सोमवार, २० जुलै, २०१५

|| श्री स्वामी समर्थ ||
काल दि. १९/०७/१५ रोजी ब्राम्हण वधु-वर परिचय मेळावा औरंगाबाद येथे संपन्न झाला, वधु-वर यादी पुस्तिकाचे प्रकाशन देखिल झाले. या पुस्तकात माझा लेख "पत्रिकेतील मंगळ" हा देखिल आहे तो येथे आपनासमोर मांडत आहे.

पत्रिकेतील मंगळ:

मुलीला मंगळ म्हटले की, पालकांना तिच्या जन्मापासूनच मनात भीती निर्माण होते.  एका विशिष्ठ प्रकारचा त्रास दायक, वैवाहिक जीवनास त्रास देणारा ग्रह डोळ्यासमोर येतो आणि आई-वडिलांची चिंता येथूनच सुरु होते. मंगळ हा पृथ्वीपासून बराच लांब आहे. मानवाने त्यावर स्वारी करून बरीचशी माहिती करून घेतली आहे, नव्हेतर तो तेथे जाऊनच पोहोचला आहे यातही आपला देश अग्रेसर आहे. मंगळ हा अमंगल आहे अशी विचारसरणी समाजात जणू काही रूढच होत आहे. असो...! मंगळाविषयी थोडक्यात सांगतो. मंगळ हा लाल तांबूस रंगाचा असून त्यास भूमिपुत्र, अंगारक, रूधीर, वक्र, क्षितीज, भौम, कुज, यम ईत्यादी संबोधतात. तंत्रज्ञ आणि यंत्रज्ञ उद्याग हे मंगळ अधिपत्यखाली येतात. मंगळ कुमार आहे आणि सळसळत्या रक्तात, सैन्यात आणि सेनापतीपदाचा कारक हाच तर ग्रह आहे. जिथे शक्ती आहे तेथे मंगळ आहे. मंगळ हा मंगलकारक आहे, म्हणूनच सौभाग्यस्त्रिया गळ्यात घालतात ते “मंगळसूत्र” असते. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीस “अंगारिका चतुर्थी” म्हणतात. मंगळवारी येणाऱ्या त्रयोदशीला “भौम प्रदोष” म्हणतात. पतीबरोबर एकत्र राहण्यासाठी केली जाणारी सप्तपदीस “मंगळ फेरे” म्हणतात.  मंगळचा रक्त लाल व सौ-लेणे म्हणून स्त्रिया कापळी कुंकू लावतात ते लाल रंगाचे, मंगळसूत्रात दोन-दोन पोवळे हे मंगळाचे प्रतीकच घातलेले असतात. मंगळसूत्रातील काळेमणी म्हणजे शनीचे आणि कपाळावरील कुंक लाल रंगाचे हे पाहिल्यावर परपुरुषाचे त्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे धाडस होत नाही. तर मंगळ हा मंगलकारीच आहे. तो अमंगल असेलच कसा.....!!

येथे मला पत्रिकेतील मंगळदोष हा विषय मांडण्यास संगीतला आहे त्यामुळे आपण मंगळदोषचा विचार करणार आहोत. पत्रिका पाहुन विवाह करावा की नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तीक प्रश्न आहे. मात्र, सद्या पत्रिका पाहून विवाहाचा कल वाढत आहे.  वधू पित्याने किंवा वरच्या पित्याने दिलेल्या ठोकळा कुंडलीवरून पत्रिकामेलन बाबतील विचार करणे एवढाच असतो. बरे दिलेले टीपण किती बरोबर आहे ? कुणी जाणकार व्यक्तीने बनविले आहे का ? याचे उत्तर हे पालकाकडून नाकार्थीच येते कारण पत्रिकेची आठवण ही आपल्या मुला-मुलीच्या लग्नाच्या वेळीच येत असते. त्यात त्या पत्रिकेची स्थिती कशी झाली असावी हे सांगणे नको. त्यातच हल्ली मी जो अनुभव घेत आहे तो Android Apps  गुणमिलन करतात आणि चुकीच्या संकल्पना मनात बाळगतात. त्यात चुका आढळतात.  बरेचदा ही कुंडली कोण तपासतो ? कळो अगर न कळो बाळू पासून बाबा तर ताई पासून आई आणि मामा पासून मावशी असे बरेचजन हाताळताना दिसतात. १, ४, ७, ८, १२ या स्थानत मंगळ असल्यास ती मांगळीक पत्रिका असे त्यांनी एकेवलेले असते किंवा पंचागात वाचलेले असते. त्यामुळे यास्थानी मंगळ दिसलारे दिसला की मंगळाची पत्रिका म्हुणून शिक्का मोर्तब करतात. परिणामी मंगळाची पत्रिका सखोल अभ्यास न करता नकार कळविला जोतो.

