मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गुरु पालट २०१९



!! श्री स्वामी समर्थ !!
दि.4-11-2019 रोजी सोमवारी उत्तर रात्री म्हणजे उजाडत्या मंगळवारी पहाटे ५ वाजून १८ मिनीटांनी गुरू धनू राशीत प्रवेश करतो आहे. याचा पुण्यकाल सोमवारी मध्यरात्री नंतर ३-२७ ते मंगळवारी सकाळी ७-०९ पर्यंत आहे. या कालावधीत गुरूचा जप केला तर खूप लाभदायक असेल.
याचे सर्वसामान्य फल पहाता.
सिंह-मकर-मीन--: या राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने येत असूनही "चिंता" असेल.पुण्य काळात जप दान पूजा केली असता शुभता प्राप्त होईल.सुवर्ण पादाने येणारा हा गुरू शुभ असतो.
वृषभ-कन्या-धनु---:
या राशींना रोप्य पादाने येत असून याचे फल शुभकारक असेल.
मेष-कर्क-वृश्चिक---:
या राशींना ताम्र पादाने येत असून याचे फल श्रीप्राप्ती आहे.
मिथुन-तुला-कुंभ -----:
या राशींना लोह पादाने येत असून याचे फल "कष्ट" असे आहे.
या गुरूपालटाची राशीगत फलादेश आपण थोडक्यात पाहू!
मेष:--शुभदायक असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.नोकरी, प्रमोशन, बदली,विवाह तसेच, व्यवसायात येणारे आडथळे दूर होतील. धार्मिक कार्य संपन्न होतील.सामाजिक कार्यात यश प्रतिष्ठा लाभेल. संततीकडून आनंद प्राप्त होईल.
वृषभ:--हा गुरूपालट वृषभ राशीच्या लोकांना ही लाभदायक असेल.
तरुणांना मनोवांछित यश मिळेल.शिक्षण नोकरीत प्रगती होईल.
मात्र प्रवासात दगदग होईल. आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. क्वचित प्रसंगी एखाद्या घटनेमुळे मानसिक संताप , अकस्मात खर्च व व्यापारात नुकसान होण्याची शक्यता असते.
मिथुन:--येणाऱ्या काळात या गुरूपालटा मुळे दगदग व कष्ट जास्त करावे लागतील. परंतु अथक परिश्रम केल्याचे फल निश्चितच मिळेल.व्यापार व्यवसायात भरभराट होईल.आर्थिक स्थितीत अपेक्षित सुधारणा होईल. वैवाहिक सौख्य व कौटुंबिक आनंद प्राप्त होईल. संततीसौख्य मिळेल.
कर्क:--हा गुरूपालट या राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्ती करून देईल.कर्ज परतफेड होईल.नोकरी व व्यवसाय यातून धनलाभ होईल.मात्र याचबरोबरीने आपली उन्नती न पहावल्याने आपणास त्रास देणारी मंडळी आसपास असतील.कधीकधी एखाद्या घटनेमुळे मन अशांत होईल.येत्या वर्षभरात आपणास आरोग्यासाठी खास लक्ष द्यावे लागेल. शरीरातील जाडेपणा वाढेल.पोटाचे विकार संभवतील.
सिंह:--या राशीच्या लोकांना सर्व काही उत्तम असूनही मनाला कसली तरी चिंता लागून राहिलेली असेल. सहसा या राशीपासून समाधान लांबच असते.मात्र आगामी वर्षात या जातकांना कौटुंबीक, वैवाहिक तसेच कार्यक्षेत्रातील सुख आनंद मिळणार आहे फक्त त्याला जवळ करणे न करणे हे यांचे मनावर अवलंबून आहे.
सकारात्मक दृष्टीने पाहिले तर नोकरी, व्यवसाय, संतती आर्थिक स्थैर्य आदी सर्वांगाने हे वर्ष लाभदायक असणार आहे.
कन्या:--या राशीच्या लोकांना हा गुरूपालट उत्तम आहे. परदेशगमन स्वतःचे नवीन घर तयार होणे,नवीन नोकरी लागणे.लग्न जमणे वगैरे गोष्टी घडू शकतात. मात्र या लोकांनी नेहमी आर्थिक बाबतीत आगामी काळात सतर्क राहावे.फसवणूक व नुकसानीची शक्यता आहे. मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे. घरातील इतर लोकांच्या समस्या मुळे मनःशांती भंगण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आजच्या भागात आपण #मेष ते #कन्या राशींना या गुरूपालटामुळे काय अनुभव येऊ शकतात हे थोडक्यात व ढोबळ मानाने पाहिले. उद्याच्या भागात #तूळ ते #मीन राशीबाबत पहाणार आहोत शिवाय गुरूचा जप दान पूजा याविषयीही मार्गदर्शन देण्यात येईल.
मित्रांनो ! मागच्या भागात आपण मेष ते कन्या राशींच्या जातकाला हा गुरूपालट काय फले देऊ शकेल याचे अंदाजे विश्लेषण पाहिले. मित्रांनो खरे पाहिले असता #गुरू हा सर्वात शुभ ग्रह आहे. याचे #बल मिळते म्हणूनच प्रत्येक जातकाचे भाग्य उजळत असते. शत्रूच्या राशीत गुरू भ्रमण करत असेल किंवा गुरूचा शत्रू ग्रह हा गुरूच्या राशीत भ्रमण करत असेल तेंव्हाही गुरूची फले तितकी त्रासदायक मिळत नाहीत. दोन वाईट माणसे एकत्र असतील तेंव्हा एखाद्याला ते खूप त्रास देतील.पण एक सज्जन व एक वाईट माणूस एकत्र असतील तर सहसा तेवढा त्रास देऊ शकत नाहीत.सज्जन माणूस दुसऱ्याला एकतर विरोध करेल अथवा त्याला त्या कर्मात कुठलीही साथ देणार नाही. गुरू कोणत्याही राशीत घरात कोणत्याही क्रूर ग्रहाबरोबर जरी असेल तेंव्हा तो तुम्हाला निश्चितच सांभाळून घेईल याची खात्री बाळगा ! फक्त एक गोष्ट मात्र कधीच विसरू नका की गुरूला अध्यात्मिक व धार्मिक माणूस फार प्रिय आहे.
