शुक्रवार, २५ जुलै, २०१४

प्रारब्धाचे झटके

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

आज जो तो येतो आणि ज्योतिषशास्त्र थोतांड आहे, भोळ्या भाबड्याना फसवून पैसे मिळविण्याची सोपे साधन आहे असे म्हाणून ह्या शास्त्राची हेटाळणी करणारे महाभाग पुष्कळ आहे. येथे मला आमच्या हसबे गुरुजीच्या लेखाची आठवण झाली. ते म्हणतात..

अधिष्टनं, तथा कर्ता, करणं च पृथग्विधम् |
विविधाश्च पथगचेष्ठा, दैवं चैवात्र पंचामम्   ||

ज्योतिषशास्त्राचा मूळ गाभा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या या पांचव्या करणात आहे ज्योतीषशास्त्रानुकार जन्मणाऱ्या प्राण्याने पूर्वजन्मामध्ये ज्या प्रकारची कर्मे केलेली असतील त्यानुसार ह्या जन्मात सुखदु:ख मिळतात.  भाग्य, दुर्भाग्य ह्यांच्या लीला अगाध आहेत. ह्याची कल्पना रोजच्या जीवनात अनेकता येते. जन्मणाऱ्या मनुष्याने कोणत्या प्रकारच्या प्रराब्द कर्माचे गाठोडे बरोबर आणले आहे, आणि त्या कर्माचा फलपाक होत असताना कोणत्या प्रकारची परिस्थिती निर्माण होऊन त्याला कशी व कोणत्या प्रकारची सुखदु:खे भोगावी लागतील ह्याचा बोध जन्मकालचे ग्रह करतात. पुत्रशोक, स्त्रीवियोग, वैधव्य,  अपघात,  आणि इतर अनेक गोष्ठी ह्या पूर्वकर्मावर आधरित आहे. जीवनातील यशापयश यांची संगती इतर काराणांप्रमाणे ज्योतिषशास्त्रातही मिळते. दैवलीलेत फार मोठे सामर्थ्य आहे. ज्यांनी या शास्त्राचा एक मिनिटभर सुध्दा विचार केलेला नाही, त्यांनी या आकाशस्थ ग्रहांचा आणि आमचा काय संबंध आहे हे खुशाल ओरडत बसावे. मानवी जीवनावरचे अचूक मार्गदर्शन करू शकणारे फलज्योतिषाशास्त्र खरे व उपयुक्त आहे ह्यावर विश्वास ठेवणारे लोक जगात भरपूर आहे. असो..

!! शुभम् भवतु..!!
Preview

मंगळवार, १ जुलै, २०१४

suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का ?

!! श्री स्वामी समर्थ !!
नमस्कार,

माझ्या एका जोतिष मित्रास एका जातकाने suspension रद्द होऊन कामावर परत घेतील का असा प्रश्न विचारला त्यामुळे अशा प्रश्नांना के. पी. मध्ये कुठले नियम वापरतात आणि मि अशा पद्धतीचा एक प्रश्न २०११ रोजी प्रश्न कुंडली मांडून यशस्वी सोडविला होता. त्याचा तपशील माझ्याकडे असल्याने सदर कुंडलीसह येथे मांडत आहे.

आपला
Preview