विवाहासाठी  वधु-वरच्या पत्रिका जुळावीताना नाडी, भूकुट, गण वगैरे ८ प्रकारातून गुण पाहतात. १८ वा त्यापेक्षा जास्त गुण येत असल्याने पत्रिका जुळते असे सांगण्याचे प्रमाण जास्त आढळते. ३६ गुण जमत असूनही संसार सुखाचा होत नाही आणि अगदी कमी गुण असूनही संसार छान होतो असेही मत आढळते. जास्त खोलात जाऊन पत्रिकेला अभ्यास करण्याऱ्या ज्योतिषांचे प्रमाण फारच कमी आहे. तज्ञ जाणकार हा केवळ ठोकला कुंडलीवरून विचार करत नाही तर जन्मलग्न, भावचलित, आणि नवमांश, ईत्यादी कुंडल्यावरून विचार करेल.


वस्तीविक या मंगळाला नियमापेक्षा अपवाद जास्त आहे, ते न पाहता मंगळाची कुंडली नाकारली जाते. तसे होऊ नये म्हणून मंगळचा दोष नाहीसा करणाऱ्या पुढील तथ्य बाबी आपण पाहूया:
१) मंगळ कुठल्याही स्थानात निच राशीचा म्हणजे कर्क राशीचा असता.
२) मंगळ शत्रू राशीत म्हणजे मिथून, कन्या वा बुधाच्या राशीचा असता.
३) मंगळ अस्तंगत म्हणजे रवीचे जवळ ७ अंश असता.
४) मंगळ प्रथम स्थानी मेषेचा, चतुर्थस्थानी वृश्चिकेचा, सप्तमात मकरेचा, अष्ठमात सिंहेचा, व द्वादश स्थानात धनु राशीचा असता दोष नाहीसा होतो.
५) मंगळवार शुभ ग्रहांची दृष्टी असता तो सौम्य होतो.
६) मंगळ-लग्न, चंद्र किंवा शुक्रापासून १ ल्या स्थानात असेल आणि त्यास्थानाची राशी मेष, कर्क, वृश्चिक असेल तर मंगळदोष नाही.
७) मंगळ-चंद्र एकाच राशीत असता मंगळदोष नाही. (हा योग शुभ आहे).
८) पंचमात किंवा दशमात शनी असता, शनी दृष्टी ही सप्तमभावार (पती/पत्नी स्थान) असते, शनीचा दाब या स्थानवर असतो. त्यामुळे मंगळदोष राहत नाही.
९) लग्नी अगर सप्तमात गुरु असता, शुक्र असता, मंगळदोष मानू नये.
१०) विवाहात दुसरा अडसर बाब – एक नाड दोष / एक नाडीत जर चरण भिन्न असतील तर एकनाड मानू नये.

वरील काही महत्वाच्या बाबतीत मंगळदोष नाहीसा होतो. आजूनही यात काही योग दृष्टी यांच्यामुळे देखिल हा दोष नाहिसा होतो यासाठी तज्ञ ज्योतीषाचा सल्ला हा मार्गदर्शकच ठरेल. केवळ मंगळ आणि गुण न पाहता जातकास पुढील येणाऱ्या दशा पहा, त्याचे आयुष्यमान, आरोग्य, धन, भरभराट, मानसन्मान याकडे जास्त लक्ष द्यावे. त्यामुळे मंगळची भीती मनातून काढून टाकावी आणि आपल्या मुला-मुलीच्या जोडीदाराची योग्य निवड करावी हेच फार महत्ताचे नाही का...!!
Preview
* लेखाचे सर्व हक्क लेखक - दिपक पिंपळे यांचे

!! शुभम् भवतु !!