आता आपण बाकीच्या राशीबाबत पाहू या !
(७):-तूळ :--लोहपादाने या राशीला गुरू येत असल्याने या जातकांना हा काळ खूप कष्टाचा जाईल.एखाद्या स्थानी ठरवलेले एखादे काम लवकर होणार नाही. तिथेच आडकले जाऊ शकते. नोकरीत समस्या निर्माण होऊन पदावनती किंवा जाँब जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. व्यवसाय धंद्यात आडचणी निर्माण होऊन कर्जबाजारी होण्याचीही वेळही एखाद्या जातकावर येऊ शकते. उत्पन्न कमी खर्च जास्त तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतील.आतापर्यंत हा गुरू आपणास बरेच शुभ फले देऊन गेलेला असून इथून पुढे जरा सतर्क राहाण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे.
(८):-वृश्चिक---हा गुरूपालट कठीण प्रसंगातून जाणाऱ्या वृश्चिक जातकांना जरा दिलासा देणारा असेल.
ताम्र पादाने पैसा घेऊन आपल्याकडे हा गुरू येत आहे. पैसा कसा प्राप्त करायचा हे आता आपल्या कर्मावर अवलंबून असेल. नोकरीत बढती,अपेक्षित ठिकाणी बदली ,नवीन जाँब,व्यवसायात प्रगती,
वैवाहिक सौख्य, उत्तम भोग व सुखप्राप्ती हे अनुभव येणार आहेत.
आळस झटकून टाका ! निराशा सोडून सकारात्मक व्हा! जोमाने व आत्मविश्वासाने कामाला लागा! गुरूला अपेक्षित वागणूक आचरणात ठेवा!
(९):-धनु:---हे गुरूचे भ्रमण आपल्या धनू राशीत होत असल्याने.हळूहळू स्थीरता मिळण्यास सुरूवात होईल.हा गुरू रौप्य पादाने आपणाकडे काही चांगल्या गोष्टी घेऊन येत आहे. आतापर्यंत झालले नुकसान पुढील काही दिवसात भरून निघण्याची शक्यता आहे.
नवीन जाँब,विवाह,याचे योग येतील.आर्थिक स्थैर्य लाभेल. मनाची उद्विग्नता कमी होऊन जोडीदाराशी संबंध सुधारतील.प्रेमविवाह सफल होतील.तरुणांना स्फूर्तिदायक स्थिती अनुभवायला मिळेल. मात्र याचबरोबर निरर्थक भीती वाटेल व्यवसायात धास्ती वाटेल.वादविवादाचे प्रसंग येतील.कधीकधी आर्थिक आवक घटल्यामुळे बुद्धी व विवेक यावर नियंत्रण राहाणार नाही. यासाठी रागावर नियंत्रण व काटकसर याचा अवलंब करावा.मूळ नक्षत्रातील जातकांचा त्रास हा काही काळानंतर कमी होईल.मूळ नक्षत्रातील जातकांनी खूपच संयमाने व शांततेने वागण्याची गरज आहे. विशेष करून वैवाहिक व आर्थिक बाबी हाताळताना सतर्क राहिले पाहिजे! राशीस्वामी #गुरूचा जप करावा.काही इतर साधना कुलधर्म कुलाचार नियमितपणे करावे.
सर्वकाही ठीक होईल.!!
(१०):-मकर:--या राशीच्या लोकांना हा गुरू सुवर्ण पादाने येत आहे. बाराव्या स्थानी येत आहे. याचे फल चिंता असे जरी असले तरी.व्यय स्थानी स्वराशीचा असल्याने आपणास आर्थिक व्यवहार जपून करावे लागतील. गुंतवणूक सांभाळून करणे अन्यथा फसवणूक संभवते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे
मन चिंतेत राहील. एखाद्या घटनेमुळे अचानक खर्च उद्भवेल. त्याचा त्रास सर्व कुटुंबातील व्यक्तींना जाणवेल.पण मित्रांनो हा सुवर्ण पादाने येणारा गुरू परोपकारी असल्याने स्वराशीतील लोकांना थोडा त्रासदायक वाटला तरी शुभ असेल.श्रद्धेने जप, दान पूजा केली की हा गुरू आपणावर नक्कीच प्रसन्न होईल व रक्षण करेल.!शिवाय मकर राशीला साडेसाती चा प्रभाव वाढता असेल.सांभाळून राहावे.
(११):-कुंभ:-हा गुरू कुंभ राशीला लोह पादाने येत आहे त्यामुळे या जातकांना भाग्योदयासाठी अथक परिश्रम करावे लागतील. नोकरी तसेच व्यवसायात खूप कष्ट सोसावे लागतील.
जाँब मिळतांना,विवाह जमवताना विलंब व आडचणीचा सामना करावा लागू शकतो. तथापि गोचरीचे हा गुरू लाभ स्थानी येत असल्याने नवीन काम मिळेल.स्थान बदलले की फायदा होईल. आडकलेली आर्थिक कामे मार्गी लागतील.
नोकरी व्यवसाय शेती धंदा यात लाभ होईल. खास करून बिल्डर लोकांना उत्तम दिवस येतील.गुरू व शन
(१२):-मीन:--गुरूचे हे भ्रमण मीन राशीच्या लोकांना सुवर्ण पादाने होत आहे. त्यामुळे याचे फल चिंता आहे. व जवळपास तशीच परिस्थिती या लोकांना अनुभवास येईल.मात्र परिवार व नातेवाईक यांच्याशी एखाद्या कारणामुळे वितुष्ट येऊ शकेल.नोकरीत व्यवसायात संबंधित लोकांशी विनाकारण मतभेद होतील.खर्चात वाढ,आर्थिक नुकसान व कामात अपयश येण्याची शक्यता असेल.क्वचित प्रसंगी एखाद्या जातकाच्या बाबतीत नोकरीत मनाविरुद्ध बदली तसेच नोकरी जाणे इत्यादी घटना घडू शकतात. आर्थिक फटके बसू शकतात.परंतु सुवर्ण पादाने येणारा स्वतःच्या धनु राशीत येणारा हा गुरू त्याच्याच मीन राशीसाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तितके अनिष्ट फळ देणार नाही.मात्र जातक धार्मिक ,शांत व सहनशील असला पाहिजे.
निराशा झटकून प्राणायाम ध्यानधारणा सुरू करा. भयमुक्त राहून श्रद्धेने गुरुचे पूजन करा! काळजी नको!



सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

::::- रत्न विचार - ::::



!! श्री स्वामी समर्थ !!
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार रत्न कोणती धारण करावीत व् गैरसमजुती ..
ज्योतिष दिपक चंद्रकांत पिंपळे : ९८२३४४८४४९
आजवर इतके लोक ज्योतिष मार्गदर्शनात पाहिले , 90 % लोकांना खड़े व् रत्न धारण करण्याविषयी चुकीचे सल्ले दिले जातात . पुष्कराज घातला की लग्न होत आणि माणिक घातला की नोकरी मिळते , या सर्व भ्रामक कल्पना आहेत . त्याचप्रमाणे टीवी असो वा आजकाल ची ज्योतिष विषयक पुस्तक त्यातही जे कोणती रत्ने धारण करावीत या विषयी 95% चुकीच् लिहिलेल असत. मुळात माझी रास मेष आहे म्हणून मी पोवळ घालतो , धनु रास आहे म्हणून पुष्कराज घालतो ...हेच मुळात चुकीच् आहे . खुप लोक वेगवेगळ्या ज्योतिषी जातात आणि प्रत्येक जन वेगवेगळी रत्न धारण करायला सांगतात , त्यात लोकही द्विधा अवस्थेत येतात की नेमकं कोणत रत्न धारण करावे .?
कुंडली मध्ये बारा स्थान , बारा राशी असतात. त्यापैकी सर्वात महत्वाची स्थान पुढील प्रमाणे ,.... 1 ) बालवयात वय वर्ष सात / आठ पर्यन्त बाळाच आरोग्य चांगल रहावे म्हणून कुंडलीतील पंचम स्थानच जो बलिष्ठ कार्येश ग्रह असेल त्याच रत्न वापराव , कारण पंचम स्थान हे रोगमुक्ति साठी महत्व्पूर्ण स्थान म्हणाव. 2) व्यक्ति शिक्षण घेत असताना , कुंडलीतील चतुर्थ , नवम व् अकरावे स्थान यातील बलिष्ठ कार्येश ग्रहांची रत्ने वापरावीत , कारण 4 व् 9 वे स्थान शिक्षण स्थान असतात . ( काहीजण म्हणतील की 5 वे स्थान विद्या स्थान असते , तर 5 वे स्थान फक्त कलात्मक शिक्षणास उत्तम इतर नाही.) 3) नोकरी असताना , यात जे मार्केटिंग करणारे असतात त्यानी 3 ऱ्या स्थाना संबंधी , डॉ.पेशातील यानी 6 वे , शिक्षक प्रोफेसर यानी 4 व् 9 , ज्यांची बैठी बौद्धिक कार्य व् जे अधिकार पदावर असतात त्यानी 10 , 11 वे स्थानचे , वित्तीय क्षेत्रातील 2 व् 7 , ..साधारण असे स्वरूप् राहील . 4) व्यवसायिक व्यक्तिनी , 3-7-10-11 संबंधी जे उत्तम असेल ते रत्न वापरावे. 5) गृहिणीनी 2-4-7-11 संबंधी जे उत्तम स्थान असेल त्या कार्येश ग्रहाच् रत्न घलाव. 6) हॉस्पिटल मध्ये एडमिट असणारे किंवा सतत आजार असणारे याना 5 वे स्थानच रत्न वापराव. 7) लग्नासाठी 2-7-11 या स्थानांची रत्ने वापरणे. 8)कलाकार लोकांनी 5 व् 7 वे स्थान संबंधी........ शक्यतो , 8-12 या स्थानची रत्न वापरु नयेत. नोकरित असल्यास 8-12 -5-9 या स्थानाची, शिक्षणात असल्यास 3-8-12 ची ,मोठी आजारपीड़ा असल्यास 4-6-12 ची ,विवाह करावयाच असल्यास 1-6-10-12 या स्थानचे कार्येश ग्रहांची रत्ने वापरु नयेत. विवाहा मध्ये 6, 12 व् स्थान प्रखर विवाहविरोधी स्थान , शिक्षणात 3,8,12 ही प्रखर शिक्षणविरोधी स्थान , नोकरीत 1,5,8,9,12 ही प्रखर विरोधी तर आजारपनात 4,12,8 ही अशुभ स्थान असतात म्हणून त्यांचे बलिष्ठ ग्रहांचे रत्न वापरु नए . दूसर म्हणजे , मंगळ कन्या मिथुन राशीत असता पोवळ व् बुध मेष वृचिक राशीत असताना पाचु ,मकर कुंभ वाल्याणी मोती , रवि शनि युतित माणिक वापरताना दक्षता घ्यावी. गुरु वृषभ व् तूल राशीत असेल वा शुक्र धनु मीन राशीत असेल तर शक्यतो पांढरट पुष्कराज वापरावा. विशेष म्हणजे , कोणताही रत्न वापरताना तो ज्या कारणासाठी वापरत आहात तो ग्रह उत्तम कार्येश असेल तर चांगल्या प्रतीच रत्न घेण्यास हरकत नाही आणि जर तो ग्रह आवश्यक स्थान व् त्या विरोधी भावांचा कार्येश ही होत असेल तर ...कुंडली अभ्यासुन कमी प्रतिच् रत्न वापरण्यास हरकत नसते. रत्न हे चांगल्या प्रतीचे उत्तम दर्जेचे असावे.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

सात मुखी रुद्राक्ष

!! श्री स्वामी समर्थ !!

ज्योतिष दिपक पिंपळे 9823448449
सात मुखी रुद्राक्षावर देवी लक्ष्मीचे अधिपत्य असते तर शनी हा शासक ग्रह आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि शनी कृपाशील असे हे सात मुखी रुद्राक्ष आहे.
|| सप्त्वक्त्रो महेशानीहुयनंगो नाम नामत:
धारणiतस्य देवेशी दरिद्रोपीश्वरो भवेत् ||
शिवपुराण, अ २५,श्लो ७२
सप्त मुखी रुद्राक्ष हे अन्ग स्वरुचे असून हे धारण केल्यास दारिद्र नाहीसे होऊन ऐश्वर्यवान होतो असे शिवपुराणातील या श्लोकाचा अर्थ असून शनीचे अधिपत्य असल्याने हाडाच्या संबधित आजाराना फायदा देणार आहे. पायांचे आजार, मानेचे आजार तसेच गुढघ्याचे आजारी लोकांनी धारण करावा. लक्ष्मी स्वरूप असल्याने धन-धान्य याची वाढ होते. नौकरी आणि व्यासायिक लोकांना चांगला फलदायी आहे.

बुधवार, १७ जुलै, २०१९

**** स्वास्थ बंध ******

!! श्री स्वामी समर्थ !!
तीन मुखी रुद्राक्ष अग्‍नि देवाच स्‍वरूप मानल गेल आहे. याची देवता ही मंगळ असून हा शरीरातील energy level वाढविण्याचे
काम करतो, रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो, आणि आत्मबल निर्माण कुरून Immune level संतुलित ठेवतो.
|| त्रिमुखश्चैव रुद्राक्षो अप्यग्नित्रय स्वरुपक:
तध्दारणाच्च हुतयुक्तस्य तुष्यति नित्य: ||
श्रीमद् देवीभागवत अ. ६, श्लो. २६
५ मुखी रुद्रक्षावर गुरुच अधिपत्य आहे. त्यामुळे दोन ३ मुखी राद्रक्ष आणि तीन ५ मुखी रुद्राक्ष एकत्र केल्यास किंवा एक तीन मुखी आणि दोन ५ मुखी रुद्राक्ष जरी धारण केले तरी स्वास्थ बंध तयार होतो. Blood pressure कंट्रोल मध्ये राहते, जे मुले अथवा लोक depression/anxiety, diabetes यासारख्या आजारे त्रस्त आहे त्याच्यासाठी उपयुक्त आहे.
“ॐ क्लीम नमः” मंत्राचा जप करत करत धारण करावे.
**** वोटर थेरपी (Water Therapy)*****
तीन ५ मुखी रुद्राक्ष रात्री एक ग्लास पाण्यात ठेवून सकाळी ब्रश करण्याची अगोदर अनोशी पोटी घेतल्याने acidity व ईतर पोटाचे आजार कमी होतात. याचा अनुभव घ्या..
दिपक पिंपळे -९८२३४४८४४९
Image may contain: text

