलाच. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास आपण रत्न उपचार, दैव व नक्षत्र  हा लेख आवश्य वाचा. मग या जातकाच्या दैवाला आमच्या सारखा एखादा ज्योतिष हा केवळ माध्यम ठरत असेल असे वाटते जो की आपणस जन्मपत्रिका बघून उपाय सूचीवतो व तो जातक हा तेवढ्याच श्रद्धेने,  भावनेने व प्रयत्नाने संगीलेला उपाय करतो व त्यास त्याचे फलश्रुती मिळतेच यात शंका नाही. निश्चित अशा कुंडल्या मी आपणास लेखाद्वारे कळवेल. हा आपचा लिखाणाचा प्रपंच आपल्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच आहे व तो नेहमी वेळोवेळी मांडेल.

काल सकाळी वी. श्री. देशिंगीकर यांचे पुस्तक वाचत होतो त्यांनी एक जातक जोडप्याला पुत्र प्राप्तीसाठी संगीलेल्या उपचार व प्रचीतीबद्दल होता. तो आपल्या समोर मांडावा असे वाटते.  ते या दैवाबाद्दल लिहितात ते असे....
"बली पुरुषकारी हि दैवमप्य तिवर्तते !"

बलिष्ठ प्रयत्नाने दैवास देखील मागे हटविता येते, असे वचन प्रसिद्ध वैद्यशास्त्रकार  पंडीत वाग्भाटकर यांनी आपल्या गंथात लिहिले. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला, हे रामायणातून व विटाळ गेलेल्या स्त्रीस श्रीनरसिंहसरस्वती स्वामीनी आशीर्वाद देता पुत्रप्राप्ती झाली, हे आपण गुरुचरित्रात वाचतो पुत्रप्राप्तीसाठी जप करणे, नवस करणे, पूजा विधी, नारायण नागबळी, औषधी देणे हे सर्व प्रयत्नाचेच भाग आहेत. असे काही दैवी प्रयत्न केले असता संतती होते, अशा कुंडल्या आहेत. अशा कुंडल्यात योग देखील तसेच असतात.

यावरून आम्हास वाटते की पंडीत वाग्भाटकर सांगीलेले वाक्य हे त्रिवार सत्य आहे.  दैव हे बदलते त्यास उपचार व प्रयत्नाची सांगड घालणे आवश्यक असते त्यामुळेच आमच्या के.पी. होरा प्रश्नकुंडलीत जातक हा जर प्रश्नसंभाधित विषयाबद्दल प्रयत्न करीत असेल तरच उत्तर बरोबर येते व प्रचीतिचा अनुभव येतो. नाहीतर उगीचच आमची परीक्षा घेणारे महाभाग देखील आम्हास भेटतात.  असो.....!

आपला,
Preview

गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

अनुभव पुन्हा पुनर्वसू नक्षत्राचा

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

काल सायंकाळी एका केस पेपर बघण्यासाठी फाईल मधील कुंडल्या शोधात होतो, ती केस पुन्हा एकदा  रीओपन करायची होती. जातक आमच्याकडे साधारण एक वर्षानंतर आले, मध्ये ईतरत्र भटकले पण आमच्याकडे मात्र आले नाही. पत्रिकेची जन्मवेळ शुद्धी करून आम्ही त्यास वर्षभर जमिनीबाबत व्यवहार होणार नाही सांगितले आणि घडले ही तसेच असो.... 

त्या आमच्या कुंडलीच्या केस पेपर फाईलच्या राड्यात एक पेपर आपली मान बाहेर काढत होता. बघितल्यावर लक्षात आले की तो कागद म्हणजे आम्ही औरंगाबाद मध्ये के. पी. च्या कार्यशाळेत मांडलेली हरवलेल्या व्यक्ती बद्धलची ती केस होती. पुनर्वसू नक्षत्राची प्रचीती आलेली ही कुंडली, मागील लेख याबद्दलच बऱ्याच वाचकांनी प्रतीक्रिया कळविल्या, शास्त्राचा अनुभव हा येतोच केवळ आपला त्यावर विश्वास पाहिजे.