मंगळवार, १८ जून, २०१९

***सरस्वती बंध:******

!! श्री स्वामी समर्थ !!
४ मुखीचे दोन रुद्राक्ष आणि ६ मुखी एक रुद्राक्ष मिळून सरस्वती बंध तयार होते. विद्यार्थांना हे अतिशय फलदायी आणि अभ्यासात एकग्रता वाढवते. हे सर्व उपयांची उपयुक्तता तेव्हाच मिळणार ज्यावेळी कर्माची परीकाष्ठा आपण करणार. याचा प्रतिसाद (feedback) पालकांकडून चांगाला मिळाला आहे, जे विध्यार्थी हे बंध वापरत आहे, १०-१५% मार्कस आणि अभ्यासात वाढ दिसत आहे.
चार मुखी रुद्राक्ष हे ब्रम्हस्वरूप मानले आहे आणि शासक ग्रह हा बुध असून बुद्धीदायक गणेश देखील या रुद्राक्ष देवता मानली आहे. हे रुद्राक्ष धारण केल्याने एकग्रता, स्मरणशक्तीची वाढ होते आणि कुठल्याही शाखेतील शास्त्राच्या आभ्यास होण्यास मदत मिळते त्यामुळे विद्यार्थी, लेखक, कलाकार, पुरोहित यांना फलदायी आहे.
।।चतुर्वक्त्र: स्वयं ब्रह्मा यस्य देहे प्रतिष्टती
स भवेत्सर्वशास्त्रज्ञो द्विजो वेद विदा वर: ।।
पद्मपुराण अ ५७,श्लो ४८
चार मुखी ब्रम्ह आहे आणि हे धारण केल्यास चारही वेदाचे व इतर शास्त्राचे ज्ञान प्राप्त करू शकतो असे पद्म पुराणात संगीतले आहे

शनिवार, १ जून, २०१९

जातक हो…!! प्रश्न कुंडली ही फार महत्त्वाची..हं..!!!


!! श्री स्वामी समर्थ !!

मागील बऱ्याच लेखात मी प्रश्न कुंडलीचे महत्त्व सांगितले आहे आणि हरवलेल्या जातकाची केस देखील प्रश्न आणि जन्म कुंडलीने आपण पाहिली आहे की उत्तरला किती समीपता येते. लक्षात घेतले पाहिजे कि जन्मकुंडली हा जीवनाचा पूर्ण आराखडा आहे त्यात जन्मापासून ते मरणापर्यंत जीवनाच्या घटना दर्शवित असेतच मग विवाह, नौकरी, आथवा संतती याचा देखील आढावा घेता येतो. परंतु चालू जीवनात तत्कालीन प्रश्न उद्भवतात त्यावेळी केवळ प्रश्नकुंडलीच फार समीप उत्तर देऊ शकते.  २३ मे २०१९ रोजी मला एका पुणेस्थित जातकाने प्रश्न केला आणि प्रश्न कुंडलीची माहिती त्यांना असल्याने प्रश्नकुंडलीच मांडावी असे ते म्हणाले. हे ज्या क्षेत्रात काम करतात त्यात पूर्णत: अगदी १००% हे लेबरवर (कामगारावर) अवलंबून आहे आणि त्यांचे सर्व कामगार टीम साधारण दीड तो दोन महिन्यापासून सुटीवर होते, ती सर्व उत्तर भारतातील होती त्यांचा फोन-मोबिईल कुठलाच संपर्क होत नव्हता, आणि जातकाचे शिक्रापूर येथील काम हातातून जाईल अशी त्यांना भीती वाटू लागली, काम मोठ होत, १५ दिवस सुट्टी म्हणून गेलेले कामगार दीड महिना झाला तरी संपर्कात नाही म्हणून काळजी वाटू लागली आणि त्यांनी मला पुढील प्रश्न केला. (कुंडली आणि whatsapp चा त्यांचा feedback अभिप्राय देखील मी दिला आहे).



मुले वेळेत येऊन शिक्रापूर चे काम आपल्याला मिळेल ना ?  मुले नाहीत म्हणून हातातून जाणार नाही ना?”

प्रश्न होरारी tossing पद्धतीने नंबर #१०३ घेऊन, दि. २४/०५/२०१९ वेळ ९:५८:५१ रोजी, स्थळ: औरंगाबाद आणि प्रश्नकुंडली मांडली. कुंडलीत लेबर, नौकर, अथवा कामगार हे ६ व्या स्थानावरून पाहतात.
नियम: जर ६ भावाचा सब हा जर ६-१०-११ पैकीचा कार्येश असून याच भावाच्या दशा-अंतरदशेत हे कामगार कामावर रुजू होतील.

६ व्या भावाचा सव हा शनी (सेवाधारी) असून त्यचे बलवान कार्येश पाहूया.

SATURN* : -4  6  7   5(cuspal) (Conj-KET 4 (JUP 4 ))(Asp-RAH 10 (MER 9  2  11 ))
2-Star-Lord is VEN: 8  3
3-Sub-Lord is KET: 4 (JUP 4 ) 5(cuspal)  (Conj-SAT 4  6  7 )
4-Star-Lord of SubLord is VEN: 8  3


शनी हा २-६-१०-११ या सर्व भावांचा कार्येश आहे यामुळे लेबर लोक कामावर परततील हे सिद्ध झाले.

१० भावाचा (कर्म स्थान) सब गुरु आहे

JUPITER : -  4(cuspal)
2-Star-Lord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)
3-Sub-Lord is JUP:  4(cuspal) 
4-Star-Lord of SubLord is MER: 9  2  11 (Conj-SUN 9  1)

गुरु बुधाच्या नक्षत्रात २-११-१, २ (धन) १-११ (जातकाची ईछपुर्ति होणे) त्यामुळे जातकाचे शिक्रपुरचे काम जाणार नाही..हे हि निश्चित झाले, तर मग हे लेबर कधी येतील त्यासाठी दशा स्वामी पाहूया.
चंद्र-मंगळ-गुरु हि दशा २३-०५-२०१९ पासून ते ६-०६-२०१९ पर्यंत आहे.

चंद्र हा स्वतःच्या नक्षत्रात असून मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ -१० आहे आणि मंगळ आणि गुरु हे दोन्ही ग्रह २-६-१०-११ चे बलवान कार्येश आहेत त्यामुळे वरील कालावधीत लेबर येतील असे सांगितले आणि २८/०५/२०१९ रोजी ३ मुल आली आणि बाकीची सर्व मुले ४/६/२०१९ रोजी येणार आहेत असे त्यांनी कळविले. असे ग्रह-नक्षत्र एका ज्योतिषाला अडचणीत असणाऱ्या जातकाचा प्रश्न सोडविण्यास मदत करतात त्यातच स्वामी महाराज वाचेला साथ देतात हे हि त्रिवार सत्य...

मंगळवार, २१ मे, २०१९

हरवलेले व्यक्ती सापडेल का ? जन्म कुंडली विवेचेन – भाग २


!!श्री स्वामी समर्थ!!
मागील भागात याच जातकाची प्रश्न कुंडलीवरून जातक सापडेल आणि जीविताला धोका आणि मृतदेह घरातील मागील परिसरात पाण्याच्या डबक्यात मिळाला, या सर्व घटना प्रश्न कुंडलीत तंतोतंत दर्शवित होत्या त्याचे विवेचन देखील भागिल भागात प्रश्न कुंडलीत केले आहे. जातकाच्या जन्म कुंडलीचा तपशील प्राप्त झाला आहे. मी जातक सापडेल कि नाही हा प्रश्न केवळ मात्र प्रश्न कुंडलीने सोडविला आहे, जन्म कुंडलीने नाही, हे येथे नमूद करू ईच्छितो, अशा काही प्रश्नांना प्रश्न कुंडलीची साथ मिळत असते, तत्कालीन प्रश्न हे प्रश्न कुंडलीवरून सोडवण्यात समीपता आणि यश मिळते. या जातकाचा जन्म कुंडली हि दिलेल्या तपशिलानुसार मी तयार केली, जातक अल्पआयु आहे, जीवनातील हि घटना याचा आढावा पाहूया.
जन्म तारीख: १४/०८/१९८८, जन्म वेळ: ०२:४५ जन्म स्थळ: ७३’ पू ९’’/ १९’ उ १५’’
प्रथम आयुष्यामानाचे काही नियम पाहूया.
लग्न भावाचा (प्रथम भाव) सब हा १-५-९-११ या भावाचा कार्येश असेल तर जातक हा दिघार्युषी असतो, जर हा सब २-६-७-८-१२ या भावाच्या कार्येश असून मारक आणि बाधक स्थानाचा (लग्नात चर राशी – ११ स्थान/स्थिर राशी – ९ स्थान/द्विस्वभावी – ७ स्थान बाधक स्थान असते) कार्येश असेल तर जातक हा अल्पायुषी असतो आणि मारक भाव हे २ आणि ७ आहेत. वरील सांगितलेल्या दोन्ही समान भाव दर्शवित असेल तर तो मध्यायु असतो. शास्रतात ३३ वर्षे अल्पायु आणि ६६ वर्षाच्या वर जगाला तर त्यास पूर्णआयु सांगितले आहे. असे काही नियम आहेत.
पुन्हा मी आपणास सांगू ईच्छितो तो की कधीहि आयुष्यमानाचे प्रश्न ज्योतिषाला विचारू नये केवळ अति संकटाच्या वेळी आथवा बिकट परस्थितीमध्येच हे पाहावे लागते याचे कारण जातकाचे आयुष्याची डोर हि कर्म, प्रारब्ध, संचित आणि भोग यावर अवलंबून असते आणि त्याची परीपक्व फलित तो परमेश्वर परमात्मा देत असतो. “परमेश्वरा मला आता उचल..!!” असे म्हणारे अंथरूणावर पडलेले असतात पण तो काही नेत नाही कारण त्याच भोग सरलेले नसतात. त्यासाठी सत्कर्म करावे, असो... आपण कुंडलीकडे वळूया...!!


या जातकाच्या कुडलीत लग्न भावाचा सब हा गुरु आहे त्याचे बलवान कार्येश पाहूया..
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- 12 7 10 Cusp Yuti: (12)
It's N.Swami :-------- Sun:- (2) 3 Cusp Yuti: (3)
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 6 4 8
या ठिकाणी गुरु हा रवी च्या नक्षत्र २ (मारक) ३ (अष्टामाचे ८ वे स्थान-संकट), आणि गुरु १२ स्थानी (मोक्ष स्थानी – अंतिम) तर गुरु सप्तमेश (बाधकेश असून येथे धनु रास (शनी+नेपचून+हर्शल) आहे आणि शनी (कर्म) ६-८ (आयुष्याला धोका) या सर्व भावांचा बलवान कार्येश/एकूण १-२-६-८-१२ या भावाचा बलवान कार्येश झाला आहे त्यामुळे जातक हा अल्पायु आहे असे प्रथम दर्शनी दिसते.
आयुष्याला धोका/अपघात अथवा संकट यासाठी ८ स्थान पाहावे लागते. या कुंडलीत अष्टम साथांचा सब हा शनी आहे. शनीचे बलवान कार्येश ग्रह पाहूया
PLANET : SATURN
Itself :-------------- Saturn:- (6) (8) 9
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Venus:- 1 5 12 Cusp Yuti: (1) Mars-Drusht 10 6 11
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (9) Rashi-Swami Saturn (6) (8) 9
Itself aspects :------ 1 9 4
येथे शनी एकमात्र असा ग्रह आहे जो जीवाला धोका दर्शवित आहे. पहा शनी १ भावार (जातक स्वत:) दृष्टी, तो धनुला असून ६ भावात आहे आणि या ठिकाणी वृश्चिक रास(पाणी साचलेले डबके) हि रास आहे, अष्टम स्थानावरून जातकाचा मृत्यू कसा होईल हे देखील कळवते आणि शनी अष्टमेश (धोका/संकट) आहे. त्यामुळे शनी आहे २-३-६-८ या आयुष्याच्या नकारात्मक भावाचा कार्येश झाला.
आपण आयुष्यमान पहिले, ८ स्थानावरून आयुष्याचा धोका देखील पहिला तर मग आता हि घटना घडली याचा विचार आपण दशास्वामी वरून करूया. यावेळी जातकाला चंद्र–शनी–शनी दशा १४/४/२०१९ ते १५/०७/२०१९ पर्यंत होती. शनी किती आयुष्याला धोका दायक आहे, वर संगीतलेच आहे. आता महादशा स्वामी चंद्र (पाणी तत्त्व) पाहूया:
PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- (3) 2 Mercury-Yuti (3) 1 (4)
It's N.Swami :-------- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
It's Sub :------------ Mercury:- 3 1 4 Moon-Yuti 3 2
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (3) Rashi-Swami Sun (2) 3
येथे चंद्र देखील ३ (८ चे ८ वे स्थान) २ (मारक) ४ (अंतिम चिरशांती) या भावाचा बलवान कार्येश असून, चंद्र केतूच्या नक्षत्रात असून ३ स्थानी चंद्र आणि केतू ग्रहण योगात आहे आणि जातक हा ३/५/२०१९ सायंकाळी घरातून निघून गेले त्यावेळी अमावास्या सुरु होती दुसऱ्या दिवशी शनी अमावास्याच होती आणि जातक हा मंगळवारी दि. ७/०५/२०१९ रोजी घराच्या मागील भागातील साचलेल्या पाण्याच्या डबक्यात त्याचे शव सापडेल या दिवशि रोहिणी नक्षत्र म्हणजेच चंद्राचे नक्षत्र होते. घटनेच्या वेळी गोचारेने चंद्र, रवी किंवा दशास्वामी हे दशास्वामी ग्रहांच्या नक्षत्रात भ्रमण करतात हा नियम देखील कुंडलीत येथे सिद्ध होतो. असे ग्रह, नक्षत्र, आणि राशी मनुष्य जीवनाचा आराखडा सांगतात, बाकी ज्योतिष शास्त्र थोतांड आहे असे म्हणार्यांना अजून काय सिद्द करून दाखवावे. असो....!! नमो नारायण !!

सोमवार, १३ मे, २०१९

“हरवलेली व्यक्ती परत घेईल का (सापडेल का)?....!!!”