घटना ही मे महिन्यातील आहे.  साधारण मध्यरात्री उलटून गेली व जातकाने आमच्या घरची डॉरबेल वाजविली. जातकाची मुलगी सकाळी टूशनला चालले म्हणून गेली तर घरी परतली नव्हती, मुलीचे १२ वीचे वर्षे, त्यातच बाईजात व जातक हि बडी आसामी,  साहजिकच पालकाचा संयमाचा बांध सुटला होता आणि काय करावे.?... काहीही सुचत नव्हते. त्यांच्या ओळखी पैकी आमच्या वडीलाकडे त्यांना भेटण्यास सांगितले.  गुरुवारी स्वामी मठात भजनाचा कार्यक्रम नुकताच रात्री संपला होता व वडिलांना झोप लागली होती. त्यामुळे त्यांनी जातकास आपण सकाळी यावे असे सांगितले तेवढ्यात आमची स्वारी ही माडीवरून खाली आली, जातक आई-वडील दोघेही चिंतीत दिसत होते, डोळे पाणावलेले होते, मला बघताच वडिलांनी आम्हाला त्यांचा प्रश्न बघण्यास संगीतला, मग काय...! आम्हाला तो बघावाच लागणार होता व ही केस आता आमच्याकडे ट्रान्स्फर झाली. मला देखिल थोडे जीवार येत होते, जाताकास बसण्यास सांगितले व अर्धे डोळे पुसत कम्पूटर सुरु केले.

आम्ही ज्योतिषाचा पसारा उघडला,  नित्याप्रमाणे L S R D, नक्षत्राची नोंद घेत असतो, पुनर्वसू नक्षत्र हे रात्री ८:४० मी. सुरु झाले होते. व ते नंतर सायंकाळ पर्यंत होते, उत्तर तयार होते, आम्ही जातकास मुलगी घरी हे संध्याकाळ पर्यंत येईल असे सांगणार तोच मनात एवढ्या लवकर उत्तर आले तर जातकाला वाटेल की आम्ही झोपेतच प्रश्न बघितला. त्यामुळे व्यवस्थित रित्या कागदावर नोंद करून हा प्रश्न रुलींग प्लानेटने सोडविला. आम्ही कुंडलीमध्ये डोकावले तर बरेच काही लक्षात आले. हरवलेल्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र हा मार्गदर्शक असतो.

कुंडलीकडे बघितल्यास लक्षात येते, पंचमेश हा चंद्र आहे. जातकाचा प्रश्न हा मुली बद्धल, चंद्र हा चतुर्थ स्थानी म्हणजेच पंचमाचे व्ययस्थान (आई-वडील मुलीबद्दल चिंता). येथे कुंडली आई-वडील दोन्ही बरोबर होत त्यामुळे कुंडली फिरविण्याचा म्हणजे पंचमस्थान लग्नी मांडण्याचा द्रविडीप्राणायाम टाळला होता. पुनर्वसू व मुळ नक्षत्रावर हरविलेल्या वस्तू अथवा व्यक्ती सापडते अथवा घरी परतते. असा अनुभव येतो.
प्रश्न दि.२५/५/२०१२ वेळ ०२:१८ १९  स्थळ: औरंगाबाद 
L: (मीन) - गुरु  LS: शनी   S: (पुनर्वसू) गुरु  R: (मिथून) बुध  D: (गुरुवार) गुरु  
येथ आम्ही प्रथम लाभ स्थानाचा सब बघितला तो आहे गुरु व गुरु हा लग्नेश आहे त्यामुळे जातकाची मुलगी घरी परतण्याची ईच्छा पूर्ण होणार, चंद्र हा केंद्रातच आहे याचा अर्थ मुलगी घराच्या जवळच आसपास. घटना हि दिवसभराची आहे त्यामुळे लग्न ज्यावेळ LSRD च्या ग्रहांमधून भ्रमण करेल त्यावेळी घटना घडेल. यासाठी अशी येणारी स्थितीचा आम्ही पर्याय दुसरा निवडला कारण लग्न द्विस्वभावी असून लाभेश शनी असून तो चंद्रावर दृष्टी ठेउन आहे.

कालनिर्णय: ज्यावेळी वृश्चिक लग्न १४ अंश ५३' वर येइल तेव्हा घटना घडेल.  अशी स्थिती हि सायंकाळी ७:१५ असेल त्यामुळे मुलगी हि साधारण ७ ते ७:३० या दरम्यान येईल असे सांगितले यावेळी मंगळ (लग्न), शनी (लग्न न. स्वा.), गुरु (सब) असा पर्याय निवडला. मंगळ LSRD मधे नाही असे ज्योतिषांना वाटल्यास त्यांनी कुंडलीचे निरीक्षण केल्यास उत्तर मिळेल. परंतु जातकाची मुलगी ही ७:४५ घरी आले असे जातकाने कळविले.

येथे शनीने आपले कार्य केले. अर्ध्या तासाने उत्तर चुकले की लागलेच डोक्याच खोबर करायच नसत, जातकाची मुलगी घरी सुखरूप परत आली त्याला महत्व आहे. जातकाने दुसऱ्या दिवशी स्वामी मठात पेढे आणले.  असा हा पुनर्वसू नक्षत्राच महिमा आहे.

आपला,