श्री स्वामी समर्थ

मागील रविवारी दि. ०५ मे रोजी सकाळी ७ वाजता फोनची रिंग वाजली, माझी स्वामी मठात पूजेची तयारी सुरु होती, खूप अर्जंट आहे व्यक्ती घरातून ३ मे पासून घरातून निघून गेली आहे आणि आपण प्रश्न कुंडली मांडावी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने एक होरारी नंबर पाठविला आहे तो देखील मी पाठविला आहे असे तो म्हणाला त्यास मी पूजा आरती झाल्यावर ऑफस मध्ये गेलो कि प्रथम आपली कुंडली मांडून कळवतो असे सांगितले. हा फोन मुंबई येथून होता.

ऑफिस मध्ये आल्यावर कॉम्पुटर सुरु केले आणि प्रथम कुंडली मांडली, हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीने ५० हा नंबर दिला, त्यानुसार कुंडली मांडली आणि ७ स्थान (पतीचे स्थान) फिरवून कुंडली (लग्न भाव) तयार केली आणि तीच कुंडली पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न कुंडली: ५ मे २०१९, रविवार, वेळ: १०:४२:१३, स्थळ: औरंगाबाद, होरारी न. ५०
रूलीग प्लानेट: रवी, मंगळ शुक्र, गुरु, राहू, केतू

नियम:  हरवलेल्या व्यक्तीच्या लग्न भावापासून २-४-११ या भावापैकीचा कार्येश ग्रहाच्या दशा-अंतरदशेत व्यक्ती परत येते.

वरील नियमा व्यतिरिक्त जातकाच्या आयुष्याला काही धोका आहे का, तर अशावेळी लग्न भावाचा सब मारक/बाधक भावाचा कार्येश आहे किंवा नाही हे पाहून तो व्यक्ती जीवित अथवा मृत आहे आहे याचा देखील आढावा घ्यावा लागतो, मंगळ संबध असेल तर पोलिसांची मदत घ्यावी लागते हे सर्व काही पाहावे लागते आणि कुंडलीचा आधार घेऊन अंतिम निष्कर्श येवून उत्तर सोमोरील व्यक्तीस सांगावे लागते. हे नियम पाहूया या कुंडलीत.



कुंडलीत ७ भाव लग्नी मांडला आहे कारण पत्नीने प्रश्न विचारला आहे. या कुंडलीत १ भाव (जातक) आणि ८ भावाचा (धोका, संकट) सब (उपनक्षत्र स्वामी) हा बुध आहे आणि आत बुधाचे बलवान कार्येश ग्रह पाहूया.

० बुध:
केतू: १ (गुरु १२) (यु.शनी १, २, ३) (मंगळ दृ ६)
० रवी:
शुक्र:  ४ ११

एकूण: १-२-३-६-१२ आणि ४-११

बुध हा १ (हरवलेला जातक), १२ (लांब दूर, इस्पितळात, मंदिर), २ (मारक स्थान) ३ (८ चे ८ स्थान) मंगल ६ (पोलिसांचा आधार घेणे) आणि शुक्र मुळे ४ आणि ११ भावाचा कार्येश झाला त्यामुळे जातक हे सापडेल हे निश्चित झाले.

तसेच बुध हा सप्तमेश (बाधक) असून त्यात राहू देखील आहे याचाच अर्थ बुध हा १-२-७-६-१२ या भावाचा कार्येश असल्यामुळे जातकाच्या जीवाला धोका आहे आणि मंगळाचा संबध असल्याने पोलिसाचा आधार घ्यावा लागतो, दुय्यम कार्येश सब रवी हा ९-५ चा कार्येश असल्याने एक आशेचा किरण म्हणजे जातक जीवत आहे असे दर्शविते, आम्हाला अशा महत्वाच्या गोष्टीत एकदम अंतिम निर्णय घेता येत आणि जरी कुंडली पूर्णत: जीवाला धोका दर्शवित असली तरी ५-९ मुळे जातक कदाचित सुरक्षित आहे असे मी समोरील प्रश्न विचारलेल्या व्यक्तीस कळविले आणि दशा स्वामी काय सांगतो याचा विचार केला, तर प्रश्न हा भरणी नक्षत्रात विचारला, त्याचा स्वामी शुक्र आणि शुक्र चतुर्थी स्थानी (घरी घेईल/सापडेल), मीन रास या ठिकाणी (जल तत्वाची रास), शुक्र बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध चतुर्थात, सप्तमेश (बाधक स्थान), दशमेश (११ चे व्यय) आणि हा शुक्र मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ ६ (पोलीस आधार), १२ व्या स्थानाचा अधिपती (हॉस्पिटल, धोका) आणि वृश्चिक रास (साचलेला डबके अथवा गटार) असे दर्शवितो कि दशा देखील पूर्णत: नकारात्मक झाली आहे जातकाच्या जीवाला धोका आहे हे मात्र आता निश्चीत वाटत होते. तरी देखील रुलिंग प्लानेटचा आधार घेऊन समोरील व्यक्तीस आपण पोलिसांची मदत घ्यावी आणि जातक हे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सापडतील असे संगीतले, ५-९ भावामुळे ते कदाचित जीवित असतील असे हि सांगितले. परंतू प्रश्न कुंडली अगदी बरोबर सांगत होती, जातकचा मृतदेह मंगळवारी सूर्यास्तापूर्वी त्यांच्याच घरातील मागच्या बाजूच्या डबक्यात तरंगत होता आणि पुढील तपास हे पोलीस करती आहेत.
याच कुंडलीत अजून खूप बारकावे आहेत विचार केला तर प्रत्यक घटनेचे उत्तर मिळते असो कधी कधी कुंडलीत नकारात्मक गोष्टी दिसत असल्यातरी समोरील व्यक्तीस सांगण्याचे धाडस होत नाही, खूप विचार करून समर्पक उत्तर द्यावे लागते. हरवलेल्या व्यक्तीची जन्म कुंडली तपशील प्राप्त झाला आहे, पुढील भागात जन्म कुंडलीचे विवेचण पाहूया...!!! ॐ शांती !!!






मंगळवार, ७ मे, २०१९

मंगळाचा मिथून राशीत प्रवेश


श्री स्वामी समर्थ 
आज दि. ७ मे २०१९ रोजी मंगळाचे राशी परिवर्तन सकाळी मिथुन राशीत झाले आणि मंगळ आणि राहू हा अंगारक योग असून शनी-केतू ची देखील दृष्टी आहे. या योगाचा १२ राशीवर निश्चितच परिणाम होणार आहे. २२ जून पर्यंत आहे मंगळ हा मिथून राशीत आहे. याचा परिमाण भौतिक दृष्ट्या देखील होणार आहे. गर्मी वाढेल कारण मंगळ उष्णतेचा कारक, पाण्याचे संकट निर्माण होतील तर शनी दृष्टी युक्त असल्याने राजनैतिक उलथा-पालथ देखील होणार आहे आणि याचा परिणाम आपण २३ मे रोजी पाहणारच आहोत. मंगळ हा शत्रू राशीत आहे आणि शत्रू ग्रहा बरोबर म्हणजेच राहू बरोबर अंगारक योग करीत आहे. त्यामुळे १२ राशीला तो वेग वेगळा परिणाम देणार ठरेल.

मंगळाचे गोचर राशी फळ
मेष:- मेष राशीतील तिसरा मंगळ हा भावंडात वाद निर्माण करणारा ठरेल तर वाहन सावकाश चालवणे योग्य ठरेल. संपत्ती बाबत सावधान राहा, फसवणूक होऊ नये.

वृषभ : या राशीला दुसरा मंगळ हा, कोर्ट आणि कचेरीत आपण विनाकारण ओढले जाऊ शकता. पैसे उधार देऊ नका. धर्याने काम करा.

मिथून : याच राशीत मंगळ-राहू हा अंगारक योग आहे, कर्ज वाढेल, संध्याकाळी प्रवास टाळावा. मानसिक तणाव देखील वाढेल, वडिलांशी वाद होतील. त्यामुळे आपण शांत राहणे योग्य राहील.

कर्क : मंगळ या राशीला १२ राहणार आहे. वाहनासाठी आणि घर कामासाठी पैसा खर्च होईल. नियमाचे पालन करा नाही तर कानुनी पेचात अडकाल.

सिंह:  ११ वा मंगळ आपणास अचानक धन लाभ करून देऊ शकतो मग शेअर असो अथवा लॉटरी मार्फत असो ते धन प्राप्त होईल. मित्रांनावर विश्वास ठेवू नका.

कन्या: १० वा मंगळ कामाची दग-दग वाढेल आणि पैसे हि कमी मिळतील केवळ ढोर महिनत होणार आहे.

तुला: ९ वा मंगळ भाग्याला साथ मिळेल. यात्रेचा योग येईल.  मोठी कामे मार्गी लागणार आहेत.  लांबचे प्रवास देखील होतील. परदेश जाण्याचे योग आहेत.

वृश्चिक: ८ वा मंगळ या राशीला अशुभ फळे देणारा ठरेल. सावधान राह, आर्थिक आणि मानसिक हानी होणार आहे. त्यामुळे सतर्क रहा.

धनु: ७ वा मंगळ पती-पत्नी मध्ये वाद निर्माण होऊ शकता. संशयाचे वातावरण तयार होऊन गैरसमज वाढणार आहे. प्रेमात वाद निर्माण होतील, वेळ सावधान राहण्याची आहे.


मकर:  ६ वा मंगळ रोग वाढवू शकतो. शत्रू हे हवी होणार आहेत. सत्याने वागा पुढे परिणाम चांगले मिळतील. रोगाचे निदान लावर होणार नाही. काळजी घ्या.

कुंभ:  ५ वा मंगळ हा नौकरीत समस्या निर्माण करू शकतो, उत्त्पन्न कमी होईल, मुलांच्या स्वथाकडे लक्ष्य द्यावे लागेल.

मीन : ४ था मंगळ आईची काळजी घावी. सुखात कमतरता येईल. घरात वाद टाळा.  चिंता वाढणार आहे. विवाद होणार नाही याची देखील काळजी घ्या.

ज्योतिषकार: श्री दिपक चंद्रकांत पिंपळे / ९८२३४४८४४९



शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

......माझी counseling (समालोचन) देखील असफल ठरले... !!!


!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली एका स्त्री जातकाची आहे. विवाहास साधारण तीन वर्षे झाली आहेत. मी ज्योतिष जरी असलो तरी देखील counseling चे कार्य देखील मला करावे लागते कारण त्या जातकाची दशा पुढील काही काळापुर्तीच नकारात्मक सुरु असते त्यासाठी हा समजविण्याचा आमचा हट्टहास असतो, परंतू कुंडलीतील ग्रह आपले परिणाम देण्यास सज्ज झालेले असतात अशीच हि कुंडली आहे. विवाह मोडण्याची आणि घटस्पोट घेण्याचा  निर्णय या मुलीने घेतला आहे. परंतू या मुलीच्या कुंडलीत गुरु ३ स्थानी (सुप्तमन) आणि तो ७ भावाला (पती/life partner स्थान) बघत आहे आणि गुरु ९ भावाला देखील बघत आहे (३-९ स्थाने म्हणजे करार-समजाविणे यामध्ये यश येते) त्यामुळे counseling आणि समजविण्याचा प्रयत्न निश्चितच करणे आवश्यक असते. गुरु जर बलवान अथवा सप्तमावर दृष्टीयुक्त असेल कुंडलीत तर सहसा विवाह मोडत नाही, शेवटी शनी महाराज (न्याय/कर्माची फळे देणारा ग्रह) जो परिणाम द्यायचा आहे तो देणारच कारण ते कार्यच त्यांचाकडे आहे आणि शेवटी माझी counseling मात्र फेल झाली आणि या मुलीने आणि मुलाने देखील divorce घेण्याचे अखेर ठरविले आहे. हे couple माझ्याकडे जानेवारीत आले होते. पाहूया कुंडलीत ग्रह आणि शनी महाराज कसे परिणाम देत आहे.


नियम: जर ७ भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी) जर २ (सुख/पैसा), ७ (life partner/पती/पत्नी) आणि ११ (लाभ/पक्की मैत्री) या भावांचा कार्येश असून दशास्वामी देखील या भावांचे कार्येश असेल तर विवाह आणि वैवाहिक सुख मिळते.


सदर स्त्री जातकाच्या कुंडलीत ७ भाव (वैवाहिक सुख) सब हा शनी आहे. शनी ४ स्टेप बलवान कार्येश पद्धतीनुसार २-७-११ या भावाचा कार्येश नाही तो केवळ ५ स्थानचा कार्येश आहे. तर शनी हा शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या सब मध्ये आहे आणि शुक्र ६ स्थान (वैवाहिक सुखाचे विरोधी स्थान) मध्ये आहे आणि त्यातच आगीत तेल ओतण्याचे काम प्लुटोने केले केवळ ३ डिग्रीच्या ७ भावारंभावार आहे. त्यामुळे वैवाहिक सुखास कमतरता निर्माण झाली.

आता पाहूया दशास्वामी या मुलीला केतूची दशा १५/९/२०१८ समाप्त झाली आणि शुक्राची महादशेला सुरुवात झाली याच महिन्यापासून दोघांचे भांडणे वाढली आहे आणि हि दशा पुढील २० वर्षे आहे आणि शुक्र-शुक्र-शुक्र १५/९/२०१८ ते ६/०४/२०१९ पर्यंत आहे. शुक्र हा ६ स्थानी (७ स्थानाचे व्यय) आहे तो मंगळच्या नक्षत्रात आहे मंगळ हा लग्नेश १ (२-सुख स्थानचा व्यय) असून तो ५ स्थानी आहे आणि शुक्र हा बुधाच्या सब मध्ये आणि बुध देखील ६ स्थानी आहे त्यावर शनी दृष्टी आहे त्यामुळे तो ८ (अडचणी) देखील कार्येश झाला. ४ स्टेप पद्धतीने तो ७-११ चा कार्येश आहे परंतू येथे शनी गोचर पहा कसा परिणाम करत आहे. अष्टक वर्गानुसार शनीचे भ्रमण भाग्य स्थानातून (सासू-सासरे) होत आहे आणि या भावाला केवळ १ बिंदू (कमित कमी २ च्या वर गुण असावे) आहे आणि ७ भावाला २० बिंदू (२४ च्या वर बिंदू असावे) आहे. सध्या जानेवारी २०१९ रोजी शनी १९ अंशावर आहे तर नेपचून हा फसवा ग्रह देखील याच भावात १६ अंशावर आणि हर्षल शनी १३ अंशावर आहे येथेच शनीचे भ्रमण नकारात्मक ठरले सासू-सासरे पासून विभक्त राहणे हि या मुलीची पहिली अट आहे आणि मुलगी हि डिसेंबर २०१८ पासून माहेरी आहे आणि त्यांनी मला आजच कळवल त्यांचा निर्णय, मुलाच एकत्र कुंटुंब आहे आणि वैभाशाली आहे. पण शेवटी ग्रहांनी परिणाम केला हे मात्र निश्चित...!! हे जोडप एकत्र येईल असे मला वाटते कारण २३ जाने २०२० ला शनी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल.आणि मुलीची साडेसाती देखील संपते....यांनी एकत्र यावा हीच स्वामी चरणी प्रार्थना ..!! शुभम भवतु !!

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple



 तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते.
 मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात.
 मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते.
 मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते.
 वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.
 वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात.
 मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. तसेच मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात त्यामुळे हास्य आणि नेतृत्व असे उत्तम मिश्रण दिसून येते.
 कर्क आणि मीन - या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात. समोरच्याला सांभाळून घेणे हीच मोठी गोष्ट जमत असल्याने यांचे चांगले जमू शकते.
 सिंह आणि धनू - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. धनु राशीच्या लोकांना मस्ती, मजाक करणे आवडते.
 कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. त्यामुळे मकर राशीचे लोक यांच्याकडे फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात.
 सिंह आणि मिथुन - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्तीसोबत हे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.
 वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.
 वृश्चिक आणि कर्क - या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
 वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
 कुंभ आणि मिथुन - या दोन्ही राशींचे विशेष म्हणजे या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.
 मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर प्रेमळरित्या अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते. त्यामुळे यांचे चांगले जमू शकते.
(संग्रहित - दिपक पिंपळे -९८२३४४८४४९ )
No photo description available.

बुधवार, १६ जानेवारी, २०१९

जे घडायचे होते तेच शेवटी घडले.....!!!!


!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली ही पुरुष जातकाची आहे. या मुलाचे पालक माझ्याकडे पूर्वी पासून जन्मपत्रिका दाखवाण्यासाठी येतात आणि एक ज्योतिष म्हणून कुंडलीत जे आहे ते मला सांगणे हेच माझे कर्तव्य आहे. या जातकाचा डिसेंबर २०१८ रोजी विवाह मोडला आणि विवाह हा डिसेंबर २०१७ रोजी झाला होता. याची चाहूल एक ज्योतिष म्हणून आम्हाला होती याची ताकीद मी त्यांना दिली देखील मी कुंडली मिलन करता बऱ्याचवेळी मुलीच्या कुंडली गुणमिलन चांगले अगदी गुण २७, २१ आणि ३६ गुणाच्या कुंडल्या बाजूला काढून ठेवतो आणि दुसरे गुरुजी हो पुढे जाण्यासा हरकत नाही असे हे पालक सांगतात. या मुलाचे लग्न अजून एक ते दोन वर्ष करू नका असे मी सांगत होतो. परंतू मुलगा चांगला इंजिनिअर आहे नौकरी आहे, वय देखील वाढत आहे, मुली देखील येत आहे या कारणामुळे पालकांनी निर्णय घेतला आणि घडायचे तेच घडले. काही गोष्टी ह्या विधीलिखितच असतात हेच खर...!! एक ज्योतिष काही नकारात्मक बाबी कुंडलीत दिसत आहे हे ओरडून सांगत असतो, परंतू त्याचा दैव योगच तसा असतो आणि ती घटना घडते.



आता कुंडलीचा विचार करूया, या कुंडलीत ७ भावाचा सब हा शनी आहे. आणि शनी बुधाच्या नक्षत्रात आहे आणि बुध (नपुसक ग्रह) शुक्र (विवाह कारक) आणि प्लुटो (स्पोटक) पूर्ण युती योगात आहे. शनी आणि हर्शल युती युक्त आहे आणि हे दोन्ही ग्रह सप्तम (पती/पत्नी) स्थानला बघत (दृष्टी) आहे आणि सर्वात विध्वंसक योग म्हणजे शनी आणि प्लुटो ३७ डिग्री असे अंतर, अशा बर्याच कुंडल्यात विवाह मोडतात आणि या योगाच्या कुंडल्यांचा संग्रह माझ्याकडे आहे.  बुध अष्टमेश व्ययात (बेडरूम) शक्र-प्लुटो युक्त आहे त्यामुळे यांचे शयनकश स्थान बिघडले. शुक्राची महादशा नोव्हेंबर २०१५ सुरु झाली आणि शुक्र २-७-११ या भावांचा बलवान कार्यश झाला त्यामुळे विवाह होणार हे लिखित होते. शुक्र किती खराब झाला आहे हे मी वर सांगितले तसेच ७ भावाचा सब देखील कसा व्ययात बुधाच्या नक्षत्रात स्पोटक झाला हे देखील पाहिले. डिसेंबर २०१७ रोजी विवाह झाला त्यावेळी शुक्र-शुक्र-शनी ची दशा सुरु होती आणि अंतरदशास्वामी शनीचा प्रवेश नुकताच ऑक्टोबर २०१७ रोजी धनु राशीत झाला होता. आणि या मुलाच्या सुखस्थानी (द्वितीय स्थान) ११ अंशावर नेपचून हा फसवा ग्रह आहे. विवाह हा डिसेंबर २०१८ रोजी मोडला मुलगी एक महिन्याअगोदरच माहेरी निघून गेली. यावेळी शनी हा १५ अंशावर कुंडलीतील नेपचून वरून गोचर करीत होता केवळ ४ degree (फसवणूक) दर्शवितो, शुक्र-शुक्र-बुध हि दशा २३ डिसेंबर २०१८ पर्यंत होती आणि बुध कसा बिघडला हे वर सांगितलेच आहे तर दशास्वामी शुक्र यावेळी तुळ राशीत होता जो कि मुळ कुंडलीत देखील तूळ रास व्ययस्थानी आहे. असे ग्रह आणि असे परिणाम करतात. स्वामी महाराजांचे नाव घेऊन ज्योतिष मार्गदर्शन करतो आणि त्यांचे साथही मिळते हे देखील त्रिवार सत्य. त्यामुळे आपणस एकच सांगणे आहे गुण मिलानापेक्षा कुंडलीस महत्त्व द्यावे हे मी नेहमी सांगतो.
Preview